LibreOffice-Suite-Writer-6.3/C2/Viewing-and-printing-a-document-in-Writer/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 21:39, 14 July 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Viewing and Printing text documents वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः

LibreOffice Writer मधे डॉक्युमेंटस बघणे आणि डॉक्युमेंटस प्रिंट करणे.

00:17 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि

00:25 LibreOffice Suite वर्जन 6.3.5
00:29 प्रथम LibreOffice Writer मधील Viewing options चे विविध पर्याय पाहू.
00:37 Writer मध्ये मुख्यतः दोन View पर्याय वापरले जातात.
00:42 ते म्हणजे Normal आणि Web.
00:45 Normal हा पर्याय प्रिंट केल्यावर डॉक्युमेंट कसे दिसेल हे दाखवतो.
00:50 Web हा पर्याय web browser मधे डॉक्युमेंट कसे दिसेल हे दाखवतो.
00:55 ह्या पर्यायाचा उपयोग HTML डॉक्युमेंट बनवताना होतो.
01:00 full screen mode वापरून डॉक्युमेंटमधे बदल करतानाही हा पर्याय उपयुक्त ठरतो.
01:07 पूर्वी तयार केलेली “Resume.odt” ही फाईल उघडा.
01:12 ही फाईल या पाठाच्या Code files या लिंकमधे दिलेली आहे.
01:17 कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
01:20 त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
01:24 Normal हा पर्याय वापरण्यासाठी मेनूबार मधील View menu वर क्लिक करा.

नंतर Normal पर्यायावर क्लिक करा.

01:34 Web पर्याय वापरण्यासाठी मेनूबारमधील View menu वर क्लिक करा.

नंतर Web पर्यायावर क्लिक करा.

01:42 या दोन पर्यायांव्यतिरिक्त आपण डॉक्युमेंटस full screen mode मधे देखील पाहू शकतो.
01:49 मेनूबारमधील View menu वर क्लिक करा. नंतर Full Screen पर्यायावर क्लिक करा.
01:55 डॉक्युमेंटमधे बदल करताना Full screen मोडचा उपयोग होतो.
01:59 प्रोजेक्टरवर प्रोजेक्ट करताना देखील याचा उपयोग होतो.
02:04 "Full Screen” मोड मधून बाहेर पडण्यासाठी Full Screen बटण दाबा किंवा कीबोर्डवरील “Escape” की दाबा.
02:10 आपण Writer विंडोवर परत आलो आहोत.
02:13 आता पुन्हा एकदा View menu वर क्लिक करून नंतर Normal पर्याय निवडा.
02:20 पुढे जाण्यापूर्वी डॉक्युमेंटमधे एक नवे पान समाविष्ट करू.
02:25 मेनूबारमधील Insert menu वर क्लिक करून Page break पर्यायावर क्लिक करा.
02:32 आपण डॉक्युमेंटमधे नव्या पानावर गेलो आहोत.
02:36 हे बदल undo करण्यासाठी Ctrl+Z ही बटणे दाबा.
02:40 नवे पान समाविष्ट करण्याची आणखी एक पध्दत पाहू.
02:44 मेनूबारमधील Insert menu वर क्लिक करून नंतर More Breaks पर्यायावर क्लिक करा.

पुढे Manual Break हा सब ऑप्शन निवडा.

02:54 Insert Break चा डायलॉग बॉक्स उघडेल.
02:58 येथे Page break पर्याय निवडा.
03:02 नंतर डायलॉग बॉक्समधील OK बटण क्लिक करा.
03:07 आता या नव्या पानावरच्या काही ओळींवर काही सँपल टेक्स्ट टाईप करू.
03:13 Ctrl+Enter ही बटणे एकत्रितपणे दाबून आणखी एक पान समाविष्ट करू.
03:19 हे सँपल टेक्स्ट नव्या पानावर टाईप करू.
03:23 पुन्हा एकदा Ctrl+Enter ही बटणे दाबून आणखी एक नवे पान बनवा.
03:29 हे सँपल टेक्स्ट नव्या पानावर टाईप करू.
03:33 आता Zoom हा पर्याय वापरायला शिकू.
03:37 डॉक्युमेंट zoom किंवा magnify करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे Zoom slider वापरणे.
03:43 हा स्लायडर Writer विंडोच्या उजव्या कोपऱ्यात खाली आहे.
03:48 slider च्या दोन्ही बाजूंना असलेले plus आणि minus हे आयकॉन्स अशाप्रकारे वापरू शकतो.
03:56 किंवा अशाप्रकारे Zoom head ड्रॅग करून magnification कमी जास्त करू शकतो.
04:03 झुम करण्याची दुसरी पध्दत जाणून घेऊ.
04:06 मेनूबार वरील View menu वर क्लिक करून Zoom वर क्लिक करा.
04:11 context menu मधे काही पर्याय दिसत आहेत.
04:15 ते वगळून Zoom पर्यायावर क्लिक करा.
04:19 Zoom & View Layout हा डायलॉग बॉक्स उघडेल.
04:23 येथे Zoom Factor आणि View Layout ही दोन हेडिंग्ज आहेत.
04:29 Zoom Factor, डॉक्युमेंटस् किती मोठी करून दाखवावीत हे सांगतो.
04:34 Zoom Factor खाली अनेक पर्याय दिसतील.
04:38 Optimal वर क्लिक करा. नंतर उजवीकडे खालील Ok बटण क्लिक करा.
04:43 असे केल्यावर डॉक्युमेंटचा सर्वात सोयीस्कर magnified view मिळतो.
04:48 पुन्हा Zoom & View Layout चा डायलॉग बॉक्स उघडा.
04:52 Fit width and height वर क्लिक करून नंतर उजवीकडे खालील Ok बटण क्लिक करा.
04:58 या व्ह्यूमधे डॉक्युमेंट पानाच्या रुंदी आणि उंचीमधे मावेल असे बसवले जाते.

त्यामुळे हे एकावेळी एकच पान दर्शवते.

05:07 Fit Width हा पुढील पर्याय पानाला त्याच्या रूंदीप्रमाणे स्क्रीनवर मापात बसवतो.
05:13 100% view पानाचा वास्तविक आकार दाखवितो.
05:17 हे दोन पर्याय तुम्ही वापरून बघा.
05:20 पुढचा महत्त्वाचा zoom ऑप्शन म्हणजे Variableहोय.
05:25 ज्या आकारात डॉक्युमेंट बघायचे आहे तो zoom factor येथे टाईप करू शकतो.
05:31 उदाहरणार्थ Variable फिल्डमधे 75% ही व्हॅल्यू टाईप करा.

नंतर OK बटण क्लिक करा.

05:41 टेक्स्ट कसे zoomed झाले आहे हे पहा.
05:45 डायलॉग बॉक्समधील अजून एक सुविधा म्हणजे “View Layout.
05:50 येथे दोन पर्याय दिसतील - Automatic आणि Single page.
05:55 Automatic पर्याय पाने एकमेकांच्या शेजारी दाखवतो.
05:59 Single page पर्याय पाने एकाखाली एक दाखवतो.
06:03 आता काही पर्याय एकत्रित वापरून बघू.
06:06 उदाहरणार्थ- Zoom Factor खालील Fit width and height हा पर्याय निवडा.
06:12 नंतर View Layout खालील Automatic या पर्यायावर

क्लिक करून OK बटण क्लिक करा.

06:20 डॉक्युमेंटची पाने एकमेकांच्या शेजारी दाखवलेली दिसतील.
06:24 येथे दाखविल्याप्रमाणे Zoom & View Layout हा डायलॉग बॉक्स पुन्हा उघडा.
06:30 यावेळी View Layout खालील Single page पर्याय निवडून OK बटणावर क्लिक करा.
06:37 डॉक्युमेंटची पाने एकाखाली एक दाखवल्याचे दिसेल.
06:41 आता zoom slider वापरू. Zoom head हा slider च्या मध्यभागी आणा.
06:47 Writer Status Bar वरील आणखी तीन कंट्रोल्स वापरून पान दाखवता येते.
06:53 हे डॉक्युमेंटचा zoom आणि view layout बदलण्याची परवानगी देखील देतात.
06:59 त्याचे आयकॉन असे आहेत:
07:02 Single-page view, Multiple-page view आणि Book view.
07:08 Book view मधे उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे शेजारी असलेली दोन पाने दाखवली जातात.
07:14 Single page view वर क्लिक करा. Zoom head हे zoom slider च्या मध्यभागी आणा.
07:21 आता Print Preview बद्दल जाणून घेऊ.
07:25 Standard toolbar वरील Toggle Print Preview आयकॉन क्लिक करा.
07:29 डॉक्युमेंट preview mode मधे बघू तेव्हा Print Preview bar उघडेल.
07:35 डॉक्युमेंट प्रिंट केल्यावर कसे दिसेल हे येथे दाखवले जाते.
07:40 डॉक्युमेंटमधील सर्व पाने बघण्यासाठी खाली स्क्रॉल करा.
07:45 हे पाहून झाल्यावर डॉक्युमेंट छापण्यासाठी आपण Print आयकॉन क्लिक करू शकतो.

मी आत्ता तसे करत नाही.

07:54 preview बंद करण्यासाठी Close Preview बटण क्लिक करा.
07:58 तसेच menu bar मधील File menu वर क्लिक करून नंतर Print Preview क्लिक करू शकतो.
08:05 आता आपले LibreOffice Writer डॉक्युमेंट कसे print करायचे ते बघूया.
08:10 तुमच्या मशीनवर प्रिंटरचे कनेक्शन बरोबर कॉन्फिगर केल्याची खात्री करा.
08:15 संपूर्ण डॉक्युमेंट थेट print करण्यासाठी Standard toolbar वरील Print आयकॉनवर क्लिक करा.

याला quick printing म्हणतात.

08:24 Print पर्याय वापरून डॉक्युमेंट छापण्याची क्रिया अधिक नियंत्रित करता येते.
08:30 menu bar मधील File menu वर क्लिक करून Print वर क्लिक करा.
08:37 स्क्रीनवर Print चा डायलॉग बॉक्स उघडेल.
08:41 या डायलॉग बॉक्समधे वेगवेगळी सेटिंग्ज असलेले दोन टॅब आहेत.
08:46 ही सेटिंग्ज डिफॉल्ट स्वरूपातच ठेऊ शकता किंवा तुमच्या प्रिंटिंगच्या गरजेनुसार बदलू शकता.
08:53 Printer या ड्रॉपडाऊन खालील Print to File हा पर्याय निवडा.
08:59 हा पर्याय मुख्यत: डॉक्युमेंट PDF file स्वरूपात प्रिंट करण्यासाठी वापरला जातो.
09:05 डायलॉग बॉक्सच्या खालील भागातील Print to File बटण क्लिक करा.
09:12 नवे डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी योग्य फोल्डर निवडून फाईलचे नाव टाईप करा.

उजव्या कोपऱ्यातील वरचे Save बटण क्लिक करा.

09:21 डॉक्युमेंट एका फाईलमधे प्रिंट होईल.
09:24 कीबोर्डवरील Ctrl+P ही बटणे दाबा.

हा Print डायलॉग बॉक्स उघडण्याचा शॉर्टकट आहे.

09:31 आता Printer खालील आपल्या कॉन्फिगर केलेल्या प्रिंटरचे नाव निवडा.
09:37 Range and Copies खाली

Pages साठी 2 आणि Number of copies साठी 3 पर्याय निवडा.

09:46 शेवटी प्रिंटींग सुरू करण्यासाठी OK बटण क्लिक करा.
09:51 नमूद केलेली पाने आणि त्यांच्या प्रती प्रिंट होतील.
09:56 पुढे Print चे इतर पर्याय कसे वापरायचे ते जाणून घेऊ.
10:01 menu bar मधील Tools menu वर क्लिक करून नंतर Options वर क्लिक करा.
10:07 LibreOffice च्या शेजारील बाणावर क्लिक करून नंतर Print वर क्लिक करा.
10:12 स्क्रीनवर आलेल्या डायलॉग बॉक्समधे निवडण्यासाठी अनेक पर्याय दिलेले आहेत.
10:18 तुमच्या आवश्यकतेनुसार पर्याय निवडा.
10:21 LibreOffice Writer मधून भविष्यात होणाऱ्या सर्व प्रिंटसाठी ही सेटिंग्ज लागू होतील.
10:27 सर्व डिफॉल्ट सेटींग्ज तशीच ठेवा. नंतर खालील OK वर क्लिक करा.
10:33 Ctrl + S ही बटणे दाबून फाईल सेव्ह करा.
10:37 X आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा.
10:42 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

10:47 या पाठात शिकलो:

LibreOffice Writer मधे डॉक्युमेंट बघणे आणि प्रिंट करणे.

10:56 असाईनमेंट म्हणून,

practice.odt फाईल उघडा.

11:00 This is LibreOffice Writer” हे टेक्स्ट टाईप करा.
11:04 View मेनूमधून Full Screen पर्याय निवडा.
11:08 Full Screen पर्यायातून बाहेर पडा.
11:11 उपलब्ध असलेले Zoom चे सर्व पर्याय वापरून बघा.
11:14 Page preview चे सर्व उपलब्ध पर्याय वापरून बघा.
11:18 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

11:25 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

11:33 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
11:36 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:41 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.
11:48 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali