Health-and-Nutrition/C2/Non-vegetarian-recipes-for-6-month-old-babies/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:14, 17 October 2019 by Latapopale (Talk | contribs)
|
|
00:00 | 6 महिन्यांच्या बाळांसाठी मांसाहारी पाककृती ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलवर आपले स्वागत आहे. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - बाळांसाठी मांसाहारी पूरक अन्नाचा समावेश करण्याचे महत्त्व आणि |
00:17 | मांसाहारी पूरक आहार कसा तयार करावा जसे- |
00:22 | अंड्याची घट्ट पेस्ट |
00:24 | माश्याची घट्ट पेस्ट
कच्चे केळे आणि माश्याची घट्ट पेस्ट |
00:27 | कोंबडीच्या कलेजीची घट्ट पेस्ट आणि चिकन गाजराची घट्ट पेस्ट |
00:31 | सुरवात करूया -
नेहमीच लक्षात ठेवा की, बाळ 6 महिन्यांचे झाल्यावर बाळाची पौष्टिकतेची आवश्यकता कमालीची वाढते. |
00:42 | तिला पूरक अन्नांपासून 200 कॅलरीजपर्यंत ऊर्जेची गरज असते. |
00:48 | स्तनपानासह पूरक आहार देणे सुरू केले पाहिजे. |
00:53 | ह्या व्यतिरिक्त, हळूहळू, जसे बाळाचे वय वाढते - अन्नाचे प्रमाण आणि सुसंगतता बदलली पाहिजे. |
01:03 | कृपया लक्षात घ्या की बाळाला भरवताना, अन्नाची मात्रा कप आणि चमचा वापरून मोजली पाहिजे |
01:12 | जे ह्याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये स्पष्ट केले गेले आहे. |
01:18 | जेव्हा बाळ 6 महिने पूर्ण करते – तेव्हा सुरुवातीला 1 चमचा दिवसातून दोनदा सुरू करावे, त्यानंतर हळूहळू दिवसातून दोनदा 4 चमचे द्यावे. |
01:29 | आणि, फक्त शिजवलेले, शुद्ध स्वरूपातील अन्न दिले पाहिजे. |
01:35 | आता आपण, मांसाहारी अन्न बाळांसाठी कसे महत्त्वाचे आहेत ते पाहू. |
01:40 | सर्व मांसाहारी पदार्थ हे, चांगली चरबी, प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहेत. |
01:48 | ही पोषक तत्त्वे बाळांची योग्य वाढ आणि विकासासाठी आणि त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहेत. |
01:57 | बाळांना देण्यासाठी शिफारस केलेले अन्न आहेत – गावरान कोंबडी |
02:02 | अंडी, मांस आणि मासे. शेलफिश वगळता सर्व प्रकारचे मासे, शेलफिश मासे बाळ 1 वर्षाचे झाल्यानंतर दिले जाऊ शकतात. |
02:12 | मांसाहारी अन्नपदार्थांचा समावेश करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. |
02:18 | बाळाला प्रक्रिया केलेले मांस आणि कच्चे अन्न देऊ नका. |
02:23 | ते पूर्णपणे शिजवलेले असावे. |
02:26 | आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाळाचे अन्न शिजवताना - नेहमी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर टाळा. |
02:34 | आपण 6 महिन्यांच्या बाळाच्या मांसाहारी पूरक आहाराची आवश्यकता आणि महत्त्व ह्याची चर्चा केली आहे. |
02:43 | आता आपण हे मांसाहारी पूरक अन्न कसे बनवावे ते पाहू. |
02:48 | आपण आपल्या पहिल्या पाककृतीपासून सुरुवात करूया जी आहे अंड्याची घट्ट पेस्ट. |
02:53 | ही अंड्याची घट्ट पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला हवे आहे -
1 अंडे आणि ½ (अर्धा) चमचा तूप किंवा लोणी. |
03:01 | ते बनवण्यासाठी, अंडे घ्या आणि वाडग्यात व्यवस्थित फेटा. |
03:06 | मग, स्टीलच्या भांड्यात तूप गरम करावे.
ह्या स्टीलच्या भांड्यात फेटलेले अंडे ओता आणि मंद आचेवर हलवायला सुरवात करा. |
03:15 | त्यास त्यादरम्यान आचेवरून काढा कारण सतत शिजत असताना अंड्याची घट्ट पेस्ट जळून जाईल. |
03:21 | मिश्रण ढवळत रहा आणि ते घट्ट होईपर्यंत शिजवा. |
03:25 | आच बंद करा. आणि अंड्याची घट्ट पेस्ट तयार आहे. |
03:30 | थोडा वेळ थंड होऊ द्या आणि ती बाळाला भरवा. |
03:34 | दुसरी पाककृती आपण जी पाहणार आहोत ती आहे माश्याची घट्ट पेस्ट. |
03:37 | ह्यासाठी, आपल्याला स्थानिक उपलब्ध असलेल्या कोणत्याही माशांचे 2 तुकडे हवे आहेत -
काळे पापलेट, बोंबील, पांढरे पापलेट, आणि स्क्विड |
03:50 | स्टीलच्या भांड्यामध्ये स्वच्छ आणि धुतलेल्या माशाचे 2 तुकडे घ्या. |
03:54 | मासे बुडतील इतके पाणी घालावे. |
04:00 | आणि 3 ते 4 शिट्या होईपर्यंत ते शिजवावे. |
04:04 | थोडा वेळ ते थंड होऊ द्या त्यानंतर माशाच्या तुकडे बाहेर ताटात घ्या. |
04:10 | आता काळजीपूर्वक सर्व काटे काढून टाका. |
04:13 | हे अत्यंत महत्त्वाचे आहे की बाळाला भरवण्याआधी ह्या माशांचे काटे काढून टाकले आहेत कारण ते बाळाच्या घशात अडकू शकतात. |
04:22 | आता मिक्सरमध्ये, उकळलेल्या माश्याची घट्ट पेस्ट तयार करा आणि ती बाळाला भरवा. |
04:28 | तिसरी पाककृती आहे कच्चे केळे आणि माश्याची पेस्ट. |
04:32 | ते बनवण्यासाठी करण्यासाठी आपल्याला हवे आहेत 2 चमचे कच्च्या केळीची पावडर,
बोंबील किंवा स्थानिक माश्याचे 4 लहान तुकडे. |
04:41 | प्रथम आपण कच्च्या केळ्याची पावडर बनवण्यापासून सुरवात करू. |
04:46 | आपल्या भागात स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रकारची 2 कच्ची केळी घ्या. |
04:51 | सोलणे वापरून त्यांची साल काढा. आता ह्या केळ्यांचे पातळ काप कापून घ्यावेत. |
04:58 | हे काप सावलीत 1 ते 2 दिवस ते कुरकुरीत होईपर्यंत वाळवा. |
05:05 | नंतर मिक्सरमध्ये ह्या वाळलेल्या कच्च्या केळ्याच्या कापांची पावडर बनवा. |
05:10 | ही पूड चाळा आणि बिया काढून टाका. |
05:13 | कच्चा केळीची पावडर वापरण्यासाठी तयार आहे. |
05:17 | पुढे, माश्याची घट्ट पेस्ट बनविण्यासाठी - मागील पाककृतीमध्ये नमूद केलेल्या सूचनांचे अनुसरण करा. |
05:24 | त्यानंतर, वाडग्यात 2 चमचे कच्च्या केळ्याची पावडर घ्या. |
05:29 | 3 चमचे पाणी घाला आणि व्यवस्थित एकत्र करा जेणेकरून त्यात गुठळ्या होणार नाही. |
05:35 | आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला. |
05:38 | आता 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर हे मिश्रण शिजवावे. |
05:43 | त्यानंतर, त्यात शिजवलेली माश्याची घट्ट पेस्ट घाला. |
05:47 | मिश्रण हलवत रहा आणि पुढील 4-5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. |
05:53 | कच्चे केळे आणि माश्याची घट्ट पेस्ट तयार आहे. थोडा वेळ थंड होऊ द्या आणि नंतर ती बाळाला भरवा. |
06:01 | आता आपण चौथ्या पाककृतीकडे आलो आहोत - कोंबडीच्या कलेजीचा घट्ट रस्सा |
06:06 | ही बनवण्यासाठी आपल्याला हवे आहे 1 कोंबडीची कलेजी. |
06:09 | प्रक्रिया : स्टीलच्या भांड्यात धुतलेल्या कोंबडीची कलेजी घेऊन तयारी सुरू करा. |
06:15 | ते पूर्ण बुडेपर्यंत पाणी घाला. |
06:18 | आता हे स्टीलचे भांडे प्रेशर कुकरमध्ये ठेवा. |
06:21 | 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे. |
06:25 | थंड झाल्यावर ते ताटात काढा. |
06:29 | मिक्सर वापरून उकडलेल्या कोंबडीच्या कलेजीचा घट्ट रस्सा बनवा आणि ते बाळाला द्या. |
06:37 | आता आपण पाहणार आहोत पाचवी पाककृती – चिकन गाजराची घट्ट पेस्ट . |
06:43 | आपल्याला हवे आहेत : कोंबडीच्या छातीचे मांसाचे 4-5 लहान तुकडे किंवा हाडे नसलेले कोंबडीचे मांस आणि 1 गाजर. |
06:50 | स्टीलच्या भांड्यात धुतलेल्या कोंबडीच्या मांसाचे तुकडे घेऊन तयारीची सुरवात करू.
मग ते बुडतील इतके पाणी ओता. |
07:00 | आता, हे स्टीलचे भांडे एका प्रेशर कुकरमध्ये ठेवा आणि ते 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. |
07:07 | थोडा वेळ थंड होऊ द्या. आणि नंतर एका ताटात कोंबडीच्या मांसाचे तुकडे काढून घ्या आणि थंड होऊ द्या. |
07:15 | नंतर, 10 मिनिटे गाजर वाफवून घ्या आणि थंड होऊ द्या. |
07:20 | मिक्सरने उकडलेल्या कोंबडीच्या मांसाचे तुकडे आणि वाफवलेले गाजर एकत्र करून त्याचा घट्ट पेस्ट तयार करा. |
07:26 | ह्या पाककृतींच्या पोषक घटकांकडे येत असताना - लक्षात घ्या की, ह्या सर्व पाककृती
प्रथिने(प्रोटीन), |
07:36 | डीएचए आणि ईपीए जे आहेत ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, |
07:42 | कोलिन |
07:45 | जीवनसत्त्व अ, |
07:49 | जीवनसत्त्व ड, |
07:52 | जीवनसत्त्व ब 3, |
07:57 | जीवनसत्त्व ब 6, |
08:01 | फोलेट, |
08:04 | जीवनसत्त्व ब 12, |
08:08 | झिंक, |
08:11 | मॅग्नेशियम, |
08:14 | लोह, |
08:18 | फॉस्फरस, |
08:21 | कॉपर आणि सेलेनियम ह्यांनी समृद्ध आहेत. |
08:28 | ही पोषक तत्त्वे, मांसाहारी अन्न स्रोतांमध्ये सहज उपलब्ध आहेत. |
08:33 | म्हणून ते बाळांची वाढ, विकास आणि प्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात. |
08:40 | ह्यासह 6 महिन्यांच्या बाळांसाठी मांसाहारी पाककृती ह्यावरील ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आलो आहोत,
सहभागासाठी धन्यवाद. |