Moodle-Learning-Management-System/C2/Question-bank-in-Moodle/Marathi
Time | Narration |
00:01 | Moodle मधील Question bank वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : Moodle मधील Question bank बद्दल |
00:12 | questions चे Categories आणि question bank ला प्रश्न कसे जोडायचे. |
00:19 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:
Ubuntu Linux OS 16.04 |
00:26 | XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP |
00:34 | Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:44 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे, कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात. |
00:52 | हे ट्युटोरिअल गृहीत धरते की आपल्या site administrator ने तुमची teacher म्हणून नोंदणी केली आहे.
आणि आपल्याला किमान एक कोर्स असाईन केला आहे. |
01:03 | असेही मानले जाते की, आपण आपल्या कोर्ससाठी काही कोर्स सामग्री अपलोड केली आहे. |
01:09 | नसल्यास, कृपया हया वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:16 | ब्राऊझरवर जा आणि आपल्या Moodle site वर teacher म्हणून लॉगिन करा. |
01:24 | मी Code files लिंकमध्ये, ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरलेल्या सर्व टेक्स्टसह टेक्स्ट फाईल प्रदान केली आहे.
कृपया “Mytextfile.txt” नावाची फाईल डाऊनलोड करा आणि तुमच्या मशीनवर उघडा. |
01:40 | डाव्या 'navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा. |
01:45 | आपण Question banks बद्दल जाणून घेत सुरवात करू. |
01:49 | Question bank हा प्रश्नांचा संग्रह आहे, जो मुख्यतः विषयांद्वारे आयोजित केला जातो. |
01:55 | Question bank मधील प्रश्न एकाहून अधिक quizzes मध्ये पुन्हा वापरले जाऊ शकतात. |
02:01 | हे प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी किंवा वेगवेगळ्या बॅचेससाठी वेगळे quizzes तयार करण्यात मदत करते. |
02:09 | ब्राऊझरवर परत जा. |
02:11 | वरील उजव्या बाजूला gear icon वर क्लिक करा आणि नंतर शेवटी More… वर क्लिक करा. |
02:18 | आपण Course Administration पृष्ठावर आलो आहोत. |
02:22 | खाली स्क्रोल करा आणि Question bank नावाचा सेक्शन शोधा. |
02:27 | ह्या सेक्शनमधील Categories वर क्लिक करा. |
02:30 | Add category सेक्शन पहा. |
02:34 | Parent category ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. |
02:37 | ह्या कोर्ससाठी Top ही उच्च पातळीची कॅटेगरी आहे. |
02:42 | Default for Calculus, निवडा, जर तो डीफॉल्टनुसार आधीच निवडलेला नसेल तर. |
02:49 | Name फिल्डमध्ये टाईप करा Basic Calculus. |
02:54 | त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Add Category बटणावर क्लिक करा.
तशाच प्रकारे, आपण अधिक categories जोडू शकता. |
03:04 | Calculus course, साठी categories ची श्रेणीबद्धता तयार करा, जसे मी येथे केले आहे. |
03:11 | Questions टॅबवर क्लिक करून क्वेश्चन्स क्रिएशन पृष्ठावर जा. |
03:17 | तळाशी Create a new question बटणावर क्लिक करा. |
03:22 | एक पॉप-अप विंडो उघडते. |
03:25 | आपण जोडू इच्छित असलेल्या प्रश्नाचे type निवडा. |
03:29 | question type बद्दल विस्तृत तपशील उजव्या बाजूला दिसत आहे. |
03:35 | मी Multiple choice निवडेन. |
03:39 | पॉप-अपच्या तळाशी Add बटणावर क्लिक करा. |
03:43 | आता, category निवडा ज्यासाठी आपण प्रश्न जोडू इच्छिता.
मी Evolutes निवडेन. |
03:51 | Question name फिल्डमध्ये टाईप करा MCQ with single correct answer. |
03:57 | Question text एरिआमध्ये खालील प्रश्न टाईप करा.
आपण Mytextfile.txt फाईलमधून टेक्स्ट कॉपी-पेस्ट करू शकता. |
04:07 | Default Mark 1 ला सेट केले आहे आणि मी त्यास 1 म्हणून राहून देईन. |
04:12 | पुढील पर्याय आहे General feedback. त्याने/तिने क्विझ सबमिट केल्यानंतर येथे विद्यार्थ्याला टेक्स्ट दर्शविला आहे. |
04:23 | हे प्रश्नाचे विस्तृत निराकरण दर्शविण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
जसे मी येथे केले तसे टेक्स्ट टाईप किंवा कॉपी-पेस्ट करा. |
04:34 | आता One or multiple answers ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. |
04:39 | येथे आपण 2 पर्याय पाहतो- Multiple answers allowed
One answer only |
04:46 | दोन्ही पर्याय कसे कार्य करतात ते मी दाखवेन. |
04:49 | मी प्रथम निवडते One answer only. |
04:53 | Shuffle the choices चेकबॉक्स डिफॉल्टनुसार चेक केला आहे.
हे सुनिश्चित करते की, प्रश्नातील उत्तराची निवड प्रत्येक quiz attempt शफल केले आहेत. |
05:06 | Answers सेक्शन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
05:10 | लक्षात घ्या की, येथे प्रत्येक पर्याय grade आणि feedback शी संबंधित आहे. |
05:17 | येथे दर्शविल्याप्रमाणे Choice 1 टाईप करा. |
05:20 | आता ह्या प्रश्नासाठी, Choice 1 हे अचूक उत्तर आहे. |
05:25 | म्हणून मी Grade मध्ये 100% निवडेन. |
05:30 | Grade ड्रॉपडाऊनमध्ये, आपण प्रत्येक choice साठी आंशिक गुण किंवा नकारात्मक गुणदेखील देऊ शकतो. |
05:38 | जेव्हा तुम्ही Moodle शी अधिक कुशल असाल तेव्हा आपण हे नंतर अन्वेषण करू शकता. |
05:43 | हे उत्तर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा अभिप्राय, Feedback टेक्स्ट एरिआमध्ये लिहिला जाऊ शकतो.
मी टाईप करेन “Correct”. |
05:53 | जसे मी येथे केले त्याप्रमाणे बाकीचे choices आणि grades भरा. |
06:01 | आता खाली स्क्रोल करा आणि विस्तृत करण्यासाठी Multiple Tries सेक्शनवर क्लिक करा. |
06:08 | येथे लक्ष द्या - Penalty for each incorrect try फिल्ड डीफॉल्टपणे, 33.33% ला सेट केले आहे. |
06:18 | ह्याचा अर्थ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांना दंड आकारला जाईल. |
06:24 | तुम्ही ते आहे तसेच ठेवू शकता किंवा येथे दर्शविल्याप्रमाणे ते इतर कोणत्याही टक्केवारी पर्यायांमध्ये बदलू शकता. |
06:31 | मी माझ्या विद्यार्थ्यांना चुकीच्या उत्तरासाठी दंडित करू इच्छित नाही, म्हणून मी 0% निवडेन. |
06:39 | मग खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Save changes बटणावर क्लिक करा. |
06:46 | आपण पाहू शकतो की आपला प्रश्न Question Bank ला जोडला गेला आहे. |
06:51 | लक्षात घ्या की, प्रश्नाच्या प्रश्न शीर्षका पुढे 4 आयकॉन्स आहेत. |
06:57 | हे प्रश्न edit, duplicate, preview आणि delete साठी आहेत. |
07:06 | quiz मधील प्रश्न कसा दिसेल हे पाहण्यासाठी Preview आयकॉनवर क्लिक करा. |
07:13 | निवडलेला प्रश्न आणि त्याचे पर्याय एका पॉप-अप विंडोमध्ये उघडतात. |
07:19 | Fill in correct responses बटणावर क्लिक करा.
हे आपल्याला प्रश्न, निवड आणि योग्य उत्तर सत्यापित करण्यास मदत करते. |
07:29 | Submit and finish बटणावर क्लिक करा. |
07:32 | प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर हे विद्यार्थ्याने दिलेले अभिप्राय दर्शवेल. |
07:38 | जेव्हाही आपण एक नवीन प्रश्न जोडता तेव्हा प्रत्येकवेळी क्रॉस चेकसाठी नेहमीच त्याचे पूर्वावलोकन करा. |
07:44 | हा पॉप-अप विंडो बंद करण्यास Close preview बटणावर क्लिक करा. |
07:49 | आता MCQ तयार करू या ज्यामध्ये एकापेक्षा अधिक बरोबर उत्तर आहे. |
07:54 | आधीच्या पायऱ्यांचे अनुसरण करत, मी आणखी एक MCQ तयार केला आहे.
कृपया तसेच करा. |
08:01 | One or multiple answers ड्रॉपडाऊनमध्ये, ह्यावेळी मी निवडेन Multiple answers allowed. |
08:10 | दर्शविल्याप्रमाणे, choices 1 आणि 2 आणि त्यांचे संबंधित grades प्रविष्ट करा.
येथे मी दोन्हीसाठी 50% grade निवडले आहे. |
08:20 | ज्या विद्यार्थ्याला फक्त 1 योग्य उत्तर मार्क करतो त्याला 0.5 marks मिळते. |
08:26 | आणि ज्या विद्यार्थ्याला दोन्ही योग्य उत्तरे मार्क करतो त्याला 1 mark मिळतो. |
08:32 | दर्शविल्याप्रमाणे choices 3 आणि 4 आणि त्यांचे संबंधित grades प्रविष्ट करा. |
08:38 | आणि मी Penalty for each incorrect try फिल्ड 0% म्हणून ठेवेन. |
08:44 | मग खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा. |
08:49 | पुढे, Short answer प्रश्न जोडू. |
08:53 | प्रश्नाचे उत्तर म्हणून विद्यार्थ्याने शब्द किंवा वाक्यांश टाईप करणे अपेक्षित आहे. |
09:00 | Create a new question बटणावर क्लिक करा आणि Short answer पर्यायावर डबल क्लिक करा. |
09:08 | दर्शविल्याप्रमाणे प्रश्न तयार करा. |
09:11 | Case sensitivity ड्रॉपडाऊनमध्ये No, case is unimportant. निवडा. |
09:18 | ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर म्हणजे “same logarithmic spiral” |
09:24 | मी पूर्ण गुण देईन जर एखाद्या विद्यार्थ्याचे उत्तर एकतर
“same spiral” असेल किंवा “same logarithmic spiral” असेल |
09:35 | तथापि, जर विद्यार्थी उत्तर म्हणून “logarithmic spiral” लिहितो, तर मी अर्धा गुण देईन. |
09:43 | आन्सर्स सेक्शनमध्ये खाली स्क्रोल करा. |
09:46 | दर्शविल्याप्रमाणे Answer 1 आणि 2 आणि त्यांचे संबंधित grades भरा. |
09:52 | Answer 1 टेक्स्टमधील asterix लक्षात घ्या.
Asterix कोणताही अक्षर जुळविण्यासाठी wildcard म्हणून वापरले जाऊ शकते. |
10:02 | म्हणून उदाहरणार्थ : एक विद्यार्थी लिहितो The evolute of a logarithmic spiral is the same logarithmic spiral.
ह्या उत्तराला पूर्ण गुण देण्यात येईल. |
10:15 | दर्शविल्याप्रमाणे, Answer 3 आणि त्याचे संबंधित grades भरा. |
10:20 | लक्षात घ्या की उत्तराच्या टेक्स्टआधी asterixनाही. |
10:24 | म्हणून उदाहरणार्थ : एक विद्यार्थी लिहितो The evolute of a logarithmic spiral is not the same logarithmic spiral.
ह्या उत्तराला कोणतेही गुण दिले जाणार नाहीत. |
10:37 | दर्शविल्याप्रमाणे, Answer 4 आणि त्याचे संबंधित grades भरा. |
10:43 | लक्षात घ्या की मी ह्या उत्तराला फक्त 50% गुण दिले आहेत. |
10:48 | फिडबॅक टेक्स्ट एरियामध्ये, टाईप करा “You need to specify that it’s the same spiral and not any spiral.” |
10:57 | हे स्पष्टीकरण विद्यार्थ्याला अभिप्राय म्हणून दर्शविले जाईल. |
11:02 | पुन्हा एकदा, मी Penalty for each incorrect try फिल्ड 0% म्हणून ठेवेन. |
11:09 | मग खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा. |
11:14 | आता Numerical प्रश्न जोडू. |
11:18 | Create a new question बटणावर क्लिक करा आणि Numerical पर्यायावर डबल क्लिक करा. |
11:26 | दर्शविल्याप्रमाणे प्रश्न तयार करा. |
11:29 | ह्या प्रश्नाचे उत्तर 5mm आहे.
तथापि, विद्यार्थ्याने 4.5mm आणि 5.5mm दरम्यान कोणतेही उत्तर दिल्यास मला चालेल. |
11:41 | येथे एरर मार्जिन 0.5 आहे. |
11:45 | Answers सेक्शनवर खाली स्क्रोल करा. |
11:48 | दर्शविल्याप्रमाणे Answers, Error आणि grades प्रविष्ट करा. |
11:53 | Unit handling सेक्शन विस्तृत करा.
Unit handling ड्रॉपडाऊनमध्ये 3 पर्याय आहेत. |
12:00 | मी पर्याय निवडेन - The unit must be given, and will be graded. |
12:07 | Unit penalty field डिफॉल्टपणे 0.1 दर्शवते.
मी ते 0.5 करेन. |
12:16 | तर unit चा उल्लेख न करता त्यांनी उत्तर लिहिल्यास विद्यार्थ्याला अर्धा गुण मिळेल. |
12:23 | Units are input using ड्रॉपडाऊनमध्ये, मी the text input element पर्याय निवडेन. |
12:31 | ह्याचा अर्थ विद्यार्थ्याने उत्तरासह unit टाईप करणे आवश्यक आहे. |
12:37 | Units सेक्शन विस्तृत करा. |
12:40 | युनिट म्हणून mm लिहा आणि गुणक 1 आहे. ह्याचा अर्थ उत्तराची निवड mm मध्ये आहे. |
12:50 | पुन्हा एकदा, मी Penalty for each incorrect try फिल्ड 0% म्हणून ठेवेन. |
12:57 | आणि मग खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा. |
13:02 | ह्या सह आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
13:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलोत : Moodle मधील Question bank बद्दल |
13:14 | questions चे Categories आणि question bank ला प्रश्न कसे जोडायचे. |
13:22 | येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे : question bank. मध्ये अधिक प्रश्न जोडा. |
13:28 | अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या. |
13:34 | हे ट्युटोरिअल थांबवा आणि पूर्ण झाल्यावर पुन्हा सुरू करा. |
13:38 | ह्या क्वेश्चन बँकेमध्ये आपल्याकडे 10 प्रश्न असले पाहिजेत.
त्यापैकी 6 Evolutes मध्ये आहेत आणि 4 Involutes subcategory मध्ये. |
13:51 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा. |
14:00 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
14:10 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
14:14 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
14:27 | आय.आय.टी. बॉम्बेतर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |