LibreOffice-Suite-Impress-6.3/C2/Inserting-Pictures-and-Tables-in-Impress/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Inserting Pictures and Tables वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत:
00:11 Pictures समाविष्ट करणे.
00:14 Pictures फॉरमॅट करणे.
00:17 presentation च्या आत आणि बाहेर नेणारी Hyperlink बनवणे.
00:21 Tables समाविष्ट करणे.
00:24 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:38 आपण आधी सेव्ह केलेल्या presentation ची Sample-Impress.odp फाईल उघडू.
00:46 ही फाईल आणि इमेज फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेली आहे.
00:55 या फाईल्स डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
00:59 या फाईल्सची कॉपी बनवून सरावासाठी त्यांचा वापर करा.
01:04 Presentation मधे picture समाविष्ट करण्याविषयी जाणून घेऊ.
01:09 प्रथम Slides Pane मधून slide क्रमांक 4 सिलेक्ट करा.
01:15 Standard toolbar मधील Duplicate Slide आयकॉनवर क्लिक करून slide ची दुसरी प्रत बनवा.
01:22 slide च्या Title textbox वर क्लिक करा.
01:26 Long Term Goal हे टायटल बदलून “Open Source Funny” असे करा.
01:32 खालील Body textbox मधे क्लिक करा.
01:37 Standard toolbar मधील Insert Image आयकॉनवर क्लिक करा.
01:43 किंवा menu bar मधील Insert menu वर क्लिक करून Image पर्यायावर क्लिक करा.
01:52 Insert Image चा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:56 Picture जिथे सेव्ह केलेले आहे त्या फोल्डरवर जा.
02:01 Desktop वर जाऊन opensource-bart.png हे picture सिलेक्ट करू.
02:10 उजव्या कोपऱ्यात वरती Open बटणावर क्लिक करा.
02:15 slide मधे पिक्चर समाविष्ट होईल.
02:19 पूर्वी नमूद केल्याप्रमाणे Code files या लिंकमधे ही image दिलेली आहे.
02:26 Ctrl + Z कीज दाबून केलेले बदल undo करा.
02:32 Body textbox च्या मध्यभागी चार आयकॉन्स असलेला छोटा बॉक्स दिसेल.

जलद ऍक्सेस करण्यासाठी हा Insert Toolbar आहे.

02:42 चित्र समाविष्ट करण्यासाठी Insert Toolbar मधील डावीकडील खालचा “Insert Image” नावाचा आयकॉन क्लिक करा.
02:51 opensource-bart.png ही फाईल सिलेक्ट करून उजव्या कोपऱ्यातील वरचे Open बटण क्लिक करा.
02:59 slide मधे image समाविष्ट होईल.
03:03 आता image चा आकार कसा बदलायचा हे जाणून घेऊ.
03:09 image च्या कडांभोवती ‘Control Points’ नावाची आठ हँडल्स आहेत.
03:17 माऊसचा कर्सर ‘double vertical arrow’ मधे बदलेपर्यंत कोणत्याही Control Point वर माऊस फिरवा.
03:25 आता कोणत्याही एका Control Point वर माऊसचे डावे बटण क्लिक करून ते दाबून ठेवा.
03:31 आता आवश्यकतेनुसार Control Point, खाली किंवा वर, डावीकडे किंवा उजवीकडे ड्रॅग करून image च्या आकारात बदल करा.
03:42 कोपऱ्यातील Control points ड्रॅग करण्याने लांबी आणि रुंदीचे प्रमाण राखून त्यांत बदल केले जातात.
03:50 एकदा image चा आकार बदलून झाला की टेक्स्ट बॉक्समधे कुठेही क्लिक करा.
03:56 केलेले बदल undo करण्यासाठी Ctrl आणि Z ह्या कीज दाबा.
04:02 याचप्रकारे slide मधे charts आणि audio-video clips सारखी इतर objects समाविष्ट करू शकतो.
04:11 नंतर हे सर्व पर्याय स्वतः वापरून बघा.
04:16 पुढे hyperlink बद्दल जाणून घेऊ.
04:20 Hyperlinking चा उपयोग:
04:22 एका slide वरून दुसऱ्या slide वर सहजपणे जाणे,
04:26 Presentation मधून document उघडणे,
04:30 Presentation मधून web page उघडणे यासाठी होतो.
04:34 प्रथम presentation मधील दुसऱ्या slide ला कसे hyperlink करायचे ते बघू.
04:41 Slide च्या Title textbox वर क्लिक करा.
04:45 प्रथम आपण Long term Goal हे टायटल बदलून ते Table of Contents करू.
04:52 नंतर ही स्लाईड आपण दुसऱ्या क्रमांकावर हलवूया. त्यासाठी Slides pane मधे ह्या slide वर क्लिक करा.
05:00 माऊसचे बटण न सोडता slide वर दुसऱ्या क्रमांकावर ड्रॅग करा.
05:07 आता माऊसचे बटण सोडा.
05:10 Body textbox वर क्लिक करून पुढील टेक्स्ट टाईप करा:
05:16 Overview

Short Term Strategy

05:20 Open Source Funny

Long Term Goal

05:26 आता Overview या टेक्स्टची ओळ सिलेक्ट करा.
05:30 Standard Toolbar मधील Insert Hyperlink या आयकॉनवर क्लिक करा.
05:35 Hyperlink चा डायलॉग बॉक्स स्क्रीनवर उघडेल.
05:40 डायलॉग बॉक्सच्या डावीकडील भागात Document हा पर्याय निवडा.
05:45 Target in Document भागात Target फिल्डच्या उजवीकडे जा.
05:51 Target in document नावाच्या Circle आयकॉनवर क्लिक करा.
05:56 स्क्रीनवर Target in document चा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:02 Presentation मधील सर्व slides ची सूची येथे दिसेल.
06:08 hyperlink करायची slide या सूचीतून तुम्ही निवडू शकता.
06:14 सूचीतील Slide 3 वर डबल क्लिक करून ती निवडत आहोत.
06:19 Apply बटणावर क्लिक करून नंतर Close बटण क्लिक करा.
06:25 आता Target फिल्डमधे आपल्याला Slide 3 दिसेल.
06:31 आता खाली Apply बटण क्लिक करून Close बटण क्लिक करा.
06:37 नंतर Body textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा.
06:42 आता कर्सर hyperlinked टेक्स्टवर नेल्यावर कर्सर pointing finger मधे बदलेल.
06:51 याचा अर्थ hyperlinking यशस्वी झाले आहे.
06:56 Ctrl की दाबून hyperlinked केलेल्या टेक्स्टवर क्लिक करा.
07:01 हे तुम्हाला संबंधित slide वर घेऊन जाईल.
07:05 आता या presentation मधून दुसऱ्या document ला कसे hyperlink करायचे हे पाहू.
07:12 प्रथम Table of Contents हे टायटल असलेल्या slide वर परत जा.
07:18 Body textbox मधे क्लिक करा.
07:21 External Document अशी ओळ शेवटी टाईप करा.
07:26 आता External Document हे वाक्य सिलेक्ट करा.
07:30 Standard Toolbar मधे Insert Hyperlink आयकॉनवर क्लिक करा.
07:35 Hyperlink च्या डायलॉग बॉक्समधील डावीकडील भागात Document पर्याय क्लिक करा.
07:41 आता उजवीकडील Path फिल्डवर जा.
07:45 Open File’ नावाच्या Folder आयकॉनवर क्लिक करा.
07:50 स्क्रीनवर Open हा डायलॉग बॉक्स उघडेल.
07:54 येथे hyperlink करायचे डॉक्युमेंट सिलेक्ट करणे आवश्यक आहे.
08:00 Desktop वर जाऊन Resume.odt फाईल उघडू.
08:06 उजव्या कोपऱ्यात वरचे Open बटण क्लिक करा.
08:11 Path फिल्डमधे Resume.odt या फाईलचे संपूर्ण लोकेशन दिसेल.
08:18 आता खालील भागातील Apply बटण क्लिक करून Close बटण क्लिक करा.
08:24 आता Body textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा.
08:29 External Document हे टेक्स्ट आता hyperlinked टेक्स्ट झालेले दिसेल.
08:36 Ctrl की दाबून hyperlinked केलेल्या टेक्स्टवर क्लिक करा.
08:42 हे आपण निवडलेल्या संबंधित document वर घेऊन जाईल.
08:48 येथे आपल्याला Resume.odt फाईलवर नेईल.
08:53 अशाचप्रकारे web page ला Hyperlinking केले जाते.
08:57 पुन्हा एकदा Body textbox वर क्लिक करा.
09:01 पुढील ओळीवर Ubuntu LibreOffice असे टाईप करा.
09:06 Ubuntu LibreOffice हे टेक्स्ट सिलेक्ट करा.
09:10 menu bar मधील Insert menu वर क्लिक करून नंतर Hyperlink पर्यायावर क्लिक करा.
09:18 Hyperlink डायलॉग बॉक्समधील डावीकडील भागात डिफॉल्ट रूपात Internet पर्याय निवडलेला आहे.
09:25 आणि Hyperlink Type या भागात Web हे रेडिओ बटण निवडलेले आहे.
09:31 आता URL फिल्डमधे www.libreoffice.org टाईप करा.
09:41 आता खालील Apply बटण क्लिक करून नंतर Close बटण क्लिक करा.
09:47 Body textbox च्या बाहेर कुठेही क्लिक करा.
09:51 Ubuntu LibreOffice हे टेक्स्ट आता hyperlinked टेक्स्ट झालेले आहे.
09:58 पुढील भागाच्या प्रात्यक्षिकासाठी internet connectivity आवश्यक आहे.

तुमच्याकडे ती नसल्यास हा भाग वगळून पुढे जा.

10:08 Ctrl की दाबून hyperlinked केलेल्या टेक्स्टवर क्लिक करा.
10:13 हे तुम्हाला संबंधित URL वर घेऊन जाईल.
10:17 आता presentation मधे tables कशी समाविष्ट करायची ते बघू.
10:23 columns आणि rows मधे data संयोजित करण्यासाठी Tables चा उपयोग होतो.
10:29 Slides pane मधून Short Term Strategy नावाची slide सिलेक्ट करा.
10:35 Standard Toolbar मधील Slide Layout आयकॉनवर क्लिक करा.
10:40 Title and 2 Content layout वर क्लिक करा.
10:44 slide च्या डावीकडील Body textbox वर क्लिक करा.
10:49 Insert Toolbar मधील ‘Insert Table’ नावाच्या आयकॉनवर क्लिक करा.
10:55 स्क्रीनवर Insert Table चा डायलॉग बॉक्स उघडेल.
11:00 डिफॉल्ट रूपात Number of columns म्हणून 5 आणि Number of rows म्हणून 2 दिसत आहेत.
11:08 plus आणि minus बटणांच्या सहाय्याने ही संख्या कमी जास्त करता येते.
11:16 Number of columns साठी 2 आणि

Number of rows साठी 5 असे सेट करू.

11:23 उजव्या कोपऱ्यातील Ok बटणावर क्लिक करा.
11:28 slide मधे table समाविष्ट करण्याची ही एक पध्दत आहे.
11:33 दुसऱ्या पध्दतीने table समाविष्ट करण्यासाठी Standard toolbar मधील Table आयकॉनवर क्लिक करा.
11:40 येथे दाखवलेल्या grid मधून table चे rows आणि columns स्वतः निवडू शकतो.
11:47 येथे table भोवती Control Points दिसतील.
11:52 आता हे table इतके मोठे करू की त्यातील टाईप केलेले टेक्स्ट नीट वाचता येईल.
11:58 आता माऊसचे डावे बटण खालच्या Control Point वर क्लिक करून तसेच दाबून ठेवून खालच्या बाजूला ड्रॅग करा.
12:06 येथे दाखवल्याप्रमाणे table मधे काही टेक्स्ट टाईप करा.
12:11 आता header row चा font Bold करून ते टेक्स्ट मध्यभागी आणा.
12:18 आता वरच्या row मधील टेक्स्ट सिलेक्ट करा.
12:22 Sidebar मधील Properties भागावर क्लिक करा.
12:27 Bold आयकॉनवर क्लिक करून नंतर Align Center आयकॉनवर क्लिक करा.
12:34 आता table चा रंग बदलू.
12:38 अशाप्रकारे माऊस ड्रॅग करून table मधील सर्व टेक्स्ट प्रथम सिलेक्ट करा.
12:45 Properties या भागात Table Design या प्रॉपर्टीवर जाऊन कोणतीही table style निवडता येते.
12:53 या सूचीतून आपल्या आवडीची table style निवडू.
12:59 Body textbox बाहेर कुठेही क्लिक करा.

आता आपले Table कसे दिसत आहे ते बघा.

13:06 Save आयकॉनवर क्लिक करून आपण प्रेझेंटेशनमधे केलेले सर्व बदल सेव्ह करा.

आणि नंतर फाईल बंद करा.

13:16 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

13:23 या पाठात आपण शिकलो:
13:27 Pictures समाविष्ट करणे

Pictures फॉरमॅट करणे

13:31 presentation मधे आणि बाहेर नेणारी Hyperlink बनवणे, Tables समाविष्ट करणे.
13:38 असाईनमेंट म्हणून,

“Practice-Impress.odp” ही फाईल उघडा.


13:44 तिसऱ्या slide वर picture समाविष्ट करा.
13:48 चौथ्या slide वर दोन rows आणि तीन columns असलेले table बनवा.
13:54 दुसऱ्या column च्या दुसऱ्या row मधे ‘slide 3’ टाईप करा आणि तिसऱ्या slide साठी या टेक्स्टला hyperlink बनवा.
14:02 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

14:10 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

14:20 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
14:24 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
14:31 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.


ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali