GeoGebra-5.04/C2/Theorems-in-GeoGebra/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Marathi Narration
00:01 Theorems in GeoGebra वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण जिओजेब्रा वापरुन सांगू आणि सिध्द करू. पायथागोरस प्रमेय आणि मिडपॉईंट प्रमेय.
00:16 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे.

उबंटू लिनक्स ओएस version 16.04

जिओजेब्रा version 5.0.438.0-डी.

00:29 या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्‍याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी .

संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.

00:40 पायथागोरस प्रमेय सांगू
00:43 कर्णाचा वर्ग (उजव्या कोनाच्या विरुद्ध बाजू) इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.
00:50 मी आधीच जिओजेबरा इंटरफेस उघडला आहे.
00:54 आपण अर्धवर्तुळाच्या रेखांकनापासून सुरूवात करू.
00:58 Semicircle through 2 Points टूल वर क्लिक करा.
01:02 त्यानंतर ग्राफिक्स व्यू मध्ये दोन बिंदू चिन्हांकित करण्यासाठी क्लिक करा.
01:07 पॉईंट वापरुन आपण अर्धवर्तुळ c वर दुसरा बिंदू C चिन्हांकित करू.
01:14 आता अर्धवर्तुळावरील बिंदू वापरून त्रिकोण ABC काढू.
01:19 पॉलीगॉन टूलवर क्लिक करा आणि त्रिकोण ABC काढा
01:26 येथे आपण त्रिकोण काढण्यासाठी अर्धवर्तुळ वापरत आहोत.
01:30 कारण आपल्याला 90 अशांच्या कोनाच्या मापाची गरज आहे
01:36 चला त्रिकोणाचे कोन मोजू.
01:39 एंगल टूल वर क्लिक करा आणि त्रिकोणाच्या आत क्लिक करा. येथे कोन ACB 90 अंश आहे.
01:49 आता आपण अर्धवर्तुळ c लपवू.
01:52 Algebra view मध्ये कोनिक अंतर्गत c च्या निळ्या बिंदूवर क्लिक करा.
01:58 त्रिकोणाच्या बाजूंनी तीन चौरस काढू.
02:02 त्यासाठी Regular Polygon tool वर क्लिक करा आणि नंतर बिंदू C, B वर क्लिक करा.
02:09 Regular Polygon text बॉक्स डीफॉल्ट value 4 सह उघडेल.
02:14 तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.
02:17 जर आपण B, C बिंदूवर क्लिक केले तर चौरस उलट दिशेने काढला जाईल.
02:25 Undo या बटणावर क्लिक करून प्रक्रिया पूर्ववत करू.
02:29 आता बिंदू A, C वर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या text बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
02:37 त्याचप्रमाणे B, A बिंदूवर क्लिक करा आणि नंतर दिसत असलेल्या text बॉक्समधील ओके बटणावर क्लिक करा.
02:46 आता आपल्याकडे  Pythagorean triplets दाखवणारे तीन चौरस आहेत.
02:51 आकृती स्पष्टपणे पाहण्यासाठी आता आपण झूम आउट टूल वापरू.
02:57 आता आपण चौरसाचे क्षेत्र शोधू.
03:01 एरिया टूलवर क्लिक करा आणि अनुक्रमे पॉली 1, पॉली 2 आणि पॉली 3 वर क्लिक करा.
03:12 संबंधित चौरसाचे क्षेत्र दाखवले जाईल
03:16 Move tool वापरुन labels स्पष्ट दिसण्यासाठी ड्रॅग करा.
03:29 आता आपण क्षेत्रफळ पॉली 1 प्लस क्षेत्रफळ पॉली 2 हे पॉली 3 च्या क्षेत्रफळाइतके असल्याचे तपासू.
03:36 इनपुट बारमध्ये पॉली 1 + पॉली 2 टाइप करा आणि एंटर दाबा.
03:43 Algebra view मध्ये Number d, पॉली 3 च्या क्षेत्रफळाची value दर्शविते.
03:49 म्हणून पायथागोरस प्रमेय सिद्ध झाले आहे.
03:52 आता मी पायथागोरस प्रमेय करीता कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल स्पष्ट करते.
03:57 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल अ‍ॅनिमेशन म्हणून आकृतीचे क्रमाक्रमाने रचना दर्शविते..
04:03 अ‍ॅनिमेशन पाहण्यासाठी व्ह्यू मेनूवर क्लिक करा आणि कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल चेक बॉक्स निवडा.
04:10 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल व्यू ग्राफिक्स व्यू च्या पुढे उघडेल.
04:15 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल व्यू पाहण्यासाठी मी ग्राफिक्स व्यू व्ह्यूची सीमा ड्रॅग करेन.
04:21 या व्यूमध्ये काही columnसह एक टेबल आहे. टेबलच्या खाली आपल्याकडे अ‍ॅनिमेशन कंट्रोल्स आहेत.
04:29 आता प्ले बटणावर क्लिक करा.
04:32 अ‍ॅनिमेशन म्हणून आकृतीची क्रमाक्रमाने रचना पहा.
04:50 आता आपण मिडपॉईंट प्रमेय सिद्ध करू.
04:53 त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्य-बिंदूंमध्ये जोडणारा रेषाखंड तिसर्‍या बाजूच्या समांतर आणि अर्धा आहे.
05:01 मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडली आहे.
05:05 पॉलीगॉन टूल वापरुन त्रिकोण ABC काढा.
05:16 आता आपण AB आणि AC चा मधला बिंदू शोधू.
05:21 Midpoint or Center टूलवर क्लिक करा. नंतर बाजू AB आणि AC वर क्लिक करा.
05:30 लाइन टूल वापरुन बिंदू D आणि E मधून रेषा काढा.
05:38 आता आपण रेषाखंड AB च्या समांतर रेषा काढू.
05:42 त्यासाठी पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि रेषाखंड AB वर क्लिक करा.
05:49 नंतर बिंदू C वर क्लिक करा रेषाखंड AB ला समांतर रेषां g काढली आहे.
05:56 लक्ष द्या की f आणि g रेषा एका बिंदूत छेदत आहेत.
06:01 इंटरसेक्ट टूलचा वापर करून, छेदनबिंदू F म्हणून चिन्हांकित करू.
06:08 आता आपल्याला F C E आणि D A E कोन मोजण्याची आवश्यकता आहे.
06:17 एंगल टूल वर क्लिक करा आणि F, C, E आणि D, ​​A, E बिंदूवर क्लिक करा.
06:32 ते कोन समान असल्याचे पहा. ते एकमेकांचे अंतर्गत पर्यायी कोन आहेत.
06:38 त्याचप्रमाणे आपण C,B,D आणि E,D,A मोजू.
06:49 कोन समान आहेत. हे दर्शविते की रेषा f ही BC रेषाखंडाला समांतर आहे.
06:56 Distance or Length  टूल वापरुन D, E आणि B, C या बिंदूवर क्लिक करा.

लक्षात घ्या की DE हा BC च्या अर्धा आहे.

07:09 म्हणूनच मिडपॉईंट प्रमेय सिद्ध झाले आहे.
07:12 पुन्हा एकदा मी प्रमेय करीता कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल दर्शविते.
07:17 व्यू मेनूवर क्लिक करा. कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल चेक बॉक्स निवडा.
07:23 कन्स्ट्रक्शन प्रोटोकॉल view ग्राफिक्स व्यू च्या पुढे उघडेल.
07:28 आता प्ले बटणावर क्लिक करा. आकृतीची क्रमाक्रमाने रचना पहा.
07:51 असाईनमेंट म्हणून हे प्रमेय सिद्ध करा.
07:55 आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी.
07:59 आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू.
08:02 या ट्यूटोरियल मध्ये आपण जिओजेब्रा वापरुन सांगितले आणि सिद्ध केले,

पायथागोरस प्रमेय आणि मिडपॉईंट प्रमेय

08:12 पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाउनलोड करा आणि पहा.

08:20 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.

08:28 कृपया या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा.
08:32 स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.

यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

08:43 मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Radhika