LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Introduction-to-LibreOffice-Calc/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 07:51, 3 September 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Introduction to LibreOffice Calc या पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत:
00:09 LibreOffice Calc विषयी,
00:12 विविध toolbars ,
00:14 नवीन तसेच अस्तित्वात असलेली spreadsheet उघडणे.
00:18 Calc मधील spreadsheet सेव्ह करून ती बंद करणे.
00:22 ती MS Excel spreadsheet म्हणून सेव्ह करणे.
00:26 PDF डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
00:30 LibreOffice Calc म्हणजे काय?

LibreOffice Calc हा LibreOffice Suite चा spreadsheet घटक आहे.

00:38 याचे साम्य Microsoft Office Suite मधील Microsoft Excelशी आहे.
00:43 हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर आहे.
00:47 त्याचे वितरण, वापर व त्यातील बदल निर्बंधांशिवाय करता येतो.
00:53 खालील कोणत्याही OS वर LibreOffice Calc कार्यान्वित होऊ शकते:
00:57 Microsoft Windows 8 किंवा त्यापुढील वर्जन्स
01:02 GNU/Linux ऑपरेटिंग सिस्टीम आणि

Mac OSX

01:08 या पाठासाठी वापरत आहोत:

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

01:22 डिफॉल्ट रूपात, नवीनतम Ubuntu Linux OS मधे LibreOffice आधीच इन्स्टॉल केलेले असते.
01:29 विशिष्ट वर्जन इन्स्टॉल करण्यासाठी या वेबसाईटवरील LibreOffice Installation या मालिकेचा संदर्भ घ्या.
01:37 LibreOffice Calc कसे उघडायचे ते जाणून घेऊ.
01:41 Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Show applications आयकॉनवर क्लिक करा.
01:49 search bar मधे Calc असे टाईप करा.
01:53 दर्शवलेल्या सूचीमधील Libreoffice Calc च्या आयकॉनवर क्लिक करा.
01:59 Windows ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Start Menu आयकॉन क्लिक करा.
02:06 search bar मधे Calc असे टाईप करा.
02:10 दर्शवलेल्या सूचीमधील Libreoffice Calc च्या आयकॉनवर क्लिक करा.
02:16 हे मुख्य Calc विंडोमधे रिकामे spreadsheet डॉक्युमेंट उघडेल.
02:22 आता Calc विंडोच्या मुख्य घटकांबद्दल जाणून घेऊ.
02:28 Calc विंडोमधे विविध toolbars आहेत.
02:32 जसे की, Title bar, Menu bar, Standard toolbar, Formatting bar, Formula bar, Status bar आणि Sidebar.
02:47 या पाठांच्या मालिकेत पुढे याबद्दल जाणून घेऊ.
02:51 Calc मधील संपूर्ण spreadsheet डॉक्युमेंटला workbook म्हणतात.
02:56 जिथे डेटा टाईप केला जातो ते कार्यक्षेत्र ग्रिडच्या स्वरूपात अनेक cells नी बनलेले आहे.
03:04 दुसऱ्या शब्दात, rows आणि columns मधे cells ची मांडणी केलेली असते.
03:10 कोणतीही cell ही row आणि column एकमेकांना छेदल्यामुळे तयार होते.
03:16 ती संबंधित row number आणि column alphabet ने संबोधली जाते.
03:22 Cells मधे टेक्स्ट, अंक, सूत्र आणि इतर प्रकारच्या घटकांच्या स्वरूपात माहिती भरता येते.
03:31 Cells चा उपयोग डेटा दाखवण्यासाठी आणि हाताळण्यासाठी केला जातो.
03:36 spreadsheet च्या डावीकडे तळाशी sheet टॅब दिसेल.

ह्या टॅबद्वारे आपल्याला sheet ऍक्सेस करता येते.

03:46 डिफॉल्ट रूपात इंटरफेसवर एक sheet दिसेल आणि त्याचे नाव Sheet 1 आहे.
03:53 प्रत्येक spreadsheet मधे अनेक sheets असू शकतात.
03:57 प्रत्येक sheet मधे दहा लाखापेक्षा थोड्या जास्त rows आणि एक हजार columns असू शकतात.
04:03 म्हणजेच एका शीटमधे एक अब्जाहून अधिक cells असतात.
04:09 प्रत्येक row ही number ने आणि प्रत्येक column हा English alphabet द्वारे ओळखला जातो.
04:16 column च्या वरील भागात मूळाक्षरे असलेल्या grey boxes ची मालिका आहे.
04:22 तसेच rows च्या सर्वात डावीकडे grey boxes मधे क्रमांक दिलेले आहेत.
04:29 हे column आणि row headers आहेत.
04:33 columns हे “A” ने सुरू होऊन ते उजवीकडे वाढत जातात.
04:38 rows ह्या “1” ने सुरू होऊन त्या खालच्या बाजूला वाढत जातात.
04:43 toolbars बरोबरच वरील भागात दोन अतिरिक्त फिल्डस् आहेत.

Name box आणि Input line.

04:53 column आणि row headers मिळून cell references तयार होतात.

हे Name box फिल्डमधे दिसतात.

05:02 हे Calc मधील विविध घटकांचे थोडक्यात वर्णन होते.
05:06 आता Calc मधे नवी spreadsheet कशी उघडायची हे जाणून घेऊ.
05:12 Standard toolbar मधील New आयकॉनवर क्लिक करून नवीन spreadsheet उघडता येते.
05:19 किंवा menu bar मधील File menu वर जा.
05:24 नंतर New या सबमेनूवर क्लिक करून Spreadsheet पर्याय निवडा.
05:31 Untitled 2 नावाची नवीन Calc spreadsheet उघडेल.
05:37 उजव्या कोपऱ्यात वरती X आयकॉनवर क्लिक करून “Untitled 2” नावाची नवीन उघडलेली spreadsheet बंद करा.
05:45 आता spreadsheet मधे “Personal Finance Tracker” कसा बनवायचा हे पाहू.
05:50 spreadsheet मधील A1 या cell वर क्लिक करा.
05:55 SN” हे हेडिंग टाईप करा.
06:00 हे घटकांचे अनुक्रमांक दाखवेल जे आपण spreadsheet मधे भरणार आहोत.
06:06 आता B1 नावाच्या cell वर क्लिक करून “Items” हे हेडिंग टाईप करा.
06:13 आपण spreadsheet, मधे वापरणार असलेल्या सर्व घटकांची नावे या हेडिंगखाली असतील.
06:19 अशाचप्रकारे एका पुढे एक C1, D1, E1, F1 आणि G1 या cells वर क्लिक करा.
06:29 अनुक्रमे “Cost”, “Spent”, “Received”, “Date” आणि “Account” ही हेडिंग्ज टाईप करा.
06:43 एकदा डॉक्युमेंटमधे टाईप केले की पुढील वापरासाठी ते सेव्ह करावे लागते.
06:49 फाईल सेव्ह करण्यासाठी Standard toolbar मधील Save आयकॉन क्लिक करा.
06:55 स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल.
06:59 हे Name फिल्डमधे फाईलचे नाव भरण्यास सांगेल.
07:04 “Personal-Finance-Tracker” हे फाईलचे नाव टाईप करू.
07:11 फाईल सेव्ह करण्यासाठी डावीकडील Desktop फोल्डर निवडू.
07:18 उजव्या कोपऱ्यात खाली File type हा ड्रॉपडाऊन दिसेल.
07:24 या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
07:27 येथे file types किंवा file extensions ची यादी आहे जी वापरून फाईल सेव्ह करू शकतो.
07:35 LibreOffice Calc मधे ODF Spreadsheet (.ods) हा डिफॉल्ट file type आहे.
07:43 ODF म्हणजे Open Document Format जे ओपन स्टँडर्ड आहे.
07:49 फाईल सेव्ह करण्यासाठी ODF Spreadsheet पर्याय निवडू.

हेच तुमच्या मशीनवर करा.

07:58 डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात वरचे Save बटण क्लिक करा.
08:04 हे तुम्हाला पुन्हा Calc विंडोवर घेऊन जाईल.
08:08 आता title bar मधे झालेल्या बदलाचे निरीक्षण करा.
08:12 पहिले नाव बदलून ते Personal-Finance-Tracker.ods झाले आहे.
08:18 dot ods फॉरमॅटमधे सेव्ह करण्याव्यतिरिक्त या फाईल्स dot xls आणि dot xlsx मधे देखील सेव्ह करू शकतो.
08:28 या फॉरमॅटसमधील फाईल्स नंतर MS Excel या ऍप्लिकेशनमधे उघडता येऊ शकतात.
08:36 Save आयकॉनच्या शेजारील ड्रॉपडाऊन ऍरोवर क्लिक करून Save As पर्यायावर क्लिक करा.
08:43 Save As डायलॉग बॉक्समधे उजव्या कोपऱ्यात खाली File type ड्रॉपडाऊन क्लिक करा.
08:50 Excel 2007-365 (.xlsx) format पर्याय निवडा.
08:59 डायलॉग बॉक्सच्या वरील उजव्या कोपऱ्यात Save बटणावर क्लिक करा.
09:05 इतर फाईल फॉरमॅटमधे फाईल सेव्ह केल्यास, Confirm File Format हा डायलॉग बॉक्स उघडेल.
09:13 Ask when not saving in ODF or default format” हा पर्याय निवडा.
09:20 नंतर Use Excel 2007-365 format बटण क्लिक करा.
09:28 हे आपल्याला पुन्हा Calc च्या विंडोवर नेईल.
09:32 Title bar मधे फाईलच्या नावात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
09:37 spreadsheet PDF फॉरमॅटमधे देखील एक्सपोर्ट करता येते.
09:42 Standard toolbar मधील Export Directly as PDF आयकॉनवर क्लिक करा.
09:49 किंवा menu bar वरील File menu वर क्लिक करा.

नंतर Export as PDF पर्याय क्लिक करा.

09:59 PDF options हा डायलॉग बॉक्स उघडेल.
10:03 या डायलॉग बॉक्समधे PDF चे पर्याय हवे तसे बदलण्याची विविध सेटींग्ज दिसतील.
10:10 डिफॉल्ट रूपात असलेली सेटींग तशीच ठेवून खालील Export बटण क्लिक करा.
10:17 फाईल सेव्ह करण्याची जागा निवडा आणि Save बटण क्लिक करा.
10:24 तुम्ही निवडलेल्या फोल्डरमध्ये pdf फाईल तयार होईल.
10:29 बहुसंख्य प्रोग्रॅममध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय file extension म्हणजे dot csv.
10:36 spreadsheet data टेक्स्ट फाईल फॉरमॅटमधे संचित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
10:43 यामुळे फाईलचा आकार खूप लहान होतो आणि ती पोर्टेबल होते.
10:49 याशिवाय spreadsheet, dot html फॉरमॅटमधे देखील सेव्ह करता येते जो एक web page format आहे.

ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते.

11:03 File type च्या ड्रॉप डाऊनमधे HTML Document (Calc)(.html) हा पर्याय निवडा.
11:10 हा पर्याय spreadsheet फाईलला dot html हे एक्स्टेन्शन देईल.
11:16 ही फाईल पुन्हा तिथेच सेव्ह करा.
11:21 आता डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यातील वरच्या Save बटणावर क्लिक करा.
11:27 Confirm File Format हा डायलॉग बॉक्स उघडेल.
11:31 Ask when not saving in ODF or default format” हा पर्याय निवडा.
11:38 नंतर Use HTML Document (Calc) Format बटण क्लिक करा.
11:46 फाईल dot html या एक्स्टेन्शनने सेव्ह झालेली दिसेल.
11:52 spreadsheet जर web page म्हणून दाखवायची असेल तर हा फॉरमॅट वापरतात.
11:58 ही कोणत्याही web browser मधे उघडता येऊ शकते.
12:02 आता File menu वर क्लिक करू. नंतर Close वर क्लिक करून spreadsheet बंद करू.
12:10 पुढे LibreOffice Calc मध्ये अस्तित्वात असलेली spreadsheet कशी उघडायची हे बघणार आहोत.
12:17 Personal-Finance-Tracker.ods ही spreadsheet उघडूया.
12:22 LibreOffice इंटरफेसच्या डावीकडील Open File मेनूवर क्लिक करा.
12:28 फाईल ब्राऊजर डायलॉग बॉक्स उघडेल.
12:32 आपण फाईल जिथे सेव्ह केली आहे त्या फोल्डरवर जा.
12:36 आता दिसत असणाऱ्या फाईलच्या नावांच्या यादीतून Personal-Finance-Tracker.ods ही फाईल निवडा.
12:44 नंतर उजव्या कोपऱ्यात वरती Open बटणावर क्लिक करा.
12:49 Calc विंडोमधे Personal-Finance-Tracker.ods ही फाईल उघडेल.
12:56 अशाप्रकारे dot xls आणि dot xlsx या एक्सटेन्शन्स असलेल्या फाईल्स Calc मधे उघडू शकतो.
13:06 आता फाईलमधे बदल कसे करायचे आणि आहे त्याच नावाने ती सेव्ह कशी करायची ते जाणून घेऊ.
13:13 फाईलमधे बदल करण्यासाठी हेडिंग्ज bold करा आणि त्यांचा फाँट साईज वाढवा.
13:20 त्यासाठी प्रथम A1 या cell वर क्लिक करा.
13:25 आता Standard toolbar मधील Bold आयकॉनवर क्लिक करा.

SN हे हेडिंग bold होईल.

13:34 Standard toolbar मधील Font Size फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा.
13:40 ड्रॉपडाऊनमधे 14 हा पर्याय निवडा.
13:44 SN या हेडिंगचा फाँट साईज वाढून 14 होईल.
13:49 आता आपण वापरत असलेला font बदलू.
13:54 Standard toolbar मधील Font Name फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा.
14:00 ड्रॉपडाऊन मधून Arial हा font निवडा.
14:05 अशाचप्रकारे उर्वरित हेडिंग्जमधे बदल करा.
14:10 आता आपण केलेले बदल सेव्ह करू.
14:14 त्यासाठी Standard toolbar मधील Save आयकॉन क्लिक करा.
14:19 आता spreadsheet बंद करू.
14:22 menu bar मधील File मेनूवर क्लिक करून नंतर Close पर्यायावर क्लिक करा.
14:29 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

14:36 या पाठात आपण शिकलो:
14:39 LibreOffice Calc विषयी.
14:41 Calc मधील विविध toolbars .
14:45 नवीन आणि अस्तित्वात असलेली spreadsheet उघडणे.
14:49 spreadsheet सेव्ह करून ती बंद करणे.
14:52 ती MS Excel spreadsheet म्हणून सेव्ह करणे.
14:56 Calc मधून PDF डॉक्युमेंट म्हणून एक्सपोर्ट करणे.
15:01 असाईनमेंट म्हणून,

Calc मधे नवी spreadsheet उघडा.

15:06 ती Spreadsheet-Practice.ods नावाने सेव्ह करा.
15:11 SN”, “Name”, “Department” आणि “Salary” ही हेडिंग्ज टाईप करा.
15:18 हेडिंग्ज अंडरलाईन करून ती bold करा.
15:22 हेडिंग्जचा font size वाढवून तो 12 करा.
15:26 फाईल सेव्ह करून बंद करा.
15:29 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

15:38 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

15:48 तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
15:52 कृपया या साईटला भेट द्या.
15:55 ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
16:00 प्रश्न थोडक्यात विचारा.
16:03 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीममधील कोणीतरी उत्तर देईल.
16:08 प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल.
16:13 स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे.
16:19 कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.

त्यामुळे गोंधळ कमी होईल.

16:27 असंबध्दता टाळल्यास सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल.
16:33 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
16:40 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali