PhET/C3/Gene-Expression-The-Basics/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Gene-Expression-The Basics simulation वरील पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात, Gene Expression-The Basics या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
00:16 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील जीवशास्त्राचे ज्ञान असावे.
00:23 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04,

00:30 जावा वर्जन 1.7.0,
00:35 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.


00:41 हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:

1. प्रथिन संश्लेषणातील पायऱ्यांची माहिती

00:48 2. प्रथिन संश्लेषणावर परिणाम करणारे घटक

3. पेशींमधे तयार होणाऱ्या Green Fluorescent Protein ची सरासरी पातळी पाहणे.

01:00 Central Dogma of Genetics याविषयी माहिती आठवूया.
01:05 याची संकल्पना Francis Crick या शास्त्रज्ञाने मांडली.
01:09 असे म्हटले जाते की जेनेटिक माहितीचा प्रवाह DNA कडून mRNA कडे आणि पुढे प्रथिनांपर्यंत जातो.
01:19 प्रथिन संश्लेषण दोन पायऱ्यांत होते.
01:23 Transcription ही mRNA बनवण्याची प्रक्रिया आहे.
01:28 तर Translation प्रक्रियेमधे mRNA प्रथिन संश्लेषण घडवून घेतो.
01:35 प्रात्यक्षिकाला सुरूवात करूया.


01:38 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
01:42 मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Gene Expression-The Basics हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
01:51 सिम्युलेशन सुरू करण्यासाठी टर्मिनल उघडा.
01:55 प्रॉम्प्टवर टाईप करा: cd Downloads आणि एंटर दाबा.
02:03 टाईप करा: java space hyphen jar space gene hyphen expression hyphen basics underscore en dot jar आणि एंटर दाबा.
02:20 Gene Expression-The Basics सिम्युलेशन उघडेल.
02:25 सिम्युलेशन स्क्रीनच्या वरच्या बाजूला 3 टॅब्ज आहेत- Cell Gene Expression,
02:32 Messenger RNA Production आणि Multiple Cells.
02:38 डीफॉल्ट स्वरूपात, Cell Gene Expression स्क्रीन उघडेल.
02:43 स्क्रीनच्या डाव्या बाजूला Biomolecule Toolbox आहे.
02:48 यामधे transcription आणि translation नियंत्रित करणारे घटक आहेत.
02:54 स्क्रीनच्या तळाशी एक DNA स्ट्रँड(पेड) दाखवला आहे.
02:59 हा जीन 1 दाखवत आहे.
03:02 जीन 1 मधे एक रेग्युलेटरी भाग आणि एक Transcribed भाग आहे.
03:08 रेग्युलेटरी भागावर धन आणि ऋण Transcription घटक कार्य करतात.
03:15 DNA स्ट्रँडमधे Transcribed भाग हा रेग्युलेटरी भागाच्या नंतर असतो.
03:22 त्याचा उपयोग mRNA तयार करण्यासाठी होतो.
03:26 mRNA स्ट्रँडमधे असलेली माहिती Transcribed भागात सापडते.
03:33 दुसऱ्या बाजूला आपल्याकडे Protein Collection दाखवणारा बॉक्स आहे. आपण कोणत्या प्रकारचे प्रथिन बनवत आहोत ते येथे दिसते.
03:42 आता आपण बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधून धन Transcription घटक निवडूया.
03:49 Positive Transcription Factor वर क्लिक करा.
03:53 जीन 1 मधील रेग्युलेटरी भागाकडे लक्ष द्या.
03:57 धन Transcription घटकाचा आकार हायलाईट केला जाईल.
04:02 तो ड्रॅग करून हायलाईट झालेल्या रेग्युलेटरी भागावर ठेवा.
04:07 बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधील RNA Polymerase वर क्लिक करा.
04:13 जीन 1 मधील RNA polymerase चा आकार हायलाईट झालेला दिसेल.
04:19 तो ड्रॅग करून RNA Polymerase च्या हायलाईट केलेल्या भागावर ठेवा.
04:25 RNA Polymerase येथे transcription प्रक्रिया सुरू करेल.
04:30 आता Transcription प्रक्रियेमुळे mRNA तयार झाल्याचे दिसेल.
04:38 आता transcription घटकांची भूमिका पाहू.
04:43 धन Transcription घटकांना activator असेही नाव आहे.
04:49 हे स्वतःला रेग्युलेटरी भागावर ठेवतात.
04:54 हे RNA polymerase रेग्युलेटरी भागाला जोडून घेण्यास मदत करतात.
05:00 हे RNA polymerase ला mRNA बनवण्यास अनुमती देतात.
05:05 RNA Polymerase हे एक एंझाईम आहे.
05:09 ते DNA चा transcribed भाग वाचून mRNA बनवते.
05:15 प्रथम रेग्युलेटरी भागातून स्ट्रँड पाठवून तो जोडून घेतला जातो.
05:21 असाईनमेंट म्हणून ऋण Transcription घटक जीन 1 वर ठेवा.
05:28 RNA polymerase सिलेक्ट करा.
05:31 RNA polymerase हा transcribed भागातून जाऊ शकतो का ते बघा.

आणि त्याचे कारण द्या.

05:39 सिम्युलेशनवर परत जाऊ.
05:42 बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधून Ribosome निवडा.
05:47 तो ड्रॅग करून mRNA च्या हायलाईट केलेल्या मोकळ्या सुट्या भागावर ठेवा.
05:52 प्रथिनाचा एक प्रकार तयार झाला आहे.
05:56 Your Protein collection बॉक्समधे ते हायलाईट केले गेले आहे.
06:01 बायोमॉलिक्युल टुलबॉक्समधून mRNA destroyer निवडा.
06:06 mRNA वरील mRNA विनाशक बसण्याची जागा तुटक रेषेने हायलाईट केलेली आहे.
06:14 ड्रॅग करून तो mRNA च्या हायलाईट केलेल्या जागेवर ठेवा.
06:20 mRNA चे त्याच्या स्वतःच्या घटकांमधे विघटन होताना दिसेल.
06:25 mRNA विनाशक हा mRNA ला अधिक प्रथिने बनवण्यापासून थांबवेल.
06:31 स्क्रीनच्या तळाशी उजवीकडे Reset All बटण आहे.
06:37 स्क्रीन डीफॉल्ट स्थितीत आणण्यासाठी reset वर क्लिक करा.
06:42 स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यातील Next Gene या हिरव्या बटणावर क्लिक करा.
06:49 हे तुम्हाला दुसऱ्या जीनकडे घेऊन जाईल जो दुसऱ्या प्रकारचे प्रथिन बनवतो.
06:56 दुसरा जीन पहिल्या जीनपेक्षा कसा वेगळा आहे ते शोधून काढा.
07:03 आता वरती असलेल्या Messenger RNA Production टॅबवर क्लिक करा.
07:08 येथे transcription म्हणजेच mRNA च्या निर्मितीवर परिणाम करणारे विविध घटक पाहू.
07:15 आपल्याला दोन पॅनेल्स दिसतील. धन Transcription घटक आणि RNA Polymerase.
07:24 मी धन Transcription घटकांची तीव्रता आणि Affinity वाढवत आहे.
07:32 Concentrations चा स्लायडर Lots कडे ड्रॅग करू.
07:37 मी Affinity ‘हाय’ वर ठेवत आहे.
07:41 तसेच RNA Polymerase Affinity सुध्दा 'हाय' वर ठेवू.
07:46 आपल्याला दिसेल की RNA polymerase स्वतःला DNA स्ट्रँडला सहज जोडून घेत आहे.

आणि mRNA बनवत आहे.

07:57 आपण असे पाहिले की धन Transcription घटकांची तीव्रता वाढवली असता त्यांचे रेग्युलेटरी भागावरील बंध वाढतात.
08:08 यामुळे RNA polymerase जास्त जलदपणे DNA ला जोडले जातात.
08:14 यामुळे mRNA चे उत्पादन जलद गतीने होते.
08:19 Concentration आणि Affinity चे स्लायडर्स हलवून त्यांचे परिणाम पहा.
08:26 Multiple Cells टॅबवर क्लिक करा. उजवीकडे 3 पर्याय दिसतील-
08:35 Concentrations, Affinities आणि Degradation.
08:41 पॅनेल उघडण्यासाठी हिरव्या रंगाच्या अधिक चिन्हावर क्लिक करा.
08:45 Concentrations, Affinities आणि Degradation बदलण्यासाठी त्यांचे स्लायडर ड्रॅग करा.
08:55 पेशीतील Green Fluorescent प्रथिनांच्या संख्येकडे लक्ष द्या.
09:01 Cells स्लायडर एकवरून Many वर ड्रॅग करा.
09:06 green fluorescent प्रथिन पेशींकडे लक्ष द्या.
09:10 पेशींची चमक त्यातील प्रथिनांची तीव्रता दाखवते.
09:16 थोडक्यात,
09:19 या पाठात, Gene Expression-The Basics सिम्युलेशन कसे वापरावे हे बघितले.
09:28 सिम्युलेशन वापरून आपण पाहिलेः प्रथिन बायो संश्लेषणातील पायऱ्यांची माहिती,
09:35 transcription घटक वापरून mRNA ची निर्मिती,
09:40 translation घटक वापरून प्रथिन बनवणे,
09:45 आणि mRNA च्या उत्पादनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास.
09:51 असाईनमेंट म्हणून: Cell Gene Expression स्क्रीन वापरून जीन 2 transcribe करा आणि प्रथिन protein collection बॉक्समधे ठेवा.
10:03 Multiple Cells टॅब वापरून पहा.
10:06 या सिम्युलेशनमधे वापरलेल्या पेशींची नावे शोधा.
10:10 पेशी हिरव्या रंगाच्या का असतात याचे स्पष्टीकरण द्या.
10:14 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:23 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

10:33 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


10:37 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:41 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


10:50 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

11:04 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali