LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Working-with-Data-in-Calc/Marathi
From Script | Spoken-Tutorial
TIME | NARRATION |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Working with data in Calc वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोतः
Fill tools वापरून data ऑटोफिल करणे. |
00:15 | एका spreadsheet च्या सर्व sheets वर तेच कंटेंट समाविष्ट करणे. |
00:22 | cell मधील data काढणे, data रीप्लेस करणे, data चा काही भाग बदलणे. |
00:29 | या पाठासाठी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:43 | spreadsheet मधे data समाविष्ट करणे खूप श्रमाचे असू शकते. |
00:49 | हे बऱ्याच प्रमाणात सोपे करण्यासाठी Calc अनेक टूल्स प्रदान करते. |
00:56 | सर्वात मूलभूत क्षमता म्हणजे माऊसच्या सहाय्याने एका cell मधील कंटेंट अन्यत्र ड्रॅग आणि ड्रॉप करणे. |
01:05 | तथापि data ची पुनरावृत्ती असेल तेव्हा इनपुट आपोआप होण्यासाठी Calc मध्ये इतर टूल्स देखील आहेत. |
01:14 | असे एक टूल म्हणजे Fill tool. |
01:18 | याद्वारे एकाच spreadsheet वरील अनेक sheets वर एकाच वेळी data भरू शकतो. |
01:26 | Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा. |
01:31 | या फाईलमधील heading Cost च्या खालील data, त्याच्या शेजारील cells मध्ये कॉपी करूया. |
01:39 | Cost खालील 6000 एंट्री असलेल्या cell वर क्लिक करा. |
01:45 | mouse चे डावे बटण दाबून ठेवून cell च्या शेवटपर्यंत ड्रॅग करा, ज्यामध्ये 2000 ही खर्चाची नोंद आहे. |
01:54 | निवडलेल्या cells च्या उजवीकडील शेजारच्या cells देखील त्याचबरोबर सिलेक्ट करा. |
02:01 | या शेजारील cells मधे data कॉपी करू. |
02:05 | आता mouse चे डावे बटण सोडा. |
02:09 | menu bar मधील Sheet menu वर क्लिक करा. Fill Cells च्या सबमेनूवर जा. |
02:17 | सबमेनूतील Fill Right पर्यायावर क्लिक करा. |
02:22 | किंवा Standard toolbar मधील ड्रॉपडाऊनवरील Column आयकॉनवर क्लिक करा.
नंतर Fill Right पर्यायावर क्लिक करा. |
02:34 | heading Cost खालील data शेजारच्या cells मधे कॉपी झाल्याचे दिसेल.
हे बदल Undo करा. |
02:45 | Fill tool चा अधिक गुंतागुंतीचा उपयोग म्हणजे sheets मधे काही Series, data म्हणून भरण्यासाठी होतो. |
02:54 | पूर्ण आणि संक्षिप्तपणे लिहिलेल्या आठवड्याच्या वारांसाठी आणि वर्षांच्या महिन्यांसाठी Calc डिफॉल्ट रूपात याद्या देते. |
03:04 | हे users ना त्यांच्या स्वत:च्या याद्या तयार करू देते. |
03:10 | आता आपल्या sheet मध्ये Days नावाचे नवीन heading समाविष्ट करू. |
03:16 | याखाली आठवड्याचे सात वार आपोआप दाखवू. |
03:22 | Days heading च्या खालील पहिले सात cells निवडा. |
03:27 | menu bar मधील Sheet menu वर क्लिक करा. नंतर Fill Cells सबमेनूवर क्लिक करा. |
03:35 | सबमेनूमधून Fill Series पर्याय निवडा. |
03:40 | Fill Series डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:44 | आता Series Type मधील AutoFill पर्यायावर क्लिक करा. |
03:49 | Start value फिल्डमधे आठवड्याचा पहिला दिवस म्हणून Sunday टाईप करू. |
03:57 | Increment फिल्ड आधीच 1 म्हणून सेट केले आहे. |
04:02 | आता OK बटण क्लिक करा. |
04:05 | cells मध्ये सर्व दिवस आपल्याला आपोआप भरलेले दिसतील. |
04:11 | या पध्दतीद्वारे फक्त weekdays आणि months समाविष्ट करू शकतो कारण ते Calc मधे pre-defined आहेत. |
04:20 | ऑटोफिलिंग सिक्वेन्शियल data साठी आपण आणखी एक पद्धत पाहणार आहोत. |
04:26 | आणखी एका cell मधे Sunday टाईप करून Enter दाबा. |
04:31 | आपण column मधील पुढच्या cell वर जाऊ. |
04:36 | जिथे Sunday टाईप केले होते त्या cell वर परत जाऊ. |
04:41 | cell च्या उजव्या कोपऱ्यातील तळाशी एक छोटा black box दिसेल. |
04:47 | माऊसच्या सहाय्याने या box वर क्लिक करा. |
04:51 | उजवीकडील डिस्प्ले बॉक्समध्ये Saturday दिसेपर्यंत खाली ड्रॅग करा.
माऊसचे बटण सोडा. |
05:01 | cells मधे आठवड्याचे दिवस आपोआप भरले जातात. |
05:06 | ही पद्धत अनुक्रमिक असलेल्या सर्व data साठी कार्य करते. |
05:11 | हे बदल Undo करा. |
05:15 | आता start, end आणि increment च्या व्हॅल्यूज भरून numbers ची autofill मालिका तयार करू . |
05:24 | प्रथम A2 ते A8 या cells मधे समाविष्ट केलेले सिरीयल क्रमांक काढून टाकू. |
05:33 | menu bar मधील Sheet वर क्लिक करा.
नंतर Fill Cells आणि Fill Series पर्यायावर क्लिक करा. |
05:45 | Fill Series डायलॉग बॉक्समधील Series Type खालील Linear पर्यायावर क्लिक करा. |
05:53 | Start value फिल्डमधे 1 हा पहिला सिरीयल नंबर टाईप करू. |
06:00 | End value फिल्डमधे 7 ही शेवटची व्हॅल्यू टाईप करू. |
06:08 | आता आधीपासून व्हॅल्यू 1 सेट नसल्यास Increment म्हणून 1 सेट करू. |
06:15 | आता OK बटण क्लिक करा. |
06:19 | बदलांचे निरीक्षण करा. |
06:22 | असाईनमेंट म्हणून:
increment ची व्हॅल्यू 5 घेऊन वरील स्टेप्स रिपीट करा. |
06:29 | बदल पहा आणि नंतर undo करा. |
06:34 | या सर्व केसेस मध्ये, Fill tool हे cells मधे फक्त तात्पुरते संबंध निर्माण करते. |
06:42 | एकदा cells भरून झाल्यावर त्यांचा एकमेकांशी काही संबंध उरत नाही. |
06:48 | Calc मधे समान data अनेक sheets वरील समान cell लोकेशन्समधे समाविष्ट केला जाऊ शकतो. |
06:56 | म्हणजे प्रत्येक sheet वर स्वतंत्रपणे समान डेटा समाविष्ट करण्याची गरज नाही. |
07:04 | सर्व sheets मध्ये एकाच वेळी हा डेटा समाविष्ट करू शकतो. |
07:09 | हे कसे करायचे ते जाणून घेऊ. |
07:13 | Personal-Finance-Tracker.ods फाईलमधे Sheet 1 वर आपला संपूर्ण data आहे. |
07:20 | Sheet 2 आणि Sheet 3 मधे आपल्याला Sheet 1 प्रमाणे data दाखवायचा आहे. |
07:29 | त्यासाठी menu bar मधील Edit मेनूवर क्लिक करा नंतर Select वर क्लिक करा. |
07:37 | Select sheets वर क्लिक करा. |
07:42 | Select Sheets डायलॉग बॉक्स दिसेल. |
07:46 | Shift की वापरून Sheet 1, Sheet 2 आणि Sheet 3 हे पर्याय निवडा.
आता OK बटण क्लिक करा. |
07:58 | हे आपल्याला Sheet 1 वर परत नेईल. |
08:02 | आता Sheet 1 वर काही टाईप करू. |
08:06 | उदाहरणार्थ, cell F12 मधे टाईप करू “This will be displayed on multiple sheets”. |
08:16 | आता Sheet 2 आणि Sheet 3 टॅबवर लागोपाठ क्लिक करा. |
08:24 | प्रत्येक शीटमधील cell F12 तोच समान data दाखवत असल्याचे दिसेल. |
08:32 | हे बदल Undo करा. |
08:36 | cells' मधे data डिलीट आणि एडिट करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती शिकू. |
08:44 | अस्तित्वात असलेल्या कोणत्याही cell चे फॉरमॅटिंग न काढता data डिलीट करण्यासाठी आधी cell निवडा. |
08:52 | cell चा data हा Input line फिल्डमध्ये दर्शविला गेला आहे. |
08:57 | Input line वर एकदा क्लिक करा. |
09:00 | आता कीबोर्ड वरील Backspace की दाबा. |
09:05 | data डिलिट होईल. |
09:08 | हे बदल Undo करा. |
09:12 | cell मधील data बदलण्यासाठी, cell निवडा आणि जुन्या ठिकाणी नवीन data टाईप करा. |
09:20 | नवीन data, सेलचे मूळ फॉरमॅटिंग कायम ठेवेल. |
09:25 | हे बदल Undo करा. |
09:29 | सर्व कंटेंट न काढताही cell मधील data चा काही भाग आपण बदलू शकतो. |
09:37 | असे करण्यासाठी cell वर फक्त डबल क्लिक करा. |
09:42 | नंतर Rent हा शब्द डबल क्लिक करून तो सिलेक्ट करा.
आता टाईप करा Expenses आणि Enter दाबा. |
09:53 | बदलांचे निरीक्षण करा. |
09:56 | हे बदल Undo करा. |
10:00 | शेवटी फाईल सेव्ह करुन बंद करा. |
10:04 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
10:11 | या पाठात आपण शिकलोः |
10:14 | Fill tools वापरून data ऑटोफिल करणे. |
10:18 | एका spreadsheet च्या सर्व sheets वर तेच कंटेंट शेअर करणे. |
10:24 | cell मधील data काढणे, data रीप्लेस करणे, data चा काही भाग बदलणे. |
10:32 | असाईनमेंट म्हणून:
“spreadsheet-practice.ods” फाईल उघडा. |
10:38 | Time या column शेजारी Month हा column बनवा. |
10:42 | May महिन्यापर्यंत ऑटो फिल करण्यासाठी Fill Series पर्याय वापरा. |
10:48 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:57 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
11:08 | आपण या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
11:13 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:20 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |