LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Working-with-Sheets-in-Calc/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 08:03, 3 September 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
TIME NARRATION
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Working with Sheets वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोतः
00:08 Rows, Columns, Sheets समाविष्ट करणे आणि डिलीट करणे.


00:13 Sheets ला नवे नाव देणे
00:15 आणि Sheets हलवणे.
00:18 या पाठासाठी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:32 आपली Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा.
00:37 या पाठाच्या पानावर Code files लिंकमधे ही फाईल दिलेली आहे.

कृपया फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.

00:48 या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी त्याचा वापर करा.
00:52 Columns आणि rows एकेक किंवा मोठ्या प्रमाणावर समाविष्ट करता येतात.
00:58 spreadsheet मधे प्रथम नवी row किंवा नवा column कसा समाविष्ट करायचा हे जाणून घेऊ.
01:05 Personal-Finance-Tracker.ods फाईलमधे cell C1 वर क्लिक करा.
01:12 या cell मधे “Cost” असे लिहिले आहे.
01:16 Standard toolbar मधील Row आयकॉनवर क्लिक करा.
01:21 context menu मधे rows शी संबंधित अनेक पर्याय दिसतील.
01:27 Insert Rows Above आणि Insert Rows Below या दोन विशिष्ट पर्यायांकडे लक्ष द्या.
01:35 Insert Rows Above या पर्यायावर क्लिक करा.
01:40 cell C1 च्या लगेच वरती नवी row समाविष्ट होईल.
01:45 आता Standard toolbar मधील Column च्या आयकॉनवर क्लिक करा.
01:50 context menu मधे columnsशी संबंधित अनेक पर्याय दाखवले जातील.
01:56 Insert Columns before आणि Insert Columns after या दोन विशिष्ट पर्यायांकडे लक्ष द्या.
02:04 Insert Columns Before पर्यायावर क्लिक करा.
02:09 cell C1 च्या डावीकडे नवा column समाविष्ट झालेला दिसेल.
02:14 हे बदल undo करू.
02:17 menu bar मधील Sheet menu वर क्लिक करून देखील Rows आणि columns समाविष्ट करता येतात.
02:25 कोणत्याही cell वर राईट क्लिक करून नवी row किंवा column समाविष्ट करण्याची ही आणखी एक जलद पध्दत आहे.
02:32 cell C1 वर राईट क्लिक करून Insert पर्यायावर क्लिक करा.
02:38 Insert Cells डायलॉग बॉक्स उघडेल.
02:42 येथे गरजेनुसार पर्याय निवडा. Ok बटण दाबा.
02:48 हे पर्याय समजून घेण्यासाठी स्वतः वापरून बघा.
02:53 सध्या हा पर्याय वापरणार नाही. डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Cancel बटण दाबा.
02:58 आता एकाचवेळी अनेक rows आणि columns कसे समाविष्ट करायचे ते जाणून घेऊ.
03:04 समजा SN च्या म्हणजेच cell A1 च्या आधी 4 columns समाविष्ट करायचे आहेत.
03:11 त्यासाठी माऊसचे डावे बटण cells A1 वर क्लिक करून ते D1 पर्यंत ड्रॅग करा.

सर्व 4 cells सिलेक्ट होतील.

03:21 सिलेक्ट केलेल्या कुठल्याही भागावर राईट क्लिक करून Insert पर्याय निवडा.
03:26 Insert Cells च्या डायलॉग बॉक्समधे Entire Column पर्यायावर क्लिक करा.
03:32 नंतर खालील OK बटण क्लिक करा.
03:36 Serial Number च्या आधी 4 नवे columns समाविष्ट झालेले दिसतील.
03:42 हे डिसिलेक्ट करण्यासाठी आता कोणत्याही cell वर क्लिक करा.
03:46 अशाप्रकारे अनेक rows देखील समाविष्ट करू शकतो.

हे तुम्ही स्वतः करून बघा.

03:54 आता एकेक किंवा एकत्रितपणे columns कसे डिलीट करायचे ते पाहू.
04:00 कोणताही एक column निवडण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे column वरील कोणत्याही अक्षरावर क्लिक करा.
04:07 Standard toolbar मधील Column आयकॉन क्लिक करून Delete Columns पर्याय क्लिक करा.

निवडलेला column डिलीट होईल.

04:18 समजा आपल्याला एकावेळी अनेक column डिलीट करायचे आहेत.
04:23 येथे आत्ता समाविष्ट केलेले हे तीन columns डिलीट करायचे आहेत.
04:30 त्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे column च्या वरील अक्षरांवर क्लिक करून ते तीन columns सिलेक्ट करा.
04:38 तिन्ही columns सिलेक्ट होतील.
04:41 आता Standard toolbar मधील Column आयकॉन क्लिक करून नंतर Delete Columns पर्याय क्लिक करा.
04:49 सिलेक्ट केलेले Columns डिलीट होतील.
04:53 अशाचप्रकारे अनेक rows देखील डिलीट करू शकतो.

हे तुम्ही स्वतः करून बघा.

05:01 Calc मधे sheets समाविष्ट आणि डिलीट कशा करायच्या हे जाणून घेऊ.


05:07 Calc मधे अनेक पध्दतींनी नवी sheet समाविष्ट करता येते.
05:12 प्रत्येक पध्दतीबद्दल एकेक करून जाणून घेऊ.
05:17 डावीकडे खाली Sheet 1 टॅब दिसेल.
05:22 त्याआधी तिथे काही आयकॉन्स आहेत.
05:26 Plus आयकॉनवर क्लिक केल्यावर Sheet2 नावाची sheet समाविष्ट होईल.
05:33 ही नवी sheet सध्या उपस्थित असलेल्या sheet च्या उजवीकडे समाविष्ट होईल.
05:38 Sheet टॅब्जच्या पुढील रिकाम्या भागावर क्लिक करून देखील sheets समाविष्ट करू शकतो.
05:46 असे केल्यावर Insert Sheet चा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:52 या डायलॉग बॉक्सच्या सहाय्याने उपलब्ध असलेल्या sheet च्या आधी किंवा नंतर sheet समाविष्ट करू शकतो.
05:59 तसेच आपण एकावेळी कितीही sheets समाविष्ट करू शकतो.
06:03 Position खालील Before the current sheet पर्याय निवडा

आणि No. of sheets मधे 2 हा आकडा घ्या.

06:12 नंतर खालील OK बटण क्लिक करा.
06:17 Sheet 2 च्या आधी Sheet 3 आणि Sheet 4 समाविष्ट झालेल्या दिसतील.
06:24 दुसऱ्या पध्दतीने sheets समाविष्ट करण्यासाठी menu bar मधील Sheet menu वर क्लिक करा.

नंतर Insert Sheet वर क्लिक करा.

06:33 असे केल्यावर Insert Sheet चा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:39 सध्या आपण हे करणार नाही. खालील Cancel बटण क्लिक करा.
06:44 पुढे sheets डिलीट कशा करायच्या ते बघू.
06:48 Sheets एकेक किंवा एकत्रितपणे डिलीट करता येतात.
06:53 एक sheet डिलीट करण्यासाठी डिलीट करायच्या sheet च्या टॅबवर राईट क्लिक करा.
06:59 नंतर Delete Sheet पर्याय निवडा.
07:03 confirmation चा डायलॉग बॉक्स उघडेल.

Yes बटणावर क्लिक करा.

07:10 आपण निवडलेली sheet डिलीट होईल.
07:14 एका वेळी अनेक sheets कशा डिलीट करता येतील?
07:18 उदाहरणार्थ Sheet 2 आणि Sheet 3 डिलीट करायची आहे.
07:24 प्रथम Sheet 2 टॅबवर क्लिक करा.
07:27 नंतर कीबोर्डवरील Shift की दाबून ठेवा आणि Sheet 3 टॅबवर क्लिक करा.
07:33 आता त्यापैकी कोणत्याही एका टॅबवर राईट क्लिक करून Delete Sheet पर्यायावर क्लिक करा.
07:40 confirmation चा डायलॉग बॉक्स उघडेल.
07:44 sheet डिलीट करण्यासाठी Yes बटण क्लिक करा.

दोन्ही sheets डिलीट होतील.

07:51 हे केलेले बदल undo करण्यासाठी Ctrl + Z कीज दाबा.
07:57 Sheets ला डिफॉल्ट रूपात Sheet 1, Sheet 2, Sheet 3 अशाप्रकारे नावे दिलेली असतात.
08:04 Calc मधे आवश्यकतेनुसार sheets चे नाव बदलण्याची सोय आहे.
08:09 उदाहरणार्थ Sheet 2 चे नाव बदलून “Dump” करू.
08:14 हे करण्यासाठी Sheet 2 टॅबवर फक्त डबल क्लिक करा.
08:19 Rename Sheet चा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:23 Sheet 2 असे लिहिलेला टेक्स्ट बॉक्स दिसेल.
08:27 हे डिलीट करून “Dump” हे नवे नाव टाईप करा.
08:31 OK बटण क्लिक करा.
08:35 आता Sheet 2 टॅबचे नाव बदलून “Dump” झालेले दिसेल.
08:40 हे बदल undo करण्यासाठी Ctrl + Z कीज दाबा.
08:46 आपल्याला हव्या त्या क्रमाने sheets चा क्रम लावू शकतो त्यासाठी sheet वर क्लिक करून,

ती हव्या त्या जागी ड्रॅग करा.

08:54 कीबोर्डवरील Ctrl+S कीज दाबून फाईल सेव्ह करा.
09:01 आता उजव्या कोपऱ्यात वरती X या आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा.
09:08 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

09:13 या पाठात आपण शिकलोः
09:15 Rows, Columns, Sheets समाविष्ट करणे आणि डिलीट करणे.
09:21 Sheets ची नावे बदलणे आणि Sheets हलवणे.
09:26 असाईनमेंट म्हणून:


Spreadsheet-Practice.ods फाईल उघडा.

09:32 SN हे हेडिंग असलेला column सिलेक्ट करून डिलीट करा.
09:37 Name, Department आणि Salary या columns मधे संबंधित डेटा भरा.
09:43 अधिक माहितीसाठी Code files लिंकचा संदर्भ घ्या.
09:46 sheet चे नाव बदलून Department-Sheet करा.
09:51 फाईल सेव्ह करून बंद करा.


09:54 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:02 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


10:08 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


10:12 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:16 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:23 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.


ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali