PhET/C3/Faradays-Electromagnetic-Lab/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Faraday's Electromagnetic Lab वरील पाठात आपले स्वागत.
|
00:06 | यात, Faraday's Electromagnetic Lab, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. |
00:14 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, |
00:20 | जावा वर्जन 1.8.0 |
00:24 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 61.0.1 वापरत आहे. |
00:29 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:36 | सिम्युलेशन वापरून आपण,
चुंबक फिरताना चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल दर्शवू. |
00:44 | चुंबकीय क्षेत्राच्या संदर्भात चुंबकसूचीच्या विचलनाचा अभ्यास करू. |
00:49 | प्रवर्तित (इनड्युस्ड) EMF सह व्होल्टेजमधील बदलाची तुलना करू. |
00:52 | विद्युत चुम्बकीय प्रवर्तनाचे कारण स्पष्ट करू. |
00:57 | ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) चे कार्य समजून घेऊ. |
01:00 | जनरेटर (जनित्र) चे कार्य जाणून घेऊ. |
01:03 | अधिक माहितीसाठी कृपया या ट्युटोरियलसोबत दिलेली अतिरिक्त सामग्री पहा. |
01:09 | सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा. |
01:13 | मी आधीच Faraday's Electromagnetic Lab हे सिम्युलेशन डाउनलोड्स फोल्डरमधे डाउनलोड केलेले आहे. |
01:20 | हे सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा. |
01:23 | प्रॉम्प्टवर टाईप करा cd Downloads आणि एंटर दाबा. |
01:29 | टाईप करा, java space hyphen jar space faraday_en.jar आणि एंटर दाबा. |
01:40 | Faraday's Electromagnetic Lab सिम्युलेशन उघडेल. |
01:45 | सिम्युलेशन इंटरफेसला पाच टॅब्ज आहेत, Bar Magnet,Pickup Coil,Electromagnet,Transformer,Generator. |
01:58 | डिफॉल्ट रूपात Bar Magnet टॅब उघडेल. |
02:02 | स्क्रीनवर उत्तर आणि दक्षिण ध्रुवांनी चिन्हांकित केलेला एक बार चुंबक आणि एक चुंबकसूची आहे. |
02:09 | चुंबकीय बलाच्या रेषा स्क्रीनवर सर्वत्र पसरलेल्या दिसत आहेत. |
02:14 | Move me or me ही दृश्य सूचनाही दिसत आहे. |
02:19 | ही दृश्य सूचना आपल्याला चुंबक किंवा चुंबकसूची ड्रॅग करण्याची सूचना देते. |
02:24 | आता सुयांचे अंतर आणि सुयांचा आकार बदलू. |
02:28 | ह्यामुळे चुंबकीय बलाच्या रेषा स्पष्टपणे पाहण्यास मदत होते. |
02:33 | Options मेनूवर क्लिक करा आणि Field Controls निवडा. |
02:38 | Field Controls डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:42 | डायलॉग बॉक्समधे आपल्याकडे Needle spacing आणि Needle size साठी स्लाइडर आहेत. |
02:49 | Needle spacing स्लाइडर 60 आणि Needle size स्लाइडर 50x14(50 बाय 14) वर ड्रॅग करा. |
02:57 | तुम्ही आवश्यकतेनुसार स्लाइडर बदलू शकता. |
03:01 | OK बटणावर क्लिक करा आणि बदल पहा. |
03:05 | स्क्रीनभोवती चुंबक ड्रॅग करा. |
03:08 | लक्षात ठेवा, चुंबक ड्रॅग केल्यावर चुंबकीय बलाच्या रेषांची मांडणी आणि पुनर्रचना होते. |
03:14 | आता चुंबकाभोवती चुंबकसूची ड्रॅग करा. |
03:17 | लक्षात घ्या, चुंबकीय बलाच्या रेषांनुसार चुंबकसूचीची रचना होते. |
03:23 | उजव्या पॅनेलवर आपल्याकडे Bar Magnet Strength स्लाइडर आहे. |
03:28 | स्लाइडर 0 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान सेट केला जाऊ शकतो. |
03:34 | 0% स्ट्रेंथवर आपल्याला चुंबकीय बलाच्या कोणत्याही रेषा दिसत नाहीत. |
03:40 | आपण स्लाइडर 100% च्या दिशेने ड्रॅग केल्यास, चुंबकीय बलाच्या रेषा स्पष्ट दिसतात. |
03:47 | उजव्या पॅनेलवरील Flip Polarity बटणावर क्लिक करा. |
03:51 | चुंबकाचे ध्रुव बदलतात. |
03:54 | ध्रुवांतील बदलांमुळे बल रेषांच्या आणि चुंबकसूचीच्या मार्गाची दिशा बदलते. |
04:00 | उजव्या पॅनेलमधील See Inside Magnet चेक बॉक्सवर क्लिक करा. |
04:05 | चुंबकाच्या आतील बलाच्या रेषांची दिशा पहा. |
04:09 | उजव्या पॅनेलमधील Show Field Meter चेक बॉक्सवर क्लिक करा. |
04:14 | Field meter स्क्रीनवर दिसू लागतो. |
04:17 | फिल्डवर भोवताली Field meter ड्रॅग करा. |
04:20 | यावर चुंबकीय फ्लक्स डेन्सिटी B च्या बदलत्या व्हॅल्युज दाखवल्या जातात. जसे की, B चा x घटक(Bx), B चा y घटक(By) आणि विचलनाचा कोन(Ө). |
04:34 | आता Pickup Coil टॅबवर क्लिक करा. |
04:37 | हा स्क्रीन Faraday's law of Electromagnetic induction दाखवतो. |
04:42 | Pickup Coil स्क्रीनमध्ये एक चुंबक आणि बल्बला जोडलेली एक कॉइल आहे. |
04:48 | Pickup Coil पॅनेल उजव्या पॅनेलमध्ये समाविष्ट आहे. |
04:52 | सर्किटमध्ये बल्ब indicator म्हणून काम करतो. |
04:56 | येथे आपण चुंबक कॉईलच्या दिशेने किंवा कॉईल चुंबकाच्या दिशेने ड्रॅग करू शकतो. |
05:03 | सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कॉईलच्या दिशेने चुंबक ड्रॅग करणे. |
05:08 | कारण, चुंबक हलविल्याने कॉईलच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र प्रवर्तित होते. |
05:14 | आता कॉईलमधून चुंबक मागे व पुढे ड्रॅग करू या. |
05:18 | बल्ब प्रकाशित झाल्याचे दिसेल. |
05:21 | याचे कारण म्हणजे कॉइलमधे प्रवर्तित होणारा EMF. |
05:25 | हे कॉइलच्या भोवती बदलणारे चुंबकीय क्षेत्र तयार करते. |
05:29 | आता Loops इनपुट बॉक्समधील लूपची संख्या वाढवून 3 करू. |
05:34 | नंतर Loop Area स्लाइडर 100% पर्यंत ड्रॅग करा. |
05:38 | लूपमधून चुंबक ड्रॅग करा. |
05:41 | बल्ब प्रकाशित झाल्याचे दिसेल. |
05:44 | चुंबक ड्रॅग करत असताना बल्बच्या प्रकाशाची तीव्रता बदलते. |
05:50 | असाईनमेंट म्हणून, बल्बच्या जागी व्होल्टेज मीटर लावा. |
05:55 | चुंबक जोराने हलवला असता तसेच त्याची पोलॅरिटी उलट केली असता प्रवर्तित EMF बदलांची नोंद करा. |
06:05 | आपले निरीक्षण समजावून सांगा. |
06:09 | Electromagnet टॅबवर क्लिक करा. |
06:12 | या स्क्रीनवर विद्युत चुंबकाच्या चुंबकीय रेषा आणि चुंबकसूची आहे. |
06:18 | विद्युत चुंबकात विद्युत् स्रोत म्हणून 10 v ची बॅटरी आहे. |
06:23 | या बॅटरीमध्ये व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी व्होल्टेज स्लाइडर आहे. |
06:28 | डिफॉल्टरूपात विद्युतचुंबकाला DC Current Source लावला आहे. |
06:33 | येथे DC विद्युतचुंबक स्थिर चुंबकीय क्षेत्र तयार करते. |
06:38 | Show Field Meter चेक बॉक्सवर क्लिक करा. |
06:42 | field meter कॉइलवर ठेवा. |
06:45 | बॅटरीचे व्होल्टेज हळूहळू 10 व्होल्टपासून 1 व्होल्टपर्यंत कमी करत न्या. |
06:51 | कॉइलमधील व्होल्टेजच्या बदलामुळे इलेक्ट्रॉनच्या गतीतील होणाऱ्या बदलाचे निरीक्षण करा. |
06:57 | व्होल्टेज 10 व्होल्टपासून 1 व्होल्टपर्यंत कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनच्या हालचालीची गती कमी होते. |
07:04 | चुंबकीय क्षेत्र शून्य व्होल्टेजवर दिसेनासे होते. |
07:08 | आता, कॉइल ही विद्युत चुंबक राहिलेली नाही. |
07:12 | 10 व्होल्टच्या दिशेने डावीकडे वोल्टेज स्लाइडर ड्रॅग करणे सुरू ठेवा. |
07:17 | विद्युतचुंबकाची पोलॅरिटी बदलली आहे. |
07:21 | ह्यामुळे चुंबकीय बलाच्या रेषांची दिशा बदलली आहे. |
07:25 | इलेक्ट्रॉनच्या हालचालीच्या दिशेत होणार्या बदलाकडे लक्ष द्या. |
07:29 | आता DC current source बदलून AC करा. |
07:33 | सतत उलट सुलट होणाऱ्या चुंबकीय क्षेत्र आणि चुंबकसूचीचे निरीक्षण करा. |
07:38 | AC Current Supply सोबत दोन स्लाइडर्स दिलेले आहेत. |
07:42 | तरंगांची वारंवारता बदलण्यासाठी आडवा स्लाइडर ड्रॅग करा. |
07:47 | लक्षात घ्या की चुंबकीय क्षेत्राची दिशा उलट सुलट होण्याचा दर वाढला आहे. |
07:51 | उभा स्लाइडर ड्रॅग करा आणि काय होते ते बघा. |
07:57 | असाईनमेंट म्हणून, कॉइलमधील लूपच्या संख्येत बदल करून चुंबकीय क्षेत्र (B) मधील बदलाकडे लक्ष द्या. |
08:06 | आता transformer (रोहित्र) कसे कार्य करते ते पाहूया. |
08:09 | ते उघडण्यासाठी Transformer टॅबवर क्लिक करा. |
08:13 | Transformer स्क्रीनवर, DC करंट स्त्रोत असलेला विद्युतचुंबक ही प्राथमिक कॉइल आणि Indicator असलेली Pickup Coil ही दुय्यम कॉइल आहे. |
08:23 | रोहित्रात, प्राथमिक कॉइल ही दुय्यम कॉइलमध्ये करंट प्रवर्तित करते. |
08:29 | उजव्या पॅनेलमधे Electromagnet आणि Pickup Coil बॉक्स आहेत. |
08:34 | Electromagnet बॉक्समधील Show Compass चेक बॉक्सवर क्लिक करा. |
08:39 | रोहित्रात, दोन कॉइल लोखंडी कोअरद्वारे एकत्र जोडल्या जातात. |
08:44 | तथापि, आपल्याकडे कॉइल जोडण्यासाठी लोखंडी कोअर नाही. |
08:49 | दोन्ही कॉइल्स एकमेकांना स्पर्श करतील एवढया जवळ आणा. |
08:53 | त्या स्थिर असताना फ्लक्समधे बदल होत नाही. |
08:57 | म्हणून बल्ब प्रकाशित झालेला नाही. |
09:00 | दुय्यम कॉइलमधे व्होल्टेज प्रवर्तित होण्यासाठी चुंबकीय क्षेत्र बदलते असावे लागते. |
09:05 | विद्युत चुंबकाचा व्होल्टेज स्लाइडर मागे व पुढे हलवा. |
09:10 | लक्षात घ्या, ड्रॅग करताना बल्ब प्रकाशित झाला आहे. |
09:14 | तसेच चुंबकसूचीचे विचलन आणि इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाच्या दिशेत बदल याकडे लक्ष द्या. |
09:20 | नंतर प्राथमिक कॉईल दुय्यम कॉइलच्या आत आणि बाहेर ड्रॅग करा. |
09:25 | कॉइल हलवल्यामुळे फ्लक्समधे झालेले बदल लक्षात घ्या. |
09:29 | आता बल्ब तीव्रतेने प्रकाशित झालेला आहे. |
09:32 | Electromagnet बॉक्समधून DC स्त्रोताच्या ठिकाणी AC स्त्रोत घ्या. |
09:37 | प्राथमिक कॉइलमधील AC करंट बदलत्या चुंबकीय क्षेत्राची निर्मिती करते. |
09:42 | हे बदलणारे चुंबकीय क्षेत्र दुय्यम कॉइलमध्ये व्होल्टेज प्रवर्तित करते. |
09:47 | बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे बल्बच्या व्होल्टेजमधील बदल पहा. |
09:52 | AC करंट स्त्रोत मोठा करा. |
09:56 | तरंग मोठे झाल्यामुळे बल्ब तीव्रतेने प्रकाशित होतो. |
10:01 | आडवा स्लाइडर वापरून वारंवारता वाढवा. |
10:05 | बल्बमधील वेगवान फ्लिकरिंग(लुकलुक) आणि चुंबक सूचीतील विचलन लक्षात घ्या. |
10:10 | याचे कारण म्हणजे कॉइल्सच्या व्होल्टेजमधील बदल. |
10:14 | येथे प्राथमिक कॉइलमधे 4 आणि दुय्यम कॉइलमधे 2 लूप्स (वेढे) आहेत. |
10:20 | आता दुय्यम कॉइलमधील लूप्सची संख्या वाढवून 3 करा. |
10:24 | प्राथमिक कॉइलमधील लूप्सची संख्या कमी करून 1 करा. |
10:28 | transformer वरील बल्बच्या व्होल्टेजमधे झालेल्या बदलाची नोंद घ्या. |
10:34 | असाईनमेंट म्हणून, AC Current Supply च्या वारंवारतेचा स्लाइडर 5% वर नेल्यास काय होते ते तपासा. |
10:42 | आपले निरीक्षण समजावून सांगा. |
10:46 | आता आपण जनरेटरकडे जाऊ. |
10:49 | Generator टॅब उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
10:52 | जनरेटरची ही एक सोपी आवृत्ती आहे. |
10:55 | आपल्याकडे उजव्या पॅनेलमधे बार मॅग्नेट आणि Pickup Coil बॉक्स आहेत. |
11:00 | Bar magnet बॉक्सच्या खालील, Show Field आणि Show Field Meter चेकबॉक्सेस क्लिक करा. |
11:07 | स्क्रीनवर नळ, पॅडलव्हीलवरील बार चुंबक, pickup coil, चुंबकसूची आणि Field Meter आहेत. |
11:18 | बार चुंबक डिफॉल्टरूपात 0 RPM (रेव्होल्युशन्स पर मिनिट) वर आहेत. |
11:23 | Field Meter कॉइलच्याजवळ ड्रॅग करा आणि ठेवा. |
11:27 | नळ चालू करण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा. |
11:30 | बार चुंबकावर पाणी पडायला सुरूवात होताच चुंबक फिरण्यास सुरवात झाल्याचे दिसेल. |
11:35 | चुंबक फिरत असताना, चुंबकीय बलाच्या रेषा सतत बदलत राहतात. |
11:40 | Field Meter मधील किंमतीत होणारे बदल लक्षात घ्या. |
11:44 | यामुळे कॉइलमधे प्रवर्तित EMF निर्मिती होते आणि बल्ब प्रकाशमान होतो. |
11:50 | आता चुंबक फिरण्याची गती 100 RPM पर्यंत वाढवूया. |
11:55 | नळाचा स्लाइडर हळूहळू वाढवत जास्तीत जास्त करा. |
11:59 | RPM मध्ये होणारी वाढ आणि सोबत वेगाने बदलणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे निरीक्षण करा. |
12:04 | आता व्होल्टेज वाढल्यामुळे बल्ब तीव्रतेने प्रकाशित झालेला आहे. |
12:09 | ट्युटोरियल थांबवा आणि ही असाईनमेंट करा. |
12:13 | खालील स्थितींमधे जनरेटरच्या कार्यात होणारे बदल तपासा.
1. लूपची संख्या आणि वायरच्या लूपचे क्षेत्रफळ यांच्यातील बदल. |
12:22 | 2. बार चुंबकाची शक्ती 0% पर्यंत कमी करणे. |
12:26 | थोडक्यात, |
12:28 | या पाठात Faraday's Electromagnetic Lab हे PhET सिम्युलेशन कसे वापरायचे ते बघितले. |
12:36 | हे सिम्युलेशन वापरुन, हलत्या चुंबकामुळे चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल बघितले. |
12:43 | चुंबकीय क्षेत्राच्या संदर्भात चुंबकसूचीच्या विचलनाचा अभ्यास केला. |
12:48 | व्होल्टेजमधील बदलाची प्रवर्तित EMF बरोबर तुलना केली. |
12:52 | विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे कारण स्पष्ट केले. |
12:56 | रोहित्र कसे कार्य करतो हे स्पष्ट केले. |
13:00 | जनरेटर कसे कार्य करतो ते पाहिले. |
13:03 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
13:08 | हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
13:10 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
13:19 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
13:23 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
13:36 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
13:34 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:41 | अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
13:46 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. |
13:52 | सहभागासाठी धन्यवाद. |