Health-and-Nutrition/C2/How-to-bathe-a-newborn/Marathi
border=1
||- | 00:00 | नवजात बाळाला आंघोळ कशी घालावी ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |- | 00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - आंघोळीच्या आधी आणि अंघोळ घालताना आई किंवा काळजी घेणाऱ्यांसाठी सुरक्षित टिपा, जसे |- |00:15 | बाळाला पहिल्यांदा अंघोळ केव्हा घालावी, ओल्या कपड्याने त्याचे शरीर कसे पुसावे, |- |00:20 | नियमित अंघोळ, पारंपारिक अंघोळ, |- |00:23 | डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशातील बाळांना अंघोळ घालणे आणि क्रॅडल कॅप. |- |00:32 | सर्व नवीन पालक नवजात बाळाला कशी अंघोळ घालावी ह्याबद्दल उत्सुक असतात. |- |00:37 | बाळाला अंघोळ घालताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. |- |00:42 | एक चुकीचे पाऊल नवजात बाळास खूप नुकसान पोहोचवू शकतो. |- | 00:46 | बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी सुरक्षितेच्या कोणत्या सूचना पाळाव्यात हे जाणून घेणे आवश्यक आहे - |- |00:54 | आईने किंवा कुटुंबातील सदस्याने बाळाला हात लावण्याआधी नेहमी बोटांची नखे कापावीत. |- |01:02 | कोणत्याही अंगठ्या, बांगड्या किंवा घड्याळे घालू नयेत. |- |01:07 | ह्यामुळे बाळाला इजा होणार नाही. |- | 01:11 | तर, बाळाला पहिल्यांदा अंघोळ केव्हा घालावी? |- |01:16 | प्रसूतीच्या 48 तासांनंतर आई बाळाला ओल्या कपड्याने पुसू शकते. |- |01:22 | लक्षात ठेवा, जोवर गर्भनाळ गळून पडत नाही तोवर बाळाला केवळ ओल्या कपड्याने पुसावे. |- |01:29 | एकदा गर्भनाळ गळून पडली की आई किंवा कुटुंबाचा सदस्य बाळाला नियमितपणे अंघोळ घालू शकतो. |- | 01:38 | तथापि, जर बाळाचे वजन कमी असेल तर अशा बाळाचे वजन 2 किलोपर्यंत वाढेपर्यंत बाळाला ओल्या कपड्याने पुसावे. |- | 01:49 | ओल्या कपड्याने कसे पुसावे ते पाहू. |- |01:53 | सुरू करण्यापूर्वी, खिडक्या बंद करून खोली पुरेशी उबदार आहे ह्याची खात्री करून घ्या. |- |02:00 | एक मऊ, स्वच्छ, लहान कापड तयार ठेवा. |- | 02:07 | बाळाला सुरक्षित, सपाट जागी ठेवावे. |- |02:12 | जमीन ही अतिशय सुरक्षित जागा असते. |- |02:15 | बाळाला कधीही उंच जागेवर ठेवू नका. |- | 02:19 | अंघोळीसाठी पाण्याचे तापमान 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे. |- |02:26 | आईने कोपर किंवा मनगटाने पाण्याचे तपमान तपासावे. |- | 02:32 | अंघोळ घालताना, प्रथम स्वच्छतेसाठी साबणाचे पाणी वापरा. |- |02:37 | साबणाचे पाणी बनविण्यासाठी नेहमीच सौम्य, रंगहीन आणि गंधरहित साबण किंवा खास बाळासाठी असलेले साबण वापरावे. |- |02:45 | नंतर साबण धुवून टाकण्यासाठी स्वच्छ पाणी वापरा. |- | 02:50 | लहान, मऊ कापड पाण्यात बुडवून पिळून घ्या. |- |02:56 | आता बाळाचे डोळे आतील कोपरापासून बाहेरील काठापर्यंत पुसा. |- |03:02 | त्याच कपड्याने शरीराचे इतर अंग पुसू नका. |- |03:06 | एका वेगळ्या नवीन आणि मऊ कपड्याने शरीराचे इतर अंग स्वच्छ करा. |- | 03:12 | तसेच सुकरत्या पडणारे अंग जसे – काख, कानामागे
|- |03:18 | मानेभोवती, बोटे आणि अंगठ्यांच्या मध्ये आणि जननेंद्रियाच्या भागात पुसण्यास विसरू नका. |- | 03:25 | आपण ओल्या कपड्याने अंग पुसणे म्हणजे काय ह्याबद्दल चर्चा केली, तर आता आपण नियमित आंघोळीबद्दल जाणून घेऊ. |- | 03:31 | कृपया लक्षात ठेवा; गर्भनाळ गळून पडल्यानंतर सर्व निरोगी बाळांना रोज अंघोळ घालावी. |- | 03:39 | रोज अंघोळ घालताना, जर तुम्ही मोठा टब वापरत असाल तर - प्रथम टब 2 इंचापर्यंत साबणाच्या पाण्याने भरा. |- |03:48 | साबणाचे पाणी बनवण्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे, नेहमीच सौम्य, रंगहीन आणि गंधरहित साबण किंवा खास बाळासाठी असलेला साबण वापरा. |- |03:58 | आणखी एक टब तयार ठेवा ज्यात ताजे पाणी असेल. |- |04:03 | त्यानंतर, दोन्ही टबांमध्ये आपल्या कोपराने पाण्याचे तपमान तपासा. |- |04:09 | पाण्याचे तपमान योग्य वाटल्यावर, बाळाला काळजीपूर्वक साबणाचे पाणी असलेल्या टबमध्ये ठेवा, डोक्याला नेहमी आधार राहिल ह्याची काळजी घ्या. |- |04:22 | बाळ जेव्हा टबमध्ये असेल तेव्हा जास्तीचे पाणी घालू नका. |- | 04:27 | प्रथम, गंधहीन आणि रंगहीन असे खास बाळांचे शैम्पू किंवा साबण वापरून बाळाचे डोके धुवून घ्या. |- |04:35 | नंतर ताज्या पाण्याने साबण हळूवारपणे धुवा. |- |04:39 | पुढे, शरीरातील घड्या पडणारे अंग आणि गुप्तांगासह बाकीचे शरीर स्वच्छ करा जिथे सर्वात जास्त मळ असतो. |- |04:47 | शेवटी, बाकीचे शरीर ताज्या पाण्याने हळूवारपणे धुवा. |- | 04:53 | दुसरीकडे - जर आईला किंवा काळजी घेणाऱ्यास बाळाला पारंपारिक भारतीय पद्धतीने अंघोळ घालायचे असेल तर आपले पाय एकमेकांना समांतर पसरवून जमिनीवर बसा. |- |05:06 | मग, बाळाला आपल्या पायावर ठेवा. |- |05:09 | बाळाचे डोके आईच्या किंवा काळजी घेणाऱ्याच्या पायाजवळ असावे. |- |05:14 | बाळाचे पाय आई किंवा काळजी घेणाऱ्याच्या पोटाजवळ असावेत. |- |05:20 | आता बाळ आंघोळ करण्यासाठी योग्य स्थितीत आहे. |- | 05:24 | आंघोळ झाल्यावर ताबडतोब बाळाला मुलायम आणि स्वच्छ टॉवेलने पुसा. |- |05:30 | आधी सांगितल्याप्रमाणे, घड्या पडणारे भाग पुसा. |- | 05:35 | पावडर किंवा बेबी पावडर वापरू नका. |- |05:40 | बेबी पावडरमुळे नवजात बाळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. |- |05:45 | डोळ्यात सुरमा किंवा काजळ कधीही घालू नका. |- |05:49 | सुरमा किंवा काजळामुळे नवजात बाळांना विषबाधा होऊ शकते आणि संसर्ग होऊ शकतो. |- | 05:56 | विशेष म्हणजे, डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशात राहणाऱ्या बाळांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. |- | 06:04 | अशा ठिकाणी असलेल्या बाळांसाठी, गर्भनाळ गळून पडल्यावर दररोज ओल्या कपड्याने पुसावे. |- |06:11 | तथापि, बाळाला कोरडे केल्यानंतर ताबडतोब आई किंवा काळजी घेणाऱ्याने बाळाला त्वचेच्या संपर्कात त्वचा दिली पाहिजे. |- |06:20 | यामुळे बाळांच्या शरीराचे तापमान कमी होण्याचा धोका कमी होईल. |- | 06:25 | कृपया लक्षात घ्या की आठवड्यातून दोनदा केस धुवावे. |- |06:30 | दररोज केस धुवू नका कारण यामुळे टाळू कोरडी पडेल. |- | 06:35 | असेही होऊ शकते की नवजात बाळाच्या टाळूवर खपल्या किंवा खवले येतील. ह्याला क्रॅडल कॅप म्हणतात. |- |06:45 | ह्या खवल्यांभोवती काही लालसरपणा असू शकतो. |- | 06:50 | लक्षात घ्या की क्रॅडल कॅपबद्दल काळजी करू नये. |- |06:54 | हे स्वतःच निघून जाईल आणि उपचार करण्याची गरज नाही. |- |06:59 | बाळासाठीचे विशेष तेल ह्या खवली मऊ कमी करण्यास मदत करते. |- | 07:04 | तेल लावताना, खवल्यांवर फक्त थोडे तेल पुसून घ्या. |- |07:09 | जास्त तेलामुळे स्थिती बिघडू शकते. |- | 07:12 | मग, एक किंवा दोन तासांत डोळ्यांना झोंबणार नाही अश्या सौम्य शैम्पूने बाळाचे केस धुवा. |- |07:20 | त्यानंतर, खवले अधिक वाढू नये म्हणून एका तासानंतर हळुवारपणे कंगव्याने ते झाडून घ्या. |- |07:27 | खवले कधीही खेचू नका त्यामुळे टाळूला इजा होऊ शकते किंवा संसर्ग होऊ शकतो. |- | 07:33 | नवजात बाळाला अंघोळ कशी घालावी ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आपण आलो आहोत. हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज क्राईस्ट ग्लोरी सर्व्हिसेस ह्यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.