Moodle-Learning-Management-System/C2/Course-Administration-in-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:51, 27 March 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Moodle मध्ये Course Administration वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Moodle मध्ये Course Administration

course मध्ये Activities आणि Resources

00:17 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे: Ubuntu Linux OS 16.04
00:24 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
00:33 Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर
00:40 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.

तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.

00:52 हे ट्युटोरिअल गृहीत धरते कि तुमच्या site administrator ने Moodle website सेटअप केली आहे आणि तुम्हाला teacher म्हणून रजिस्टर्ड केली आहे.
01:03 या ट्युटोरियलच्या शिकणाऱ्यांकडे Moodle वर teacher login असावा.
01:09 कमीतकमी एक course त्यांना administrator द्वारे असाइन करणे आवश्यक आहे.

काही कोर्स सामग्री त्यांच्या संबंधित course साठी अपलोड केली आहे.

01:19 नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.
01:26 ब्राउजर वर जा आणि तुमचे moodle site उघडा.
01:31 तुमच्या teacher username आणि password तपशिलासह लॉगिन करा.

मी आधीच teacher Rebecca Raymond म्हणून लॉगिन आहे.

01:41 आपण teacher’s dashboard मध्ये आहोत.
01:44 डावीकडे navigation menu मध्ये लक्षात ठेवा My Courses अंतर्गत Calculus.
01:51 कृपया लक्षात ठेवा. teacher किंवा student म्हणून तुम्ही एन्रॉल केलेले सर्व courses येथे सूचीबद्ध केले जातील.
01:59 Calculus course वर क्लिक करा.
02:02 आपण मागील ट्यूटोरियलमध्ये course topics आणि summaries अपडेट केले होते.
02:09 तुम्ही असे न केल्यास, कृपया मागील ट्यूटोरियलच्या असाइनमेंटचा संदर्भ घ्या.
02:16 आता आपण काही उपयुक्त course सेटिंग्ज बद्दल जाणून घेऊ.
02:21 section च्या वरती उजवीकडे gear icon वर क्लिक करा.
02:26 Edit Settings वर क्लिक करा. त्यानंतर सर्व sections ना विस्तृत करण्यासाठी उजवीकडे Expand All वर क्लिक करा.
02:36 येथे दिलेले सेटिंगadministrator द्वारे परिभाषित केले गेले होते, जेव्हा हा course तयार झाला होता.
02:44 General section मध्ये आपल्याकडे Course full name आहे

हे नाव course page च्या वरती प्रदर्शित केलेले आहे.

02:54 Course short name हे नाव course navigation आणि course- संबंधित emails मध्ये प्रदर्शित केलेले आहे.
03:03 Course category हे admin द्वारे आधीच सेट करण्यात आली आहे.
03:08 आपण आपल्या गरजांनुसार Course start date, Course end date आणि Course ID number बदलू शकतो.
03:21 Description section मध्ये Course Summary टेक्सटबॉक्स पहा.

मी अस्तित्वात असलेले कॉन्टेन्ट डिलीट करेल आणि खालील टाइप करेल.

03:31 माझे विद्यार्थी माझ्या course च्या पहिल्या पेजवर हे पहातील.
03:37 पुढे Course summary files फील्डवर जा.

Course summary सह या फायली आहेत जे विद्यार्थ्यांना दाखविली जाईल.

03:47 डीफॉल्टनुसार, केवळ jpg, gif आणि png file types ना Course summary फाइल्स म्हणून परवानगी आहे.
03:56 येथे फाइल अपलोड करण्याचे 3 मार्ग आहेत: बॉक्समध्ये फाइल ड्रॅग आणि ड्रॉप करा.
04:03 वर डाव्या बाजूला Upload किंवा Add आयकॉनवर क्लिक करा.

खालील एरोवर क्लिक करा.

04:11 जर तुम्ही Upload किंवा Add आयकॉन किंवा खालील एरोवर क्लिक केले तर, File picker डायलॉग बॉक्स उघडेल.
04:21 डाव्या मेनू वर Upload a file पर्यायवर क्लिक करा.
04:26 Browse किंवा Choose File बटणवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या मशीनवरून इच्छित फाइल निवडा.

04:34 मी माझ्या सिस्टिम मधून calculus.jpg निवडा.
04:40 तुम्ही त्यास Save as फील्ड मध्ये टाईप करून वेगळे नाव देऊ शकता.
04:46 संबंधित कोडमध्ये author आणि license तपशील निर्दिष्ट करा.

शेवटी, तळाशी Upload this file बटणवर क्लिक करा

04:58 अशा प्रकारे आपण Course summary फायली अपलोड करू शकतो.
05:02 पुढे आहे Course format. Course format हे resources आणि activities साठी संदर्भित मार्ग विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे आयोजित केल्या जातात.
05:12 येथे Format ड्रॉपडाउन मध्ये 4 पर्याय आहेत-

Single Activity Format, Social Format , Topics Format आणि Weekly Format.

05:26 आपल्या admin ने Topics format निवडले आहे.

आपण ते तसे राहू देऊ.

05:33 पुढील सेटिंग्स आहे Hidden sections

या course मध्ये सामान्य topics असतात ज्यास विद्यार्थ्यांपासून लपविले जाऊ शकते.

05:44 जेव्हा एखादा विशिष्ट विषय असेल तेव्हा हे उपयुक्त ठरू शकते, जे अद्याप शिक्षकाने पूर्ण केलेले नाही.

हे सेटिंग विद्यार्थ्यांना Hidden sections कसे सादर करायचे ते निर्धारित करते.

05:57 हा पर्याय निवडल्याने विद्यार्थ्यांना संक्षिप्त फॉर्ममध्ये सामग्री प्रदर्शित होईल.
06:04 हा पर्याय निवडल्याने विद्यार्थ्यांकडून सामग्री लपविली जाईल.
06:09 आता साठी आपण हे डिफॉल्ट म्हणून राहू देऊ.
06:13 पुढील ड्रॉप-डाउन Course Layout आहे. त्यावर क्लिक करा.
06:19 हा पर्याय निवडून, आपण एका पेजमध्ये सर्व sections दाखवण्यासाठी हे निवडू.
06:25 अन्य पर्याय येथे आहे ते Show one section per page आहे.

हे अनेक पेजेसवर course ना विभाजित करेल, जे sections च्या संखेवर आधारित आहे.

06:37 आपण आतासाठी Show all sections in one page वर जसे आहे तसेच राहू देऊ.
06:43 पुढे आहे Appearance सेक्शन
06:46 Show gradebook to students पर्यायवर लक्ष द्या.

course मधील अनेक क्रियाकलाप शिक्षकांना ग्रेड ने मण्याची परवानगी देतात.

06:57 हा पर्याय निर्धारित करते कि विद्यार्थी त्या ग्रेड्स पाहू शकतो की नाही.
हा पर्याय डिफॉल्टनुसार Yes, सेट करते. आपण ते जसे आहे तसेच राहू देऊ.
07:10 जर ते डिफॉल्टपणे निवडलेले नसेल तर आपण Show activity reports बदलून Yes, करू.
07:18 हे सुनिश्चित करते की विद्यार्थी त्याच्या/तिच्या activity reports ना त्याच्या/तिच्या profile page वर पाहू शकतात.
07:27 आपण त्या फायलींची महत्तम साईज सेट करू शकतो जे या course साठी अपलोड केले जाऊ शकते.
07:34 फायली additional materials, assignments, इत्यादींसाठी अपलोड केल्या जाऊ शकतात.
07:41 आपल्या admin ने यास 128MB वर सेट केले आहे, जे महत्तम फाईल साईज आहे.

जसे साईज आहे तसे आपण करू या.

07:52 आपण इतर सर्व सेटिंग्ज त्यांच्या डीफॉल्ट व्हॅल्यूमध्ये राहू देऊ.
07:58 खाली स्क्रोल करून Save and display बटणवर क्लिक करा.

आपण Course पेजवर आहोत.

08:06 टॉपिक नावांवरील Announcements लिंककडे लक्ष द्या.
08:11 यामुळे विद्यार्थ्यांना अनिवार्य माहिती, ताजी बातमी, घोषणा इ. बद्दल माहिती मिळेल.
08:20 पेजच्या वरती उजवीकडील gear आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा.
08:28 नोंद: course मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी तुम्हाला एडिटिंग चालू करणे आवश्यक आहे.
08:35 आता Announcements च्या उजवीकडे, Edit वर क्लिक करा आणि नंतर Edit Settings वर क्लिक करा.
08:44 आणि Description मध्ये मी खालील टेक्स्ट टाईप करेल.

“Please check the announcements regularly”.

08:52 Display description on course page तपासा. हे लिंकच्या खाली वर्णन दर्शवेल.
09:01 इतर सर्व सेटिंग्ज त्याप्रमाणे सोडा.
09:05 खाली स्क्रोल करा आणि Save and return to course बटणवर क्लिक करा.

आपण Course पेजवर परत आलो आहोत.

09:15 अधिक announcements जोडण्यासाठी, Announcements शीर्षकावर क्लिक करा.
09:21 आता Add a new topic बटणवर क्लिक करा. Subject मध्ये टाईप करा Minimum requirements
09:31 मेसेज टाईप करा “This course requires you to submit a minimum of 3 assignments and attempt 5 quizzes to pass”.
09:43 लक्षात घ्या की Discussion subscription चेकबॉक्स हे चेक आहे आणि ते एडिट करू शकत नाही.

याचे कारण असे की प्रत्येक course मध्ये नोंदणी केलेले प्रत्येकजण अनिवार्यपणे सदस्यता घेतलेले आहे.

09:59 पुढे आहे Attachments. तुम्ही येथे संबंधित फाइल्स ड्रॅग आणि ड्रॉप किंवा अपलोड करू शकता.
10:08 जर तुम्हाला forum च्या शीर्षस्थानी घोषणे दर्शवायची असतील तर, Pinned चेकबॉक्सवर क्लिक करा. मी ते टिक करेल.
10:18 पुढील चेकबॉक्सवर टिक करा,

हे प्रत्येकाला त्वरित forum वर subscribed करण्यासाठी notification पाठवेल.

10:29 पुढील Display period विभागाचा विस्तार करा.

येथेforum post तारीख श्रेणीसाठी दृश्यमान असले पाहिजे की नाही हे येथे निश्चित केले आहे.

10:41 डीफॉल्टनुसार, हे अक्षम केले आहेत. याचा अर्थ posts नेहमीच दृश्यमान असेल.

आपण डीफॉल्ट सेटिंग्ज तसेच राहू देऊ.

10:52 खाली स्क्रोल करा आणि Post to forum बटणवर क्लिक करा.
10:57 एक यशस्वी मेसेज प्रदर्शित होईल. Post authors ना posts मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी 30 मिनिटे आहेत.
11:08 मी breadcrumb मधील Calculus लिंकवर क्लिक करते.
11:13 आता या section मध्ये मी विस्तृत अभ्यासक्रमासह एक पेज जोडते.
11:19 General section च्या तळाशी उजवीकडील Add an activity or resource लिंकवर क्लिक करा. Resources च्या यादी मधून, Page निवडा.
11:32 या क्रियाकलापाचे वर्णन वाचा जेव्हा तुम्ही निवड करता तेव्हा ते दिसून येईल.
11:39 नंतर तळाशी Add बटणवर क्लिक करा.

आपण नवीन पेजवर आलो आहोत.

11:47 Name फील्डमध्ये टाईप करा Detailed syllabus.
11:52 मी Description टेक्सटबॉक्स रिक्त ठेवेन कारण शीर्षक स्वयं-स्पष्टीकरणात्मक आहे.
11:59 मी Page Content टेक्सटबॉक्स मधील या Calculus कोर्सचे विस्तृत अभ्यासक्रम प्रविष्ट करेल.
12:07 हे कॉन्टेन्ट या ट्युटोरिअलच्या Code Files लिंकमध्ये मध्ये उपलब्ध आहे.

सराव करताना तुम्ही डाउनलोड करून त्याचा वापर करू शकता.

12:18 खाली स्क्रोल करा आणि Save and return to course बटणवर क्लिक करा.

आपण पुन्हा course पेजवर परत आलो आहोत.

12:27 आपण आता आपल्या अकाउंटमधून logout करू. असे करण्यासाठी, वरती उजवीकडील user icon वर क्लिक करा.

आता Log out पर्याय निवडा.

12:39 आता मी तुम्हाला दाखवेन कि विद्यार्थयांना हे पेज कसे दिसेल
12:45 माझ्याकडे student ID Priya Sinha आहे.

या विद्यार्थ्याने Calculus कोर्समध्ये admin द्वारे नावनोंदणी केली आहे.

12:55 मी Priya Sinha म्हणून लॉगिन केले आहे. आता मी डावीकडे Calculus वर क्लिक करेल.
13:04 विद्यार्थी अशा प्रकारे हे पेज पाहू शकतील.

लक्षात घ्या की या पेजच्या शीर्षस्थानी उजवीकडे gear icon नाही.

13:14 कारण की विद्यार्थी course च्या कोणत्याही भागास एडिट (संपादित) करू शकत नाहीत.
13:20 आता आपण student id मधून लॉग आऊट करू.
13:24 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात.

13:30 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: Moodle मध्ये Course Administration

course मध्ये Activities आणि Resources

13:40 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.

course चा आऊटकम स्रोत माहिती देणारा एक नवीन पेज जोडा. अधिक माहितीसाठी या ट्यूटोरियलच्या Assignment या लिंकचा संदर्भ घ्या.

13:53 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाउनलोड करून पहा.

14:02 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

14:13 कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
14:17 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
14:31 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana