GeoGebra-5.04/C2/Theorems-in-GeoGebra/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:58, 13 January 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Marathi Narration |
00:01 | Theorems in GeoGebra वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण जिओजेब्रा वापरुन सांगू आणि सिध्द करू. पायथागोरस प्रमेय आणि मिडपॉईंट प्रमेय. |
00:16 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.
उबंटू लिनक्स ओएस version 16.04 जिओजेब्रा version 5.0.438.0-डी. |
00:29 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी .
संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:40 | पायथागोरस प्रमेय सांगू |
00:43 | कर्णाचा वर्ग (उजव्या कोनाच्या विरुद्ध बाजू) इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. |
00:50 | मी आधीच जिओजेबरा इंटरफेस उघडला आहे. |
00:54 | आपण अर्धवर्तुळाच्या रेखांकनापासून सुरूवात करू. |
00:58 | Semicircle through 2 Points टूल वर क्लिक करा. |
01:02 | त्यानंतर ग्राफिक्स व्यू मध्ये दोन बिंदू चिन्हांकित करण्यासाठी क्लिक करा. |
01:07 | पॉईंट वापरुन आपण अर्धवर्तुळ c वर दुसरा बिंदू C चिन्हांकित करू. |
01:14 | आता अर्धवर्तुळावरील बिंदू वापरून त्रिकोण ABC काढू. |
01:19 | पॉलीगॉन टूलवर क्लिक करा आणि त्रिकोण ABC काढा |
01:26 | येथे आपण त्रिकोण काढण्यासाठी अर्धवर्तुळ वापरत आहोत. |
01:30 | कारण आपल्याला 90 अशांच्या कोनाच्या मापाची गरज आहे |
01:36 | चला त्रिकोणाचे कोन मोजू. |
01:39 | एंगल टूल वर क्लिक करा आणि त्रिकोणाच्या आत क्लिक करा. येथे कोन ACB 90 अंश आहे. |
01:49 | आता आपण अर्धवर्तुळ c लपवू. |
01:52 | Algebra view मध्ये कोनिक अंतर्गत c च्या निळ्या बिंदूवर क्लिक करा. |
01:58 | त्रिकोणाच्या बाजूंनी तीन चौरस काढू. |
02:02 | त्यासाठी Regular Polygon tool वर क्लिक करा आणि नंतर बिंदू C, B वर क्लिक करा. |
02:09 | Regular Polygon text बॉक्स डीफॉल्ट value 4 सह उघडेल. |
02:14 | तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा. |
02:17 | जर आपण B, C बिंदूवर क्लिक केले तर चौरस उलट दिशेने काढला जाईल. |
02:25 | Undo या बटणावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ववत करू. |
02:29 | आता बिंदू A, C वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या text बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा. |
02:37 | त्याचप्रमाणे B, A बिंदूवर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या text बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा. |
02:46 | आता आपल्याकडे Pythagorean triplets दाखवणारे तीन चौरस आहेत. |
02:51 | आकृती स्पष्टपणे पाहण्यासाठी आता आपण झूम आउट टूल वापरू. |
02:57 | आता आपण चौरसाचे क्षेत्र शोधू. |
03:01 | एरिया टूलवर क्लिक करा आणि अनुक्रमे पॉली 1, पॉली 2 आणि पॉली 3 वर क्लिक करा. |
03:12 | संबंधित चौरसाचे क्षेत्र दाखवले जाईल |
03:16 | Move tool वापरुन labels स्पष्ट दिसण्यासाठी ड्रॅग करा. |
03:29 | आता आपण क्षेत्रफळ पॉली 1 प्लस क्षेत्रफळ पॉली 2 हे पॉली 3 च्या क्षेत्रफळाइतके असल्याचे तपासू. |
03:36 | इनपुट बारमध्ये पॉली 1 + पॉली 2 टाइप करा आणि एंटर दाबा. |
03:43 | Algebra view मध्ये Number d, पॉली 3 च्या क्षेत्रफळाची value दर्शविते. |
03:49 | म्हणून पायथागोरस प्रमेय सिद्ध झाले आहे. |
03:52 | आता मी पायथागोरस प्रमेय करीता कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल स्पष्ट करते. |
03:57 | कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल अॅनिमेशन म्हणून आकृतीचे क्रमाक्रमाने रचना दर्शविते.. |
04:03 | अॅनिमेशन पाहण्यासाठी व्ह्यू मेनूवर क्लिक करा आणि कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल चेक बॉक्स निवडा. |
04:10 | कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल व्यू ग्राफिक्स व्यू च्या पुढे उघडेल. |
04:15 | कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल व्यू पाहण्यासाठी मी ग्राफिक्स व्यू व्ह्यूची सीमा ड्रॅग करेन. |
04:21 | या व्यूमध्ये काही columnसह एक टेबल आहे. टेबलच्या खाली आपल्याकडे अॅनिमेशन कंट्रोल्स आहेत. |
04:29 | आता प्ले बटणावर क्लिक करा. |
04:32 | अॅनिमेशन म्हणून आकृतीची क्रमाक्रमाने रचना पहा. |
04:50 | आता आपण मिडपॉईंट प्रमेय सिद्ध करू. |
04:53 | त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्य-बिंदूंमध्ये जोडणारा रेषाखंड तिसर्या बाजूच्या समांतर आणि अर्धा आहे. |
05:01 | मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे. |
05:05 | पॉलीगॉन टूल वापरुन त्रिकोण ABC काढा. |
05:16 | आता आपण AB आणि AC चा मधला बिंदू शोधू. |
05:21 | Midpoint or Center टूलवर क्लिक करा. नंतर बाजू AB आणि AC वर क्लिक करा. |
05:30 | लाइन टूल वापरुन बिंदू D आणि E मधून रेषा काढा. |
05:38 | आता आपण रेषाखंड AB च्या समांतर रेषा काढू. |
05:42 | त्यासाठी पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि रेषाखंड AB वर क्लिक करा. |
05:49 | नंतर बिंदू C वर क्लिक करा रेषाखंड AB ला समांतर रेषां g काढली आहे. |
05:56 | लक्ष द्या की f आणि g रेषा एका बिंदूत छेदत आहेत. |
06:01 | इंटरसेक्ट टूलचा वापर करून, छेदनबिंदू F म्हणून चिन्हांकित करू. |
06:08 | आता आपल्याला F C E आणि D A E कोन मोजण्याची आवश्यकता आहे. |
06:17 | एंगल टूल वर क्लिक करा आणि F, C, E आणि D, A, E बिंदूवर क्लिक करा. |
06:32 | ते कोन समान असल्याचे पहा. ते एकमेकांचे अंतर्गत पर्यायी कोन आहेत. |
06:38 | त्याचप्रमाणे आपण C,B,D आणि E,D,A मोजू. |
06:49 | कोन समान आहेत. हे दर्शविते की रेषा f ही BC रेषाखंडाला समांतर आहे. |
06:56 | Distance or Length टूल वापरुन D, E आणि B, C या बिंदूवर क्लिक करा.
लक्षात घ्या की DE हा BC च्या अर्धा आहे. |
07:09 | म्हणूनच मिडपॉईंट प्रमेय सिद्ध झाले आहे. |
07:12 | पुन्हा एकदा मी प्रमेय करीता कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल दर्शविते. |
07:17 | व्यू मेनूवर क्लिक करा. कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल चेक बॉक्स निवडा. |
07:23 | कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल view ग्राफिक्स व्यू च्या पुढे उघडेल. |
07:28 | आता प्ले बटणावर क्लिक करा. आकृतीची क्रमाक्रमाने रचना पहा. |
07:51 | असाईनमेंट म्हणून हे प्रमेय सिद्ध करा. |
07:55 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी. |
07:59 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
08:02 | या ट्यूटोरियल मध्ये आपण जिओजेब्रा वापरुन सांगितले आणि सिद्ध केले,
पायथागोरस प्रमेय आणि मिडपॉईंट प्रमेय |
08:12 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाउनलोड करा आणि पहा. |
08:20 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
08:28 | कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा. |
08:32 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.
यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:43 | मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद. |