FrontAccounting-2.4.7/C2/Installation-of-FrontAccounting-on-Linux-OS/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:29, 24 September 2020 by Madhurig (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Installation of FrontAccounting on Linux Operating System वरील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात आपण शिकणार आहोत XAMPP इन्स्टॉल करणे
00:13 FrontAccounting सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे
00:15 डेटाबेस सेटअप करणे आणि

Linux ऑपरेटिंग सिस्टीमवर FrontAccounting इन्स्टॉल करणे.

00:22 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 16.04

00:29 XAMPP 5.5.19 द्वारे मिळालेले Apache, MySQL आणि PHP
00:36 FrontAccounting 2.4.7,
00:40 फायरफॉक्स वेब ब्राऊजर आणि चालू इंटरनेट कनेक्शन.
00:45 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजरही वापरू शकता.
00:50 FrontAccounting ही server वर आधारित अकाउंटिंग सिस्टीम आहे.
00:54 आपण web server सेटअप करण्यासाठी XAMPP वापरू.
00:59 वेब ब्राऊजर उघडा.

ऍड्रेसबारमधे ही URL टाईप करून Enter दाबा.

01:06 हे आपल्याला XAMPP च्या डाऊनलोड पेजवर नेईल.
01:10 येथे सर्व ऑपरेटिंग सिस्टीम्ससाठी XAMPP डाऊनलोड उपलब्ध आहे.
01:15 हिरवे बटण क्लिक करून XAMPP चे नवीनतम वर्जन डाऊनलोड होते.
01:20 परंतु सॉफ्टवेअरच्या आवश्यकतेनुसार XAMPP ची वेगवेगळी वर्जन लागू शकतात.
01:27 येथे मला XAMPP वर्जन 5.5.19 हवे आहे.
01:33 खाली स्क्रॉल करून XAMPP Linux पर्याय निवडा.
01:37 हे आजपर्यंतच्या XAMPP च्या सर्व वर्जन्सची सूची असलेल्या पेजवर नेईल.
01:42 येथे इन्स्टॉल करण्यासाठी मी XAMPP वर्जन 5.5.19 निवडत आहे.
01:49 माझी सिस्टीम ही 64bit ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

म्हणून मी xampp-linux-x64-5.5.19-0-installer.run डाऊनलोड करणार आहे.

02:05 आता Save file वर क्लिक करून OK क्लिक करा.
02:10 माझ्या मशीनवर हे Downloads फोल्डरमधे सेव्ह झाले आहे.
02:14 आता टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl + Alt + T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
02:21 टर्मिनलवर

cd space Downloads टाईप करून Enter दाबा.

02:27 हे सध्याची चालू डिरेक्टरी बदलून ती Downloads करेल.
02:31 येथे दाखवल्याप्रमाणे कमांड टाईप करून Enter दाबा.
02:36 इन्स्टॉलर फाईल कार्यान्वित करण्यासाठी येथील कमांड टाईप करून Enter दाबा.

विचारल्यास admin password टाईप करा.

02:46 Setup wizard चा डायलॉग बॉक्स उघडेल.
02:50 विचारणा झाल्यावर Next वर क्लिक करा. येथील इन्स्टॉलेशन स्टेप्सचे पालन करा.
02:56 Learn more about Bitnami for XAMPP हा चेकबॉक्स अनचेक करून पुढे जाण्यासाठी,

Next वर क्लिक करा.

03:05 इन्स्टॉलेशन पूर्ण झाले की Launch XAMPP हा चेकबॉक्स अनचेक करा.
03:10 शेवटी Finish बटण क्लिक करा.
03:13 आता मशीनवर XAMPP यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले का हे तपासू.
03:19 XAMPP सर्व्हिस सुरू करण्यासाठी टर्मिनलमधे

sudo space slash opt slash lampp slash lampp space start असे टाईप करा.

03:31 विचारणा झाल्यावर admin password टाईप करून Enter दाबा.
03:36 येथे दाखवल्याप्रमाणे हा मेसेज मिळू शकेल.

जे सूचित करते की सिस्टीमवर XAMPP इन्स्टॉल झालेले असून ती सर्व्हिस सुरू केलेली आहे.

03:46 Command not found हा मेसेज मिळाल्यास तुमच्या मशीनवर XAMPP इन्स्टॉल झालेले नाही.
03:54 तुम्हाला कदाचित यापैकी काही एरर मेसेजेस मिळू शकतात:

Apache shutdown unexpectedly

किंवा

04:00 Port 80 in use for Apache Server

किंवा

04:05 Unable to connect to any of the specified MySQL hosts for MySQL database.”
04:13 याचे कारण Apache आणि MySQL साठी देण्यात आलेले डिफॉल्ट पोर्ट दुसऱ्या सॉफ्टवेअरने वापरलेले आहे.
04:21 Apache चा डिफॉल्ट पोर्ट नंबर 80 आणि MySQL चा 3306 आहे.
04:30 ही पोर्टस बदलण्यासाठी या पाठातील Additional Reading Material चा संदर्भ घ्या.
04:36 आणि पुढे जाण्यापूर्वी योग्य पोर्ट नंबर द्या.

उदाहरणार्थ: 8080

04:44 आता फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा. ऍड्रेसबारमधे localhost टाईप करून Enter दाबा.
04:52 आपल्याला XAMPP चा स्क्रीन दिसला पाहिजे.
04:56 भाषा निवडण्यासाठी पर्याय दाखवले तर English पर्याय निवडा.
05:01 आपण XAMPP homepage वर आहोत.
05:04 स्क्रीनच्या डावीकडील मेनूमधील, PHPinfo वर क्लिक करा.
05:10 Ctrl + F बटणे दाबून DOCUMENT underscore ROOT हा शब्द शोधा.
05:18 हे Apache Environment च्या टेबलमधे सापडेल.
05:22 DOCUMENT underscore ROOT ची व्हॅल्यू एकतर

slash opt slash lampp slash htdocs असेल किंवा slash var slash www असेल.

05:35 माझ्या मशीनमधे ही व्हॅल्यू slash opt slash lampp slash htdocs आहे.
05:41 कृपया या पाथची नोंद ठेवा.

येथे FrontAccounting इन्स्टॉल करणार आहोत.

05:47 आता FrontAccounting डाऊनलोड करू.
05:50 वेब ब्राऊजरमधे आणखी एक टॅब उघडा आणि या URL वर जा.
05:57 frontaccounting-2.4.7.tar.gz वर क्लिक करा.
06:04 लगेच डाऊनलोड होणे सुरू होईल.

Save File वर क्लिक करून OK क्लिक करा.

06:12 टर्मिनलवर परत जा.
06:15 पुढे डाऊनलोड केलेल्या tar.gz फाईलमधील घटक एक्स्ट्रॅक्ट करावे लागतील.
06:22 त्यासाठी टाईप करा sudo space tar space hyphen zxvf space frontaccounting hyphen 2.4.7.tar.gz
06:39 विचारणा झाल्यास admin password टाईप करून Enter दाबा.
06:44 एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यावर मी FrontAccounting फोल्डरचे नाव बदलून account करते.
06:50 mv space frontaccounting space account ही कमांड टाईप करून Enter दाबा.
06:58 फोल्डरचे नाव बदलणे ऐच्छिक आहे.

परंतु हे एकाच मशीनवर असलेल्या FrontAccounting च्या अनेक फोल्डर्सपैकी आपला फोल्डर निवडण्यास मदत करते.

07:08 टर्मिनलवर परत जा.
07:11 आता account फोल्डर apache home directory मधे हलवू.
07:17 account फोल्डर apache home directory मधे हलवण्यासाठी टाईप करा

sudo space mv space account space /opt/lampp/htdocs/ आणि Enter दाबा.

07:34 आता apache home डिरेक्टरीवर जाऊ.
07:37 त्यासाठी टाईप करा cd space /opt/lampp/htdocs/ आणि Enter दाबा.
07:47 account फोल्डरची permission बदलण्यासाठी टाईप करा-

sudo space chmod space -R space 777 space account slash आणि Enter दाबा.

08:01 XAMPP server यशस्वीरित्या इन्स्टॉल झाला आहे.
08:05 FrontAccounting installer वेब सर्व्हरच्या root डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा.
08:11 पुढे जाण्यापूर्वी FrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे.
08:17 हे phpmyadmin मधे करू जो MySQL साठीचा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे.

हे XAMPP इन्स्टॉल करताना त्याबरोबरच आले आहे.

08:28 वेब ब्राऊजरमधील XAMPP पेजवर परत जाऊ.

XAMPP पेजवर डावीकडील मेनूमधे phpMyadmin वर क्लिक करा.

08:39 वरील भागात असलेल्या मेनूमधील Users वर क्लिक करून मग Add User क्लिक करा.
08:47 उघडलेल्या नव्या विंडोमधे तुमच्या पसंतीचे User name टाका.

मी माझे User name म्हणून frontacc टाईप करते.

08:56 Host च्या ड्रॉपडाऊन सूचीतून Local हा पर्याय निवडा.
09:01 password च्या टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा.
09:06 मी पासवर्ड म्हणून admin123 टाईप करणार आहे.
09:11 Re-type च्या टेक्स्ट बॉक्समधे तोच पासवर्ड टाईप करा.
09:16 सध्या Generate Password prompt वर क्लिक करू नका.
09:21 Database for user account खाली-

Create database with the same name and grant all privileges हा पर्याय दिसेल.

09:29 तो पर्याय निवडून खाली स्क्रॉल करा.
09:33 पेजच्या खालील भागात उजवीकडील Go बटणावर क्लिक करा.
09:38 You have added a new user” हा मेसेज दिसेल.

म्हणजेच frontacc नावाचा नवा डेटाबेस frontacc या युजरसहित तयार झाला आहे.

09:50 हे युजरनेम आणि पासवर्ड केवळ डेटाबेसमधे लॉगिन करण्यासाठी आहे.
09:56 युजरनेम, पासवर्ड आणि डेटाबेस यांच्या नावांची नोंद ठेवा.
10:01 नंतर FrontAccounting चे इन्स्टॉलेशन करताना त्यांची गरज लागेल.
10:06 Database चे नाव आणि username सारखे नसले तरी चालेल.
10:11 वेगळी नावे हवी असल्यास प्रथम डेटाबेस तयार करा. नंतर त्यासाठी युजर तयार करा.
10:18 नावांच्या प्रथेप्रमाणे username मधे स्पेस असता कामा नये.
10:25 XAMPP कार्यान्वित झाले असून डेटाबेस तयार आहे.
10:29 आपण Front Accounting इन्स्टॉल करण्यासाठी तयार आहोत.
10:33 वेबब्राऊजरमधे नवीन टॅब उघडा.

ऍड्रेसबारमधे localhost/account टाईप करून Enter दाबा.

10:44 आपल्याला FrontAccounting च्या वेबपेजवर

Step 1: System Diagnostics असे दिसत आहे.

10:51 Select install wizard language साठी English हा पर्याय निवडल्याची खात्री करा.
10:56 पेजवर खाली स्क्रॉल करा. तेथील Continue बटणावर क्लिक करा.
11:02 Step 2: Database Server Settings हे पुढील वेबपेजचे शीर्षक आहे.
11:08 येथे मी Server Port चा बॉक्स रिकामा ठेवत आहे.
11:12 तुम्ही MySQL चा 3306 हा डिफॉल्ट port number बदलला असल्यास तो येथे टाईप करा.
11:21 आपण आधी तयार केलेला पुढील तपशील भरू-

database Name मधे frontacc

database user मधे frontacc

11:33 database password मधे admin123
11:38 उर्वरित पर्याय भरू नका. खालील Continue बटणावर क्लिक करा.
11:45 पुढे तुम्ही तुमच्या company चा तपशील भरणार आहात.

कसे ते मी दाखवणार आहे.

11:53 Company Name मधे ST Company Pvt Ltd टाईप करा.
11:59 मी Admin Login म्हणून admin.
12:02 आणि Admin Password म्हणून spoken टाईप करत आहे.

तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही पासवर्ड द्या.

12:10 तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाईप करा.

हा login password लक्षात ठेवा.

12:16 पुढे Charts of Accounts साठी दोन पर्याय दिसतील.
12:21 Standard new company American COA हा पर्याय निवडू.
12:26 Default Language साठी English हा पर्याय निवडा.
12:30 Install बटणावर क्लिक करा.
12:34 स्क्रीनवर शेवटी, FrontAccounting ERP has been installed successfully हा मेसेज दिसेल जो आपले इन्स्टॉलेशन यशस्वी झाल्याचे सांगतो.
12:46 FrontAccounting च्या इंटरफेसवर लॉगिन करण्यासाठी Click here to start ही लिंक क्लिक करा.
12:53 लॉग-इन स्क्रीनमधे पुढील तपशील भरा:

User name म्हणून admin

Password म्हणून spoken

13:03 Company साठी ST Company Pvt. Ltd हा पर्याय निवडून

Login वर क्लिक करा.

13:11 हे आपल्याला 'Front Accounting Administration पेजवर नेईल.

या पेजवर आपल्याला विविध टॅब्ज दिसतील.

13:18 ते कसे वापरायचे हे आपण पुढील पाठांमधे शिकणार आहोत.
13:23 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

13:28 या पाठात आपण शिकलो,

XAMPP डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे

13:34 FrontAccounting डाऊनलोड आणि इन्स्टॉल करणे
13:38 Linux ऑपरेटिंग सिस्टीमवर डेटाबेस सेटअप करणे.
13:42 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.


हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

13:50 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

14:00 तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

14:05 ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.

प्रश्न थोडक्यात विचारा.

14:12 आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल.
14:15 स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.

कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.

14:25 त्यामुळे गोंधळ कमी होईल.

सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल.

14:34 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:40 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali