Moodle-Learning-Management-System/C2/Overview-of-Moodle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Overview of Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : Learning Management Systems (थोडक्यात LMS ) ची संकल्पना
00:16 LMS म्हणून मूडल,
00:19 Moodle कोण वापरू शकते आणि Moodle वेबसाइट्सची उदाहरणे.
00:26 Moodle रन होण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची आवश्यकता आणि
00:33 Moodle च्या सिरीजमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मुख्य वैशिष्ट्यां बद्दल देखील जाणून घेऊ
00:39 वेबसाईट कसा ब्राउज करायचा, हे ह्या ट्युटोरिअल शिकणाऱ्यांना माहित असले पाहिजे.
00:45 Learning Management System किंवा LMS म्हणजे काय ते प्रथम समजून घेऊ.
00:53 LMS आपल्याला eLearning content तयार करण्यास, व्यवस्थापन(मॅनेज) करण्यास आणि वितरित करण्यास मदत करते.
01:01 उदाहरणार्थ: शैक्षणिक अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रम.
01:07 हे आपल्या courses चे व्यवस्थापन(मॅनेज) करण्यासही मदत करते.
01:11 आपण कॉन्टेन्ट तयार आणि edit करू शकतो, विद्यार्थ्यांना एक्सेस, त्यांच्या सबमिशनला ग्रेड इ. देऊ शकतो.
01:21 Moodle हे एक प्रतिक्रियाशील, विनामूल्य (फ्री) आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे.
01:27 शैक्षणिक संस्थांद्वारे जागतिक स्तरावर वापरले जाणारे LMS हे सर्वात लोकप्रिय आहे.
01:33 त्याची सुरक्षा नियंत्रणे आपला डेटा सुरक्षित आणि संरक्षित ठेवतात.
01:39 यात काही प्रबळ वैशिष्ट्ये(फिचर्स) आहेत जी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना सक्षम करतात.
01:47 Moodle हे विस्तृत डॉक्यूमेंटेशन देखील प्रदान करते जे हे वापरणे सोपे करते.
01:54 Moodle युजर्स कम्युनिटी आणि फोरम हेल्प खूप सक्रिय आहेत.
02:00 Moodle मध्ये उपलब्ध असलेले विनामूल्य प्लगइन्स त्यास आणखी वैशिष्ट्यपूर्ण संपन्न बनवतात.
02:06 मूडल सर्व डिव्हाइसेसवर नेव्हिगेट करणे सोपे आहे;

course आणि site level वर क्रियाकलाप आणि सहभागाबद्दल तपशीलवार अहवाल आहेत.

02:18 सहयोगी तसेच वैयक्तिकृत शिकण्यात मदत करते.
02:23 फोरम्स, पियर असेसमेंट, ग्रूप मॅनेजमेंट, लर्निंग पाथ्स इत्यादींचा त्यासाठी वापर केला जाऊ शकतो.
02:32 Moodle LMS कोण वापरू शकते ? हे पाहू :
02:36 विद्यापीठ(युनिव्हर्सिटीज), महाविद्यालये(कॉलेजेस), शाळा आणि कोचिंग संस्था यासारख्या शैक्षणिक संस्था.
02:44 कर्मचारी प्रशिक्षण आणि अभिमुखतेसाठी(ओरिएन्टेशनसाठी) व्यवसाय.
02:49 हॉस्पिटल आणि आरोग्य सेवा प्रशिक्षण कार्यक्रम.
02:53 कोणतीही ई-लर्निंग आधारित संस्था.
02:57 Moodle च्या सहाय्याने तयार केलेली काही वेबसाईट्स पाहू.
03:02 यासारखे महाविद्यालय.
03:05 यासारखी खाजगी विद्यापीठे.
03:09 यासारख्या प्रशिक्षण संस्था
03:13 यासारख्या कोचिंग संस्था.
03:17 वैयक्तिक शिक्षक जे त्यांचे कोर्स ऑनलाईन आणि बरेच काही देऊ इच्छित आहेत.
03:24 Moodle मध्ये खालील URLवरील(यूआरएलवरील ) वापर ह्यांची विस्तृत आकडेवारी आहे.
03:30 येथे, आपण विविध देशांमधून नोंदणीकृत Moodle websites तपासू शकता.
03:40 Moodle इन्टॉल करण्यास, आपल्याला आवश्यक आहे : Apache web-server.
03:46 MySQL, MariaDB किंवा PostgreSQL सारखा डेटाबेस आणि PHP.
03:54 Moodle हे एक संसाधन वापरणारा सॉफ्टवेअर आहे.
03:58 Moodle रन करण्यासाठी शिफारस केलेले हार्डवेअर आहेत :
04:02 Disk Space: 200 MB Moodle code साठी आणि कॉन्टेन्ट संग्रहित करण्यासाठी अतिरिक्त स्पेस. तरीही 5GB किमान पुरेसे आहे.
04:15 Processor: किमान 1 Gigahertz, परंतु 2 गीगाहर्ट्ज dual core किंवा अधिकची शिफारस केली आहे.
04:23 Memory: किमान 512MB, परंतु 1GB किंवा अधिकची शिफारस केली आहे.
04:31 system वरील अपेक्षित लोडच्या आधारे ह्या आवश्यकता(गरजा) बदलू शकतात.
04:37 उदाहरणार्थ : courses ची संख्या आणि एकाच वेळी अपेक्षित logins.
04:44 ह्या सिरीज तयार करताना Moodle 3.3 हा नवीनतम स्टेबल वर्जन होता.
04:50 उपलब्ध असलेल्या नवीनतम स्टेबल वर्जनसह कार्य करण्याची नेहमी शिफारस केली जाते.
04:57 Moodle 3.3 ला खालील गोष्टी आवश्यक आहेत :
05:01 Apache 2.x (किंवा उच्च व्हर्जन)

MariaDB 5.5.30 (किंवा कोणतेही उच्च व्हर्जन) आणि

05:11 PHP 5.4.4 (किंवा कोणतेही उच्च व्हर्जन)
05:17 ह्या सिरीजसाठी आपण खालील OS आणि सॉफ्टवेअरचा वापर केला आहे :

Ubuntu Linux OS 16.04

05:26 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP आणि Moodle 3.3
05:36 ही Moodle सिरीज दोन भागांमध्ये विभागलेली आहे -
05:41 एक Moodle site administrators साठी आणि दुसरी teachers साठी
05:48 Moodle site Administrators server(सर्व्हरवर) वर Moodle इन्स्टॉल करतील.
05:54 संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वेनुसार course categories तयार करा आणि विविध courses साठी courses आणि user accounts व्यवस्थापित(मॅनेज) करा.
06:04 Moodle site administrators साठी ह्या सिरीजमध्ये समाविष्ट केलेल्या काही प्रमुख वैशिष्ट्ये येथे आहेत.
06:14 Getting ready for Moodle installation ट्युटोरिअल localhost वर packages कसे तपासावे आणि database कसा सेट करावा हे स्पष्ट करते.
06:29 Installing Moodle on Local Server ट्युटोरिअल Moodle कसे डाऊनलोड आणि इन्स्टॉल करावे हे स्पष्ट करते.
06:39 Moodle मध्ये Admin’s dashboard ट्युटोरिअल स्पष्ट करते -Admin Dashboard.

विविध blocks आणि profile page आणि preferences कशी एडिट करावी.

06:53 Blocks in Admin's Dashboard ट्युटोरिअल स्पष्ट करते - blocks कसे जोडणे आणि डिलीट करणे आणि
07:05 Front page सेट करणे.
07:08 पुढील ट्युटोरिअल Categories in Moodle मध्ये, आपण, categories & subcategories तयार करणे शिकू.
07:19 Courses in Moodle च्या ट्युटोरिलमध्ये आपण course कसे तयार करावे आणि त्यास कॉन्फिगर कसे करावे ते शिकू.
07:28 Users in Moodle ट्युटोरिअल आपल्याला खालील समजून घेण्यास मदत करेल - user कसे जोडायचे,
07:36 user’s profile एडिट कसे करणे,

आणि users बल्कमध्ये अपलोड कसे करणे.

07:43 User Roles in Moodle ट्युटोरिअल, युजर्सना विविध रोल्स (भूमिका) कशा नियुक्त करायच्या हे शिकण्यास मदत करेल.
07:52 उदाहरणार्थ : दुय्यम (सेकंडरी) admin role, teacher role आणि student role
08:00 भविष्यात, मूडल साईट एडमिनिस्ट्रेटर्ससाठी ह्या सिरीजमध्ये बरेच अधिक ट्युटोरिअल्स असतील.
08:07 आपण आता शिक्षकांसाठी ट्युटोरिअल्समध्ये जाऊ.
08:11 शिक्षक त्यांचे course कॉन्टेन्ट अपलोड आणि एडिट करण्यासाठी जबाबदार असतील.
08:17 विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी assignments आणि quizzes तयार करा आणि
08:22 विद्यार्थ्यांची त्यांच्या course मध्ये नोंदणी करा आणि त्यांच्याशी संवाद साधा.
08:27 आता, मी शिक्षकांसाठी ह्या मालिकेत समाविष्ट केलेल्या काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची(फिचर्सची) झलक दाखवते.
08:34 Moodle मध्ये Teacher’s dashboard ट्युटोरिअल स्पष्ट करते - teachers’ dashboard

profile कसे एडिट करावे आणि preferences कसे एडिट करावे.

08:46 Moodle मध्ये Course Administration ट्युटोरिअल स्पष्ट करते - course सेटिंग्ज कॉन्फिगर कसे करावे ?
08:53 आणि Activities आणि Resources व्यवस्थापित(मॅनेज) करणे
08:59 Moodle मधील Formatting course material ट्युटोरिअल स्पष्ट करते - डिफॉल्ट Moodle text editor मधील विविध फॉरमॅटींग पर्याय
09:10 आणि अतिरिक्त course material जोडणे.
09:15 Moodle चे Uploading and Editing Resources ट्युटोरिअल, URL resource आणि book resource अपलोड कसे करायचे

आणि ते resources एडिट कसे करायचे ते स्पष्ट करते.

09:29 ह्या सिरीजमध्ये पुढील ट्युटोरिअल आहे - Moodle मधील Forums and Assignments.
09:34 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - Moodle मधील forums चे विविध प्रकार.
09:39 चर्चेसाठी forum कसे जोडायचे आणि Assignments कसे तयार करावेत.
09:48 Moodle च्या Question bank ट्युटोरिअलमध्ये आपण प्रश्नांची Categories कशा तयार करणे आणि question bank ला प्रश्न कसे जोडणे हे शिकणार आहोत.
09:58 Moodle मधील Quiz ट्युटोरिअल आपल्याला शिकवेल : Quiz कशी तयार करावी आणि

Question bank मधून Quiz मध्ये प्रश्न जोडणे.

10:12 Moodle मधील Enroll Students and Communicate नामक ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :

course मध्ये csv file द्वारे अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करणे.

10:25 groups मध्ये courses बनवा आणि विद्यार्थ्यांना messages आणि notes पाठवा.
10:31 नंतर ह्या सिरीजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आणखी काही ट्युटोरिअल्स असतील.
10:37 आतासाठी, सारांशित करू.

ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो आहोत : Learning Management Systems(थोडक्यात LMS ) ची संकल्पना

10:48 LMS म्हणून मूडल, Moodle कोण वापरू शकते आणि Moodle वेबसाइट्सची उदाहरणे.
10:57 आपण हेदेखील शिकलो - Moodle रन करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची आवश्यकता आणि

Moodle च्या सिरीजमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मुख्य वैशिष्ट्यांचा (फिचर्स) आढावा.

11:10 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाऊनलोड करून पहा.
11:18 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.

11:28 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:35 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.

11:45 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
11:51 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल.
11:59 फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
12:05 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
12:18 मी रंजना उके, आय.आय.टी. बॉम्बे स्पोकन ट्युटोरिअल टीमसह आपली रजा घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana