LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Working-with-Data-in-Calc/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:06, 14 December 2020 by Madhurig (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
TIME NARRATION
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Working with data in Calc वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः

Fill tools वापरून data ऑटोफिल करणे.

00:15 एका spreadsheet च्या सर्व sheets वर तेच कंटेंट समाविष्ट करणे.
00:22 cell मधील data काढणे, data रीप्लेस करणे, data चा काही भाग बदलणे.
00:29 या पाठासाठी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:43 spreadsheet मधे data समाविष्ट करणे खूप श्रमाचे असू शकते.
00:49 हे बऱ्याच प्रमाणात सोपे करण्यासाठी Calc अनेक टूल्स प्रदान करते.
00:56 सर्वात मूलभूत क्षमता म्हणजे माऊसच्या सहाय्याने एका cell मधील कंटेंट अन्यत्र ड्रॅग आणि ड्रॉप करणे.
01:05 तथापि data ची पुनरावृत्ती असेल तेव्हा इनपुट आपोआप होण्यासाठी Calc मध्ये इतर टूल्स देखील आहेत.
01:14 असे एक टूल म्हणजे Fill tool.
01:18 याद्वारे एकाच spreadsheet वरील अनेक sheets वर एकाच वेळी data भरू शकतो.
01:26 Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा.
01:31 या फाईलमधील heading Cost च्या खालील data, त्याच्या शेजारील cells मध्ये कॉपी करूया.
01:39 Cost खालील 6000 एंट्री असलेल्या cell वर क्लिक करा.
01:45 mouse चे डावे बटण दाबून ठेवून cell च्या शेवटपर्यंत ड्रॅग करा, ज्यामध्ये 2000 ही खर्चाची नोंद आहे.
01:54 निवडलेल्या cells च्या उजवीकडील शेजारच्या cells देखील त्याचबरोबर सिलेक्ट करा.
02:01 या शेजारील cells मधे data कॉपी करू.
02:05 आता mouse चे डावे बटण सोडा.
02:09 menu bar मधील Sheet menu वर क्लिक करा. Fill Cells च्या सबमेनूवर जा.
02:17 सबमेनूतील Fill Right पर्यायावर क्लिक करा.
02:22 किंवा Standard toolbar मधील ड्रॉपडाऊनवरील Column आयकॉनवर क्लिक करा.

नंतर Fill Right पर्यायावर क्लिक करा.

02:34 heading Cost खालील data शेजारच्या cells मधे कॉपी झाल्याचे दिसेल.

हे बदल Undo करा.

02:45 Fill tool चा अधिक गुंतागुंतीचा उपयोग म्हणजे sheets मधे काही Series, data म्हणून भरण्यासाठी होतो.
02:54 पूर्ण आणि संक्षिप्तपणे लिहिलेल्या आठवड्याच्या वारांसाठी आणि वर्षांच्या महिन्यांसाठी Calc डिफॉल्ट रूपात याद्या देते.
03:04 हे users ना त्यांच्या स्वत:च्या याद्या तयार करू देते.
03:10 आता आपल्या sheet मध्ये Days नावाचे नवीन heading समाविष्ट करू.
03:16 याखाली आठवड्याचे सात वार आपोआप दाखवू.
03:22 Days heading च्या खालील पहिले सात cells निवडा.
03:27 menu bar मधील Sheet menu वर क्लिक करा. नंतर Fill Cells सबमेनूवर क्लिक करा.
03:35 सबमेनूमधून Fill Series पर्याय निवडा.
03:40 Fill Series डायलॉग बॉक्स दिसेल.
03:44 आता Series Type मधील AutoFill पर्यायावर क्लिक करा.
03:49 Start value फिल्डमधे आठवड्याचा पहिला दिवस म्हणून Sunday टाईप करू.
03:57 Increment फिल्ड आधीच 1 म्हणून सेट केले आहे.
04:02 आता OK बटण क्लिक करा.
04:05 cells मध्ये सर्व दिवस आपल्याला आपोआप भरलेले दिसतील.
04:11 या पध्दतीद्वारे फक्त weekdays आणि months समाविष्ट करू शकतो कारण ते Calc मधे pre-defined आहेत.
04:20 ऑटोफिलिंग सिक्वेन्शियल data साठी आपण आणखी एक पद्धत पाहणार आहोत.
04:26 आणखी एका cell मधे Sunday टाईप करून Enter दाबा.
04:31 आपण column मधील पुढच्या cell वर जाऊ.
04:36 जिथे Sunday टाईप केले होते त्या cell वर परत जाऊ.
04:41 cell च्या उजव्या कोपऱ्यातील तळाशी एक छोटा black box दिसेल.
04:47 माऊसच्या सहाय्याने या box वर क्लिक करा.
04:51 उजवीकडील डिस्प्ले बॉक्समध्ये Saturday दिसेपर्यंत खाली ड्रॅग करा.

माऊसचे बटण सोडा.

05:01 cells मधे आठवड्याचे दिवस आपोआप भरले जातात.
05:06 ही पद्धत अनुक्रमिक असलेल्या सर्व data साठी कार्य करते.
05:11 हे बदल Undo करा.
05:15 आता start, end आणि increment च्या व्हॅल्यूज भरून numbers ची autofill मालिका तयार करू .
05:24 प्रथम A2 ते A8 या cells मधे समाविष्ट केलेले सिरीयल क्रमांक काढून टाकू.
05:33 menu bar मधील Sheet वर क्लिक करा.

नंतर Fill Cells आणि Fill Series पर्यायावर क्लिक करा.

05:45 Fill Series डायलॉग बॉक्समधील Series Type खालील Linear पर्यायावर क्लिक करा.
05:53 Start value फिल्डमधे 1 हा पहिला सिरीयल नंबर टाईप करू.
06:00 End value फिल्डमधे 7 ही शेवटची व्हॅल्यू टाईप करू.
06:08 आता आधीपासून व्हॅल्यू 1 सेट नसल्यास Increment म्हणून 1 सेट करू.
06:15 आता OK बटण क्लिक करा.
06:19 बदलांचे निरीक्षण करा.
06:22 असाईनमेंट म्हणून:

increment ची व्हॅल्यू 5 घेऊन वरील स्टेप्स रिपीट करा.

06:29 बदल पहा आणि नंतर undo करा.
06:34 या सर्व केसेस मध्ये, Fill tool हे cells मधे फक्त तात्पुरते संबंध निर्माण करते.
06:42 एकदा cells भरून झाल्यावर त्यांचा एकमेकांशी काही संबंध उरत नाही.
06:48 Calc मधे समान data अनेक sheets वरील समान cell लोकेशन्समधे समाविष्ट केला जाऊ शकतो.
06:56 म्हणजे प्रत्येक sheet वर स्वतंत्रपणे समान डेटा समाविष्ट करण्याची गरज नाही.
07:04 सर्व sheets मध्ये एकाच वेळी हा डेटा समाविष्ट करू शकतो.
07:09 हे कसे करायचे ते जाणून घेऊ.
07:13 Personal-Finance-Tracker.ods फाईलमधे Sheet 1 वर आपला संपूर्ण data आहे.
07:20 Sheet 2 आणि Sheet 3 मधे आपल्याला Sheet 1 प्रमाणे data दाखवायचा आहे.
07:29 त्यासाठी menu bar मधील Edit मेनूवर क्लिक करा नंतर Select वर क्लिक करा.
07:37 Select sheets वर क्लिक करा.
07:42 Select Sheets डायलॉग बॉक्स दिसेल.
07:46 Shift की वापरून Sheet 1, Sheet 2 आणि Sheet 3 हे पर्याय निवडा.

आता OK बटण क्लिक करा.

07:58 हे आपल्याला Sheet 1 वर परत नेईल.
08:02 आता Sheet 1 वर काही टाईप करू.
08:06 उदाहरणार्थ, cell F12 मधे टाईप करू “This will be displayed on multiple sheets”.
08:16 आता Sheet 2 आणि Sheet 3 टॅबवर लागोपाठ क्लिक करा.
08:24 प्रत्येक शीटमधील cell F12 तोच समान data दाखवत असल्याचे दिसेल.
08:32 हे बदल Undo करा.
08:36 cells' मधे data डिलीट आणि एडिट करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती शिकू.
08:44 अस्तित्वात असलेल्या कोणत्याही cell चे फॉरमॅटिंग न काढता data डिलीट करण्यासाठी आधी cell निवडा.
08:52 cell चा data हा Input line फिल्डमध्ये दर्शविला गेला आहे.
08:57 Input line वर एकदा क्लिक करा.
09:00 आता कीबोर्ड वरील Backspace की दाबा.
09:05 data डिलिट होईल.
09:08 हे बदल Undo करा.
09:12 cell मधील data बदलण्यासाठी, cell निवडा आणि जुन्या ठिकाणी नवीन data टाईप करा.
09:20 नवीन data, सेलचे मूळ फॉरमॅटिंग कायम ठेवेल.
09:25 हे बदल Undo करा.
09:29 सर्व कंटेंट न काढताही cell मधील data चा काही भाग आपण बदलू शकतो.
09:37 असे करण्यासाठी cell वर फक्त डबल क्लिक करा.
09:42 नंतर Rent हा शब्द डबल क्लिक करून तो सिलेक्ट करा.

आता टाईप करा Expenses आणि Enter दाबा.

09:53 बदलांचे निरीक्षण करा.
09:56 हे बदल Undo करा.
10:00 शेवटी फाईल सेव्ह करुन बंद करा.
10:04 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

10:11 या पाठात आपण शिकलोः
10:14 Fill tools वापरून data ऑटोफिल करणे.
10:18 एका spreadsheet च्या सर्व sheets वर तेच कंटेंट शेअर करणे.
10:24 cell मधील data काढणे, data रीप्लेस करणे, data चा काही भाग बदलणे.
10:32 असाईनमेंट म्हणून:

spreadsheet-practice.ods” फाईल उघडा.

10:38 Time या column शेजारी Month हा column बनवा.
10:42 May महिन्यापर्यंत ऑटो फिल करण्यासाठी Fill Series पर्याय वापरा.
10:48 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:57 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

11:08 आपण या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
11:13 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:20 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali