Moodle-Learning-Management-System/C2/Course-Administration-in-Moodle/Marathi
Time | Narration |
00:01 | Moodle मध्ये Course Administration वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Moodle मध्ये Course Administration
course मध्ये Activities आणि Resources |
00:17 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे: Ubuntu Linux OS 16.04 |
00:24 | XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP |
00:33 | Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर |
00:40 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
00:52 | हे ट्युटोरिअल गृहीत धरते कि तुमच्या site administrator ने Moodle website सेटअप केली आहे आणि तुम्हाला teacher म्हणून रजिस्टर्ड केली आहे. |
01:03 | या ट्युटोरियलच्या शिकणाऱ्यांकडे Moodle वर teacher login असावा. |
01:09 | कमीतकमी एक course त्यांना administrator द्वारे असाइन करणे आवश्यक आहे.
काही कोर्स सामग्री त्यांच्या संबंधित course साठी अपलोड केली आहे. |
01:19 | नसल्यास, कृपया या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:26 | ब्राउजर वर जा आणि तुमचे moodle site उघडा. |
01:31 | तुमच्या teacher username आणि password तपशिलासह लॉगिन करा.
मी आधीच teacher Rebecca Raymond म्हणून लॉगिन आहे. |
01:41 | आपण teacher’s dashboard मध्ये आहोत. |
01:44 | डावीकडे navigation menu मध्ये लक्षात ठेवा My Courses अंतर्गत Calculus. |
01:51 | कृपया लक्षात ठेवा. teacher किंवा student म्हणून तुम्ही एन्रॉल केलेले सर्व courses येथे सूचीबद्ध केले जातील. |
01:59 | Calculus course वर क्लिक करा. |
02:02 | आपण मागील ट्यूटोरियलमध्ये course topics आणि summaries अपडेट केले होते. |
02:09 | तुम्ही असे न केल्यास, कृपया मागील ट्यूटोरियलच्या असाइनमेंटचा संदर्भ घ्या. |
02:16 | आता आपण काही उपयुक्त course सेटिंग्ज बद्दल जाणून घेऊ. |
02:21 | section च्या वरती उजवीकडे gear icon वर क्लिक करा. |
02:26 | Edit Settings वर क्लिक करा. त्यानंतर सर्व sections ना विस्तृत करण्यासाठी उजवीकडे Expand All वर क्लिक करा. |
02:36 | येथे दिलेले सेटिंगadministrator द्वारे परिभाषित केले गेले होते, जेव्हा हा course तयार झाला होता. |
02:44 | General section मध्ये आपल्याकडे Course full name आहे
हे नाव course page च्या वरती प्रदर्शित केलेले आहे. |
02:54 | Course short name हे नाव course navigation आणि course- संबंधित emails मध्ये प्रदर्शित केलेले आहे. |
03:03 | Course category हे admin द्वारे आधीच सेट करण्यात आली आहे. |
03:08 | आपण आपल्या गरजांनुसार Course start date, Course end date आणि Course ID number बदलू शकतो. |
03:21 | Description section मध्ये Course Summary टेक्सटबॉक्स पहा.
मी अस्तित्वात असलेले कॉन्टेन्ट डिलीट करेल आणि खालील टाइप करेल. |
03:31 | माझे विद्यार्थी माझ्या course च्या पहिल्या पेजवर हे पहातील. |
03:37 | पुढे Course summary files फील्डवर जा.
Course summary सह या फायली आहेत जे विद्यार्थ्यांना दाखविली जाईल. |
03:47 | डीफॉल्टनुसार, केवळ jpg, gif आणि png file types ना Course summary फाइल्स म्हणून परवानगी आहे. |
03:56 | येथे फाइल अपलोड करण्याचे 3 मार्ग आहेत: बॉक्समध्ये फाइल ड्रॅग आणि ड्रॉप करा. |
04:03 | वर डाव्या बाजूला Upload किंवा Add आयकॉनवर क्लिक करा.
खालील एरोवर क्लिक करा. |
04:11 | जर तुम्ही Upload किंवा Add आयकॉन किंवा खालील एरोवर क्लिक केले तर, File picker डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:21 | डाव्या मेनू वर Upload a file पर्यायवर क्लिक करा. |
04:26 | Browse किंवा Choose File बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या मशीनवरून इच्छित फाइल निवडा. |
04:34 | मी माझ्या सिस्टिम मधून calculus.jpg निवडा. |
04:40 | तुम्ही त्यास Save as फील्ड मध्ये टाईप करून वेगळे नाव देऊ शकता. |
04:46 | संबंधित कोडमध्ये author आणि license तपशील निर्दिष्ट करा.
शेवटी, तळाशी Upload this file बटणवर क्लिक करा |
04:58 | अशा प्रकारे आपण Course summary फायली अपलोड करू शकतो. |
05:02 | पुढे आहे Course format. Course format हे resources आणि activities साठी संदर्भित मार्ग विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारे आयोजित केल्या जातात. |
05:12 | येथे Format ड्रॉपडाउन मध्ये 4 पर्याय आहेत-
Single Activity Format, Social Format , Topics Format आणि Weekly Format. |
05:26 | आपल्या admin ने Topics format निवडले आहे.
आपण ते तसे राहू देऊ. |
05:33 | पुढील सेटिंग्स आहे Hidden sections
या course मध्ये सामान्य topics असतात ज्यास विद्यार्थ्यांपासून लपविले जाऊ शकते. |
05:44 | जेव्हा एखादा विशिष्ट विषय असेल तेव्हा हे उपयुक्त ठरू शकते, जे अद्याप शिक्षकाने पूर्ण केलेले नाही.
हे सेटिंग विद्यार्थ्यांना Hidden sections कसे सादर करायचे ते निर्धारित करते. |
05:57 | हा पर्याय निवडल्याने विद्यार्थ्यांना संक्षिप्त फॉर्ममध्ये सामग्री प्रदर्शित होईल. |
06:04 | हा पर्याय निवडल्याने विद्यार्थ्यांकडून सामग्री लपविली जाईल. |
06:09 | आता साठी आपण हे डिफॉल्ट म्हणून राहू देऊ. |
06:13 | पुढील ड्रॉप-डाउन Course Layout आहे. त्यावर क्लिक करा. |
06:19 | हा पर्याय निवडून, आपण एका पेजमध्ये सर्व sections दाखवण्यासाठी हे निवडू. |
06:25 | अन्य पर्याय येथे आहे ते Show one section per page आहे.
हे अनेक पेजेसवर course ना विभाजित करेल, जे sections च्या संखेवर आधारित आहे. |
06:37 | आपण आतासाठी Show all sections in one page वर जसे आहे तसेच राहू देऊ. |
06:43 | पुढे आहे Appearance सेक्शन |
06:46 | Show gradebook to students पर्यायवर लक्ष द्या.
course मधील अनेक क्रियाकलाप शिक्षकांना ग्रेड ने मण्याची परवानगी देतात. |
06:57 | हा पर्याय निर्धारित करते कि विद्यार्थी त्या ग्रेड्स पाहू शकतो की नाही.
हा पर्याय डिफॉल्टनुसार Yes, सेट करते. आपण ते जसे आहे तसेच राहू देऊ. |
07:10 | जर ते डिफॉल्टपणे निवडलेले नसेल तर आपण Show activity reports बदलून Yes, करू. |
07:18 | हे सुनिश्चित करते की विद्यार्थी त्याच्या/तिच्या activity reports ना त्याच्या/तिच्या profile page वर पाहू शकतात. |
07:27 | आपण त्या फायलींची महत्तम साईज सेट करू शकतो जे या course साठी अपलोड केले जाऊ शकते. |
07:34 | फायली additional materials, assignments, इत्यादींसाठी अपलोड केल्या जाऊ शकतात. |
07:41 | आपल्या admin ने यास 128MB वर सेट केले आहे, जे महत्तम फाईल साईज आहे.
जसे साईज आहे तसे आपण करू या. |
07:52 | आपण इतर सर्व सेटिंग्ज त्यांच्या डीफॉल्ट व्हॅल्यूमध्ये राहू देऊ. |
07:58 | खाली स्क्रोल करून Save and display बटणवर क्लिक करा.
आपण Course पेजवर आहोत. |
08:06 | टॉपिक नावांवरील Announcements लिंककडे लक्ष द्या. |
08:11 | यामुळे विद्यार्थ्यांना अनिवार्य माहिती, ताजी बातमी, घोषणा इ. बद्दल माहिती मिळेल. |
08:20 | पेजच्या वरती उजवीकडील gear आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर Turn Editing On वर क्लिक करा. |
08:28 | नोंद: course मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी तुम्हाला एडिटिंग चालू करणे आवश्यक आहे. |
08:35 | आता Announcements च्या उजवीकडे, Edit वर क्लिक करा आणि नंतर Edit Settings वर क्लिक करा. |
08:44 | आणि Description मध्ये मी खालील टेक्स्ट टाईप करेल.
“Please check the announcements regularly”. |
08:52 | Display description on course page तपासा. हे लिंकच्या खाली वर्णन दर्शवेल. |
09:01 | इतर सर्व सेटिंग्ज त्याप्रमाणे सोडा. |
09:05 | खाली स्क्रोल करा आणि Save and return to course बटणवर क्लिक करा.
आपण Course पेजवर परत आलो आहोत. |
09:15 | अधिक announcements जोडण्यासाठी, Announcements शीर्षकावर क्लिक करा. |
09:21 | आता Add a new topic बटणवर क्लिक करा. Subject मध्ये टाईप करा Minimum requirements |
09:31 | मेसेज टाईप करा “This course requires you to submit a minimum of 3 assignments and attempt 5 quizzes to pass”. |
09:43 | लक्षात घ्या की Discussion subscription चेकबॉक्स हे चेक आहे आणि ते एडिट करू शकत नाही.
याचे कारण असे की प्रत्येक course मध्ये नोंदणी केलेले प्रत्येकजण अनिवार्यपणे सदस्यता घेतलेले आहे. |
09:59 | पुढे आहे Attachments. तुम्ही येथे संबंधित फाइल्स ड्रॅग आणि ड्रॉप किंवा अपलोड करू शकता. |
10:08 | जर तुम्हाला forum च्या शीर्षस्थानी घोषणे दर्शवायची असतील तर, Pinned चेकबॉक्सवर क्लिक करा. मी ते टिक करेल. |
10:18 | पुढील चेकबॉक्सवर टिक करा,
हे प्रत्येकाला त्वरित forum वर subscribed करण्यासाठी notification पाठवेल. |
10:29 | पुढील Display period विभागाचा विस्तार करा.
येथेforum post तारीख श्रेणीसाठी दृश्यमान असले पाहिजे की नाही हे येथे निश्चित केले आहे. |
10:41 | डीफॉल्टनुसार, हे अक्षम केले आहेत. याचा अर्थ posts नेहमीच दृश्यमान असेल.
आपण डीफॉल्ट सेटिंग्ज तसेच राहू देऊ. |
10:52 | खाली स्क्रोल करा आणि Post to forum बटणवर क्लिक करा. |
10:57 | एक यशस्वी मेसेज प्रदर्शित होईल. Post authors ना posts मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी 30 मिनिटे आहेत. |
11:08 | मी breadcrumb मधील Calculus लिंकवर क्लिक करते. |
11:13 | आता या section मध्ये मी विस्तृत अभ्यासक्रमासह एक पेज जोडते. |
11:19 | General section च्या तळाशी उजवीकडील Add an activity or resource लिंकवर क्लिक करा. Resources च्या यादी मधून, Page निवडा. |
11:32 | या क्रियाकलापाचे वर्णन वाचा जेव्हा तुम्ही निवड करता तेव्हा ते दिसून येईल. |
11:39 | नंतर तळाशी Add बटणवर क्लिक करा.
आपण नवीन पेजवर आलो आहोत. |
11:47 | Name फील्डमध्ये टाईप करा Detailed syllabus. |
11:52 | मी Description टेक्सटबॉक्स रिक्त ठेवेन कारण शीर्षक स्वयं-स्पष्टीकरणात्मक आहे. |
11:59 | मी Page Content टेक्सटबॉक्स मधील या Calculus कोर्सचे विस्तृत अभ्यासक्रम प्रविष्ट करेल. |
12:07 | हे कॉन्टेन्ट या ट्युटोरिअलच्या Code Files लिंकमध्ये मध्ये उपलब्ध आहे.
सराव करताना तुम्ही डाउनलोड करून त्याचा वापर करू शकता. |
12:18 | खाली स्क्रोल करा आणि Save and return to course बटणवर क्लिक करा.
आपण पुन्हा course पेजवर परत आलो आहोत. |
12:27 | आपण आता आपल्या अकाउंटमधून logout करू. असे करण्यासाठी, वरती उजवीकडील user icon वर क्लिक करा.
आता Log out पर्याय निवडा. |
12:39 | आता मी तुम्हाला दाखवेन कि विद्यार्थयांना हे पेज कसे दिसेल |
12:45 | माझ्याकडे student ID Priya Sinha आहे.
या विद्यार्थ्याने Calculus कोर्समध्ये admin द्वारे नावनोंदणी केली आहे. |
12:55 | मी Priya Sinha म्हणून लॉगिन केले आहे. आता मी डावीकडे Calculus वर क्लिक करेल. |
13:04 | विद्यार्थी अशा प्रकारे हे पेज पाहू शकतील.
लक्षात घ्या की या पेजच्या शीर्षस्थानी उजवीकडे gear icon नाही. |
13:14 | कारण की विद्यार्थी course च्या कोणत्याही भागास एडिट (संपादित) करू शकत नाहीत. |
13:20 | आता आपण student id मधून लॉग आऊट करू. |
13:24 | यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात. |
13:30 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: Moodle मध्ये Course Administration
course मध्ये Activities आणि Resources |
13:40 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
course चा आऊटकम स्रोत माहिती देणारा एक नवीन पेज जोडा. अधिक माहितीसाठी या ट्यूटोरियलच्या Assignment या लिंकचा संदर्भ घ्या. |
13:53 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाउनलोड करून पहा. |
14:02 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
14:13 | कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
14:17 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
14:31 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |