Moodle-Learning-Management-System/C2/Question-bank-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Moodle मधील Question bank वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : Moodle मधील Question bank बद्दल
00:12 questions चे Categories आणि question bank ला प्रश्न कसे जोडायचे.
00:19 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:

Ubuntu Linux OS 16.04

00:26 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
00:34 Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. 
00:44 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे, कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात.
00:52 हे ट्युटोरिअल गृहीत धरते की आपल्या site administrator ने तुमची teacher म्हणून नोंदणी केली आहे.

आणि आपल्याला किमान एक कोर्स असाईन केला आहे.

01:03 असेही मानले जाते की, आपण आपल्या कोर्ससाठी काही कोर्स सामग्री अपलोड केली आहे.
01:09 नसल्यास, कृपया हया वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.
01:16 ब्राऊझरवर जा आणि आपल्या Moodle site वर teacher म्हणून लॉगिन करा.
01:24 मी Code files लिंकमध्ये, ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरलेल्या सर्व टेक्स्टसह टेक्स्ट फाईल प्रदान केली आहे.

कृपया “Mytextfile.txt” नावाची फाईल डाऊनलोड करा आणि तुमच्या मशीनवर उघडा.

01:40 डाव्या 'navigation menu मध्ये Calculus course वर क्लिक करा.
01:45 आपण Question banks बद्दल जाणून घेत सुरवात करू.
01:49 Question bank हा प्रश्नांचा संग्रह आहे, जो मुख्यतः विषयांद्वारे आयोजित केला जातो.
01:55 Question bank मधील प्रश्न एकाहून अधिक quizzes मध्ये पुन्हा वापरले जाऊ शकतात.
02:01 हे प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी किंवा वेगवेगळ्या बॅचेससाठी वेगळे quizzes तयार करण्यात मदत करते.
02:09 ब्राऊझरवर परत जा.
02:11 वरील उजव्या बाजूला gear icon वर क्लिक करा आणि नंतर शेवटी More… वर क्लिक करा.
02:18 आपण Course Administration पृष्ठावर आलो आहोत.
02:22 खाली स्क्रोल करा आणि Question bank नावाचा सेक्शन शोधा.
02:27 ह्या सेक्शनमधील Categories वर क्लिक करा.
02:30 Add category सेक्शन पहा.
02:34 Parent category ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
02:37 ह्या कोर्ससाठी Top ही उच्च पातळीची कॅटेगरी आहे.
02:42 Default for Calculus, निवडा, जर तो डीफॉल्टनुसार आधीच निवडलेला नसेल तर.
02:49 Name फिल्डमध्ये टाईप करा Basic Calculus.
02:54 त्यानंतर पृष्ठाच्या तळाशी Add Category बटणावर क्लिक करा.

तशाच प्रकारे, आपण अधिक categories जोडू शकता.

03:04 Calculus course, साठी categories ची श्रेणीबद्धता तयार करा, जसे मी येथे केले आहे.
03:11 Questions टॅबवर क्लिक करून क्वेश्चन्स क्रिएशन पृष्ठावर जा.
03:17 तळाशी Create a new question बटणावर क्लिक करा.
03:22 एक पॉप-अप विंडो उघडते.
03:25 आपण जोडू इच्छित असलेल्या प्रश्नाचे type निवडा.
03:29 question type बद्दल विस्तृत तपशील उजव्या बाजूला दिसत आहे.
03:35 मी Multiple choice निवडेन.
03:39 पॉप-अपच्या तळाशी Add बटणावर क्लिक करा.
03:43 आता, category निवडा ज्यासाठी आपण प्रश्न जोडू इच्छिता.

मी Evolutes निवडेन.

03:51 Question name फिल्डमध्ये टाईप करा MCQ with single correct answer.
03:57 Question text एरिआमध्ये खालील प्रश्न टाईप करा.

आपण Mytextfile.txt फाईलमधून टेक्स्ट कॉपी-पेस्ट करू शकता.

04:07 Default Mark 1 ला सेट केले आहे आणि मी त्यास 1 म्हणून राहून देईन.
04:12 पुढील पर्याय आहे General feedback. त्याने/तिने क्विझ सबमिट केल्यानंतर येथे विद्यार्थ्याला टेक्स्ट दर्शविला आहे.
04:23 हे प्रश्नाचे विस्तृत निराकरण दर्शविण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.

जसे मी येथे केले तसे टेक्स्ट टाईप किंवा कॉपी-पेस्ट करा.

04:34 आता One or multiple answers ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
04:39 येथे आपण 2 पर्याय पाहतो- Multiple answers allowed

One answer only

04:46 दोन्ही पर्याय कसे कार्य करतात ते मी दाखवेन.
04:49 मी प्रथम निवडते One answer only.
04:53 Shuffle the choices चेकबॉक्स डिफॉल्टनुसार चेक केला आहे.

हे सुनिश्चित करते की, प्रश्नातील उत्तराची निवड प्रत्येक quiz attempt शफल केले आहेत.

05:06 Answers सेक्शन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
05:10 लक्षात घ्या की, येथे प्रत्येक पर्याय grade आणि feedback शी संबंधित आहे.
05:17 येथे दर्शविल्याप्रमाणे Choice 1 टाईप करा.
05:20 आता ह्या प्रश्नासाठी, Choice 1 हे अचूक उत्तर आहे.
05:25 म्हणून मी Grade मध्ये 100% निवडेन.
05:30 Grade ड्रॉपडाऊनमध्ये, आपण प्रत्येक choice साठी आंशिक गुण किंवा नकारात्मक गुणदेखील देऊ शकतो.
05:38 जेव्हा तुम्ही Moodle शी अधिक कुशल असाल तेव्हा आपण हे नंतर अन्वेषण करू शकता.
05:43 हे उत्तर निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा अभिप्राय, Feedback टेक्स्ट एरिआमध्ये लिहिला जाऊ शकतो.

मी टाईप करेन “Correct”.

05:53 जसे मी येथे केले त्याप्रमाणे बाकीचे choices आणि grades भरा.
06:01 आता खाली स्क्रोल करा आणि विस्तृत करण्यासाठी Multiple Tries सेक्शनवर क्लिक करा.
06:08 येथे लक्ष द्या - Penalty for each incorrect try फिल्ड डीफॉल्टपणे, 33.33% ला सेट केले आहे.
06:18 ह्याचा अर्थ प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी विद्यार्थ्यांना दंड आकारला जाईल.
06:24 तुम्ही ते आहे तसेच ठेवू शकता किंवा येथे दर्शविल्याप्रमाणे ते इतर कोणत्याही टक्केवारी पर्यायांमध्ये बदलू शकता.
06:31 मी माझ्या विद्यार्थ्यांना चुकीच्या उत्तरासाठी दंडित करू इच्छित नाही, म्हणून मी 0% निवडेन.
06:39 मग खाली स्क्रोल करा आणि पृष्ठाच्या तळाशी Save changes बटणावर क्लिक करा.
06:46 आपण पाहू शकतो की आपला प्रश्न Question Bank ला जोडला गेला आहे.
06:51 लक्षात घ्या की, प्रश्नाच्या प्रश्न शीर्षका पुढे 4 आयकॉन्स आहेत.
06:57 हे प्रश्न edit, duplicate, preview आणि delete साठी आहेत.
07:06 quiz मधील प्रश्न कसा दिसेल हे पाहण्यासाठी Preview आयकॉनवर क्लिक करा.
07:13 निवडलेला प्रश्न आणि त्याचे पर्याय एका पॉप-अप विंडोमध्ये उघडतात.
07:19 Fill in correct responses बटणावर क्लिक करा.

हे आपल्याला प्रश्न, निवड आणि योग्य उत्तर सत्यापित करण्यास मदत करते.

07:29 Submit and finish बटणावर क्लिक करा.
07:32 प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर हे विद्यार्थ्याने दिलेले अभिप्राय दर्शवेल.
07:38 जेव्हाही आपण एक नवीन प्रश्न जोडता तेव्हा प्रत्येकवेळी क्रॉस चेकसाठी नेहमीच त्याचे पूर्वावलोकन करा.
07:44 हा पॉप-अप विंडो बंद करण्यास Close preview बटणावर क्लिक करा.
07:49 आता MCQ तयार करू या ज्यामध्ये एकापेक्षा अधिक बरोबर उत्तर आहे.
07:54 आधीच्या पायऱ्यांचे अनुसरण करत, मी आणखी एक MCQ तयार केला आहे.

कृपया तसेच करा.

08:01 One or multiple answers ड्रॉपडाऊनमध्ये, ह्यावेळी मी निवडेन Multiple answers allowed.
08:10 दर्शविल्याप्रमाणे, choices 1 आणि 2 आणि त्यांचे संबंधित grades प्रविष्ट करा.

येथे मी दोन्हीसाठी 50% grade निवडले आहे.

08:20 ज्या विद्यार्थ्याला फक्त 1 योग्य उत्तर मार्क करतो त्याला 0.5 marks मिळते.
08:26 आणि ज्या विद्यार्थ्याला दोन्ही योग्य उत्तरे मार्क करतो त्याला 1 mark मिळतो.
08:32 दर्शविल्याप्रमाणे choices 3 आणि 4 आणि त्यांचे संबंधित grades प्रविष्ट करा.
08:38 आणि मी Penalty for each incorrect try फिल्ड 0% म्हणून ठेवेन.
08:44 मग खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा.
08:49 पुढे, Short answer प्रश्न जोडू.
08:53 प्रश्नाचे उत्तर म्हणून विद्यार्थ्याने शब्द किंवा वाक्यांश टाईप करणे अपेक्षित आहे.
09:00 Create a new question बटणावर क्लिक करा आणि Short answer पर्यायावर डबल क्लिक करा.
09:08 दर्शविल्याप्रमाणे प्रश्न तयार करा.
09:11 Case sensitivity ड्रॉपडाऊनमध्ये No, case is unimportant. निवडा.
09:18 ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर म्हणजे “same logarithmic spiral”
09:24 मी पूर्ण गुण देईन जर एखाद्या विद्यार्थ्याचे उत्तर एकतर

“same spiral” असेल किंवा “same logarithmic spiral” असेल

09:35 तथापि, जर विद्यार्थी उत्तर म्हणून “logarithmic spiral” लिहितो, तर मी अर्धा गुण देईन.
09:43 आन्सर्स सेक्शनमध्ये खाली स्क्रोल करा.
09:46 दर्शविल्याप्रमाणे Answer 1 आणि 2 आणि त्यांचे संबंधित grades भरा.
09:52 Answer 1 टेक्स्टमधील asterix लक्षात घ्या.

Asterix कोणताही अक्षर जुळविण्यासाठी wildcard म्हणून वापरले जाऊ शकते.

10:02 म्हणून उदाहरणार्थ : एक विद्यार्थी लिहितो The evolute of a logarithmic spiral is the same logarithmic spiral.

ह्या उत्तराला पूर्ण गुण देण्यात येईल.

10:15 दर्शविल्याप्रमाणे, Answer 3 आणि त्याचे संबंधित grades भरा.
10:20 लक्षात घ्या की उत्तराच्या टेक्स्टआधी asterixनाही.
10:24 म्हणून उदाहरणार्थ : एक विद्यार्थी लिहितो The evolute of a logarithmic spiral is not the same logarithmic spiral.

ह्या उत्तराला कोणतेही गुण दिले जाणार नाहीत.

10:37 दर्शविल्याप्रमाणे, Answer 4 आणि त्याचे संबंधित grades भरा.
10:43 लक्षात घ्या की मी ह्या उत्तराला फक्त 50% गुण दिले आहेत.
10:48 फिडबॅक टेक्स्ट एरियामध्ये, टाईप करा “You need to specify that it’s the same spiral and not any spiral.”
10:57 हे स्पष्टीकरण विद्यार्थ्याला अभिप्राय म्हणून दर्शविले जाईल.
11:02 पुन्हा एकदा, मी Penalty for each incorrect try फिल्ड 0% म्हणून ठेवेन.
11:09 मग खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा.
11:14 आता Numerical प्रश्न जोडू.
11:18 Create a new question बटणावर क्लिक करा आणि Numerical पर्यायावर डबल क्लिक करा.
11:26 दर्शविल्याप्रमाणे प्रश्न तयार करा.
11:29 ह्या प्रश्नाचे उत्तर 5mm आहे.

तथापि, विद्यार्थ्याने 4.5mm आणि 5.5mm दरम्यान कोणतेही उत्तर दिल्यास मला चालेल.

11:41 येथे एरर मार्जिन 0.5 आहे.
11:45 Answers सेक्शनवर खाली स्क्रोल करा.
11:48 दर्शविल्याप्रमाणे Answers, Error आणि grades प्रविष्ट करा.
11:53 Unit handling सेक्शन विस्तृत करा.

Unit handling ड्रॉपडाऊनमध्ये 3 पर्याय आहेत.

12:00 मी पर्याय निवडेन - The unit must be given, and will be graded.
12:07 Unit penalty field डिफॉल्टपणे 0.1 दर्शवते.

मी ते 0.5 करेन.

12:16 तर unit चा उल्लेख न करता त्यांनी उत्तर लिहिल्यास विद्यार्थ्याला अर्धा गुण मिळेल.
12:23 Units are input using ड्रॉपडाऊनमध्ये, मी the text input element पर्याय निवडेन.
12:31 ह्याचा अर्थ विद्यार्थ्याने उत्तरासह unit टाईप करणे आवश्यक आहे.
12:37 Units सेक्शन विस्तृत करा.
12:40 युनिट म्हणून mm लिहा आणि गुणक 1 आहे. ह्याचा अर्थ उत्तराची निवड mm मध्ये आहे.
12:50 पुन्हा एकदा, मी Penalty for each incorrect try फिल्ड 0% म्हणून ठेवेन.
12:57 आणि मग खाली स्क्रोल करा आणि Save changes बटणावर क्लिक करा.
13:02 ह्या सह आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
13:08 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलोत : Moodle मधील Question bank बद्दल
13:14 questions चे Categories आणि question bank ला प्रश्न कसे जोडायचे.
13:22 येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे : question bank. मध्ये अधिक प्रश्न जोडा.
13:28 अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या.
13:34 हे ट्युटोरिअल थांबवा आणि पूर्ण झाल्यावर पुन्हा सुरू करा.
13:38 ह्या क्वेश्चन बँकेमध्ये आपल्याकडे 10 प्रश्न असले पाहिजेत.

त्यापैकी 6 Evolutes मध्ये आहेत आणि 4 Involutes subcategory मध्ये.

13:51 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करा आणि पहा.
14:00 Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
14:10 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
14:14 Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
14:27 आय.आय.टी. बॉम्बेतर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana