FrontAccounting-2.4.7/C2/Installation-of-FrontAccounting-on-Linux-OS/Marathi
|
|
00:01 | Installation of FrontAccounting on Linux Operating System वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात आपण शिकणार आहोत XAMPP इन्स्टॉल करणे |
00:13 | FrontAccounting सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे |
00:15 | डेटाबेस सेटअप करणे आणि
Linux ऑपरेटिंग सिस्टीमवर FrontAccounting इन्स्टॉल करणे. |
00:22 | या पाठासाठी मी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 16.04 |
00:29 | XAMPP 5.5.19 द्वारे मिळालेले Apache, MySQL आणि PHP |
00:36 | FrontAccounting 2.4.7, |
00:40 | फायरफॉक्स वेब ब्राऊजर आणि चालू इंटरनेट कनेक्शन. |
00:45 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजरही वापरू शकता. |
00:50 | FrontAccounting ही server वर आधारित अकाउंटिंग सिस्टीम आहे. |
00:54 | आपण web server सेटअप करण्यासाठी XAMPP वापरू. |
00:59 | वेब ब्राऊजर उघडा.
ऍड्रेसबारमधे ही URL टाईप करून Enter दाबा. |
01:06 | हे आपल्याला XAMPP च्या डाऊनलोड पेजवर नेईल. |
01:10 | येथे सर्व ऑपरेटिंग सिस्टीम्ससाठी XAMPP डाऊनलोड उपलब्ध आहे. |
01:15 | हिरवे बटण क्लिक करून XAMPP चे नवीनतम वर्जन डाऊनलोड होते. |
01:20 | परंतु सॉफ्टवेअरच्या आवश्यकतेनुसार XAMPP ची वेगवेगळी वर्जन लागू शकतात. |
01:27 | येथे मला XAMPP वर्जन 5.5.19 हवे आहे. |
01:33 | खाली स्क्रॉल करून XAMPP Linux पर्याय निवडा. |
01:37 | हे आजपर्यंतच्या XAMPP च्या सर्व वर्जन्सची सूची असलेल्या पेजवर नेईल. |
01:42 | येथे इन्स्टॉल करण्यासाठी मी XAMPP वर्जन 5.5.19 निवडत आहे. |
01:49 | माझी सिस्टीम ही 64bit ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
म्हणून मी xampp-linux-x64-5.5.19-0-installer.run डाऊनलोड करणार आहे. |
02:05 | आता Save file वर क्लिक करून OK क्लिक करा. |
02:10 | माझ्या मशीनवर हे Downloads फोल्डरमधे सेव्ह झाले आहे. |
02:14 | आता टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl + Alt + T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
02:21 | टर्मिनलवर
cd space Downloads टाईप करून Enter दाबा. |
02:27 | हे सध्याची चालू डिरेक्टरी बदलून ती Downloads करेल. |
02:31 | येथे दाखवल्याप्रमाणे कमांड टाईप करून Enter दाबा. |
02:36 | इन्स्टॉलर फाईल कार्यान्वित करण्यासाठी येथील कमांड टाईप करून Enter दाबा.
विचारल्यास admin password टाईप करा. |
02:46 | Setup wizard चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:50 | विचारणा झाल्यावर Next वर क्लिक करा. येथील इन्स्टॉलेशन स्टेप्सचे पालन करा. |
02:56 | Learn more about Bitnami for XAMPP हा चेकबॉक्स अनचेक करून पुढे जाण्यासाठी,
Next वर क्लिक करा. |
03:05 | इन्स्टॉलेशन पूर्ण झाले की Launch XAMPP हा चेकबॉक्स अनचेक करा. |
03:10 | शेवटी Finish बटण क्लिक करा. |
03:13 | आता मशीनवर XAMPP यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले का हे तपासू. |
03:19 | XAMPP सर्व्हिस सुरू करण्यासाठी टर्मिनलमधे
sudo space slash opt slash lampp slash lampp space start असे टाईप करा. |
03:31 | विचारणा झाल्यावर admin password टाईप करून Enter दाबा. |
03:36 | येथे दाखवल्याप्रमाणे हा मेसेज मिळू शकेल.
जे सूचित करते की सिस्टीमवर XAMPP इन्स्टॉल झालेले असून ती सर्व्हिस सुरू केलेली आहे. |
03:46 | Command not found हा मेसेज मिळाल्यास तुमच्या मशीनवर XAMPP इन्स्टॉल झालेले नाही. |
03:54 | तुम्हाला कदाचित यापैकी काही एरर मेसेजेस मिळू शकतात:
“Apache shutdown unexpectedly” किंवा |
04:00 | “Port 80 in use for Apache Server”
किंवा |
04:05 | “Unable to connect to any of the specified MySQL hosts for MySQL database.” |
04:13 | याचे कारण Apache आणि MySQL साठी देण्यात आलेले डिफॉल्ट पोर्ट दुसऱ्या सॉफ्टवेअरने वापरलेले आहे. |
04:21 | Apache चा डिफॉल्ट पोर्ट नंबर 80 आणि MySQL चा 3306 आहे. |
04:30 | ही पोर्टस बदलण्यासाठी या पाठातील Additional Reading Material चा संदर्भ घ्या. |
04:36 | आणि पुढे जाण्यापूर्वी योग्य पोर्ट नंबर द्या.
उदाहरणार्थ: 8080 |
04:44 | आता फायरफॉक्स वेब ब्राऊजर उघडा. ऍड्रेसबारमधे localhost टाईप करून Enter दाबा. |
04:52 | आपल्याला XAMPP चा स्क्रीन दिसला पाहिजे. |
04:56 | भाषा निवडण्यासाठी पर्याय दाखवले तर English पर्याय निवडा. |
05:01 | आपण XAMPP homepage वर आहोत. |
05:04 | स्क्रीनच्या डावीकडील मेनूमधील, PHPinfo वर क्लिक करा. |
05:10 | Ctrl + F बटणे दाबून DOCUMENT underscore ROOT हा शब्द शोधा. |
05:18 | हे Apache Environment च्या टेबलमधे सापडेल. |
05:22 | DOCUMENT underscore ROOT ची व्हॅल्यू एकतर
slash opt slash lampp slash htdocs असेल किंवा slash var slash www असेल. |
05:35 | माझ्या मशीनमधे ही व्हॅल्यू slash opt slash lampp slash htdocs आहे. |
05:41 | कृपया या पाथची नोंद ठेवा.
येथे FrontAccounting इन्स्टॉल करणार आहोत. |
05:47 | आता FrontAccounting डाऊनलोड करू. |
05:50 | वेब ब्राऊजरमधे आणखी एक टॅब उघडा आणि या URL वर जा. |
05:57 | frontaccounting-2.4.7.tar.gz वर क्लिक करा. |
06:04 | लगेच डाऊनलोड होणे सुरू होईल.
Save File वर क्लिक करून OK क्लिक करा. |
06:12 | टर्मिनलवर परत जा. |
06:15 | पुढे डाऊनलोड केलेल्या tar.gz फाईलमधील घटक एक्स्ट्रॅक्ट करावे लागतील. |
06:22 | त्यासाठी टाईप करा sudo space tar space hyphen zxvf space frontaccounting hyphen 2.4.7.tar.gz |
06:39 | विचारणा झाल्यास admin password टाईप करून Enter दाबा. |
06:44 | एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यावर मी FrontAccounting फोल्डरचे नाव बदलून account करते. |
06:50 | mv space frontaccounting space account ही कमांड टाईप करून Enter दाबा. |
06:58 | फोल्डरचे नाव बदलणे ऐच्छिक आहे.
परंतु हे एकाच मशीनवर असलेल्या FrontAccounting च्या अनेक फोल्डर्सपैकी आपला फोल्डर निवडण्यास मदत करते. |
07:08 | टर्मिनलवर परत जा. |
07:11 | आता account फोल्डर apache home directory मधे हलवू. |
07:17 | account फोल्डर apache home directory मधे हलवण्यासाठी टाईप करा
sudo space mv space account space /opt/lampp/htdocs/ आणि Enter दाबा. |
07:34 | आता apache home डिरेक्टरीवर जाऊ. |
07:37 | त्यासाठी टाईप करा cd space /opt/lampp/htdocs/ आणि Enter दाबा. |
07:47 | account फोल्डरची permission बदलण्यासाठी टाईप करा-
sudo space chmod space -R space 777 space account slash आणि Enter दाबा. |
08:01 | XAMPP server यशस्वीरित्या इन्स्टॉल झाला आहे. |
08:05 | FrontAccounting installer वेब सर्व्हरच्या root डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा. |
08:11 | पुढे जाण्यापूर्वी FrontAccounting साठी डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे. |
08:17 | हे phpmyadmin मधे करू जो MySQL साठीचा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे.
हे XAMPP इन्स्टॉल करताना त्याबरोबरच आले आहे. |
08:28 | वेब ब्राऊजरमधील XAMPP पेजवर परत जाऊ.
XAMPP पेजवर डावीकडील मेनूमधे phpMyadmin वर क्लिक करा. |
08:39 | वरील भागात असलेल्या मेनूमधील Users वर क्लिक करून मग Add User क्लिक करा. |
08:47 | उघडलेल्या नव्या विंडोमधे तुमच्या पसंतीचे User name टाका.
मी माझे User name म्हणून frontacc टाईप करते. |
08:56 | Host च्या ड्रॉपडाऊन सूचीतून Local हा पर्याय निवडा. |
09:01 | password च्या टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या पसंतीचा पासवर्ड टाईप करा. |
09:06 | मी पासवर्ड म्हणून admin123 टाईप करणार आहे. |
09:11 | Re-type च्या टेक्स्ट बॉक्समधे तोच पासवर्ड टाईप करा. |
09:16 | सध्या Generate Password prompt वर क्लिक करू नका. |
09:21 | Database for user account खाली-
Create database with the same name and grant all privileges हा पर्याय दिसेल. |
09:29 | तो पर्याय निवडून खाली स्क्रॉल करा. |
09:33 | पेजच्या खालील भागात उजवीकडील Go बटणावर क्लिक करा. |
09:38 | “You have added a new user” हा मेसेज दिसेल.
म्हणजेच frontacc नावाचा नवा डेटाबेस frontacc या युजरसहित तयार झाला आहे. |
09:50 | हे युजरनेम आणि पासवर्ड केवळ डेटाबेसमधे लॉगिन करण्यासाठी आहे. |
09:56 | युजरनेम, पासवर्ड आणि डेटाबेस यांच्या नावांची नोंद ठेवा. |
10:01 | नंतर FrontAccounting चे इन्स्टॉलेशन करताना त्यांची गरज लागेल. |
10:06 | Database चे नाव आणि username सारखे नसले तरी चालेल. |
10:11 | वेगळी नावे हवी असल्यास प्रथम डेटाबेस तयार करा. नंतर त्यासाठी युजर तयार करा. |
10:18 | नावांच्या प्रथेप्रमाणे username मधे स्पेस असता कामा नये. |
10:25 | XAMPP कार्यान्वित झाले असून डेटाबेस तयार आहे. |
10:29 | आपण Front Accounting इन्स्टॉल करण्यासाठी तयार आहोत. |
10:33 | वेबब्राऊजरमधे नवीन टॅब उघडा.
ऍड्रेसबारमधे localhost/account टाईप करून Enter दाबा. |
10:44 | आपल्याला FrontAccounting च्या वेबपेजवर
Step 1: System Diagnostics असे दिसत आहे. |
10:51 | Select install wizard language साठी English हा पर्याय निवडल्याची खात्री करा. |
10:56 | पेजवर खाली स्क्रॉल करा. तेथील Continue बटणावर क्लिक करा. |
11:02 | Step 2: Database Server Settings हे पुढील वेबपेजचे शीर्षक आहे. |
11:08 | येथे मी Server Port चा बॉक्स रिकामा ठेवत आहे. |
11:12 | तुम्ही MySQL चा 3306 हा डिफॉल्ट port number बदलला असल्यास तो येथे टाईप करा. |
11:21 | आपण आधी तयार केलेला पुढील तपशील भरू-
database Name मधे frontacc database user मधे frontacc |
11:33 | database password मधे admin123 |
11:38 | उर्वरित पर्याय भरू नका. खालील Continue बटणावर क्लिक करा. |
11:45 | पुढे तुम्ही तुमच्या company चा तपशील भरणार आहात.
कसे ते मी दाखवणार आहे. |
11:53 | Company Name मधे ST Company Pvt Ltd टाईप करा. |
11:59 | मी Admin Login म्हणून admin. |
12:02 | आणि Admin Password म्हणून spoken टाईप करत आहे.
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही पासवर्ड द्या. |
12:10 | तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाईप करा.
हा login password लक्षात ठेवा. |
12:16 | पुढे Charts of Accounts साठी दोन पर्याय दिसतील. |
12:21 | Standard new company American COA हा पर्याय निवडू. |
12:26 | Default Language साठी English हा पर्याय निवडा. |
12:30 | Install बटणावर क्लिक करा. |
12:34 | स्क्रीनवर शेवटी, FrontAccounting ERP has been installed successfully हा मेसेज दिसेल जो आपले इन्स्टॉलेशन यशस्वी झाल्याचे सांगतो. |
12:46 | FrontAccounting च्या इंटरफेसवर लॉगिन करण्यासाठी Click here to start ही लिंक क्लिक करा. |
12:53 | लॉग-इन स्क्रीनमधे पुढील तपशील भरा:
User name म्हणून admin Password म्हणून spoken |
13:03 | Company साठी ST Company Pvt. Ltd हा पर्याय निवडून
Login वर क्लिक करा. |
13:11 | हे आपल्याला 'Front Accounting Administration पेजवर नेईल.
या पेजवर आपल्याला विविध टॅब्ज दिसतील. |
13:18 | ते कसे वापरायचे हे आपण पुढील पाठांमधे शिकणार आहोत. |
13:23 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
13:28 | या पाठात आपण शिकलो,
XAMPP डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे |
13:34 | FrontAccounting डाऊनलोड आणि इन्स्टॉल करणे |
13:38 | Linux ऑपरेटिंग सिस्टीमवर डेटाबेस सेटअप करणे. |
13:42 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
|
13:50 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
14:00 | तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
14:05 | ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
प्रश्न थोडक्यात विचारा. |
14:12 | आमच्या टीममधील कोणीतरी उत्तर देईल. |
14:15 | स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये. |
14:25 | त्यामुळे गोंधळ कमी होईल.
सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल. |
14:34 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
14:40 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |