Health-and-Nutrition/C2/Non-vegetarian-recipes-for-lactating-mothers/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:00 | स्तनपान देणाऱ्या मातांसाठीच्या मांसाहारी पाककृतींवरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपलं स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - स्तनपानादरम्यान पौष्टिकतेचं महत्त्व, |
00:13 | आणि काही मांसाहारी पाककृती. जसं, शेवग्याची शेंग घातलेली चिकन करी, |
00:20 | शेंगदाणा लसूण मसाल्यात बनवलेलं चिकन, |
00:24 | नारळ घालून केलेला माश्याचा रस्सा, अंडं आणि मिश्र भाज्यांचा रस्सा आणि पालक घातलेला माश्याचा रस्सा. |
00:31 | स्तनपानादरम्यान आईला व्यवस्थित दूध येण्यासाठी, |
00:38 | वाढत्या बाळाला पुरेसा पोषक आहार देण्यासाठी आणि आईची स्वतःची रोजच्या आहाराची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात पोषण आवश्यक असतं. |
00:45 | स्तनपानादरम्यान जीवनसत्त्वं, खनिजं, |
00:51 | ओमेगा 3 फॅटी ॲसिडस् आणि कोलीन ही आवश्यक पोषकतत्त्वं आहेत. |
00:54 | पोषकतत्त्वांव्यतिरिक्त, आपण गॅलेक्टोगोग्सबद्दल जाणून घेऊ. |
00:59 | गॅलेक्टोगोग्स हे दूध उत्पादनास मदत करतात. |
01:04 | आहारात लसूण किंवा अन्य जिन्नस वापरून आई ते मिळवू शकते. |
01:08 | जसं, मेथीचे दाणे आणि पानं, |
01:10 | बडीशेपेचे दाणे, |
01:12 | हळीवाचे दाणे, शेवग्याची पानं, |
01:15 | शेपूची पानं आणि ओव्याचे दाणे. |
01:19 | कृपया नोंद घ्या:
याच मालिकेतल्या वेगळ्या ट्युटोरिअलमध्ये स्तनपान देणाऱ्या मातांसाठीचं पोषण समजावून सांगितलं आहे. |
01:28 | स्तनपानादरम्यान पौष्टिकतेचं महत्त्व तर समजलं. आता आपण पाककृती बनवण्यास सुरुवात करू. |
01:37 | आपली पहिली पाककृती आहे – शेवग्याची शेंग घातलेली चिकन करी |
01:43 | हे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं सामान म्हणजे - 100 ग्रॅम चिकन, |
01:47 | शेवग्याच्या शेंगेचे 2 तुकडे, कढीपत्त्याची 1 फांदी, |
01:51 | 1 चमचा काळी मिरी, 1 चिरलेला कांदा, |
01:55 | लसणाच्या 4 पाकळ्या, चवीनुसार मीठ, |
02:00 | ½ चमचा हळद, ½ चमचा मिरचीपूड, |
02:05 | 1 हिरवी मिरची, 1 मूठभर कोथिंबीर आणि 2 चमचे तेल. |
02:11 | भांड्यात 1 चमचा तेल गरम करा. कांदे, लसूण, मिरे आणि हिरवी मिरची घाला. |
02:19 | ते सोनेरी होईपर्यंत परता. आता कढीपत्ता, कोथिंबीर घाला आणि 2-3 सेकंद परता. |
02:27 | सगळं थंड झाल्यावर थोडं पाणी घालून बारीक वाटण तयार करा. |
02:32 | नंतर शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये शिजवा किंवा शिजेपर्यंत उकळवा. |
02:36 | भांड्यात १ चमचा तेल गरम करा. तयार वाटण घाला आणि 2 मिनिटं शिजवा. |
02:42 | सर्व मसाले आणि चिकन घाला. आता अर्धा कप पाणी घालून नीट मिसळा. |
02:50 | चिकन मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवा. |
02:53 | मग त्यात उकडलेल्या किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला. सगळं मिश्रण 2-4 मिनिटं शिजू द्या. |
02:59 | शेवग्याच्या शेंगा घातलेली चिकन करी तयार आहे. |
03:03 | दुसरी पाककृती आपण शिकणार आहोत ती म्हणजे "शेंगदाणा लसूण मसाल्यातलं चिकन". |
03:08 | हे बनवण्यासाठी आपल्याला लागेल - 100 ग्रॅम चिकन, 2 चमचे शेंगदाणे, |
03:14 | लसणाच्या 5 पाकळ्या, 1 चिरलेला टोमॅटो, |
03:18 | 1 चिरलेला कांदा, 1/2 चमचा हळद, |
03:21 | चवीनुसार मीठ, 1चमचा लाल मिरची पूड, |
03:25 | आणि 2 चमचे तेल. |
03:27 | शेंगदाणा आणि लसणाचं वाटण तयार करण्यासाठी – भांड्यात शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्या. |
03:34 | करपू नये म्हणून ते सतत हलवा. मग ते थंड होऊ द्या. |
03:39 | भाजलेले शेंगदाणे तळहातांमध्ये चोळून निघतील तेवढी फोलपटं काढून टाका. |
03:45 | आता भांड्यात 1 चमचा तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो आणि लसूण घाला. टोमॅटो मऊ होईपर्यंत परता. |
03:54 | ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे सगळं शेंगदाण्यांमध्ये मिसळा. |
03:59 | त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये किंवा बत्त्यात वाटण करून घ्या. |
04:03 | भांड्यात 1 चमचा तेल गरम करा. |
04:05 | आता शेंगदाणा आणि लसणाचं वाटण घालून 2 मिनिटं शिजवा. नंतर, मसाले घालून चांगलं एकजीव करा. |
04:15 | यात चिकन घाला आणि अजून 2 मिनिटं शिजवा. आता थोडंसं पाणी घालून हलवून घ्या. |
04:21 | कढई झाकून चिकन मऊ होईपर्यंत शिजवा. |
04:25 | शेंगदाणा लसूण मसाला चिकन तयार आहे. |
04:28 | तिसरी पाककृती आहे नारळ घालून केलेला माश्याचा रस्सा |
04:32 | यासाठी, 100 ग्रॅम रोहू घ्या, ½ कप खवललेला नारळ, 4 लाल मिरच्या, |
04:38 | ½ चमचा हळद, चवीनुसार मीठ, |
04:42 | लसणाच्या 4 पाकळ्या, लिंबाएवढ्या आकाराचा चिंचेचा 1 गोळा, |
04:47 | 1 चिरलेला कांदा, ½ चमचा मेथीचे दाणे, |
04:51 | ½ चमचा जिरे, 1 चमचा तेल. |
04:56 | जर रोहू मिळत नसेल तर तुम्ही बांगडा, पापलेट किंवा बोंबील यांपैकी एखादा वापरू शकता. |
05:06 | मासे स्वच्छ करा, त्यांना 2 चिमटी मीठ लावा आणि 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवा. |
05:11 | सुक्या लाल मिरच्या, मेथीचे दाणे आणि जिरे रंग बदलेपर्यंत परतून घ्या. |
05:17 | खोबरे, चिंच आणि लसणाबरोबर हे भाजलेले मसाले बारीक वाटून घ्या. |
05:25 | भांड्यात 1 चमचा तेल घालून गरम करा. |
05:29 | आता कांदे घाला आणि कांदा सोनेरी होईपर्यंत परता. |
05:33 | त्यात भाजलेल्या मसाल्याचं वाटण घाला आणि 5-6 मिनिटं शिजवा. मसाला चांगला मिसळून घ्या. |
05:42 | त्यात मुरवलेले मासे घाला आणि 10 मिनिटं शिजवा. नारळ घालून केलेला माश्याचा रस्सा तयार आहे. |
05:49 | चौथी रेसिपी आहे "मिश्र भाजी आणि उकडलेल्या अंड्याचा रस्सा". |
05:53 | हे बनवण्यासाठी आपल्याला लागतील - 2 उकडलेली अंडी, फुलकोबीतली दोन छोटी फुलं |
05:59 | 1 मध्यम कांदा, 2 फरसबीच्या शेंगा चिरून |
06:02 | 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरुन, ½ शिमला मिरची बारीक चिरलेली |
06:07 | 1 चमचा तीळ, 1 चमचा मिरची पूड, |
06:12 | चवीनुसार मीठ, ½ चमचा हळद, |
06:16 | 1 चमचे खसखस, ½ चमचा हळीव पूड, |
06:21 | 1 चमचा तेल. |
06:24 | भांड्यात तीळ आणि खसखस कोरडे भाजून घ्या. ते थंड होऊ द्या. |
06:29 | नंतर भांड्यात अर्धा चमचा तेल घालून टोमॅटो परता. |
06:35 | थंड झाल्यावर टोमॅटो आणि फरसबी मिक्सर किंवा दगडी ग्राईंडरमध्ये वाटून घ्या. |
06:41 | भांड्यात 1 चमचा तेल गरम करा. कांदे घाला आणि ते सोनेरी होईपर्यंत परता. |
06:48 | आता टोमॅटोचा लगदा घालून 5 मिनिटे शिजवा. मीठ, हळद, मिरची पूड घालून चांगले ढवळा. |
06:57 | थोडे पाणी आणि भाज्या घाला. |
07:01 | झाकण ठेवून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवा. |
07:04 | उकडलेली अंडी अर्धी कापा आणि रश्श्यात टाका. एक मिनिट शिजवा. |
07:10 | मिश्र भाजी आणि उकडलेल्या अंड्याचा रस्सा तयार आहे. |
07:14 | शेवटची पाककृती आपण पाहणार आहोत “पालक आणि माश्याचा रस्सा” - |
07:19 | हे तयार करण्यासाठी, आपल्याला लागतील– सामन माश्याचे 2 तुकडे, |
07:22 | पालकाची 4-5 पानं, चवीनुसार मीठ, |
07:26 | 1 चमचा मिरची पूड, ½ चमचा हळद, |
07:31 | 1 चमचा जवसाची पूड, 1 चमचे तूप किंवा तेल, |
07:36 | 1 मूठभर कोथिंबीर, 1 चमचा लिंबाचा रस, |
07:41 | 1 हिरवी मिरची, 1 चमचा गरम मसाल्याची पूड. |
07:45 | माशांचे तुकडे धुवा. थोडे मीठ आणि हळद चोळून बाजूला ठेवा. |
07:52 | पालक पाण्यानं चांगला धुवा. भांड्यात पाणी उकळवून त्यात पालक घालून 5 मिनिटे शिजवा. |
08:01 | नंतर, पाणी निथळून पालक थंड होऊ द्या. पालक, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण करून घ्या. |
08:09 | भांड्यात 1 चमचा तूप किंवा तेल गरम करून मासे शिजेपर्यंत तळा. |
08:15 | त्याचवेळी दुसर्या भांड्यात 1 चमचा तेल किंवा तूप गरम करा. |
08:22 | पालकाचा लगदा आणि थोडं पाणी घालून 5 मिनिटे शिजू द्या. मसाले घालून आणि चांगले एकत्र करा. |
08:30 | आता तळलेले माशाचे तुकडे घाला आणि सगळ्या तुकड्यांना मसाला नीट लागेपर्यंत शिजवा. |
08:37 | आता गरम मसाला आणि जवसाची पूड घाला आणि अजून 2 मिनिटं शिजवा. |
08:42 | गॅस बंद करून रश्श्यात लिंबाचा रस घाला. पालक आणि माश्याचा रस्सा तयार आहे. |
08:49 | वरील सर्व पाककृती - प्रथिनं, |
08:54 | जीवनसत्त्व ब- 12, |
08.57 | चांगल्या प्रतीची चरबी, |
09:00 | लोह |
09:02 | फोलेट, |
09:04 | पोटॅशिअम, |
09:06 | अ जीवनसत्त्व, |
09:08 | ड जीवनसत्व, |
09:12 | झिंक |
09:14 | आणि मॅग्नेशिअमने समृद्ध आहेत. |
09:17 | ही पोषकतत्त्वं बाळाच्या वाढीत आणि विकासात, |
09:22 | आईच्या दूध उत्पादनात आणि आईला निरोगी ठेवण्यात मदत करतात. |
09:27 | आता, स्तनपान देणाऱ्या मातांसाठी मांसाहारी पाककृतीवरील स्पोकन ट्युटोरिअल समाप्त झालं आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |