Linux-AWK/C2/Conditional-statements-in-awk/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | नमस्कार awk मध्ये conditional statements वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- awk मध्ये if, else, else if |
00:15 | आपण हे काही उदाहरणांद्वारे करू. |
00:19 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि gedit text editor 3.20.1 |
00:32 | तुमची तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:36 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्ही या वेबसाईटवरील आधीचे awk ट्युटोरिअल्स पहा. |
00:43 | तुम्ही C किंवा C++ सारख्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजशी परिचित असावे. |
00:50 | नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा. |
00:56 | या ट्युटोरियलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स या ट्यूटोरियल पेजवरील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहेत. कृपया त्यांना डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट (काढा) करा. |
01:06 | conditional statement क्रिया करण्याआधी आपल्याला निर्दिष्ट condition तपासण्याची परवानगी देते. |
01:14 | आता awk मध्ये if, else, else-if सारखे conditional statements कसे कार्य करते हे शिकू. |
01:22 | कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजप्रमाणे, if -else statement चे सिंटॅक्स आहे: |
01:28 | जर if conditional-expression1 true (बरोबर) असेल तर नंतर action1 करा. |
01:34 | जर else if conditional-expression2 true (बरोबर) असेल तर नंतर action 2 करा. |
01:41 | यानंतर अनेक else if statements येऊ शकते. |
01:46 | शेवटी, जर निर्दिष्ट conditional expressions मधून कोणतेही true नसेल तर नंतर action n करा. |
01:54 | else आणि else-if भाग वैकल्पिक(पर्यायी) आहेत.
आपण एक उदाहरण पाहू या. |
02:02 | आपण तीच awkdemo.txt फाईल वापरू जी आपण पूर्वी वापरली होती. |
02:10 | म्हणा कि, विद्यार्थ्यांना 8000 रुपयांपेक्षा जास्त मिळणार्या शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला ५०% वाढ देण्याची आवशकता आहे. |
02:19 | या condition साठी awk फाईल तयार करू. |
02:23 | टेक्स्ट एडिटरमध्ये दाखवल्याप्रमाणे खालील कोड टाईप करा आणि त्याला cond dot awk म्हणून सेव्ह करा. मी आधीच हे केले आहे. |
02:34 | तीच फाईल Code Files लिंकमध्ये देखील उपलब्ध आहे. |
02:39 | या कोडमध्ये, आम्ही Output Field Separator ला colon म्हणून सेट केले आहे. |
02:45 | प्रथम print statement field headings प्रिंट करते. |
02:50 | पुढे, if statement 6 व्या field ची व्हॅल्यू 8000 पेक्षा मोठे आहे की नाही हे तपासेल. |
02:58 | जर होय, तर दुसरा print statement कार्यान्वित होईल. |
03:03 | $6 into 1.5 या print statement च्या आत 6 व्या field ची व्हॅल्यू 1.5% टक्के ने गुणाकार करेल. |
03:13 | आता हा कोड कार्यान्वित करू. |
03:16 | CTRL, ALT आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा. |
03:22 | त्या फोल्डर वर जा ज्यात तुम्ही cd command वापरून Code Files डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट केले आहे. |
03:29 | आता टाईप करा: awk स्पेस hyphen capital F pipe symbol डबल कोट्समध्ये स्पेस hyphen small f स्पेस cond dot awk स्पेस awkdemo dot txt
Enter दाबा. |
03:49 | आउटपुट केवळ एक विद्यार्थीच्या वाढलेल्या शिष्यवृत्तीसह रेकॉर्ड दर्शवितो ज्याने condition पूर्ण केली आहे. |
03:57 | आता समजा नियम बदलला आहे: 8000 रुपयांपेक्षा जास्त मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये 50 टक्के वाढ. |
04:07 | अन्यथा 30% टक्के वाढ द्या.
आपण ते कसे करू शकतो? |
04:13 | आपल्याला else block जोडण्याची गरज आहे. |
04:16 | पुन्हा एकदा cond dot awk फाईलवर जा. |
04:21 | कोडची खालील ओळ(लाईन) समाविष्ट करूया.
शेवटचे बंद होणारे curly brace च्या पूर्वी एंटर दाबा. |
04:30 | else एंटर दाबा. |
04:33 | print स्पेस dollar 2 कॉमा dollar 6 कॉमा dollar 6 into 1.3
|
04:42 | फाईल सेव्ह करून टर्मिनल वर जा. |
04:46 | पूर्वी कार्यान्वित केलेले कमांड मिळविण्यासाठी अप की दाबा.
आणि एंटर दाबा. |
04:53 | आता आऊटपुट पहा.
योजना चौधरीला पूर्वी 1000 मिळत होते. आता तिला 1300 मिळत आहेत. |
05:04 | आता पुन्हा नियम बदलू.
8000 रुपयांपेक्षा जास्त मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये 50% टक्के वाढ. |
05:13 | 4000 रुपयांपेक्षा जास्त मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये 40% टक्के वाढ.
अन्यथा 30% टक्के वाढ द्या. |
05:23 | कोडवर जा. दर्शविल्याप्रमाणे कोड अपडेट करा. |
05:29 | फाईल सेव्ह करा आणि टर्मिनल वर जा. |
05:33 | मी टर्मिनल क्लिअर करते. |
05:36 | पूर्वी कार्यान्वित केलेले कमांड मिळविण्यासाठी अप की दाबा.
आणि एंटर दाबा. |
05:44 | या वेळी लक्षात घ्या की मीरा नायर विद्यार्थीला 40% वाढ मिळाली आहे. |
05:51 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:54 | थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो awk मध्ये if , else, else if सारखे conditional statements. |
06:05 | असाईनमेंट म्हणून नियमांनुसार ग्रेड द्या: जर गुण 90 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल तर ग्रेड A असेल. |
06:15 | जर गुण 80 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल परंतु 90 पेक्षा कमी असेल तर ग्रेड B असेल. |
06:23 | जर गुण 70 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल परंतु 80 पेक्षा कमी असेल तर ग्रेड C असेल. |
06:30 | जर गुण 60 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल परंतु 70 पेक्षा कमी असेल तर ग्रेड D असेल.
अन्यथा ग्रेड F असेल. |
06:41 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
06:49 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:58 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:02 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
07:08 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:20 | या स्क्रिप्टचे योगदान अंतराने केले आहे. आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |