Health-and-Nutrition/C2/Non-vegetarian-recipes-for-lactating-mothers/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:17, 10 February 2020 by Sakinashaikh (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 स्तनपान देणाऱ्या मातांसाठीच्या मांसाहारी पाककृतींवरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपलं स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - स्तनपानादरम्यान पौष्टिकतेचं महत्त्व,
00:13 आणि काही मांसाहारी पाककृती. जसं, शेवग्याची शेंग घातलेली चिकन करी,
00:20 शेंगदाणा लसूण मसाल्यात बनवलेलं चिकन,
00:24 नारळ घालून केलेला माश्याचा रस्सा, अंडं आणि मिश्र भाज्यांचा रस्सा आणि पालक घातलेला माश्याचा रस्सा.
00:31 स्तनपानादरम्यान आईला व्यवस्थित दूध येण्यासाठी,
00:38 वाढत्या बाळाला पुरेसा पोषक आहार देण्यासाठी आणि आईची स्वतःची रोजच्या आहाराची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात पोषण आवश्यक असतं.
00:45 स्तनपानादरम्यान जीवनसत्त्वं, खनिजं,
00:51 ओमेगा 3 फॅटी ॲसिडस् आणि कोलीन ही आवश्यक पोषकतत्त्वं आहेत.
00:54 पोषकतत्त्वांव्यतिरिक्त, आपण गॅलेक्टोगोग्सबद्दल जाणून घेऊ.
00:59 गॅलेक्टोगोग्स हे दूध उत्पादनास मदत करतात.
01:04 आहारात लसूण किंवा अन्य जिन्नस वापरून आई ते मिळवू शकते.
01:08 जसं, मेथीचे दाणे आणि पानं,
01:10 बडीशेपेचे दाणे,
01:12 हळीवाचे दाणे, शेवग्याची पानं,
01:15 शेपूची पानं आणि ओव्याचे दाणे.
01:19 कृपया नोंद घ्या:

याच मालिकेतल्या वेगळ्या ट्युटोरिअलमध्ये स्तनपान देणाऱ्या मातांसाठीचं पोषण समजावून सांगितलं आहे.

01:28 स्तनपानादरम्यान पौष्टिकतेचं महत्त्व तर समजलं. आता आपण पाककृती बनवण्यास सुरुवात करू.
01:37 आपली पहिली पाककृती आहे – शेवग्याची शेंग घातलेली चिकन करी
01:43 हे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं सामान म्हणजे - 100 ग्रॅम चिकन,
01:47 शेवग्याच्या शेंगेचे 2 तुकडे, कढीपत्त्याची 1 फांदी,
01:51 1 चमचा काळी मिरी, 1 चिरलेला कांदा,
01:55 लसणाच्या 4 पाकळ्या, चवीनुसार मीठ,
02:00 ½ चमचा हळद, ½ चमचा मिरचीपूड,
02:05 1 हिरवी मिरची, 1 मूठभर कोथिंबीर आणि 2 चमचे तेल.
02:11 भांड्यात 1 चमचा तेल गरम करा. कांदे, लसूण, मिरे आणि हिरवी मिरची घाला.
02:19 ते सोनेरी होईपर्यंत परता. आता कढीपत्ता, कोथिंबीर घाला आणि 2-3 सेकंद परता.
02:27 सगळं थंड झाल्यावर थोडं पाणी घालून बारीक वाटण तयार करा.
02:32 नंतर शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये शिजवा किंवा शिजेपर्यंत उकळवा.
02:36 भांड्यात १ चमचा तेल गरम करा. तयार वाटण घाला आणि 2 मिनिटं शिजवा.
02:42 सर्व मसाले आणि चिकन घाला. आता अर्धा कप पाणी घालून नीट मिसळा.
02:50 चिकन मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवा.
02:53 मग त्यात उकडलेल्या किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला. सगळं मिश्रण 2-4 मिनिटं शिजू द्या.
02:59 शेवग्याच्या शेंगा घातलेली चिकन करी तयार आहे.
03:03 दुसरी पाककृती आपण शिकणार आहोत ती म्हणजे "शेंगदाणा लसूण मसाल्यातलं चिकन".
03:08 हे बनवण्यासाठी आपल्याला लागेल - 100 ग्रॅम चिकन, 2 चमचे शेंगदाणे,
03:14 लसणाच्या 5 पाकळ्या, 1 चिरलेला टोमॅटो,
03:18 1 चिरलेला कांदा, 1/2 चमचा हळद,
03:21 चवीनुसार मीठ, 1चमचा लाल मिरची पूड,
03:25 आणि 2 चमचे तेल.
03:27 शेंगदाणा आणि लसणाचं वाटण तयार करण्यासाठी – भांड्यात शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्या.
03:34 करपू नये म्हणून ते सतत हलवा. मग ते थंड होऊ द्या.
03:39 भाजलेले शेंगदाणे तळहातांमध्ये चोळून निघतील तेवढी फोलपटं काढून टाका.
03:45 आता भांड्यात 1 चमचा तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो आणि लसूण घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत परता.
03:54 ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे सगळं शेंगदाण्यांमध्ये मिसळा.
03:59 त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये किंवा बत्त्यात वाटण करून घ्या.
04:03 भांड्यात 1 चमचा तेल गरम करा.
04:05 आता शेंगदाणा आणि लसणाचं वाटण घालून 2 मिनिटं शिजवा. नंतर, मसाले घालून चांगलं एकजीव करा.
04:15 यात चिकन घाला आणि अजून 2 मिनिटं शिजवा. आता थोडंसं पाणी घालून हलवून घ्या.
04:21 कढई झाकून चिकन मऊ होईपर्यंत शिजवा.
04:25 शेंगदाणा लसूण मसाला चिकन तयार आहे.
04:28 तिसरी पाककृती आहे नारळ घालून केलेला माश्याचा रस्सा
04:32 यासाठी, 100 ग्रॅम रोहू घ्या, ½ कप खवललेला नारळ, 4 लाल मिरच्या,
04:38 ½ चमचा हळद, चवीनुसार मीठ,
04:42 लसणाच्या 4 पाकळ्या, लिंबाएवढ्या आकाराचा चिंचेचा 1 गोळा,
04:47 1 चिरलेला कांदा, ½ चमचा मेथीचे दाणे,
04:51 ½ चमचा जिरे, 1 चमचा तेल.
04:56 जर रोहू मिळत नसेल तर तुम्ही बांगडा, पापलेट किंवा बोंबील यांपैकी एखादा वापरू शकता.
05:06 मासे स्वच्छ करा, त्यांना 2 चिमटी मीठ लावा आणि 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवा.
05:11 सुक्या लाल मिरच्या, मेथीचे दाणे आणि जिरे रंग बदलेपर्यंत परतून घ्या.
05:17 खोबरे, चिंच आणि लसणाबरोबर हे भाजलेले मसाले बारीक वाटून घ्या.
05:25 भांड्यात 1 चमचा तेल घालून गरम करा.
05:29 आता कांदे घाला आणि कांदा सोनेरी होईपर्यंत परता.
05:33 त्यात भाजलेल्या मसाल्याचं वाटण घाला आणि 5-6 मिनिटं शिजवा. मसाला चांगला मिसळून घ्या.
05:42 त्यात मुरवलेले मासे घाला आणि 10 मिनिटं शिजवा. नारळ घालून केलेला माश्याचा रस्सा तयार आहे.
05:49 चौथी रेसिपी आहे "मिश्र भाजी आणि उकडलेल्या अंड्याचा रस्सा".
05:53 हे बनवण्यासाठी आपल्याला लागतील - 2 उकडलेली अंडी, फुलकोबीतली दोन छोटी फुलं
05:59 1 मध्यम कांदा, 2 फरसबीच्या शेंगा चिरून
06:02 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरुन, ½ शिमला मिरची बारीक चिरलेली
06:07 1 चमचा तीळ, 1 चमचा मिरची पूड,
06:12 चवीनुसार मीठ, ½ चमचा हळद,
06:16 1 चमचे खसखस, ½ चमचा हळीव पूड,
06:21 1 चमचा तेल.
06:24 भांड्यात तीळ आणि खसखस कोरडे भाजून घ्या. ते थंड होऊ द्या.
06:29 नंतर भांड्यात अर्धा चमचा तेल घालून टोमॅटो परता.
06:35 थंड झाल्यावर टोमॅटो आणि फरसबी मिक्सर किंवा दगडी ग्राईंडरमध्ये वाटून घ्या.
06:41 भांड्यात 1 चमचा तेल गरम करा. कांदे घाला आणि ते सोनेरी होईपर्यंत परता.
06:48 आता टोमॅटोचा लगदा घालून 5 मिनिटे शिजवा. मीठ, हळद, मिरची पूड घालून चांगले ढवळा.
06:57 थोडे पाणी आणि भाज्या घाला.
07:01 झाकण ठेवून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा.
07:04 उकडलेली अंडी अर्धी कापा आणि रश्श्यात टाका. एक मिनिट शिजवा.
07:10 मिश्र भाजी आणि उकडलेल्या अंड्याचा रस्सा तयार आहे.
07:14 शेवटची पाककृती आपण पाहणार आहोत “पालक आणि माश्याचा रस्सा” -
07:19 हे तयार करण्यासाठी, आपल्याला लागतील– सामन माश्याचे 2 तुकडे,
07:22 पालकाची 4-5 पानं, चवीनुसार मीठ,
07:26 1 चमचा मिरची पूड, ½ चमचा हळद,
07:31 1 चमचा जवसाची पूड, 1 चमचे तूप किंवा तेल,
07:36 1 मूठभर कोथिंबीर, 1 चमचा लिंबाचा रस,
07:41 1 हिरवी मिरची, 1 चमचा गरम मसाल्याची पूड.
07:45 माशांचे तुकडे धुवा. थोडे मीठ आणि हळद चोळून बाजूला ठेवा.
07:52 पालक पाण्यानं चांगला धुवा. भांड्यात पाणी उकळवून त्यात पालक घालून 5 मिनिटे शिजवा.
08:01 नंतर, पाणी निथळून पालक थंड होऊ द्या. पालक, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून घ्या.
08:09 भांड्यात 1 चमचा तूप किंवा तेल गरम करून मासे शिजेपर्यंत तळा.
08:15 त्याचवेळी दुसर्‍या भांड्यात 1 चमचा तेल किंवा तूप गरम करा.
08:22 पालकाचा लगदा आणि थोडं पाणी घालून 5 मिनिटे शिजू द्या. मसाले घालून आणि चांगले एकत्र करा.
08:30 आता तळलेले माशाचे तुकडे घाला आणि सगळ्या तुकड्यांना मसाला नीट लागेपर्यंत शिजवा.
08:37 आता गरम मसाला आणि जवसाची पूड घाला आणि अजून 2 मिनिटं शिजवा.
08:42 गॅस बंद करून रश्श्यात लिंबाचा रस घाला. पालक आणि माश्याचा रस्सा तयार आहे.
08:49 वरील सर्व पाककृती - प्रथिनं,
08:54 जीवनसत्त्व ब- 12,
चांगल्या प्रतीची चरबी,
09:00 लोह
09:02 फोलेट,
09:04 पोटॅशिअम,
09:06 अ जीवनसत्त्व,
09:08 ड जीवनसत्व,
09:12 झिंक
09:14 आणि मॅग्नेशिअमने समृद्ध आहेत.
09:17 ही पोषकतत्त्वं बाळाच्या वाढीत आणि विकासात,
09:22 आईच्या दूध उत्पादनात आणि आईला निरोगी ठेवण्यात मदत करतात.
09:27 आता, स्तनपान देणाऱ्या मातांसाठी मांसाहारी पाककृतीवरील स्पोकन ट्युटोरिअल समाप्त झालं आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Sakinashaikh