Linux-AWK/C2/Conditional-statements-in-awk/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 नमस्कार awk मध्ये conditional statements वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- awk मध्ये if, else, else if
00:15 आपण हे काही उदाहरणांद्वारे करू.
00:19 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि gedit text editor 3.20.1
00:32 तुमची तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:36 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्ही या वेबसाईटवरील आधीचे awk ट्युटोरिअल्स पहा.
00:43 तुम्ही C किंवा C++ सारख्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजशी परिचित असावे.
00:50 नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा.
00:56 या ट्युटोरियलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स या ट्यूटोरियल पेजवरील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहेत. कृपया त्यांना डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट (काढा) करा.
01:06 conditional statement क्रिया करण्याआधी आपल्याला निर्दिष्ट condition तपासण्याची परवानगी देते.
01:14 आता awk मध्ये if, else, else-if सारखे conditional statements कसे कार्य करते हे शिकू.
01:22 कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजप्रमाणे, if -else statement चे सिंटॅक्स आहे:
01:28 जर if conditional-expression1 true (बरोबर) असेल तर नंतर action1 करा.
01:34 जर else if conditional-expression2 true (बरोबर) असेल तर नंतर action 2 करा.
01:41 यानंतर अनेक else if statements येऊ शकते.
01:46 शेवटी, जर निर्दिष्ट conditional expressions मधून कोणतेही true नसेल तर नंतर action n करा.
01:54 else आणि else-if भाग वैकल्पिक(पर्यायी) आहेत.

आपण एक उदाहरण पाहू या.

02:02 आपण तीच awkdemo.txt फाईल वापरू जी आपण पूर्वी वापरली होती.
02:10 म्हणा कि, विद्यार्थ्यांना 8000 रुपयांपेक्षा जास्त मिळणार्या शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला ५०% वाढ देण्याची आवशकता आहे.
02:19 या condition साठी awk फाईल तयार करू.
02:23 टेक्स्ट एडिटरमध्ये दाखवल्याप्रमाणे खालील कोड टाईप करा आणि त्याला cond dot awk म्हणून सेव्ह करा. मी आधीच हे केले आहे.
02:34 तीच फाईल Code Files लिंकमध्ये देखील उपलब्ध आहे.
02:39 या कोडमध्ये, आम्ही Output Field Separator ला colon म्हणून सेट केले आहे.
02:45 प्रथम print statement field headings प्रिंट करते.
02:50 पुढे, if statement 6 व्या field ची व्हॅल्यू 8000 पेक्षा मोठे आहे की नाही हे तपासेल.
02:58 जर होय, तर दुसरा print statement कार्यान्वित होईल.
03:03 $6 into 1.5 या print statement च्या आत 6 व्या field ची व्हॅल्यू 1.5% टक्के ने गुणाकार करेल.
03:13 आता हा कोड कार्यान्वित करू.
03:16 CTRL, ALT आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा.
03:22 त्या फोल्डर वर जा ज्यात तुम्ही cd command वापरून Code Files डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट केले आहे.
03:29 आता टाईप करा: awk स्पेस hyphen capital F pipe symbol डबल कोट्समध्ये स्पेस hyphen small f स्पेस cond dot awk स्पेस awkdemo dot txt

Enter दाबा.

03:49 आउटपुट केवळ एक विद्यार्थीच्या वाढलेल्या शिष्यवृत्तीसह रेकॉर्ड दर्शवितो ज्याने condition पूर्ण केली आहे.
03:57 आता समजा नियम बदलला आहे: 8000 रुपयांपेक्षा जास्त मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये 50 टक्के वाढ.
04:07 अन्यथा 30% टक्के वाढ द्या.

आपण ते कसे करू शकतो?

04:13 आपल्याला else block जोडण्याची गरज आहे.
04:16 पुन्हा एकदा cond dot awk फाईलवर जा.
04:21 कोडची खालील ओळ(लाईन) समाविष्ट करूया.

शेवटचे बंद होणारे curly brace च्या पूर्वी एंटर दाबा.

04:30 else एंटर दाबा.
04:33 print स्पेस dollar 2 कॉमा dollar 6 कॉमा dollar 6 into 1.3


04:42 फाईल सेव्ह करून टर्मिनल वर जा.
04:46 पूर्वी कार्यान्वित केलेले कमांड मिळविण्यासाठी अप की दाबा.

आणि एंटर दाबा.

04:53 आता आऊटपुट पहा.

योजना चौधरीला पूर्वी 1000 मिळत होते. आता तिला 1300 मिळत आहेत.

05:04 आता पुन्हा नियम बदलू.

8000 रुपयांपेक्षा जास्त मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये 50% टक्के वाढ.

05:13 4000 रुपयांपेक्षा जास्त मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये 40% टक्के वाढ.

अन्यथा 30% टक्के वाढ द्या.

05:23 कोडवर जा. दर्शविल्याप्रमाणे कोड अपडेट करा.
05:29 फाईल सेव्ह करा आणि टर्मिनल वर जा.
05:33 मी टर्मिनल क्लिअर करते.
05:36 पूर्वी कार्यान्वित केलेले कमांड मिळविण्यासाठी अप की दाबा.

आणि एंटर दाबा.

05:44 या वेळी लक्षात घ्या की मीरा नायर विद्यार्थीला 40% वाढ मिळाली आहे.
05:51 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:54 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो awk मध्ये if , else, else if सारखे conditional statements.
06:05 असाईनमेंट म्हणून नियमांनुसार ग्रेड द्या: जर गुण 90 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल तर ग्रेड A असेल.
06:15 जर गुण 80 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल परंतु 90 पेक्षा कमी असेल तर ग्रेड B असेल.
06:23 जर गुण 70 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल परंतु 80 पेक्षा कमी असेल तर ग्रेड C असेल.
06:30 जर गुण 60 पेक्षा जास्त आणि बरोबर असेल परंतु 70 पेक्षा कमी असेल तर ग्रेड D असेल.

अन्यथा ग्रेड F असेल.

06:41 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
06:49 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

06:58 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:02 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

07:08 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

07:20 या स्क्रिप्टचे योगदान अंतराने केले आहे. आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana