LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Working-with-Sheets-in-Calc/Marathi
From Script | Spoken-Tutorial
TIME | NARRATION |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Working with Sheets वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | या पाठात शिकणार आहोतः |
00:08 | Rows, Columns, Sheets समाविष्ट करणे आणि डिलीट करणे |
00:13 | Sheets ला नवे नाव देणे |
00:15 | आणि Sheets हलवणे. |
00:18 | या पाठासाठी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:32 | आपली Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा. |
00:37 | या पाठाच्या पानावर Code files लिंकमधे ही फाईल दिलेली आहे.
कृपया फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
00:48 | या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी त्याचा वापर करा. |
00:52 | Columns आणि rows एकेक किंवा मोठ्या प्रमाणावर समाविष्ट करता येतात. |
00:58 | spreadsheet मधे प्रथम नवी row किंवा नवा column कसा समाविष्ट करायचा हे जाणून घेऊ. |
01:05 | Personal-Finance-Tracker.ods फाईलमधे cell C1 वर क्लिक करा. |
01:12 | या cell मधे “Cost” असे लिहिले आहे. |
01:16 | Standard toolbar मधील Row आयकॉनवर क्लिक करा. |
01:21 | context menu मधे rows शी संबंधित अनेक पर्याय दिसतील. |
01:27 | Insert Rows Above आणि Insert Rows Below या दोन विशिष्ट पर्यायांकडे लक्ष द्या. |
01:35 | Insert Rows Above या पर्यायावर क्लिक करा. |
01:40 | cell C1 च्या लगेच वरती नवी row समाविष्ट होईल. |
01:45 | आता Standard toolbar मधील Column च्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:50 | context menu मधे columnsशी संबंधित अनेक पर्याय दाखवले जातील. |
01:56 | Insert Columns before आणि Insert Columns after या दोन विशिष्ट पर्यायांकडे लक्ष द्या. |
02:04 | Insert Columns Before पर्यायावर क्लिक करा. |
02:09 | cell C1 च्या डावीकडे नवा column समाविष्ट झालेला दिसेल. |
02:14 | हे बदल undo करू. |
02:17 | menu bar मधील Sheet menu वर क्लिक करून देखील Rows आणि columns समाविष्ट करता येतात. |
02:25 | कोणत्याही cell वर राईट क्लिक करून नवी row किंवा column समाविष्ट करण्याची ही आणखी एक जलद पध्दत आहे. |
02:32 | cell C1 वर राईट क्लिक करून Insert पर्यायावर क्लिक करा. |
02:38 | Insert Cells डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:42 | येथे गरजेनुसार पर्याय निवडा. Ok बटण दाबा. |
02:48 | हे पर्याय समजून घेण्यासाठी स्वतः वापरून बघा. |
02:53 | सध्या हा पर्याय वापरणार नाही. डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Cancel बटण दाबा. |
02:58 | आता एकाचवेळी अनेक rows आणि columns कसे समाविष्ट करायचे ते जाणून घेऊ. |
03:04 | समजा SN च्या म्हणजेच cell A1 च्या आधी 4 columns समाविष्ट करायचे आहेत. |
03:11 | त्यासाठी माऊसचे डावे बटण cells A1 वर क्लिक करून ते D1 पर्यंत ड्रॅग करा.
सर्व 4 cells सिलेक्ट होतील. |
03:21 | सिलेक्ट केलेल्या कुठल्याही भागावर राईट क्लिक करून Insert पर्याय निवडा. |
03:26 | Insert Cells च्या डायलॉग बॉक्समधे Entire Column पर्यायावर क्लिक करा. |
03:32 | नंतर खालील OK बटण क्लिक करा. |
03:36 | Serial Number च्या आधी 4 नवे columns समाविष्ट झालेले दिसतील. |
03:42 | हे डिसिलेक्ट करण्यासाठी आता कोणत्याही cell वर क्लिक करा. |
03:46 | अशाप्रकारे अनेक rows देखील समाविष्ट करू शकतो.
हे तुम्ही स्वतः करून बघा. |
03:54 | आता एकेक किंवा एकत्रितपणे columns कसे डिलीट करायचे ते पाहू. |
04:00 | कोणताही एक column निवडण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे column वरील कोणत्याही अक्षरावर क्लिक करा. |
04:07 | Standard toolbar मधील Column आयकॉन क्लिक करून Delete Columns पर्याय क्लिक करा.
निवडलेला column डिलीट होईल. |
04:18 | समजा आपल्याला एकावेळी अनेक column डिलीट करायचे आहेत. |
04:23 | येथे आत्ता समाविष्ट केलेले हे तीन columns डिलीट करायचे आहेत. |
04:30 | त्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे column च्या वरील अक्षरांवर क्लिक करून ते तीन columns सिलेक्ट करा. |
04:38 | तिन्ही columns सिलेक्ट होतील. |
04:41 | आता Standard toolbar मधील Column आयकॉन क्लिक करून नंतर Delete Columns पर्याय क्लिक करा. |
04:49 | सिलेक्ट केलेले Columns डिलीट होतील. |
04:53 | अशाचप्रकारे अनेक rows देखील डिलीट करू शकतो.
हे तुम्ही स्वतः करून बघा. |
05:01 | Calc मधे sheets समाविष्ट आणि डिलीट कशा करायच्या हे जाणून घेऊ. |
05:07 | Calc मधे अनेक पध्दतींनी नवी sheet समाविष्ट करता येते. |
05:12 | प्रत्येक पध्दतीबद्दल एकेक करून जाणून घेऊ. |
05:17 | डावीकडे खाली Sheet 1 टॅब दिसेल. |
05:22 | त्याआधी तिथे काही आयकॉन्स आहेत. |
05:26 | Plus आयकॉनवर क्लिक केल्यावर Sheet2 नावाची sheet समाविष्ट होईल. |
05:33 | ही नवी sheet सध्या उपस्थित असलेल्या sheet च्या उजवीकडे समाविष्ट होईल. |
05:38 | Sheet टॅब्जच्या पुढील रिकाम्या भागावर क्लिक करून देखील sheets समाविष्ट करू शकतो. |
05:46 | असे केल्यावर Insert Sheet चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:52 | या डायलॉग बॉक्सच्या सहाय्याने उपलब्ध असलेल्या sheet च्या आधी किंवा नंतर sheet समाविष्ट करू शकतो. |
05:59 | तसेच आपण एकावेळी कितीही sheets समाविष्ट करू शकतो. |
06:03 | Position खालील Before the current sheet पर्याय निवडा
आणि No. of sheets मधे 2 हा आकडा घ्या. |
06:12 | नंतर खालील OK बटण क्लिक करा. |
06:17 | Sheet 2 च्या आधी Sheet 3 आणि Sheet 4 समाविष्ट झालेल्या दिसतील. |
06:24 | दुसऱ्या पध्दतीने sheets समाविष्ट करण्यासाठी menu bar मधील Sheet menu वर क्लिक करा.
नंतर Insert Sheet वर क्लिक करा. |
06:33 | असे केल्यावर Insert Sheet चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:39 | सध्या आपण हे करणार नाही. खालील Cancel बटण क्लिक करा. |
06:44 | पुढे sheets डिलीट कशा करायच्या ते बघू. |
06:48 | Sheets एकेक किंवा एकत्रितपणे डिलीट करता येतात. |
06:53 | एक sheet डिलीट करण्यासाठी डिलीट करायच्या sheet च्या टॅबवर राईट क्लिक करा. |
06:59 | नंतर Delete Sheet पर्याय निवडा. |
07:03 | confirmation चा डायलॉग बॉक्स उघडेल.
Yes बटणावर क्लिक करा. |
07:10 | आपण निवडलेली sheet डिलीट होईल. |
07:14 | एका वेळी अनेक sheets कशा डिलीट करता येतील? |
07:18 | उदाहरणार्थ Sheet 2 आणि Sheet 3 डिलीट करायची आहे. |
07:24 | प्रथम Sheet 2 टॅबवर क्लिक करा. |
07:27 | नंतर कीबोर्डवरील Shift की दाबून ठेवा आणि Sheet 3 टॅबवर क्लिक करा. |
07:33 | आता त्यापैकी कोणत्याही एका टॅबवर राईट क्लिक करून Delete Sheet पर्यायावर क्लिक करा. |
07:40 | confirmation चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:44 | sheet डिलीट करण्यासाठी Yes बटण क्लिक करा.
दोन्ही sheets डिलीट होतील. |
07:51 | हे केलेले बदल undo करण्यासाठी Ctrl + Z कीज दाबा. |
07:57 | Sheets ला डिफॉल्ट रूपात Sheet 1, Sheet 2, Sheet 3 अशाप्रकारे नावे दिलेली असतात. |
08:04 | Calc मधे आवश्यकतेनुसार sheets चे नाव बदलण्याची सोय आहे. |
08:09 | उदाहरणार्थ Sheet 2 चे नाव बदलून “Dump” करू. |
08:14 | हे करण्यासाठी Sheet 2 टॅबवर फक्त डबल क्लिक करा. |
08:19 | Rename Sheet चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:23 | Sheet 2 असे लिहिलेला टेक्स्ट बॉक्स दिसेल. |
08:27 | हे डिलीट करून “Dump” हे नवे नाव टाईप करा. |
08:31 | OK बटण क्लिक करा. |
08:35 | आता Sheet 2 टॅबचे नाव बदलून “Dump” झालेले दिसेल. |
08:40 | हे बदल undo करण्यासाठी Ctrl + Z कीज दाबा. |
08:46 | आपल्याला हव्या त्या क्रमाने sheets चा क्रम लावू शकतो त्यासाठी sheet वर क्लिक करून,
ती हव्या त्या जागी ड्रॅग करा. |
08:54 | कीबोर्डवरील Ctrl+ S कीज दाबून फाईल सेव्ह करा. |
09:01 | आता उजव्या कोपऱ्यात वरती X या आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा. |
09:08 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
09:13 | या पाठात आपण शिकलोः |
09:15 | Rows, Columns, Sheets समाविष्ट करणे आणि डिलीट करणे. |
09:21 | Sheets ची नावे बदलणे आणि Sheets हलवणे. |
09:26 | असाईनमेंट म्हणून:
Spreadsheet-Practice.ods फाईल उघडा. |
09:32 | SN हे हेडिंग असलेला column सिलेक्ट करून डिलीट करा. |
09:37 | Name, Department आणि Salary या columns मधे संबंधित डेटा भरा. |
09:43 | अधिक माहितीसाठी Code files लिंकचा संदर्भ घ्या. |
09:46 | sheet चे नाव बदलून Department-Sheet करा. |
09:51 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
09:54 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
10:08 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
10:12 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
10:16 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:23 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |