Health-and-Nutrition/C2/Importance-of-Folate/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:06, 20 July 2021 by Latapopale (Talk | contribs)
|
|
00:00 | फोलेटचे महत्त्व ह्यावरील ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण पाहणार आहोत : |
00:09 | शरीरातील फोलेटची भूमिका. |
00:12 | फोलेटच्या कमतरतेचे परिणाम. |
00:15 | भिन्न वयोगटांसाठी फोलेटची आवश्यकता. |
00:20 | जीवनसत्त्व-ब9 हे पाण्यात विरघळणारे एक महत्त्वपूर्ण ब-जीवनसत्त्व आहे. |
00:25 | त्याचे दोन प्रकार आहेत : फोलेट आणि फॉलिक आम्ल. |
00:30 | फोलेट हा एक नैसर्गिक प्रकार आहे आणि तो नैसर्गिकरित्या पदार्थांमध्ये आढळतो. |
00:35 | फोलेटदेखील आपल्या आतड्यांमधील जीवाणूंमुळे तयार होते. |
00:41 | तर, फॉलिक आम्ल हे सिंथेटिक स्वरूप आहे. |
00:45 | हे रासायनिकरित्या समृद्ध अन्न किंवा पूरक पदार्थांमध्ये आढळते. |
00:51 | फोलेट हे फॉलिक आम्लच्या तुलनेत आपल्या शरीरात सहजपणे शोषले जाते. |
00:58 | आता आपण आपल्या शरीरात फोलेटची भूमिका आणि |
01:02 | त्याच्या कमतरतेचे परिणाम पाहू. |
01:05 | आपल्या शरीरातील विविध कार्यांसाठी फोलेट आवश्यक आहे. |
01:09 | नवीन पेशींची वाढ, दुरुस्ती, विभाजन आणि निर्मितीसाठी आपल्या शरीराची त्याची आवश्यकता आहे. |
01:18 | फोलेट हे होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते. |
01:23 | होमोसिस्टीन हे एक प्रकारचे अमीनो आम्ल आहे जे प्रथिने तयार करण्यासाठी वापरला जाते. |
01:29 | उच्च होमोसिस्टीन पातळी संज्ञानात्मक कार्यात बिघाड आणते. |
01:34 | हे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसानदेखील करते. |
01:39 | यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. |
01:43 | अशाप्रकारे, फोलेट हृदय आणि संज्ञानात्मक कार्य टिकवून ठेवण्यास मदत करते. |
01:48 | निरोगी गर्भधारणेसाठी |
01:51 | आणि न्यूरल ट्यूब बंद करण्यासाठीदेखील हे आवश्यक आहे. |
01:55 | न्यूरल ट्यूब हे बाळाच्या मेंदूत आणि पाठीच्या कण्यामध्ये विकसित होते. |
02:01 | न्यूरल ट्यूब बंद करण्यात अयशस्वी झाल्यास न्यूरल ट्यूबमध्ये दोष असू शकतो. |
02:07 | न्यूरल ट्यूबमधील दोष हे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील जन्म दोष आहेत. |
02:13 | दोन अतिसामान्य न्यूरल ट्यूब दोष आहेत - एनसेफॅली आणि स्पाइना बिफिडा. |
02:20 | एन्सेफलीमध्ये, बाळाचा मेंदू आणि कवटीचे भाग योग्यप्रकारे तयार होत नाहीत. |
02:27 | स्पाइना बिफिडामध्ये, बाळाच्या मणक्याचा योग्यप्रकारे विकास होत नाही. |
02:33 | त्यामुळे, बाळाला शारीरिक अपंगत्व येऊ शकते. |
02:38 | त्यामुळे पायाचे स्नायू कमकुवत आणि पक्षाघात होऊ शकतो. |
02:43 | पाठीचा वक्र कणा आणि मूत्रमार्गाच्या मूत्राशयावर नियंत्रण न राहणे ही इतर लक्षणे आहेत. |
02:49 | खाण्यात आणि गिळण्यात त्रास होणे हेदेखील सामान्य आहे. |
02:55 | त्यांना शिकण्यात आणि लक्ष देण्यासही अडचण येऊ शकते. |
03:00 | गर्भधारणेच्या 28 दिवसांच्या आत न्यूरल ट्यूब बंद होते. |
03:06 | ह्यावेळेपर्यंत महिलेला ती गर्भवती आहे हेदेखील माहित नसते. |
03:12 | तिला माहित होईपर्यंत हा दोष टाळण्यास खूप उशीर झाला असेल. |
03:18 | सर्व महिलांनी, विशेषतः पुनरुत्पादक वयात पुरेसे फोलेटने समृद्ध अन्न घेतले पाहिजे. |
03:25 | न्यूरोल ट्यूब दोष टाळण्यासाठी, फोलेटसोबत इतर पोषकतत्त्वेदेखील महत्त्वपूर्ण आहेत. |
03:32 | उदाहरणार्थ : जीवनसत्त्व-ब 12 आणि कोलीन. |
03:39 | गर्भधारणेदरम्यान, फोलेटची आवश्यकता वाढते. |
03:45 | यावेळी अपुरे सेवन केल्याने फोलेटची कमतरता उद्भवू शकते. |
03:51 | शरीराद्वारे फोलेटचे अपुरे शोषण केल्याने त्याची कमतरता जाणवते. |
03:58 | मद्यपान जरी जास्त केले तरी त्याचा तोच परिणाम होतो. |
04:03 | जीवनसत्त्व-ब12 ची कमतरता अप्रत्यक्षपणे फोलेटची कमतरता होऊ शकते. |
04:09 | आपल्या शरीरात फोलेट असले, तरी ते त्याचे कार्य करण्यास सक्षम असणार नाही. |
04:16 | कारण फोलेटला त्याच्या सक्रिय स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी जीवनसत्त्व-ब12 आवश्यक आहे. |
04:24 | म्हणून, फोलेटसोबत जीवनसत्त्व-ब12 चे पुरेसे सेवन महत्त्वाचे आहे. |
04:31 | अंडी, कोंबडी, मांस आणि दुधाचे पदार्थ जीवनसत्त्व-ब12 चे चांगले स्रोत आहेत. |
04:39 | कवच असलेले मासे(खेकडा), लिवर, हृदय, मूत्रपिंड, मेंदू सारखे मटणाचे अवयव ही इतर उदाहरणे आहेत. |
04:47 | अनुवांशिक अशक्तपणा असलेल्या व्यक्तींना फोलेटच्या कमतरतेचा धोका असू शकतो. |
04:54 | अनुवांशिक अशक्तपणाची उदाहरणे आहेत - सिकल सेल अनेमिया(अशक्तपणा) |
04:58 | आणि थॅलेसीमिया. |
05:01 | अशा परिस्थितीत लाल रक्त पेशी जितक्या वेगाने तयार केल्या जाऊ शकता त्यापेक्षा जास्त वेगाने त्या नष्ट होतात. |
05:08 | अशा परिस्थितीत पर्याप्त प्रमाणात फोलेट घेण्याची शिफारस केली जाते. |
05:14 | कृपया कोणतेही पूरक घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टराचा सल्ला घ्या. |
05:19 | आता, फोलेटच्या कमतरतेची लक्षणे पाहू. |
05:24 | ही लक्षणे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही दिसू शकतात. |
05:29 | सुरुवातची काही लक्षणे म्हणजे जीभ आणि ओठांना वेदना होणे आणि लालसरपणा येणे. |
05:35 | इतर लक्षणे म्हणजे थकवा, |
05:38 | चिडचिड, झोपेचा त्रास |
05:41 | आणि औदासिन्य. |
05:43 | तोंडात किंवा पोटात अल्सरदेखील होऊ शकतो. |
05:47 | दीर्घकालीन कमतरता ही स्मरणशक्ती आणि लक्ष वेधण्याचा कालावधी कमी करते. |
05:53 | गरोदर महिलांमधील फोलेटच्या कमतरतेचा लहान मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. |
05:59 | उदाहरणार्थ : न्यूरल ट्यूब दोष आणि |
06:03 | शिशूंचे क्लेफ्ट लिप (फाटलेला ओठ), क्लेफ्ट पॅलेट (चिरलेला टाळू |
06:07 | क्लेफ्ट हे वरच्या ओठात किंवा तोंडाच्या वरच्या भागात असलेली एक फट किंवा उभी चीर आहे. |
06:13 | गर्भाशयात वाढ होताना ऊती एकाच ठिकाणी एकत्रित होत नसल्यास हे घडते. |
06:20 | फोलेट किंवा जीवनसत्त्व-ब12 च्या कमतरतेमुळे मॅक्रोसिटीक अनेमिया (अशक्तपणा) होतो. |
06:27 | हे कसे घडते ते मी तुम्हाला समजावून सांगते. |
06:30 | सामान्य पेशींच्या वाढीसाठी आणि विभाजनासाठी ह्या दोन्ही पोषकतत्त्वांची आवश्यकता असते. |
06:36 | त्यांची कमतरता झाल्यास लाल रक्तपेशी योग्यरित्या परिपक्व होत नाहीत किंवा विभाजित होत नाहीत. |
06:43 | परिणामी, मोठ्या अपरिपक्व लाल रक्तपेशी तयार होतात ज्या संख्येने कमी आहेत. |
06:51 | त्यांच्यात हिमोग्लोबिन खूप कमी असते आणि ते योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसतात. |
06:59 | हिमोग्लोबिन हे अन्य ऊतके आणि पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्यास मदत करते. |
07:06 | अशाप्रकारे, कमी हिमोग्लोबिन पातळीमुळे अनेमिया (अशक्तपणा) होऊ शकतो. |
07:11 | विविध वयोगटांसाठी फोलेटच्या दररोजच्या शिफारसी पाहू. |
07:18 | 1 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी 90 मायक्रोग्राम आवश्यक आहे. |
07:24 | 4 ते 9 वर्षांच्या मुलांसाठी ते 110 ते 142 मायक्रोग्राम आहे. |
07:32 | 10 ते 15 वर्षांच्या पौगंडावस्थेतील मुलांसाठी ते 180 ते 204 मायक्रोग्राम आहे. |
07:42 | 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पौगंडावस्थेसाठी दररोज 200 मायक्रोग्राम शिफारस केली जाते. |
07:50 | प्रौढ महिला आणि पुरुषांसाठी ते 200 ते 250 मायक्रोग्राम आहे. |
07:58 | गर्भवती महिलांमध्ये सुमारे 500 मायक्रोग्राम असावे. |
08:02 | स्तनपान देणाऱ्या मातांसाठी ते 300 मायक्रोग्राम आहे. |
08:07 | जन्म दोषाचा इतिहास असलेल्या महिलांसाठी फोलेटची आवश्यकता जास्त आहे. |
08:15 | त्यांनी गर्भधारणेपूर्वी आणि गर्भावस्थेच्या दरम्यान 500 मायक्रोग्राम घ्यावे. |
08:22 | ज्या स्त्रिया गरोदरपणाची योजना करत आहेत त्यांनाही पुरेसे फोलेट घेण्याची शिफारस केली जाते. |
08:29 | फोलेटची आवश्यकता आहारातून पूर्ण केली जाऊ शकते. |
08:33 | वेलीच्या शेंगा हे फोलेटचे उत्कृष्ट स्रोत आहेत. |
08:36 | 30 ग्रॅम किंवा ½ कप न शिजवलेल्या वेलीच्या शेंगांमुळे 80 ते 120 मायक्रोग्राम फोलेट मिळतात. |
08:46 | चवळी, राजमा, मटकी, सोयाबीन ही काही उदाहरणे आहेत. |
08:53 | चणे, वाल पापडी, कुळीथ, सुके वाटाणे चांगले स्त्रोत असले तरी |
09:00 | हिरव्या पालेभाज्यादेखील फोलेटने समृद्ध आहेत. |
09:04 | उदाहरणार्थ : पालक, राजगिऱ्याची पाने, काळ्या अळूची पाने, अगाथीची पाने. |
09:11 | 50 ग्रॅम किंवा १ कप कच्च्या पालकमधून 70 मायक्रोग्राम फोलेट मिळेल. |
09:19 | 1 चमचा शेवग्याच्या पानांचे चूर्ण फोलेट 10 मायक्रोग्राम फोलेट देते. |
09:27 | फोलेटने समृद्ध असलेल्या इतर भाज्या आहेत - कोवळी वाल पापडी, फरसबी आणि बीट. |
09:35 | अगदी फ्लॉवर, भेंडी आणि शेवग्याच्या शेंगांमध्ये मध्यम प्रमाणात फोलेट असते. |
09:43 | सूर्यफुलाच्या बिया, मोहरी आणि कारळ्यांमध्ये फोलेट कमी प्रमाणात असते. |
09:50 | या बियांच्या 1 चमचा चूर्णामध्ये सुमारे 15 ते 20 मायक्रोग्राम फोलेट असतात. |
09:59 | मांसाहारी पदार्थांमध्ये चिकन कलेजी आणि सर्व समुद्री खाद्य उत्कृष्ट स्रोत आहेत. |
10:06 | 60 ग्रॅमचे 1 चिकन कलेजी 600 मायक्रोग्राम फोलेट देईल. |
10:13 | कोणतेही 100 ग्रॅम समुद्री खाद्य 700 मायक्रोग्रामपेक्षा जास्त फोलेट देईल. |
10:20 | कृपया लक्षात घ्या की अति उष्णता आणि पाणी फोलेटचे प्रमाण कमी करते. |
10:26 | म्हणूनच, अति शिजविणे आणि पुन्हा पुन्हा अन्न गरम करणे टाळा. |
10:33 | भाज्या उकळण्याऐवजी परतल्या किंवा वाफवल्या जाऊ शकतात. |
10:38 | शिजवण्यापूर्वी डाळी नेहमी रात्रभर भिजवत ठेवव्यात. |
10:43 | कडधान्यांना मोड आणणे आणि शिजवल्यामुळे त्यातील पौष्टिक सामग्री वाढते. |
10:49 | आंबवणे आणि भाजणेदेखील फोलेटचे शोषण सुधारण्यास मदत करते. |
10:56 | फोलेटचे पुरेसे सेवन आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. |
11:01 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. सहभागी होण्यासाठी धन्यवाद. |