Health-and-Nutrition/C2/General-guidelines-for-Complementary-feeding/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:53, 2 September 2020 by Sakinashaikh (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:02 पूरक आहार देण्याची सामान्य मार्गदर्शक तत्त्वे ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:09 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत,
00:14 6 महिन्याच्या बाळांसाठी पूरक आहार सुरू करण्याचे महत्त्व
00:19 आणि 6 ते 24 महिन्याच्या बाळांसाठी पूरक आहाराची मार्गदर्शक तत्त्वे.
00:27 सुरूवात करू.
00:29 बाळाला जन्मापासून ते 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत निव्वळ स्तनपानच करावे.
00:37 6 महिन्यांचे बाळ याचा अर्थ असा नाही की बाळाच्या वयाच्या 6 व्या महिन्याची सुरुवात झाली.
00:45 तिने 6 महिने पूर्ण करून तिच्या वयाचा 7 वा महिना सुरू झाला आहे.
00:52 ह्या वयात बाळासाठी निव्वळ स्तनपान पुरेसे नसते.
00:59 आईच्या दुधाबरोबरच घरी शिजवलेले पोषक अन्न बाळाला दिलेच पाहिजे.
01:06 ह्या अन्नास पूरक अन्न म्हणतात.
01:11 हे 6 महिने ते 24 महिन्याच्या बाळास दिले जाणे गरजेचे आहे.
01:18 बाळाला उंच, निरोगी आणि बुद्धिमान बनविण्यात ह्याची महत्त्वाची भूमिका आहे.
01:26 वयाच्या 6 व्या महिन्यात पूरक आहार सुरू करणे महत्त्वाचे आहे.
01:33 अन्यथा, बाळाच्या वाढीत आणि विकासात अडथळा येईल.
01:39 नंतरच्या वयात बाळ घन पदार्थ नाकारण्याचीदेखील शक्यता असते.
01:47 लक्षात ठेवा पूरक अन्न स्तनपानास पाठींबा देते.
01:53 म्हणूनच, कमीतकमी वयाच्या 2 वर्षापर्यंत स्तनपान देणे आवश्यक आहे.
02:00 प्रकार,
02:02 सुसंगतता
02:04 आणि पूरक अन्नाचे प्रमाण बाळाच्या वयानुसार बदलते.
02:10 प्रत्येक वयोगटासाठी विशिष्ट शिफारसी आहेत.
02:16 त्याच मालिकेतल्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये त्यांची सविस्तर चर्चा केली आहे.
02:23 आता, सर्व वयोगटातील पूरक आहार देण्याच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा करू.
02:31 कोणताही नवीन पदार्थ प्रथम बाळाला स्वतंत्रपणे देणे आवश्यक आहे.
02:37 नंतर हे पदार्थ इतर पदार्थांसोबत एकत्र केले पाहिजे.
02:42 बाळाला एखाद्या विशिष्ट पदार्थाचे वावडे आहे का याचे मूल्यांकन करण्यास हे मदत करेल.
02:48 चांगल्या पोषणासाठी विविध प्रकारचे पदार्थ खाणे आवश्यक आहे.
02:54 दर चौथ्या दिवशी बाळाच्या आहारात नवीन पदार्थाची भर घाला.
03:01 आधी दिलेल्या अन्नात 1 चमचा नवीन पदार्थाचा देऊन सुरवात करा.
03:08 रोज हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा.
03:12 सर्व 8 खाद्य गटांमधील पौष्टिक घट्ट अन्न हळूहळू देणे आवश्यक आहे.
03:20 पहिला खाद्यगट धान्य, मुळे आणि कंद आहे.
03:27 ऊसळी, बियाणे आणि मेवा हा दुसरा गट आहे.
03:32 तिसरा गट आहे दुधाचे पदार्थ
03:37 चौथा गट आहे मांस, मासे आणि कोंबडी.
03:42 पाचवा गट आहे अंडी.
03:46 सहावा गट आहे जीवनसत्त्व अ ने समृद्ध फळे आणि भाज्या.
03:52 सातवा गट इतर फळे आणि भाज्या आहेत.
03:57 शेवटी, परंतु सर्वात महत्वाचा आठवा गट आहे आईचे दूध (स्तनपान).
04:04 इतर खाद्यगटांसह हे दररोज समाविष्ट केले जाणे आवश्यक आहे.
04:11 तसे पाहता, बाळाच्या आहारात सर्व 8 ही खाद्यगटांचा समावेश असलाच पाहिजे.
04:17 जर एखाद्या बाळाच्या आहारात या गटांपैकी 5 पेक्षा कमी गट असतील तर ही एक गंभीर समस्या आहे.
04:24 ते त्वरित दुरुस्त केले जाणे आवश्यक आहे.
04:28 काही बाळांना आईचे दूध बिल्कूल मिळत नाही.
04:33 त्यांच्या आहारात दररोज उर्वरित 7 गटातील खाद्य समाविष्ट करा.
04:40 तसेच, त्यांना दररोज 500 मि.ली. प्राण्याचे दूध आणि 2 अतिरिक्त जेवण द्यावे.
04:49 बाळाला दूध पाजण्यापूर्वी प्राण्याचे दूध नेहमी उकळवा.
04:55 आता आपण बाळाच्या आहारात नवीन खाद्य गट जोडण्याचा क्रम याविषयी चर्चा करू.
05:02 आईच्या दुधाबरोबरच पहिल्या 5 गटांमधून पूरक आहार देणे सुरू करा.
05:09 वयाच्या 6 महिन्यांनंतर बाळाला जास्त प्रमाणात पोषकद्रव्ये आवश्यक असतात.
05:16 तथापि, सुरुवातीच्या काळात दिले जाणारे अन्नाचे प्रमाण कमी असते.
05:24 म्हणून, पहिल्या 5 गटातील पौष्टिक घट्ट पदार्थ दिले जाऊ शकतात.
05:31 हे पदार्थ प्रथिने आणि चांगले मेद यासारख्या पोषकद्रव्यांनी समृद्ध असतात.
05:38 बाळाची उंची आणि स्नायूंच्या विकासासाठी ते महत्त्वाचे आहेत.
05:45 बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी चांगले मेद महत्त्वपूर्ण आहेत.
05:50 या पदार्थांनंतर भाज्या आणि फळे देणे सुरू करा.
05:57 भाज्या आणि फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात.
06:03 तथापि, ते पहिल्या 5 गटांतील प्रथिने आणि चरबीइतके समृद्ध नसतात .
06:11 म्हणूनच, वजन वाढण्याचे थांबणे किंवा कमी होणे हे टाळण्यासाठी ते उशिरा सुरू केले जातात.
06:18 तसेच, फळे चवीला गोड असतात.
06:23 हे महत्त्वाचे आहे की गोड चव अनुभवण्यापूर्वी लहान मुलांनी विविध प्रकारच्या चवी अनुभवलेल्या असाव्यात.
06:31 वेगवेगळ्या चवी अनुभवल्यामुळे मुलांना जास्तीत जास्त पदार्थ घेण्यास मदत होते.
06:37 यामुळे नंतर ते “मोजकेच खाणारे” बाळ होण्याची शक्यता कमी असते.
06:44 म्हणूनच, इतर सर्व प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतरच मुलाच्या आहारात फळांचा समावेश केला पाहिजे .
06:51 दिवसातून एकदा किंवा दोनदा ताजे, हंगामी, स्थानिक फळे देण्याची शिफारस केली जाते.
06:59 नियमित जेवणानंतर मिष्टान्न म्हणून फळ देता येते.
07:05 फळांचा घट्ट रस बाळाच्या नियमित जेवणामध्ये मिसळू नये.
07:11 ह्या वयोगटासाठी फळांचा रस वापरण्याची शिफारस केलेली नाही
07:16 यात घरगुती आणि तयार अशा दोन्हीही प्रकारचा फळांच्या रसाचा समावेश आहे.
07:23 लक्षात ठेवा, 2 वर्षांपर्यंत स्तनपान देणे सुरू ठेवा.
07:28 कडक अन्न देणे टाळा ज्यामुळे बाळाला गुदमरल्यासारखे होऊ शकते.
07:34 अख्खा मेवा, द्राक्षे, चणे आणि कच्चे गाजरचे तुकडे ही अशा पदार्थांची उदाहरणे आहेत.
07:44 स्वच्छपणे तयार केलेले,ताजे शिजवलेले घरगुती अन्न बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे.
07:51 जर बाळाचे भोजन साठवायचे असेल तर कृपया आमच्या सेफ स्टोरेजवरील ट्युटोरिअल पहा.
07:57 सुरक्षित तयारी आणि बाळाचा आहार देण्याविषयीही याच ट्युटोरिअलमध्ये चर्चा आहे.
08:06 कृपया अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.
08:10 अन्नासोबतच उकळून थंड केलेले पाणीदेखील 6 महिन्यांच्या बाळाला दिले जाऊ शकते.
08:18 दिवसातून दोनदा 30 ते 60 मिली पाण्याने सुरवात करा.
08:25 ह्याचे प्रमाण गरम वातावरणात आणि बाळाच्या मागणीनुसार वाढवा.
08:31 आईचे दूध आणि पाणी हे बाळासाठी सर्वोत्कृष्ट पेय आहेत.
08:37 तथापि, त्यांची योग्य वेळ असणे आवश्यक आहे.
08:42 जेवणाआधी बाळाला आईचे दूध किंवा पाणी देऊ नका.
08:48 भुकेलेले बाळ नवीन पदार्थ खाण्याचा संभव असतो.
08:54 जेवणाच्या 20 ते 30 मिनिटांपूर्वी किंवा नंतर बाळाला स्तनपान किंवा पाणी देऊ शकता.
09:02 मुलाची वाढ चांगली होण्यासाठी पुरेसा पूरक आहार आवश्यक आहे.
09:09 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.
09:12 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज राधिका हुद्दार ह्यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

Latapopale, Sakinashaikh