LibreOffice-Suite-Writer/C2/Viewing-and-printing-a-text-document/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 रायटर च्या Printing आणि Viewing वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:10 डॉक्युमेंट बघणे.
00:12 डॉक्युमेंट छापणे,आपण उबंटू लिनक्स 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिबर ऑफिस व्हर्जन 3.3.4 वापरणार आहोत.
00:24 प्रथम रायटर मधील विविध View ऑप्शन्स जाणून घेऊ.
00:31 रायटर मध्ये मुख्यतः वापरले जाणारे दोन View ऑप्शन्स आहेत.
00:36 ते म्हणजे "Print Layout आणि "Web Layout”
00:39 डॉक्युमेंट प्रिंट केल्यावर ते कसे दिसेल हे "Print Layout” ऑप्शन दाखवते.
00:45 ब्राऊझर मध्ये डॉक्युमेंट कसे दिसेल हे "Web Layout” दाखवतो .
00:50 ह्या पर्यायाचा उपयोग आपल्याला HTML डॉक्युमेंट बनवताना तसेच डॉक्युमेंट मध्ये केलेले बदल फुल स्क्रीन मोडवर बघण्यासाठी होतो.
01:00 “Print Layout” ह्या ऑप्शनवर जाण्यासाठी "View” ऑप्शनवर क्लिक करून मग "Print Layout” ह्या ऑप्शनवर क्लिक करा.
01:08 “Web Layout” ह्या ऑप्शनवर जाण्यासाठी मेनूबारवरील "View” ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग "Web Layout” ह्या ऑप्शनवर क्लिक करा.
01:19 ह्या दोन्ही ऑप्शन्स व्यतिरिक्त तुम्ही डॉक्युमेंट फुल स्क्रीन मोडवर ही बघू शकता.
01:26 प्रथम "View” वर क्लिक करून मग "Full Screen” वर क्लिक करा.
01:32 "Full Screen” mode चा उपयोग डॉक्युमेंटमध्ये बदल करताना तसेच डॉक्युमेंट प्रोजेक्टर वर दाखवण्यासाठी होतो.
01:39 "Full Screen” mode मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्डवरील “Escape” हे बटण दाबा.
01:44 तुम्हाला डॉक्युमेंट "Full Screen” मोड मधून बाहेर आलेले दिसेल.
01:49 आता 'View' मेनूमधील "Print Layout” ऑप्शनवर क्लिक करा.
01:53 पुढे जाण्याआधी आपल्या डॉक्युमेंट मध्ये एक पान वाढवून घेऊ. त्यासाठी "Insert” मेनूमधील "Manual Break” ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि "Page Break” हा पर्याय निवडा.
02:04 आता 'OK' वर क्लिक करा.
02:06 आपण ह्या बद्दलची अधिक माहिती पुढील ट्युटोरियलमध्ये शिकू.
02:11 डॉक्युमेंट बघण्याचा अजून एक पर्याय म्हणजे "Zoom”.
02:17 मेनूबार वरील "View” ऑप्शनवर क्लिक करून मग "Zoom” वर क्लिक करा.
02:22 "Zoom and View Layout” डायलॉग बॉक्स दिसेल.
02:27 त्यात "Zoom Factor” आणि "View Layout” ही हेडिंग्ज आहेत.
02:34 "Zoom Factor”, डॉक्युमेंटस् किती मोठी करून दाखवावीत हे सांगण्यासाठी वापरला जातो.
02:43 त्यातील उपयोगी पर्यायांची आपण चर्चा करणार आहोत.
02:48 “Optimal” ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर सर्वोत्तम View बघता येतो.
02:55 “Fit width and height” view मध्ये डॉक्युमेंटचे एक पान स्क्रीनच्या रूंदी किंवा लांबी मध्ये मावेल अशा प्रकारे दिसू शकते.
03:05 त्यामुळे डॉक्युमेंटची अनेक पाने बघणे आणि संपादित करणे खूप सोपे होते.
03:11 "Fit To Width” हा पर्याय पानाला त्याच्या रूंदीप्रमाणे स्क्रीनवर फिट बसवतो.
03:17 100% View पानाचा वास्तविक आकार दाखवितो.
03:23 पुढचा महत्त्वाचा 'View' ऑप्शन म्हणजे 'Variable' होय.
03:28 वापरला जाणारा झूम फॅक्टर आपण“Variable” फिल्डमध्ये एंटर करू.
03:35 उदाहरणार्थ "Variable” ह्या फिल्डमध्ये 75% ही किंमत एंटर करा आणि नंतर "OK” वर क्लिक करा.
03:43 डॉक्युमेंट योग्य आकारात बघण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी झूम फॅक्टर एंटर करू शकता.
03:51 डायलॉग बॉक्स मधील अजून एक सुविधा म्हणजे “View Layout” .
03:56 “View Layout” टेक्स्ट डॉक्युमेंटसाठी वापरतात.
03:59 झूम फॅक्टर कमी करून विविध लेआऊट मध्ये डॉक्युमेंट पाहण्यासाठी हा पर्याय वापरतात.
04:07 “View Layout” मध्ये "Automatic” आणि "Single Page” हे पर्याय वापरून डॉक्युमेंटची पाने अनुक्रमे एकमेकांच्या शेजारी किंवा एकाखाली एक बघता येतात.
04:18 उदाहरणार्थ "Fit width and height” वर क्लिक केल्यानंतर आपण 'Zoom Factor' पर्याय निवडू. त्यानंतर “'View Layout” खाली 'Single Page' पर्याय निवडून शेवटी "OK” वर क्लिक केल्यास डॉक्युमेंटमधील पाने एकाखाली एक दर्शविली जातील.
04:36 आता "Automatic” पर्याय निवडून नंतर "OK” बटणावर क्लिक करा.
04:42 तुम्हाला दिसेल की डॉक्युमेंटची पाने एकमेकांच्या शेजारी दाखवली जातात.
04:48 रायटर स्टेटस बारवरील तीन controls वापरून आपण Zoom व View Layout बदलू शकतो.
04:56 स्टेटस बारवरील View Layout आयकॉन डावीकडून उजवीकडे अशाप्रकारे : Single Column Mode , एकाशेजारी एक अशी पाने दाखवणारा Mode आणि उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे शेजारी शेजारील पाने दर्शवणारा Mode
05:15 Zoom Slider ने पानाचा आकार बदलून अनेक पाने दिसू शकतात.
05:20 लिबर ऑफिसमधील डॉक्युमेंट प्रिंट करण्याविषयी माहिती घेण्याआधी आपण "Page Preview” बद्दल थोडे जाणून घेऊ.
05:28 “File” वर क्लिक करून "Page Preview” वर क्लिक करा.
05:32 "Page Preview” मोड मध्ये डॉक्युमेंट बघताना "Page Preview” बार दिसेल.
05:38 प्रिंट केल्यावर तुमचे डॉक्युमेंट कसे दिसणार आहे हे तुम्हाला यात दिसते.
05:44 तुम्ही आपल्या resume.odt ह्या फाईल चा प्रिव्ह्यू पाहू शकता.
05:50 प्रिव्ह्यू पेजच्या टूल बार वर विविध कंट्रोल ऑप्शन्स आहेत.
05:55 “Zoom In , “Zoom Out' , “Next Page”, आणि "Print” हे पर्याय उपलब्ध आहेत.
06:03 लिबर ऑफिस रायटर मध्ये डॉक्युमेंट कसे बघायचे आणि Print Preview ह्या बद्दल जाणून घेतल्यावर आता आपण लिबर ऑफिस रायटर मधील "Printer” च्या कार्याची माहिती करून घेऊ.
06:15 "Printer” म्हणजे डॉक्युमेंट प्रिंट करण्याचे आऊटपुट डिव्हाईस होय.
06:21 आता आपण प्रिंटचे विविध पर्याय कसे वापरायचे ते पाहू.
06:26 “Tools” वर क्लिक करून "Option” वर क्लिक करा.
06:32 “Liber Office Writer” च्या शेजारील बाणावर क्लिक करून शेवटी "Print” वर क्लिक करा.
06:38 पर्याय निवडण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल.
06:43 डिफॉल्ट सेटिंग्ज तशीच ठेवा आणि "OK” वर क्लिक करा.
06:49 आता संपूर्ण डॉक्युमेंट पटकन् प्रिंट करण्यासाठी टूल बार वरील "Print File Directly” वर क्लिक करा.
06:56 ह्याला "Quick Printing” असे म्हणतात.
07:00 “Print” ऑप्शनमधील डिफॉल्ट सेटिंग्ज बदलून डॉक्युमेंट प्रिंटींगवर नियंत्रण ठेवता येते.
07:07 मेनूबार वरील "File “मेनूवर क्लिक करा. आणि नंतर "Print” वर क्लिक करा.
07:13 स्क्रीनवर "Print” नामक एक डायलॉग बॉक्स उघडेल.
07:17 जनरल टॅब मधील "Generic Printer” वर क्लिक करा.
07:22 डॉक्युमेंटची सर्व पाने प्रिंट करण्यासाठी "All Pages” हा पर्याय आहे.
07:28 पाने क्रमानुसार प्रिंट करायची असतील तर "Pages” हा ऑप्शन निवडा व त्या फिल्ड मध्ये पानांचा क्रम एंटर करा. उदाहरणार्थ, आपण इथे 1-3 असे टाईप करू. ह्यामुळे डॉक्युमेंटची पहिली तीन पाने छापली जातील.
07:44 डॉक्युमेंटच्या अनेक प्रति काढण्यासाठी "Number of Copies” फिल्डमध्ये संख्या एंटर करा. आपण '2' एंटर करू.
07:54 आता डायलॉग बॉक्स मधील "Options” ह्या टॅबवर क्लिक करा.
08:00 ऑप्शन निवडून डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शनची सूची स्क्रीनवर दिसेल.
08:07 तुम्हाला "Print in reverse page order” नामक एक चेक बॉक्स दिसेल.
08:12 यामुळे जास्त पानांचे डॉक्युमेंट एकत्र लावणे सोपे जाते.
08:16 आता सदर चेकबॉक्स वर क्लिक करा.
08:19 आणि "Print” ह्या बटणावर क्लिक करा.
08:22 तुम्ही pdf फॉरमॅट मधील डॉक्युमेंटही प्रिंट करू शकता.
08:26 “dot odt” फॉरमॅट मधील डॉक्युमेंटचे रूपांतर "dot pdf” मध्ये कसे करायचे हे आपण आधीच पाहिले आहे.
08:34 डेस्कटॉपवर आपण जी pdf फाईल अगोदरच सेव्ह करून ठेवली आहे त्या pdf फाईल वर डबल क्लिक करू या.
08:41 आता "File” ह्या ऑप्शनवर क्लिक करून मग "Print” ह्या ऑप्शन वर क्लिक करा.
08:47 डिफॉल्ट सेटींग्ज न बदलता "Print Preview” वर क्लिक करा.
08:52 तुम्हाला फाईलचा प्रिव्ह्यू स्क्रीनवर दिसेल.
08:56 आता प्रिंट करण्यासाठी प्रिव्ह्यू पेजवरील "Print this document” ह्या आयकॉनवर क्लिक करा.
09:04 अशाप्रकारे आपण लिबर ऑफिस रायटर वरील ह्या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत.
09:09 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
09:11 डॉक्युमेंट बघणे.
09:13 डॉक्युमेंट प्रिंट करणे.
09:16 COMPREHENSIVE ASSIGNMENT.
09:18 Writer मध्ये "This is Libre Office Writer” हे टेक्स्ट लिहा.
09:23 डॉक्युमेंटचा Full Screen व्ह्यू मिळवण्यासाठी "Full Screen” ह्या ऑप्शनचा उपयोग करा.
09:29 डॉक्युमेंटच्या Optimal” आणि "Variable” ह्या View साठी Zoom ह्या ऑप्शनचा उपयोग करा. “Variable” साठी "50%” ही व्हॅल्यू एंटर करून डॉक्युमेंट पहा.
09:41 डॉक्युमेंटच्या "Page Preview” वर जाऊन आणि पानांना बॉर्डर असलेल्या डॉक्युमेंटच्या दोन प्रति प्रिंट करा.
09:49 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:52 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:06 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:09 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:20 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:28 यासंबंधी माहिती
10:31 पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:39 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana, Sneha