Health-and-Nutrition/C2/Side-lying-hold-for-breastfeeding/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:51, 9 January 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 स्तनपानासाठी झोपून दूध पाजण्याची पद्धत (Side-Lying) या वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू, आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे.
00:13 स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि झोपून दूध पाजण्याची पद्धत (side-lying) कशी करावी.
00:20 आता सुरवात करूया.जगभरात, सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असतांना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात.
00:27 मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे,

आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती ती आहे ज्यामध्ये- आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल.

00:40 बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल.
00:45 आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल.
00:49 आता Side-lying होल्ड नावाच्या नवीन स्थितीबद्दल जाणून घेऊ.
00:54 जेव्हा आई रात्रीच्या वेळेच स्तनपान देत असेल,
00:59 किंवा आईची प्रसूती सिझेरिअन द्वारे झाली असेल,
01:03 किंवा आई थकली असेल तेव्हा Side-lying स्तिथीची सल्ला दिली जाते.
01:06 आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी, स्वतःचे हात साबण आणि पाण्याने स्वछ धुवून सुकुवून घ्यावेत.
01:14 मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
01:18 स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिली लिटर दूध बनते.

म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.

01:30 मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान karavayache आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे.
01:35 आईने कपडे काढतांना खात्री करून घ्यावी कि तिच्या ब्लॉउज किंवा ब्रा मुळे स्तनांवर दबाव येऊ नये.
01:41 मग, आईने ज्या स्तनातून बाळाला स्तनपान करावयाचे आहे त्याबाजूने आरामशीरपणे झोपावे.
01:48 तिने तिच्या डोक्याखाली उशी ठेवावी. आणि झोपेत या कुशीवरुन त्या कुशीवर लोळणे टाळण्यासाठी तिच्या दोन्ही पायामधे उशी ठेवावी.
01:57 या चित्रातील आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तनातून स्तनपान करेल. म्हणूनच ती तिच्या उजव्या बाजूस झोपली आहे.
02:06 पुढे आपण बाळाच्या शरीराला योग्य स्थितीत कसे ठेवायचे.
02:12 बाळाला आईच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवा कि जेणेकरून तिचे पोट आईच्या पोटामुळे हळुवारपणे दबेल.
02:21 आई ज्या बाजूने झोपली आहे त्या बाजूच्या हाताने तिच्या बाळाच्या पाठीला आधार द्यावा.
02:29 या चित्रातील आई तिच्या उजव्या हाताने तिच्या बाळाच्या पाठीला आधार देत आहे.
02:36 बाळाच्या शरीराला जवळ धरून ठेवण्यासाठी आई तिच्या बाळाच्या पाठीमागे उशी ठेवू शकते.
02:42 त्यांच्या शरीरातील कमी अंतर बाळाला स्तनापर्यंत पोहोचण्यास कमी मेहनत घावी लागेल.
02:49 आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल.
02:55 लक्षात ठेवा- आईने तिची पाठ वाकवून स्तनाला कधीही बाळाकडे आणू नये.

यामुळे बाळाच्या पोटातील आणि आईच्या शरीरातील अंतर वाढेल.

03:06 आईने तिची पाठ नेहमी सरळ ठेवावी आणि बाळाला स्तनाकडे आणावे.
03:12 मग, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाच्या पूर्ण शरीराची दिशा.
03:21 आपण हे लक्षात घेतले असेल की - जेव्हा आपण अन्न खातो, आपल डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते.
03:31 त्याच प्रमाणे- स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे.
03:39 यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
03:44 आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये तिसऱ्या मुद्यावर आलो आहोत.
03:50 आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा.
03:54 नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घावी लागेल.
04:01 पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू.
04:07 बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
04:13 आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी.
04:17 यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल.
04:25 आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
04:32 कृपया लक्षात घ्या- Areola हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे.
04:39 आता बाळाला योग्यरीत्या पकडले आहे, आता आपण शिकूया स्तनाला कसे पकडावे.
04:46 दुसऱ्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून C आकारात पकडावे.
04:55 या चित्रामध्ये आई तिच्या डाव्या हाताने उजवे स्तन पकडेल.
05:05 आईची बोटे नेहमी बाळाच्या ओठांच्या दिशेने असावेत.
05:13 असे का? हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया.
05:18 जेव्हा आपण वडा पाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो.
05:25 मोठा घास घेण्यासाठी आपण वडा पाव किंवा बर्गर आडवे पकडतो.
05:31 इथे आपली बोटे आणि अंगठा ओठांच्या दिशेत आहेत.
05:37 जर आपण वडा पाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठ्ठा घास घेऊ शकणार नाही.
05:44 तसचे, इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशे कडे पाहुयात.

इथे त्याचे ओठ आडवे उघडलेले आहे.

05:51 म्हणून आईची बोटे आणि अंगठा स्तनावर आडवे ठेवणे गरजेचे आहे.
05:59 यामुळे बाळाला एरीओलाचा मोठ्ठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
06:05 बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पल पासून ३ बोटे अंतरावर असावी.
06:18 पुन्हा वडा पाव किंवा बर्गर खाताना आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठ्ठा घास घेऊ शकणार नाही.
06:28 आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.
06:34 म्हणून आपण मोठ्ठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.
06:40 तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे, बाळासाठी स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.
06:49 हे अंतर खात्री करेल कि- आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठ्ठा भाग तोंडात घेता येईल.
06:58 आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.
07:05 आई एरीओलाच्या खालील मोठ्या दुगध नलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते.
07:12 आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते.
07:19 वडा पाव किंवा बर्गरच्या उदाहरणाकडे परत जाऊ.
07:24 वडा पाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर, आपण मोठ्ठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो.
07:32 त्याचप्रमाणे, आईने स्तनाच्या बाजूला C आकारात पकडून हळुवार पणे दबाव द्यावा.

यामुळे बाळाला स्तनाचा मोठ्ठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.

07:46 पण लक्षात ठेवा, आईने तिचे स्तन कात्रीच्या आकारात पकडून दाबू नये.
07:53 कात्रीच्या आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.
08:00 हे सुद्धा खात्री करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.
08:07 नाहीतर निप्पल वरच्या किंवा खालच्या दिशेने सरकेल.
08:14 आणि बाळ स्तनाशी घट्ट पकड करू शकणार नाही.
08:19 आता बाळ side lying स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
08:27 स्तनाशी पकड घट्ट करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये स्पष्ट केली आहेत.
08:34 एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरित्या पकड झाली कि - आई स्तनावरुन तिचे हात काढू शकते.
08:41 आईने तिच्या ह्या हाताचा वापर बाळाच्या शरीराला आधार देण्यासाठी आणि जवळ आण्यासाठी केला पाहिजे.
08:49 तसेच, तिने तिचा हात बाळाच्या मागून हलवावा आणि तिच्या शरीराच्या 90 अंश मध्ये ठेवावा.
08:58 आई त्या हाताला बाजूने वळवून उशाच्या खाली पण ठेवू शकते.
09:04 या चित्रातील आईने तिच्या डाव्या हातातून तिच्या उजव्या स्तनाला सोडले(मुक्त केले) आहे.
09:11 आई तिच्या डाव्या हाताचा वापर बाळाच्या शरीराला आधार देण्यासाठी आणि बाळाला शरीराच्या जवळ आण्यासाठी करीत आहे.
09:19 तिने बाळाच्या मागून तिचा उजवा हात काढून,
09:22 तिच्या शरीराच्या 90 अंशमध्ये ठेवला आहे.
09:26 तिचा उजवा कोपर वळवून
09:29 उजव्या हाताला उशी खाली ठेवला आहे.
09:33 एका स्तनातून स्तनपान केल्यानंतर -

जर आईला दुसर्या स्तनातून स्तनपान करावयाचे असेल तर तिला दुसऱ्या बाजूला झोपावे लागेल.

09:43 या चित्रातील आई डाव्या स्तनातून दूध पाजण्यासाठी तिच्या डाव्या बाजूला वळली आहे.
09:50 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana