LibreOffice-Suite-Writer/C2/Viewing-and-printing-a-text-document/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Viewing and Printing Text Document/Marathi
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: Liber Office/Writer
|
|
---|---|
0:00 | लिबर ऑफिस Writer मध्ये डॉक्युमेंट Printing आणि Viewing वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
0:06 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
0:10 | डॉक्युमेंट बघणे. |
0:12 | डॉक्युमेंट छापणे. |
0:13 | इथे आपण उबंटु लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिबर ऑफिस व्हर्जन3.3.4 चा उपयोग करणार आहोत. |
0:24 | लिबर ऑफिस रायटर मधील विविध View ऑप्शन्स जाणून घेत आपण आपल्या ट्युटोरियलला सुरूवात करू. |
0:31 | रायटर मध्ये मुख्यतः वापरले जाणारे दोन View ऑप्शन्स आहेत. |
0:36 | ते म्हणजे "Print Layout आणि "Web Layout” |
0:39 | डॉक्युमेंट प्रिंट केल्यावर ते कसे दिसेल हे "Print Layout” ऑप्शन दाखवते. |
0:45 | डॉक्युमेंट वेब ब्राऊझर मध्ये कसे दिसेल हे "Web Layout” ऑप्शनमध्ये दिसते . |
0:50 | ह्या पर्यायाचा उपयोग आपल्याला HTML डॉक्युमेंट बनवताना तसेच डॉक्युमेंट मध्ये केलेले बदल फुल स्क्रीन मोडवर बघण्यासाठी होतो. |
1:00 | “Print Layout” ह्या ऑप्शनवर जाण्यासाठी "View” ऑप्शनवर क्लिक करून मग "Print Layout” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. |
1:08 | “Web Layout” ह्या ऑप्शनवर जाण्यासाठी मेनूबारवरील "View” ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Web Layout” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. |
1:19 | ह्या दोन्ही ऑप्शन्स व्यतिरिक्त तुम्ही डॉक्युमेंट फुल स्क्रीन मोडवर ही बघू शकता. |
1:26 | मेनू बार वरील "View” ह्या ऑप्शनवर क्लिक करून मग "Full Screen” ह्या ऑप्शनवर क्लिक करा. |
1:32 | "Full Screen” mode चा उपयोग डॉक्युमेंटमध्ये बदल करताना तसेच डॉक्युमेंट प्रोजेक्टर वर दाखवण्यासाठी होतो. |
1:39 | "Full Screen” mode मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्डवरील “Escape” हे बटण दाबा. |
1:44 | तुम्हाला डॉक्युमेंट "Full Screen” मोड मधून बाहेर आलेले दिसेल. |
1:49 | आता 'View' मेनूमधील "Print Layout” ऑप्शनवर क्लिक करा. |
1:53 | पुढे जाण्याआधी आपल्या डॉक्युमेंट मध्ये एक पान वाढवून घेऊ. त्यासाठी "Insert” मेनूमधील "Manual Break” ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि "Page Break” हा पर्याय निवडा. |
2:04 | आता 'OK' वर क्लिक करा. |
2:06 | आपण ह्या बद्दलची अधिक माहिती पुढील ट्युटोरियलमध्ये शिकू. |
2:11 | डॉक्युमेंट बघण्याचा अजून एक पर्याय म्हणजे "Zoom”. |
2:17 | मेनूबार वरील "View” ऑप्शनवर क्लिक करून मग "Zoom” वर क्लिक करा. |
2:22 | तुम्हाला समोर "Zoom and View Layout” हा डायलॉग बॉक्स आलेला दिसेल. |
2:27 | त्यात "Zoom Factor” आणि "View Layout” ही हेडिंग्ज आहेत. |
2:34 | "Zoom Factor”, आत्ता उघडलेले व यानंतर उघडली जाणारी सर्व डॉक्युमेंटस् किती मोठी करून दाखवावीत हे सांगण्यासाठी वापरला जातो. |
2:43 | त्यातील अनेक उपयोगी पर्यायांची आपण एकेक करून चर्चा करणार आहोत. |
2:48 | “Optimal” ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सर्वोत्तम View बघता येतो. |
2:55 | “Fit width and height” view ह्या पर्यायांमध्ये डॉक्युमेंटचे पान स्क्रीनच्या रूंदी किंवा लांबी मध्ये मावेल अशा पध्दतीने दर्शविले जाते. अशा प्रकारे एक पान एकावेळी दिसू शकते. |
3:05 | त्यामुळे डॉक्युमेंटची अनेक पाने बघणे आणि संपादित करणे खूप सोपे होते. |
3:11 | "Fit To Width” हा पर्याय पानाला त्याच्या रूंदीप्रमाणे स्क्रीनवर फिट बसवतो. |
3:17 | 100% View पानाचा वास्तविक आकार दाखवितो. |
3:23 | आपल्याकडे पुढचा सगळ्यात महत्त्वाचा 'View' ऑप्शन म्हणजे 'Variable' होय. |
3:28 | डॉक्युमेंट दाखवण्यासाठी वापरला जाणारा झूम फॅक्टर आपण “Variable” फिल्डमध्ये एंटर करू. |
3:35 | उदाहरणार्थ "Variable” ह्या फिल्डमध्ये 75% ही किंमत एंटर करा आणि नंतर "OK” वर क्लिक करा. |
3:43 | अशा पध्दतीने गरजेनुसार आणि सोयीनुसार डॉक्युमेंट योग्य आकारात बघण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी तुम्ही झूम फॅक्टर एंटर करू शकता. |
3:51 | डायलॉग बॉक्स मधील अजून एक सुविधा म्हणजे “View Layout” . |
3:56 | “View Layout” हा पर्याय टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी वापरला जातो. |
3:59 | झूम फॅक्टर कमी करून विविध लेआऊट सेटिंग्ज मध्ये डॉक्युमेंट कसे दिसते हे पाहण्यासाठी या पर्यायाचा वापर होतो. |
4:07 | “View Layout” मध्ये "Automatic” आणि "Single Page” हे पर्याय वापरून डॉक्युमेंटची पाने अनुक्रमे एकमेकांच्या शेजारी किंवा एकाखाली एक बघता येतात. |
4:18 | उदाहरणार्थ "Fit width and height” वर क्लिक केल्यानंतर आपण 'Zoom Factor' पर्याय निवडू. त्यानंतर “'View Layout” खाली 'Single Page' पर्याय निवडून शेवटी "OK” वर क्लिक केल्यास डॉक्युमेंटमधील पाने एकाखाली एक दर्शविली जातील. |
4:36 | आता "Automatic” पर्याय निवडून नंतर "OK” बटणावर क्लिक करा. |
4:42 | तुम्हाला दिसेल की डॉक्युमेंटची पाने एकमेकांच्या शेजारी दाखवली जातात. |
4:48 | रायटर स्टेटस बारवरील तीन controls वापरून आपण Zoom व View Layout बदलू शकतो. |
4:56 | स्टेटस बारवरील View Layout आयकॉन डावीकडून उजवीकडे अशाप्रकारे : Single Column Mode , एकाशेजारी एक अशी पाने दाखवणारा Mode आणि उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे शेजारी शेजारील पाने दर्शवणारा Mode |
5:15 | Zoom Slider उजवीकडे वा डावीकडे ड्रॅग करून आपण पानाचा आकार मोठा वा लहान करू शकतो. यामुळे एकावेळी अनेक पाने स्क्रीनवर दिसू शकतात. |
5:20 | लिबर ऑफिसमधील डॉक्युमेंट प्रिंट करण्याविषयी माहिती घेण्याआधी आपण "Page Preview” बद्दल थोडे जाणून घेऊ. |
5:28 | “File” वर क्लिक करून "Page Preview” वर क्लिक करा. |
5:32 | तुमचे चालू डॉक्युमेंट "Page Preview” मोड मध्ये बघताना "Page Preview” बार तुम्हाला दिसेल. |
5:38 | प्रिंट केल्यावर तुमचे डॉक्युमेंट कसे दिसणार आहे हे तुम्हाला यात दिसते. |
5:44 | तुम्ही आपल्या resume.odt ह्या फाईल चा प्रिव्ह्यू पाहू शकता. |
5:50 | प्रिव्ह्यू पेजच्या टूल बार वर विविध कंट्रोल ऑप्शन्स आहेत. |
5:55 | “Zoom In , “Zoom Out' , “Next Page”, आणि "Print” हे पर्याय उपलब्ध आहेत. |
6:03 | लिबर ऑफिस रायटर मध्ये डॉक्युमेंट कसे बघायचे आणि Print Preview ह्या बद्दल जाणून घेतल्यावर आता आपण लिबर ऑफिस रायटर मधील "Printer” च्या कार्याची माहिती करून घेऊ. |
6:15 | सोप्या शब्दात "Printer” म्हणजे डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी वापरले जाणारे आऊटपुट डिव्हाईस होय. |
6:21 | आता आपण प्रिंटचे विविध पर्याय कसे वापरायचे ते पहाणार आहोत. |
6:26 | “Tools” वर क्लिक करून "Option” वर क्लिक करा. |
6:32 | “Liber Office Writer” च्या शेजारील बाणावर क्लिक करून शेवटी "Print” वर क्लिक करा. |
6:38 | पर्याय निवडण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
6:43 | डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेवा आणि "OK” वर क्लिक करा. |
6:49 | आता संपूर्ण डॉक्युमेंट पटकन् प्रिंट करण्यासाठी टूल बार वरील "Print File Directly” वर क्लिक करा. |
6:56 | ह्याला "Quick Printing” असे म्हणतात. |
7:00 | “Print” ऑप्शनवर जाऊन आणि डिफॉल्ट सेटिंग्ज बदलून तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट प्रिंट करताना त्यावर अधिक नियंत्रण ठेवू शकता. |
7:07 | मेनूबार वरील "File “मेनूवर क्लिक करा. आणि नंतर "Print” वर क्लिक करा. |
7:13 | स्क्रीनवर "Print” नामक एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
7:17 | इथे आपण जनरल टॅब मधील "Generic Printer” ह्या ऑप्शनवर क्लिक करू. |
7:22 | डॉक्युमेंटची सर्व पाने प्रिंट करण्यासाठी "All Pages” हा पर्याय आहे. |
7:28 | पाने क्रमानुसार प्रिंट करायची असतील तर "Pages” हा ऑप्शन निवडा व त्या फिल्ड मध्ये पानांचा क्रम एंटर करा. उदाहरणार्थ, आपण इथे 1-3 असे टाईप करू. ह्यामुळे डॉक्युमेंटची पहिली तीन पाने छापली जातील. |
7:44 | एखाद्या डॉक्युमेंटच्या अनेक प्रति काढायच्या असतील तर "Number of Copies” ह्या फिल्डमध्ये संख्या एंटर करा. आपण ह्या फिल्डमध्ये 2हा अंक एंटर करू. |
7:54 | आता डायलॉग बॉक्स मधील "Options” ह्या टॅबवर क्लिक करा. |
8:00 | ऑप्शन निवडून डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शनची सूची स्क्रीनवर दिसेल. |
8:07 | तुम्हाला "Print in reverse page order” नामक एक चेक बॉक्स दिसेल. |
8:12 | ह्या पर्यायामुळे जास्त पृष्ठ संख्यांचे डॉक्युमेंट एकत्र लावणे सोपे जाते. |
8:16 | आता सदर चेकबॉक्स वर क्लिक करा. |
8:19 | आणि "Print” ह्या बटणावर क्लिक करा. |
8:22 | तुम्ही pdf फॉरमॅट मधील डॉक्युमेंटही प्रिंट करू शकता. |
8:26 | “dot odt” फॉरमॅट मधील डॉक्युमेंटचे रूपांतर "dot pdf” मध्ये कसे करायचे हे आपण आधीच पाहिले आहे. |
8:34 | डेस्कटॉपवर आपण जी pdf फाईल अगोदरच सेव्ह करून ठेवली आहे त्या pdf फाईल वर डबल क्लिक करू या. |
8:41 | आता "File” ह्या ऑप्शनवर क्लिक करून मग "Print” ह्या ऑप्शन वर क्लिक करा. |
8:47 | सर्व डिफॉल्ट सेटींग्ज जशीच्या तशी ठेवून मग "Print Preview” ह्या बटणावर क्लिक करा. |
8:52 | तुम्हाला फाईलचा प्रिव्ह्यू स्क्रीनवर दिसेल. |
8:56 | आता प्रिंट करण्यासाठी प्रिव्ह्यू पेजवरील "Print this document” ह्या आयकॉनवर क्लिक करा. |
9:04 | अशाप्रकारे आपण लिबर ऑफिस रायटर वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. |
9:09 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. |
9:11 | डॉक्युमेंट बघणे. |
9:13 | डॉक्युमेंट प्रिंट करणे. |
9:16 | COMPREHENSIVE ASSIGNMENT. |
9:18 | Writer मध्ये "This is Libre Office Writer” हे टेक्स्ट लिहा. |
9:23 | डॉक्युमेंटचा Full Screen व्ह्यू मिळवण्यासाठी "Full Screen” ह्या ऑप्शनचा उपयोग करा. |
9:29 | डॉक्युमेंटच्या Optimal” आणि "Variable” ह्या View साठी Zoom ह्या ऑप्शनचा उपयोग करा. “Variable” साठी "50%” ही व्हॅल्यू एंटर करून डॉक्युमेंट पहा. |
9:41 | डॉक्युमेंटच्या "Page Preview” वर जाऊन आणि पानांना बॉर्डर असलेल्या डॉक्युमेंटच्या दोन प्रति प्रिंट करा. |
9:49 | *सदर प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफीत खालील लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा गोषवारा मिळेल. |
9:56 | *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण ती download करूनही पाहू शकता. |
10:00 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:09 | *अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी Contact@spoken-tutorial.orgवर संपर्क साधू शकता. |
10:16 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
10:20 | *यासाठी National Misssion on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
10:28 | *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे. |
10:39 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज ............ नी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |