LibreOffice-Suite-Writer-6.3/C2/Viewing-and-printing-a-document-in-Writer/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Viewing and Printing text documents वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोतः
LibreOffice Writer मधे डॉक्युमेंटस बघणे आणि डॉक्युमेंटस प्रिंट करणे. |
00:17 | या पाठासाठी मी वापरत आहे-
Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि |
00:25 | LibreOffice Suite वर्जन 6.3.5 |
00:29 | प्रथम LibreOffice Writer मधील Viewing options चे विविध पर्याय पाहू. |
00:37 | Writer मध्ये मुख्यतः दोन View पर्याय वापरले जातात. |
00:42 | ते म्हणजे Normal आणि Web. |
00:45 | Normal हा पर्याय प्रिंट केल्यावर डॉक्युमेंट कसे दिसेल हे दाखवतो. |
00:50 | Web हा पर्याय web browser मधे डॉक्युमेंट कसे दिसेल हे दाखवतो. |
00:55 | ह्या पर्यायाचा उपयोग HTML डॉक्युमेंट बनवताना होतो. |
01:00 | full screen mode वापरून डॉक्युमेंटमधे बदल करतानाही हा पर्याय उपयुक्त ठरतो. |
01:07 | पूर्वी तयार केलेली “Resume.odt” ही फाईल उघडा. |
01:12 | ही फाईल या पाठाच्या Code files या लिंकमधे दिलेली आहे. |
01:17 | कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
01:20 | त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा. |
01:24 | Normal हा पर्याय वापरण्यासाठी मेनूबार मधील View menu वर क्लिक करा.
नंतर Normal पर्यायावर क्लिक करा. |
01:34 | Web पर्याय वापरण्यासाठी मेनूबारमधील View menu वर क्लिक करा.
नंतर Web पर्यायावर क्लिक करा. |
01:42 | या दोन पर्यायांव्यतिरिक्त आपण डॉक्युमेंटस full screen mode मधे देखील पाहू शकतो. |
01:49 | मेनूबारमधील View menu वर क्लिक करा. नंतर Full Screen पर्यायावर क्लिक करा. |
01:55 | डॉक्युमेंटमधे बदल करताना Full screen मोडचा उपयोग होतो. |
01:59 | प्रोजेक्टरवर प्रोजेक्ट करताना देखील याचा उपयोग होतो. |
02:04 | "Full Screen” मोड मधून बाहेर पडण्यासाठी Full Screen बटण दाबा किंवा कीबोर्डवरील “Escape” की दाबा. |
02:10 | आपण Writer विंडोवर परत आलो आहोत. |
02:13 | आता पुन्हा एकदा View menu वर क्लिक करून नंतर Normal पर्याय निवडा. |
02:20 | पुढे जाण्यापूर्वी डॉक्युमेंटमधे एक नवे पान समाविष्ट करू. |
02:25 | मेनूबारमधील Insert menu वर क्लिक करून Page break पर्यायावर क्लिक करा. |
02:32 | आपण डॉक्युमेंटमधे नव्या पानावर गेलो आहोत. |
02:36 | हे बदल undo करण्यासाठी Ctrl+Z ही बटणे दाबा. |
02:40 | नवे पान समाविष्ट करण्याची आणखी एक पध्दत पाहू. |
02:44 | मेनूबारमधील Insert menu वर क्लिक करून नंतर More Breaks पर्यायावर क्लिक करा.
पुढे Manual Break हा सब ऑप्शन निवडा. |
02:54 | Insert Break चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:58 | येथे Page break पर्याय निवडा. |
03:02 | नंतर डायलॉग बॉक्समधील OK बटण क्लिक करा. |
03:07 | आता या नव्या पानावरच्या काही ओळींवर काही सँपल टेक्स्ट टाईप करू. |
03:13 | Ctrl+Enter ही बटणे एकत्रितपणे दाबून आणखी एक पान समाविष्ट करू. |
03:19 | हे सँपल टेक्स्ट नव्या पानावर टाईप करू. |
03:23 | पुन्हा एकदा Ctrl+Enter ही बटणे दाबून आणखी एक नवे पान बनवा. |
03:29 | हे सँपल टेक्स्ट नव्या पानावर टाईप करू. |
03:33 | आता Zoom हा पर्याय वापरायला शिकू. |
03:37 | डॉक्युमेंट zoom किंवा magnify करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे Zoom slider वापरणे. |
03:43 | हा स्लायडर Writer विंडोच्या उजव्या कोपऱ्यात खाली आहे. |
03:48 | slider च्या दोन्ही बाजूंना असलेले plus आणि minus हे आयकॉन्स अशाप्रकारे वापरू शकतो. |
03:56 | किंवा अशाप्रकारे Zoom head ड्रॅग करून magnification कमी जास्त करू शकतो. |
04:03 | झुम करण्याची दुसरी पध्दत जाणून घेऊ. |
04:06 | मेनूबार वरील View menu वर क्लिक करून Zoom वर क्लिक करा. |
04:11 | context menu मधे काही पर्याय दिसत आहेत. |
04:15 | ते वगळून Zoom पर्यायावर क्लिक करा. |
04:19 | Zoom & View Layout हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:23 | येथे Zoom Factor आणि View Layout ही दोन हेडिंग्ज आहेत. |
04:29 | Zoom Factor, डॉक्युमेंटस् किती मोठी करून दाखवावीत हे सांगतो. |
04:34 | Zoom Factor खाली अनेक पर्याय दिसतील. |
04:38 | Optimal वर क्लिक करा. नंतर उजवीकडे खालील Ok बटण क्लिक करा. |
04:43 | असे केल्यावर डॉक्युमेंटचा सर्वात सोयीस्कर magnified view मिळतो. |
04:48 | पुन्हा Zoom & View Layout चा डायलॉग बॉक्स उघडा. |
04:52 | Fit width and height वर क्लिक करून नंतर उजवीकडे खालील Ok बटण क्लिक करा. |
04:58 | या व्ह्यूमधे डॉक्युमेंट पानाच्या रुंदी आणि उंचीमधे मावेल असे बसवले जाते.
त्यामुळे हे एकावेळी एकच पान दर्शवते. |
05:07 | Fit Width हा पुढील पर्याय पानाला त्याच्या रूंदीप्रमाणे स्क्रीनवर मापात बसवतो. |
05:13 | 100% view पानाचा वास्तविक आकार दाखवितो. |
05:17 | हे दोन पर्याय तुम्ही वापरून बघा. |
05:20 | पुढचा महत्त्वाचा zoom ऑप्शन म्हणजे Variableहोय. |
05:25 | ज्या आकारात डॉक्युमेंट बघायचे आहे तो zoom factor येथे टाईप करू शकतो. |
05:31 | उदाहरणार्थ Variable फिल्डमधे 75% ही व्हॅल्यू टाईप करा.
नंतर OK बटण क्लिक करा. |
05:41 | टेक्स्ट कसे zoomed झाले आहे हे पहा. |
05:45 | डायलॉग बॉक्समधील अजून एक सुविधा म्हणजे “View Layout. |
05:50 | येथे दोन पर्याय दिसतील - Automatic आणि Single page. |
05:55 | Automatic पर्याय पाने एकमेकांच्या शेजारी दाखवतो. |
05:59 | Single page पर्याय पाने एकाखाली एक दाखवतो. |
06:03 | आता काही पर्याय एकत्रित वापरून बघू. |
06:06 | उदाहरणार्थ- Zoom Factor खालील Fit width and height हा पर्याय निवडा. |
06:12 | नंतर View Layout खालील Automatic या पर्यायावर
क्लिक करून OK बटण क्लिक करा. |
06:20 | डॉक्युमेंटची पाने एकमेकांच्या शेजारी दाखवलेली दिसतील. |
06:24 | येथे दाखविल्याप्रमाणे Zoom & View Layout हा डायलॉग बॉक्स पुन्हा उघडा. |
06:30 | यावेळी View Layout खालील Single page पर्याय निवडून OK बटणावर क्लिक करा. |
06:37 | डॉक्युमेंटची पाने एकाखाली एक दाखवल्याचे दिसेल. |
06:41 | आता zoom slider वापरू. Zoom head हा slider च्या मध्यभागी आणा. |
06:47 | Writer Status Bar वरील आणखी तीन कंट्रोल्स वापरून पान दाखवता येते. |
06:53 | हे डॉक्युमेंटचा zoom आणि view layout बदलण्याची परवानगी देखील देतात. |
06:59 | त्याचे आयकॉन असे आहेत: |
07:02 | Single-page view, Multiple-page view आणि Book view. |
07:08 | Book view मधे उघडलेल्या पुस्तकाप्रमाणे शेजारी असलेली दोन पाने दाखवली जातात. |
07:14 | Single page view वर क्लिक करा. Zoom head हे zoom slider च्या मध्यभागी आणा. |
07:21 | आता Print Preview बद्दल जाणून घेऊ. |
07:25 | Standard toolbar वरील Toggle Print Preview आयकॉन क्लिक करा. |
07:29 | डॉक्युमेंट preview mode मधे बघू तेव्हा Print Preview bar उघडेल. |
07:35 | डॉक्युमेंट प्रिंट केल्यावर कसे दिसेल हे येथे दाखवले जाते. |
07:40 | डॉक्युमेंटमधील सर्व पाने बघण्यासाठी खाली स्क्रॉल करा. |
07:45 | हे पाहून झाल्यावर डॉक्युमेंट छापण्यासाठी आपण Print आयकॉन क्लिक करू शकतो.
मी आत्ता तसे करत नाही. |
07:54 | preview बंद करण्यासाठी Close Preview बटण क्लिक करा. |
07:58 | तसेच menu bar मधील File menu वर क्लिक करून नंतर Print Preview क्लिक करू शकतो. |
08:05 | आता आपले LibreOffice Writer डॉक्युमेंट कसे print करायचे ते बघूया. |
08:10 | तुमच्या मशीनवर प्रिंटरचे कनेक्शन बरोबर कॉन्फिगर केल्याची खात्री करा. |
08:15 | संपूर्ण डॉक्युमेंट थेट print करण्यासाठी Standard toolbar वरील Print आयकॉनवर क्लिक करा.
याला quick printing म्हणतात. |
08:24 | Print पर्याय वापरून डॉक्युमेंट छापण्याची क्रिया अधिक नियंत्रित करता येते. |
08:30 | menu bar मधील File menu वर क्लिक करून Print वर क्लिक करा. |
08:37 | स्क्रीनवर Print चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:41 | या डायलॉग बॉक्समधे वेगवेगळी सेटिंग्ज असलेले दोन टॅब आहेत. |
08:46 | ही सेटिंग्ज डिफॉल्ट स्वरूपातच ठेऊ शकता किंवा तुमच्या प्रिंटिंगच्या गरजेनुसार बदलू शकता. |
08:53 | Printer या ड्रॉपडाऊन खालील Print to File हा पर्याय निवडा. |
08:59 | हा पर्याय मुख्यत: डॉक्युमेंट PDF file स्वरूपात प्रिंट करण्यासाठी वापरला जातो. |
09:05 | डायलॉग बॉक्सच्या खालील भागातील Print to File बटण क्लिक करा. |
09:12 | नवे डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी योग्य फोल्डर निवडून फाईलचे नाव टाईप करा.
उजव्या कोपऱ्यातील वरचे Save बटण क्लिक करा. |
09:21 | डॉक्युमेंट एका फाईलमधे प्रिंट होईल. |
09:24 | कीबोर्डवरील Ctrl+P ही बटणे दाबा.
हा Print डायलॉग बॉक्स उघडण्याचा शॉर्टकट आहे. |
09:31 | आता Printer खालील आपल्या कॉन्फिगर केलेल्या प्रिंटरचे नाव निवडा. |
09:37 | Range and Copies खाली
Pages साठी 2 आणि Number of copies साठी 3 पर्याय निवडा. |
09:46 | शेवटी प्रिंटींग सुरू करण्यासाठी OK बटण क्लिक करा. |
09:51 | नमूद केलेली पाने आणि त्यांच्या प्रती प्रिंट होतील. |
09:56 | पुढे Print चे इतर पर्याय कसे वापरायचे ते जाणून घेऊ. |
10:01 | menu bar मधील Tools menu वर क्लिक करून नंतर Options वर क्लिक करा. |
10:07 | LibreOffice च्या शेजारील बाणावर क्लिक करून नंतर Print वर क्लिक करा. |
10:12 | स्क्रीनवर आलेल्या डायलॉग बॉक्समधे निवडण्यासाठी अनेक पर्याय दिलेले आहेत. |
10:18 | तुमच्या आवश्यकतेनुसार पर्याय निवडा. |
10:21 | LibreOffice Writer मधून भविष्यात होणाऱ्या सर्व प्रिंटसाठी ही सेटिंग्ज लागू होतील. |
10:27 | सर्व डिफॉल्ट सेटींग्ज तशीच ठेवा. नंतर खालील OK वर क्लिक करा. |
10:33 | Ctrl + S ही बटणे दाबून फाईल सेव्ह करा. |
10:37 | X आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा. |
10:42 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
10:47 | या पाठात शिकलो:
LibreOffice Writer मधे डॉक्युमेंट बघणे आणि प्रिंट करणे. |
10:56 | असाईनमेंट म्हणून,
practice.odt फाईल उघडा. |
11:00 | “This is LibreOffice Writer” हे टेक्स्ट टाईप करा. |
11:04 | View मेनूमधून Full Screen पर्याय निवडा. |
11:08 | Full Screen पर्यायातून बाहेर पडा. |
11:11 | उपलब्ध असलेले Zoom चे सर्व पर्याय वापरून बघा. |
11:14 | Page preview चे सर्व उपलब्ध पर्याय वापरून बघा. |
11:18 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
11:25 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
11:33 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
11:36 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:41 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते. |
11:48 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |