Moodle-Learning-Management-System/C2/Overview-of-Moodle/Marathi
|
|
00:01 | Overview of Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : Learning Management Systems (थोडक्यात LMS ) ची संकल्पना |
00:16 | LMS म्हणून मूडल, |
00:19 | Moodle कोण वापरू शकते आणि Moodle वेबसाइट्सची उदाहरणे. |
00:26 | Moodle रन होण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची आवश्यकता आणि |
00:33 | Moodle च्या सिरीजमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मुख्य वैशिष्ट्यां बद्दल देखील जाणून घेऊ |
00:39 | वेबसाईट कसा ब्राउज करायचा, हे ह्या ट्युटोरिअल शिकणाऱ्यांना माहित असले पाहिजे. |
00:45 | Learning Management System किंवा LMS म्हणजे काय ते प्रथम समजून घेऊ. |
00:53 | LMS आपल्याला eLearning content तयार करण्यास, व्यवस्थापन(मॅनेज) करण्यास आणि वितरित करण्यास मदत करते. |
01:01 | उदाहरणार्थ: शैक्षणिक अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम. |
01:07 | हे आपल्या courses चे व्यवस्थापन(मॅनेज) करण्यासही मदत करते. |
01:11 | आपण कॉन्टेन्ट तयार आणि edit करू शकतो, विद्यार्थ्यांना एक्सेस, त्यांच्या सबमिशनला ग्रेड इ. देऊ शकतो. |
01:21 | Moodle हे एक प्रतिक्रियाशील, विनामूल्य (फ्री) आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. |
01:27 | शैक्षणिक संस्थांद्वारे जागतिक स्तरावर वापरले जाणारे LMS हे सर्वात लोकप्रिय आहे. |
01:33 | त्याची सुरक्षा नियंत्रणे आपला डेटा सुरक्षित आणि संरक्षित ठेवतात. |
01:39 | यात काही प्रबळ वैशिष्ट्ये(फिचर्स) आहेत जी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना सक्षम करतात. |
01:47 | Moodle हे विस्तृत डॉक्यूमेंटेशन देखील प्रदान करते जे हे वापरणे सोपे करते. |
01:54 | Moodle युजर्स कम्युनिटी आणि फोरम हेल्प खूप सक्रिय आहेत. |
02:00 | Moodle मध्ये उपलब्ध असलेले विनामूल्य प्लगइन्स त्यास आणखी वैशिष्ट्यपूर्ण संपन्न बनवतात. |
02:06 | मूडल सर्व डिव्हाइसेसवर नेव्हिगेट करणे सोपे आहे;
course आणि site level वर क्रियाकलाप आणि सहभागाबद्दल तपशीलवार अहवाल आहेत. |
02:18 | सहयोगी तसेच वैयक्तिकृत शिकण्यात मदत करते. |
02:23 | फोरम्स, पियर असेसमेंट, ग्रूप मॅनेजमेंट, लर्निंग पाथ्स इत्यादींचा त्यासाठी वापर केला जाऊ शकतो. |
02:32 | Moodle LMS कोण वापरू शकते ? हे पाहू : |
02:36 | विद्यापीठ(युनिव्हर्सिटीज), महाविद्यालये(कॉलेजेस), शाळा आणि कोचिंग संस्था यासारख्या शैक्षणिक संस्था. |
02:44 | कर्मचारी प्रशिक्षण आणि अभिमुखतेसाठी(ओरिएन्टेशनसाठी) व्यवसाय. |
02:49 | हॉस्पिटल आणि आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रम. |
02:53 | कोणतीही ई-लर्निंग आधारित संस्था. |
02:57 | Moodle च्या सहाय्याने तयार केलेली काही वेबसाईट्स पाहू. |
03:02 | यासारखे महाविद्यालय. |
03:05 | यासारखी खाजगी विद्यापीठे. |
03:09 | यासारख्या प्रशिक्षण संस्था |
03:13 | यासारख्या कोचिंग संस्था. |
03:17 | वैयक्तिक शिक्षक जे त्यांचे कोर्स ऑनलाईन आणि बरेच काही देऊ इच्छित आहेत. |
03:24 | Moodle मध्ये खालील URLवरील(यूआरएलवरील ) वापर ह्यांची विस्तृत आकडेवारी आहे. |
03:30 | येथे, आपण विविध देशांमधून नोंदणीकृत Moodle websites तपासू शकता. |
03:40 | Moodle इन्टॉल करण्यास, आपल्याला आवश्यक आहे : Apache web-server. |
03:46 | MySQL, MariaDB किंवा PostgreSQL सारखा डेटाबेस आणि PHP. |
03:54 | Moodle हे एक संसाधन वापरणारा सॉफ्टवेअर आहे. |
03:58 | Moodle रन करण्यासाठी शिफारस केलेले हार्डवेअर आहेत : |
04:02 | Disk Space: 200 MB Moodle code साठी आणि कॉन्टेन्ट संग्रहित करण्यासाठी अतिरिक्त स्पेस. तरीही 5GB किमान पुरेसे आहे. |
04:15 | Processor: किमान 1 Gigahertz, परंतु 2 गीगाहर्ट्ज dual core किंवा अधिकची शिफारस केली आहे. |
04:23 | Memory: किमान 512MB, परंतु 1GB किंवा अधिकची शिफारस केली आहे. |
04:31 | system वरील अपेक्षित लोडच्या आधारे ह्या आवश्यकता(गरजा) बदलू शकतात. |
04:37 | उदाहरणार्थ : courses ची संख्या आणि एकाच वेळी अपेक्षित logins. |
04:44 | ह्या सिरीज तयार करताना Moodle 3.3 हा नवीनतम स्टेबल वर्जन होता. |
04:50 | उपलब्ध असलेल्या नवीनतम स्टेबल वर्जनसह कार्य करण्याची नेहमी शिफारस केली जाते. |
04:57 | Moodle 3.3 ला खालील गोष्टी आवश्यक आहेत : |
05:01 | Apache 2.x (किंवा उच्च व्हर्जन)
MariaDB 5.5.30 (किंवा कोणतेही उच्च व्हर्जन) आणि |
05:11 | PHP 5.4.4 (किंवा कोणतेही उच्च व्हर्जन) |
05:17 | ह्या सिरीजसाठी आपण खालील OS आणि सॉफ्टवेअरचा वापर केला आहे :
Ubuntu Linux OS 16.04 |
05:26 | XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP आणि Moodle 3.3 |
05:36 | ही Moodle सिरीज दोन भागांमध्ये विभागलेली आहे - |
05:41 | एक Moodle site administrators साठी आणि दुसरी teachers साठी |
05:48 | Moodle site Administrators server(सर्व्हरवर) वर Moodle इन्स्टॉल करतील. |
05:54 | संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वेनुसार course categories तयार करा आणि विविध courses साठी courses आणि user accounts व्यवस्थापित(मॅनेज) करा. |
06:04 | Moodle site administrators साठी ह्या सिरीजमध्ये समाविष्ट केलेल्या काही प्रमुख वैशिष्ट्ये येथे आहेत. |
06:14 | Getting ready for Moodle installation ट्युटोरिअल localhost वर packages कसे तपासावे आणि database कसा सेट करावा हे स्पष्ट करते. |
06:29 | Installing Moodle on Local Server ट्युटोरिअल Moodle कसे डाऊनलोड आणि इन्स्टॉल करावे हे स्पष्ट करते. |
06:39 | Moodle मध्ये Admin’s dashboard ट्युटोरिअल स्पष्ट करते -Admin Dashboard.
विविध blocks आणि profile page आणि preferences कशी एडिट करावी. |
06:53 | Blocks in Admin's Dashboard ट्युटोरिअल स्पष्ट करते - blocks कसे जोडणे आणि डिलीट करणे आणि |
07:05 | Front page सेट करणे. |
07:08 | पुढील ट्युटोरिअल Categories in Moodle मध्ये, आपण, categories & subcategories तयार करणे शिकू. |
07:19 | Courses in Moodle च्या ट्युटोरिलमध्ये आपण course कसे तयार करावे आणि त्यास कॉन्फिगर कसे करावे ते शिकू. |
07:28 | Users in Moodle ट्युटोरिअल आपल्याला खालील समजून घेण्यास मदत करेल - user कसे जोडायचे, |
07:36 | user’s profile एडिट कसे करणे,
आणि users बल्कमध्ये अपलोड कसे करणे. |
07:43 | User Roles in Moodle ट्युटोरिअल, युजर्सना विविध रोल्स (भूमिका) कशा नियुक्त करायच्या हे शिकण्यास मदत करेल. |
07:52 | उदाहरणार्थ : दुय्यम (सेकंडरी) admin role, teacher role आणि student role |
08:00 | भविष्यात, मूडल साईट एडमिनिस्ट्रेटर्ससाठी ह्या सिरीजमध्ये बरेच अधिक ट्युटोरिअल्स असतील. |
08:07 | आपण आता शिक्षकांसाठी ट्युटोरिअल्समध्ये जाऊ. |
08:11 | शिक्षक त्यांचे course कॉन्टेन्ट अपलोड आणि एडिट करण्यासाठी जबाबदार असतील. |
08:17 | विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी assignments आणि quizzes तयार करा आणि |
08:22 | विद्यार्थ्यांची त्यांच्या course मध्ये नोंदणी करा आणि त्यांच्याशी संवाद साधा. |
08:27 | आता, मी शिक्षकांसाठी ह्या मालिकेत समाविष्ट केलेल्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची(फिचर्सची) झलक दाखवते. |
08:34 | Moodle मध्ये Teacher’s dashboard ट्युटोरिअल स्पष्ट करते - teachers’ dashboard
profile कसे एडिट करावे आणि preferences कसे एडिट करावे. |
08:46 | Moodle मध्ये Course Administration ट्युटोरिअल स्पष्ट करते - course सेटिंग्ज कॉन्फिगर कसे करावे ? |
08:53 | आणि Activities आणि Resources व्यवस्थापित(मॅनेज) करणे |
08:59 | Moodle मधील Formatting course material ट्युटोरिअल स्पष्ट करते - डिफॉल्ट Moodle text editor मधील विविध फॉरमॅटींग पर्याय |
09:10 | आणि अतिरिक्त course material जोडणे. |
09:15 | Moodle चे Uploading and Editing Resources ट्युटोरिअल, URL resource आणि book resource अपलोड कसे करायचे
आणि ते resources एडिट कसे करायचे ते स्पष्ट करते. |
09:29 | ह्या सिरीजमध्ये पुढील ट्युटोरिअल आहे - Moodle मधील Forums and Assignments. |
09:34 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Moodle मधील forums चे विविध प्रकार. |
09:39 | चर्चेसाठी forum कसे जोडायचे आणि Assignments कसे तयार करावेत. |
09:48 | Moodle च्या Question bank ट्युटोरिअलमध्ये आपण प्रश्नांची Categories कशा तयार करणे आणि question bank ला प्रश्न कसे जोडणे हे शिकणार आहोत. |
09:58 | Moodle मधील Quiz ट्युटोरिअल आपल्याला शिकवेल : Quiz कशी तयार करावी आणि
Question bank मधून Quiz मध्ये प्रश्न जोडणे. |
10:12 | Moodle मधील Enroll Students and Communicate नामक ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :
course मध्ये csv file द्वारे अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे. |
10:25 | groups मध्ये courses बनवा आणि विद्यार्थ्यांना messages आणि notes पाठवा. |
10:31 | नंतर ह्या सिरीजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आणखी काही ट्युटोरिअल्स असतील. |
10:37 | आतासाठी, सारांशित करू.
ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो आहोत : Learning Management Systems(थोडक्यात LMS ) ची संकल्पना |
10:48 | LMS म्हणून मूडल, Moodle कोण वापरू शकते आणि Moodle वेबसाइट्सची उदाहरणे. |
10:57 | आपण हेदेखील शिकलो - Moodle रन करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची आवश्यकता आणि
Moodle च्या सिरीजमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मुख्य वैशिष्ट्यांचा (फिचर्स) आढावा. |
11:10 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करून पहा. |
11:18 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
11:28 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या. |
11:35 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
11:45 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
11:51 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. |
11:59 | फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
12:05 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:18 | मी रंजना उके, आय.आय.टी. बॉम्बे स्पोकन ट्युटोरिअल टीमसह आपली रजा घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |