PhET/C3/Gene-Expression-The-Basics/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Gene-Expression-The Basics simulation वरील पाठात आपले स्वागत.
|
00:08 | या पाठात, Gene Expression-The Basics या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. |
00:16 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील जीवशास्त्राचे ज्ञान असावे. |
00:23 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, |
00:30 | जावा वर्जन 1.7.0, |
00:35 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
|
00:41 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:
1. प्रथिन संश्लेषणातील पायऱ्यांची माहिती |
00:48 | 2. प्रथिन संश्लेषणावर परिणाम करणारे घटक
3. पेशींमधे तयार होणाऱ्या Green Fluorescent Protein ची सरासरी पातळी पाहणे. |
01:00 | Central Dogma of Genetics याविषयी माहिती आठवूया. |
01:05 | याची संकल्पना Francis Crick या शास्त्रज्ञाने मांडली. |
01:09 | असे म्हटले जाते की जेनेटिक माहितीचा प्रवाह DNA कडून mRNA कडे आणि पुढे प्रथिनांपर्यंत जातो. |
01:19 | प्रथिन संश्लेषण दोन पायऱ्यांत होते. |
01:23 | Transcription ही mRNA बनवण्याची प्रक्रिया आहे. |
01:28 | तर Translation प्रक्रियेमधे mRNA प्रथिन संश्लेषण घडवून घेतो. |
01:35 | प्रात्यक्षिकाला सुरूवात करूया.
|
01:38 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू. |
01:42 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Gene Expression-The Basics हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे. |
01:51 | सिम्युलेशन सुरू करण्यासाठी टर्मिनल उघडा. |
01:55 | प्रॉम्प्टवर टाईप करा: cd Downloads आणि एंटर दाबा. |
02:03 | टाईप करा: java space hyphen jar space gene hyphen expression hyphen basics underscore en dot jar आणि एंटर दाबा. |
02:20 | Gene Expression-The Basics सिम्युलेशन उघडेल. |
02:25 | सिम्युलेशन स्क्रीनच्या वरच्या बाजूला 3 टॅब्ज आहेत- Cell Gene Expression, |
02:32 | Messenger RNA Production आणि Multiple Cells. |
02:38 | डीफॉल्ट स्वरूपात, Cell Gene Expression स्क्रीन उघडेल. |
02:43 | स्क्रीनच्या डाव्या बाजूला Biomolecule Toolbox आहे. |
02:48 | यामधे transcription आणि translation नियंत्रित करणारे घटक आहेत. |
02:54 | स्क्रीनच्या तळाशी एक DNA स्ट्रँड(पेड) दाखवला आहे. |
02:59 | हा जीन 1 दाखवत आहे. |
03:02 | जीन 1 मधे एक रेग्युलेटरी भाग आणि एक Transcribed भाग आहे. |
03:08 | रेग्युलेटरी भागावर धन आणि ऋण Transcription घटक कार्य करतात. |
03:15 | DNA स्ट्रँडमधे Transcribed भाग हा रेग्युलेटरी भागाच्या नंतर असतो. |
03:22 | त्याचा उपयोग mRNA तयार करण्यासाठी होतो. |
03:26 | mRNA स्ट्रँडमधे असलेली माहिती Transcribed भागात सापडते. |
03:33 | दुसऱ्या बाजूला आपल्याकडे Protein Collection दाखवणारा बॉक्स आहे. आपण कोणत्या प्रकारचे प्रथिन बनवत आहोत ते येथे दिसते. |
03:42 | आता आपण बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधून धन Transcription घटक निवडूया. |
03:49 | Positive Transcription Factor वर क्लिक करा. |
03:53 | जीन 1 मधील रेग्युलेटरी भागाकडे लक्ष द्या. |
03:57 | धन Transcription घटकाचा आकार हायलाईट केला जाईल. |
04:02 | तो ड्रॅग करून हायलाईट झालेल्या रेग्युलेटरी भागावर ठेवा. |
04:07 | बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधील RNA Polymerase वर क्लिक करा. |
04:13 | जीन 1 मधील RNA polymerase चा आकार हायलाईट झालेला दिसेल. |
04:19 | तो ड्रॅग करून RNA Polymerase च्या हायलाईट केलेल्या भागावर ठेवा. |
04:25 | RNA Polymerase येथे transcription प्रक्रिया सुरू करेल. |
04:30 | आता Transcription प्रक्रियेमुळे mRNA तयार झाल्याचे दिसेल. |
04:38 | आता transcription घटकांची भूमिका पाहू. |
04:43 | धन Transcription घटकांना activator असेही नाव आहे. |
04:49 | हे स्वतःला रेग्युलेटरी भागावर ठेवतात. |
04:54 | हे RNA polymerase रेग्युलेटरी भागाला जोडून घेण्यास मदत करतात. |
05:00 | हे RNA polymerase ला mRNA बनवण्यास अनुमती देतात. |
05:05 | RNA Polymerase हे एक एंझाईम आहे. |
05:09 | ते DNA चा transcribed भाग वाचून mRNA बनवते. |
05:15 | प्रथम रेग्युलेटरी भागातून स्ट्रँड पाठवून तो जोडून घेतला जातो. |
05:21 | असाईनमेंट म्हणून ऋण Transcription घटक जीन 1 वर ठेवा. |
05:28 | RNA polymerase सिलेक्ट करा. |
05:31 | RNA polymerase हा transcribed भागातून जाऊ शकतो का ते बघा.
आणि त्याचे कारण द्या. |
05:39 | सिम्युलेशनवर परत जाऊ. |
05:42 | बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधून Ribosome निवडा. |
05:47 | तो ड्रॅग करून mRNA च्या हायलाईट केलेल्या मोकळ्या सुट्या भागावर ठेवा. |
05:52 | प्रथिनाचा एक प्रकार तयार झाला आहे. |
05:56 | Your Protein collection बॉक्समधे ते हायलाईट केले गेले आहे. |
06:01 | बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधून mRNA destroyer निवडा. |
06:06 | mRNA वरील mRNA विनाशक बसण्याची जागा तुटक रेषेने हायलाईट केलेली आहे. |
06:14 | ड्रॅग करून तो mRNA च्या हायलाईट केलेल्या जागेवर ठेवा. |
06:20 | mRNA चे त्याच्या स्वतःच्या घटकांमधे विघटन होताना दिसेल. |
06:25 | mRNA विनाशक हा mRNA ला अधिक प्रथिने बनवण्यापासून थांबवेल. |
06:31 | स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे Reset All बटण आहे. |
06:37 | स्क्रीन डीफॉल्ट स्थितीत आणण्यासाठी reset वर क्लिक करा. |
06:42 | स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यातील Next Gene या हिरव्या बटणावर क्लिक करा. |
06:49 | हे तुम्हाला दुसऱ्या जीनकडे घेऊन जाईल जो दुसऱ्या प्रकारचे प्रथिन बनवतो. |
06:56 | दुसरा जीन पहिल्या जीनपेक्षा कसा वेगळा आहे ते शोधून काढा. |
07:03 | आता वरती असलेल्या Messenger RNA Production टॅबवर क्लिक करा. |
07:08 | येथे transcription म्हणजेच mRNA च्या निर्मितीवर परिणाम करणारे विविध घटक पाहू. |
07:15 | आपल्याला दोन पॅनेल्स दिसतील. धन Transcription घटक आणि RNA Polymerase. |
07:24 | मी धन Transcription घटकांची तीव्रता आणि Affinity वाढवत आहे. |
07:32 | Concentrations चा स्लायडर Lots कडे ड्रॅग करू. |
07:37 | मी Affinity ‘हाय’ वर ठेवत आहे. |
07:41 | तसेच RNA Polymerase Affinity सुध्दा 'हाय' वर ठेवू. |
07:46 | आपल्याला दिसेल की RNA polymerase स्वतःला DNA स्ट्रँडला सहज जोडून घेत आहे.
आणि mRNA बनवत आहे. |
07:57 | आपण असे पाहिले की धन Transcription घटकांची तीव्रता वाढवली असता त्यांचे रेग्युलेटरी भागावरील बंध वाढतात. |
08:08 | यामुळे RNA polymerase जास्त जलदपणे DNA ला जोडले जातात. |
08:14 | यामुळे mRNA चे उत्पादन जलद गतीने होते. |
08:19 | Concentration आणि Affinity चे स्लायडर्स हलवून त्यांचे परिणाम पहा. |
08:26 | Multiple Cells टॅबवर क्लिक करा. उजवीकडे 3 पर्याय दिसतील- |
08:35 | Concentrations, Affinities आणि Degradation. |
08:41 | पॅनेल उघडण्यासाठी हिरव्या रंगाच्या अधिक चिन्हावर क्लिक करा. |
08:45 | Concentrations, Affinities आणि Degradation बदलण्यासाठी त्यांचे स्लायडर ड्रॅग करा. |
08:55 | पेशीतील Green Fluorescent प्रथिनांच्या संख्येकडे लक्ष द्या. |
09:01 | Cells स्लायडर एकवरून Many वर ड्रॅग करा. |
09:06 | green fluorescent प्रथिन पेशींकडे लक्ष द्या. |
09:10 | पेशींची चमक त्यातील प्रथिनांची तीव्रता दाखवते. |
09:16 | थोडक्यात, |
09:19 | या पाठात, Gene Expression-The Basics सिम्युलेशन कसे वापरावे हे बघितले. |
09:28 | सिम्युलेशन वापरून आपण पाहिलेः प्रथिन बायो संश्लेषणातील पायऱ्यांची माहिती, |
09:35 | transcription घटक वापरून mRNA ची निर्मिती, |
09:40 | translation घटक वापरून प्रथिन बनवणे, |
09:45 | आणि mRNA च्या उत्पादनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास. |
09:51 | असाईनमेंट म्हणून: Cell Gene Expression स्क्रीन वापरून जीन 2 transcribe करा आणि प्रथिन protein collection बॉक्समधे ठेवा. |
10:03 | Multiple Cells टॅब वापरून पहा. |
10:06 | या सिम्युलेशनमधे वापरलेल्या पेशींची नावे शोधा. |
10:10 | पेशी हिरव्या रंगाच्या का असतात याचे स्पष्टीकरण द्या. |
10:14 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:23 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
10:33 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
|
10:37 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
10:41 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
10:50 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:04 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |