Health-and-Nutrition/C2/Side-lying-hold-for-breastfeeding/Marathi
From Script | Spoken-Tutorial
00:01 | स्तनपानासाठी झोपून दूध पाजण्याची पद्धत (Side-Lying) या वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू, आई आणि तिच्या बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे. |
00:13 | स्तनपान करण्यापूर्वी आईची तयारी आणि झोपून दूध पाजण्याची पद्धत (side-lying) कशी करावी. |
00:20 | आता सुरवात करूया.जगभरात, सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असतांना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात. |
00:27 | मागील ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे,
आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्तम स्तनपानाची स्थिती ती आहे ज्यामध्ये- आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होईपर्यंतचा काळ आरामदायक असेल. |
00:40 | बाळ आईच्या स्तनाशी योग्य पकड करू शकेल. |
00:45 | आणि त्याला भरपूर दूध मिळू शकेल. |
00:49 | आता Side-lying होल्ड नावाच्या नवीन स्थितीबद्दल जाणून घेऊ. |
00:54 | जेव्हा आई रात्रीच्या वेळेच स्तनपान देत असेल, |
00:59 | किंवा आईची प्रसूती सिझेरिअन द्वारे झाली असेल, |
01:03 | किंवा आई थकली असेल तेव्हा Side-lying स्तिथीची सल्ला दिली जाते. |
01:06 | आईने तिच्या बाळाला स्तनपान करण्यापूर्वी, स्वतःचे हात साबण आणि पाण्याने स्वछ धुवून सुकुवून घ्यावेत. |
01:14 | मग आईने एक ग्लास उकळून थंड केलेले पाणी प्यावे. |
01:18 | स्तनपान करणाऱ्या आईच्या स्तनांमध्ये सरासरी दररोज 750 ते 850 मिली लिटर दूध बनते.
म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे. |
01:30 | मग आईने ज्या स्तनाने बाळाला स्तनपान karavayache आहे त्या स्तनावरुन कपडे काढावे. |
01:35 | आईने कपडे काढतांना खात्री करून घ्यावी कि तिच्या ब्लॉउज किंवा ब्रा मुळे स्तनांवर दबाव येऊ नये. |
01:41 | मग, आईने ज्या स्तनातून बाळाला स्तनपान करावयाचे आहे त्याबाजूने आरामशीरपणे झोपावे. |
01:48 | तिने तिच्या डोक्याखाली उशी ठेवावी. आणि झोपेत या कुशीवरुन त्या कुशीवर लोळणे टाळण्यासाठी तिच्या दोन्ही पायामधे उशी ठेवावी. |
01:57 | या चित्रातील आई तिच्या बाळाला तिच्या उजव्या स्तनातून स्तनपान करेल. म्हणूनच ती तिच्या उजव्या बाजूस झोपली आहे. |
02:06 | पुढे आपण बाळाच्या शरीराला योग्य स्थितीत कसे ठेवायचे. |
02:12 | बाळाला आईच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवा कि जेणेकरून तिचे पोट आईच्या पोटामुळे हळुवारपणे दबेल. |
02:21 | आई ज्या बाजूने झोपली आहे त्या बाजूच्या हाताने तिच्या बाळाच्या पाठीला आधार द्यावा. |
02:29 | या चित्रातील आई तिच्या उजव्या हाताने तिच्या बाळाच्या पाठीला आधार देत आहे. |
02:36 | बाळाच्या शरीराला जवळ धरून ठेवण्यासाठी आई तिच्या बाळाच्या पाठीमागे उशी ठेवू शकते. |
02:42 | त्यांच्या शरीरातील कमी अंतर बाळाला स्तनापर्यंत पोहोचण्यास कमी मेहनत घावी लागेल. |
02:49 | आणि बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास सोपे जाईल. |
02:55 | लक्षात ठेवा- आईने तिची पाठ वाकवून स्तनाला कधीही बाळाकडे आणू नये.
यामुळे बाळाच्या पोटातील आणि आईच्या शरीरातील अंतर वाढेल. |
03:06 | आईने तिची पाठ नेहमी सरळ ठेवावी आणि बाळाला स्तनाकडे आणावे. |
03:12 | मग, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाळाच्या पूर्ण शरीराची दिशा. |
03:21 | आपण हे लक्षात घेतले असेल की - जेव्हा आपण अन्न खातो, आपल डोकं, मान आणि शरीर एका सरळ रेषेत असते. |
03:31 | त्याच प्रमाणे- स्तनपान करताना बाळाचं डोकं, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावे. |
03:39 | यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल. |
03:44 | आता आपण बाळाला ठेवण्याच्या स्थितीमध्ये तिसऱ्या मुद्यावर आलो आहोत. |
03:50 | आईने बाळाच्या पूर्ण शरीराला आधार द्यावा. |
03:54 | नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घावी लागेल. |
04:01 | पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटीची स्थिती पाहू. |
04:07 | बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत. |
04:13 | आणि हनुवटी पुढच्या बाजूस आणि स्तनांच्या खूप जवळ असावी. |
04:17 | यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरीओलाचा खालचा भाग जास्त तोंडात घेईल. |
04:25 | आणि म्हणून बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल. |
04:32 | कृपया लक्षात घ्या- Areola हा निप्पल भोवतीचा गडद भाग आहे. |
04:39 | आता बाळाला योग्यरीत्या पकडले आहे, आता आपण शिकूया स्तनाला कसे पकडावे. |
04:46 | दुसऱ्या हाताच्या बोटांचा वापर करून, आईने स्वतःच्या स्तनाला खालून C आकारात पकडावे. |
04:55 | या चित्रामध्ये आई तिच्या डाव्या हाताने उजवे स्तन पकडेल. |
05:05 | आईची बोटे नेहमी बाळाच्या ओठांच्या दिशेने असावेत. |
05:13 | असे का? हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया. |
05:18 | जेव्हा आपण वडा पाव किंवा बर्गर खातो आपण आपले ओठ आडवे उघडतो. |
05:25 | मोठा घास घेण्यासाठी आपण वडा पाव किंवा बर्गर आडवे पकडतो. |
05:31 | इथे आपली बोटे आणि अंगठा ओठांच्या दिशेत आहेत. |
05:37 | जर आपण वडा पाव किंवा बर्गर लंबकार पकडले तर आपण मोठ्ठा घास घेऊ शकणार नाही. |
05:44 | तसचे, इथे आपण बाळाच्या ओठांच्या दिशे कडे पाहुयात.
इथे त्याचे ओठ आडवे उघडलेले आहे. |
05:51 | म्हणून आईची बोटे आणि अंगठा स्तनावर आडवे ठेवणे गरजेचे आहे. |
05:59 | यामुळे बाळाला एरीओलाचा मोठ्ठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल. |
06:05 | बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पल पासून ३ बोटे अंतरावर असावी. |
06:18 | पुन्हा वडा पाव किंवा बर्गर खाताना आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठ्ठा घास घेऊ शकणार नाही. |
06:28 | आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल. |
06:34 | म्हणून आपण मोठ्ठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो. |
06:40 | तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे, बाळासाठी स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे. |
06:49 | हे अंतर खात्री करेल कि- आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठ्ठा भाग तोंडात घेता येईल. |
06:58 | आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते. |
07:05 | आई एरीओलाच्या खालील मोठ्या दुगध नलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते. |
07:12 | आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते. |
07:19 | वडा पाव किंवा बर्गरच्या उदाहरणाकडे परत जाऊ. |
07:24 | वडा पाव किंवा बर्गर योग्यरीत्या पकडल्यानंतर, आपण मोठ्ठा घास घेण्यासाठी त्यावर दबाव देतो. |
07:32 | त्याचप्रमाणे, आईने स्तनाच्या बाजूला C आकारात पकडून हळुवार पणे दबाव द्यावा.
यामुळे बाळाला स्तनाचा मोठ्ठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल. |
07:46 | पण लक्षात ठेवा, आईने तिचे स्तन कात्रीच्या आकारात पकडून दाबू नये. |
07:53 | कात्रीच्या आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल. |
08:00 | हे सुद्धा खात्री करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा. |
08:07 | नाहीतर निप्पल वरच्या किंवा खालच्या दिशेने सरकेल. |
08:14 | आणि बाळ स्तनाशी घट्ट पकड करू शकणार नाही. |
08:19 | आता बाळ side lying स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे. |
08:27 | स्तनाशी पकड घट्ट करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये स्पष्ट केली आहेत. |
08:34 | एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरित्या पकड झाली कि - आई स्तनावरुन तिचे हात काढू शकते. |
08:41 | आईने तिच्या ह्या हाताचा वापर बाळाच्या शरीराला आधार देण्यासाठी आणि जवळ आण्यासाठी केला पाहिजे. |
08:49 | तसेच, तिने तिचा हात बाळाच्या मागून हलवावा आणि तिच्या शरीराच्या 90 अंश मध्ये ठेवावा. |
08:58 | आई त्या हाताला बाजूने वळवून उशाच्या खाली पण ठेवू शकते. |
09:04 | या चित्रातील आईने तिच्या डाव्या हातातून तिच्या उजव्या स्तनाला सोडले(मुक्त केले) आहे. |
09:11 | आई तिच्या डाव्या हाताचा वापर बाळाच्या शरीराला आधार देण्यासाठी आणि बाळाला शरीराच्या जवळ आण्यासाठी करीत आहे. |
09:19 | तिने बाळाच्या मागून तिचा उजवा हात काढून, |
09:22 | तिच्या शरीराच्या 90 अंशमध्ये ठेवला आहे. |
09:26 | तिचा उजवा कोपर वळवून |
09:29 | उजव्या हाताला उशी खाली ठेवला आहे. |
09:33 | एका स्तनातून स्तनपान केल्यानंतर -
जर आईला दुसर्या स्तनातून स्तनपान करावयाचे असेल तर तिला दुसऱ्या बाजूला झोपावे लागेल. |
09:43 | या चित्रातील आई डाव्या स्तनातून दूध पाजण्यासाठी तिच्या डाव्या बाजूला वळली आहे. |
09:50 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |