LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Inserting-Pictures-and-Tables-in-Impress/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Inserting Pictures and Tables वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात शिकणार आहोत: |
00:11 | Pictures समाविष्ट करणे. |
00:14 | Pictures फॉरमॅट करणे. |
00:17 | presentation च्या आत आणि बाहेर नेणारी Hyperlink बनवणे. |
00:21 | Tables समाविष्ट करणे. |
00:24 | या पाठासाठी मी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:38 | आपण आधी सेव्ह केलेल्या presentation ची Sample-Impress.odp फाईल उघडू. |
00:46 | ही फाईल आणि इमेज फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेली आहे. |
00:55 | या फाईल्स डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
00:59 | या फाईल्सची कॉपी बनवून सरावासाठी त्यांचा वापर करा.
|
01:04 | presentation मधे picture समाविष्ट करण्याविषयी जाणून घेऊ. |
01:09 | प्रथम Slides Pane मधून slide क्रमांक 4 सिलेक्ट करा. |
01:15 | Standard toolbar मधील Duplicate Slide आयकॉनवर क्लिक करून slide ची दुसरी प्रत बनवा. |
01:22 | slide च्या Title textbox वर क्लिक करा. |
01:26 | “Long Term Goal” हे टायटल बदलून “Open Source Funny” असे करा. |
01:32 | खालील Body textbox मधे क्लिक करा. |
01:37 | Standard toolbar मधील Insert Image आयकॉनवर क्लिक करा. |
01:43 | किंवा menu bar मधील Insert menu वर क्लिक करून Image पर्यायावर क्लिक करा. |
01:52 | Insert Image चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:56 | picture जिथे सेव्ह केलेले आहे त्या फोल्डरवर जा. |
02:01 | Desktop वर जाऊन opensource-bart.png हे picture सिलेक्ट करू. |
02:10 | उजव्या कोपऱ्यात वरती Open बटणावर क्लिक करा. |
02:15 | slide मधे पिक्चर समाविष्ट होईल. |
02:19 | पूर्वी नमूद केल्याप्रमाणे Code files या लिंकमधे ही image दिलेली आहे. |
02:26 | Ctrl+Z कीज दाबून केलेले बदल undo करा. |
02:32 | Body textbox च्या मध्यभागी चार आयकॉन्स असलेला छोटा बॉक्स दिसेल.
जलद ऍक्सेस करण्यासाठी हा Insert Toolbar आहे. |
02:42 | चित्र समाविष्ट करण्यासाठी Insert Toolbar मधील डावीकडील खालचा “Insert Image” नावाचा आयकॉन क्लिक करा. |
02:51 | opensource-bart.png ही फाईल सिलेक्ट करून उजव्या कोपऱ्यातील वरचे Open बटण क्लिक करा. |
02:59 | slide मधे image समाविष्ट होईल. |
03:03 | आता image चा आकार कसा बदलायचा हे जाणून घेऊ. |
03:09 | image च्या कडांभोवती ‘Control Points’ नावाची आठ हँडल्स आहेत. |
03:17 | माऊसचा कर्सर ‘double vertical arrow’ मधे बदलेपर्यंत कोणत्याही Control Point वर माऊस फिरवा. |
03:25 | आता कोणत्याही एका Control Point वर माऊसचे डावे बटण क्लिक करून ते दाबून ठेवा. |
03:31 | आता आवश्यकतेनुसार Control Point, खाली किंवा वर, डावीकडे किंवा उजवीकडे ड्रॅग करून image च्या आकारात बदल करा. |
03:42 | कोपऱ्यातील Control points ड्रॅग करण्याने लांबी आणि रुंदीचे प्रमाण राखून त्यांत बदल केले जातात. |
03:50 | एकदा image चा आकार बदलून झाला की टेक्स्ट बॉक्समधे कुठेही क्लिक करा. |
03:56 | केलेले बदल undo करण्यासाठी Ctrl आणि Z ह्या कीज दाबा. |
04:02 | याचप्रकारे slide मधे charts आणि audio-video clips सारखी इतर objects समाविष्ट करू शकतो. |
04:11 | नंतर हे सर्व पर्याय स्वतः वापरून बघा. |
04:16 | पुढे hyperlink बद्दल जाणून घेऊ. |
04:20 | Hyperlinking चा उपयोग: |
04:22 | एका slide वरून दुसऱ्या slide वर सहजपणे जाणे, |
04:26 | presentation मधून document उघडणे, |
04:30 | presentation मधून web page उघडणे यासाठी होतो. |
04:34 | प्रथम presentation मधील दुसऱ्या slide ला कसे hyperlink करायचे ते बघू. |
04:41 | slide च्या Title textbox वर क्लिक करा. |
04:45 | प्रथम आपण “Long term Goal” हे टायटल बदलून ते “Table of Contents” करू. |
04:52 | नंतर ही स्लाईड आपण दुसऱ्या क्रमांकावर हलवूया. त्यासाठी Slides pane मधे ह्या slide वर क्लिक करा. |
05:00 | माऊसचे बटण न सोडता slide वर दुसऱ्या क्रमांकावर ड्रॅग करा. |
05:07 | आता माऊसचे बटण सोडा. |
05:10 | Body textbox वर क्लिक करून पुढील टेक्स्ट टाईप करा: |
05:16 | Overview
Short Term Strategy |
05:20 | Open Source Funny
Long Term Goal |
05:26 | आता Overview या टेक्स्टची ओळ सिलेक्ट करा. |
05:30 | Standard Toolbar मधील Insert Hyperlink या आयकॉनवर क्लिक करा. |
05:35 | Hyperlink चा डायलॉग बॉक्स स्क्रीनवर उघडेल. |
05:40 | डायलॉग बॉक्सच्या डावीकडील भागात Document हा पर्याय निवडा. |
05:45 | Target in Document भागात Target फिल्डच्या उजवीकडे जा. |
05:51 | Target in document नावाच्या Circle आयकॉनवर क्लिक करा. |
05:56 | स्क्रीनवर Target in document चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:02 | presentation मधील सर्व slides ची सूची येथे दिसेल. |
06:08 | hyperlink करायची slide या सूचीतून तुम्ही निवडू शकता. |
06:14 | सूचीतील Slide 3 वर डबल क्लिक करून ती निवडत आहोत. |
06:19 | Apply बटणावर क्लिक करून नंतर Close बटण क्लिक करा. |
06:25 | आता Target फिल्डमधे आपल्याला Slide 3 दिसेल. |
06:31 | आता खाली Apply बटण क्लिक करून Close बटण क्लिक करा. |
06:37 | नंतर Body textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
06:42 | आता कर्सर hyperlinked टेक्स्टवर नेल्यावर कर्सर pointing finger मधे बदलेल. |
06:51 | याचा अर्थ hyperlinking यशस्वी झाले आहे. |
06:56 | Ctrl की दाबून hyperlinked केलेल्या टेक्स्टवर क्लिक करा. |
07:01 | हे तुम्हाला संबंधित slide वर घेऊन जाईल. |
07:05 | आता या presentation मधून दुसऱ्या document ला कसे hyperlink करायचे हे पाहू. |
07:12 | प्रथम “Table of Contents” हे टायटल असलेल्या slide वर परत जा. |
07:18 | Body textbox मधे क्लिक करा. |
07:21 | “External Document” अशी ओळ शेवटी टाईप करा. |
07:26 | आता “External Document” हे वाक्य सिलेक्ट करा. |
07:30 | Standard Toolbar मधे Insert Hyperlink आयकॉनवर क्लिक करा. |
07:35 | Hyperlink च्या डायलॉग बॉक्समधील डावीकडील भागात Document पर्याय क्लिक करा. |
07:41 | आता उजवीकडील Path फिल्डवर जा. |
07:45 | ‘Open File’ नावाच्या Folder आयकॉनवर क्लिक करा. |
07:50 | स्क्रीनवर Open हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:54 | येथे hyperlink करायचे डॉक्युमेंट सिलेक्ट करणे आवश्यक आहे. |
08:00 | Desktop वर जाऊन Resume.odt फाईल उघडू. |
08:06 | उजव्या कोपऱ्यात वरचे “Open” बटण क्लिक करा. |
08:11 | Path फिल्डमधे Resume.odt या फाईलचे संपूर्ण लोकेशन दिसेल. |
08:18 | आता खालील भागातील Apply बटण क्लिक करून Close बटण क्लिक करा. |
08:24 | आता Body textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
08:29 | External Document हे टेक्स्ट आता hyperlinked टेक्स्ट झालेले दिसेल. |
08:36 | Ctrl की दाबून hyperlinked केलेल्या टेक्स्टवर क्लिक करा. |
08:42 | हे आपण निवडलेल्या संबंधित document वर घेऊन जाईल. |
08:48 | येथे आपल्याला Resume.odt फाईलवर नेईल. |
08:53 | अशाचप्रकारे web page ला Hyperlinking केले जाते. |
08:57 | पुन्हा एकदा Body textbox वर क्लिक करा. |
09:01 | पुढील ओळीवर Ubuntu LibreOffice असे टाईप करा. |
09:06 | Ubuntu LibreOffice हे टेक्स्ट सिलेक्ट करा. |
09:10 | menu bar मधील Insert menu वर क्लिक करून नंतर Hyperlink पर्यायावर क्लिक करा. |
09:18 | Hyperlink डायलॉग बॉक्समधील डावीकडील भागात डिफॉल्ट रूपात Internet पर्याय निवडलेला आहे. |
09:25 | आणि Hyperlink Type या भागात Web हे रेडिओ बटण निवडलेले आहे. |
09:31 | आता URL फिल्डमधे www.libreoffice.org टाईप करा. |
09:41 | आता खालील Apply बटण क्लिक करून नंतर Close बटण क्लिक करा. |
09:47 | Body textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा. |
09:51 | Ubuntu LibreOffice हे टेक्स्ट आता hyperlinked टेक्स्ट झालेले आहे. |
09:58 | पुढील भागाच्या प्रात्यक्षिकासाठी internet connectivity आवश्यक आहे.
तुमच्याकडे ती नसल्यास हा भाग वगळून पुढे जा. |
10:08 | Ctrl की दाबून hyperlinked केलेल्या टेक्स्टवर क्लिक करा. |
10:13 | हे तुम्हाला संबंधित URL वर घेऊन जाईल. |
10:17 | आता presentation मधे tables कशी समाविष्ट करायची ते बघू. |
10:23 | columns आणि rows मधे data संयोजित करण्यासाठी Tables चा उपयोग होतो. |
10:29 | Slides pane मधून Short Term Strategy नावाची slide सिलेक्ट करा. |
10:35 | Standard Toolbar मधील Slide Layout आयकॉनवर क्लिक करा. |
10:40 | Title and 2 Content layout वर क्लिक करा. |
10:44 | slide च्या डावीकडील Body textbox वर क्लिक करा. |
10:49 | Insert Toolbar मधील ‘Insert Table’ नावाच्या आयकॉनवर क्लिक करा. |
10:55 | स्क्रीनवर Insert Table चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
11:00 | डिफॉल्ट रूपात Number of columns म्हणून 5 आणि Number of rows म्हणून 2 दिसत आहेत. |
11:08 | plus आणि minus बटणांच्या सहाय्याने ही संख्या कमी जास्त करता येते. |
11:16 | Number of columns साठी 2 आणि
Number of rows साठी 5 असे सेट करू. |
11:23 | उजव्या कोपऱ्यातील ‘Ok’ बटणावर क्लिक करा. |
11:28 | slide मधे table समाविष्ट करण्याची ही एक पध्दत आहे. |
11:33 | दुसऱ्या पध्दतीने table समाविष्ट करण्यासाठी Standard toolbar मधील Table आयकॉनवर क्लिक करा. |
11:40 | येथे दाखवलेल्या grid मधून table चे rows आणि columns स्वतः निवडू शकतो. |
11:47 | येथे table भोवती Control Points दिसतील. |
11:52 | आता हे table इतके मोठे करू की त्यातील टाईप केलेले टेक्स्ट नीट वाचता येईल. |
11:58 | आता माऊसचे डावे बटण खालच्या Control Point वर क्लिक करून तसेच दाबून ठेवून खालच्या बाजूला ड्रॅग करा. |
12:06 | येथे दाखवल्याप्रमाणे table मधे काही टेक्स्ट टाईप करा. |
12:11 | आता header row चा font Bold करून ते टेक्स्ट मध्यभागी आणा. |
12:18 | आता वरच्या row मधील टेक्स्ट सिलेक्ट करा. |
12:22 | Sidebar मधील Properties भागावर क्लिक करा. |
12:27 | Bold आयकॉनवर क्लिक करून नंतर Align Center आयकॉनवर क्लिक करा. |
12:34 | आता table चा रंग बदलू. |
12:38 | अशाप्रकारे माऊस ड्रॅग करून table मधील सर्व टेक्स्ट प्रथम सिलेक्ट करा. |
12:45 | Properties या भागात Table Design या प्रॉपर्टीवर जाऊन कोणतीही table style निवडता येते. |
12:53 | या सूचीतून आपल्या आवडीची table style निवडू. |
12:59 | Body textbox बाहेर कुठेही क्लिक करा.
आता आपले Table कसे दिसत आहे ते बघा. |
13:06 | Save आयकॉनवर क्लिक करून आपण प्रेझेंटेशनमधे केलेले सर्व बदल सेव्ह करा
आणि नंतर फाईल बंद करा. |
13:16 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
13:23 | या पाठात आपण शिकलो: |
13:27 | Pictures समाविष्ट करणे
Pictures फॉरमॅट करणे |
13:31 | presentation मधे आणि बाहेर नेणारी Hyperlink बनवणे, Tables समाविष्ट करणे. |
13:38 | असाईनमेंट म्हणून,
“Practice-Impress.odp” ही फाईल उघडा.
|
13:44 | तिसऱ्या slide वर picture समाविष्ट करा. |
13:48 | चौथ्या slide वर दोन rows आणि तीन columns असलेले table बनवा. |
13:54 | दुसऱ्या column च्या दुसऱ्या row मधे ‘slide 3’ टाईप करा आणि तिसऱ्या slide साठी या टेक्स्टला hyperlink बनवा. |
14:02 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
14:10 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
14:20 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
14:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
14:31 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
|