Arduino/C2/Seven-Segment-Display/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:20, 7 December 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Seven Segment Display वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:

Seven Segment Display, Arduino board शी जोडणे आणि Seven Segment Display वर 0 ते 4 अंकांना प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहिणे

00:24 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि C किंवा C++ प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.
00:37 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे

Arduino UNO Board, उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम 14.04 आणि Arduino IDE.

00:52 आपल्याला काही बाह्य डिव्हाइसेसची देखील आवश्यकता असेल जसे की:

Seven-Segment Display, 220 ohm Resistor, Breadboard आणि Jumper Wires.

01:08 seven-segment display मध्ये सात LEDs 8 व्या अंकाच्या आकारात लावले आहेत.
01:17 दोन प्रकारचे डिस्प्ले आहेत:

common anode आणि common cathode seven segment display.

01:27 common cathode seven-segment display मध्ये , पिन्स a, b, c, d, e, f, g आणि dot +5V शी जोडलेले पाहिजे.
01:43 दोन COM pins ground (GND) शी जोडलेले पाहिजे.
01:49 common anode seven-segment display अगदी उलट आहे.
01:55 येथे, pins a, b, c, d, e, f, g आणि dot GND शी जोडलेले पाहिजे आणि दोन COM pins +5V शी जोडलेले पाहिजे .
02:12 आता आपण कनेक्शन सर्किटचे तपशील पाहू.
02:17 या प्रयोगात आपण common cathode seven-segment display वापरणार आहोत.
02:24 seven-segment display च्या Pins a, b, c, d, e, f आणि g क्रमशः Arduino च्या pins 2, 3, 4, 5, 6, 8 आणि 9 शी जोडलेले आहेत.
02:40 लक्षात घ्या कि आपण pin 7 शी जोडले नाही.
02:45 दोन सामान्य (COM) pins resistors द्वारे ground शी जोडलेले आहेत.

हे येथे काळ्या रंगाच्या वायरमध्ये दर्शविले आहे.

02:56 resistor ची व्हॅल्यू 220 ohms पेक्षा जास्त असली पाहिजे.

Dot असं जोडलेले नाही कारण या प्रयोगात त्याचा उपयोग केला जात नाही.

03:08 सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हे कनेक्शनचे थेट सेटअप आहे.
03:15 आता आपण Arduino IDE मध्ये एक प्रोग्राम लिहू. तर Arduino IDE वर जाऊ या.
03:24 प्रथम आपण seven segment display मध्ये LEDs लुकलुकण्यासाठी एक प्रोग्राम लिहू.
03:31 येथे दर्शविलेले code टाइप करा.
03:34 आम्ही सेगमेंट नावांना Arduino pins मध्ये असाइन केले आहेत.
03:39 यामुळे आपल्याला हे सहज लक्षात ठेवण्यास मदत करते जे Arduino ports डिस्प्ले सेगमेंटशी जोडलेली आहेत.
03:47 हे कोड आपल्या सोयीसाठी या ट्यूटोरियलच्या code file लिंकमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही डाउनलोड करुन त्याचा वापर करू शकता.
03:57 void setup फंक्शनमध्ये, pin ला output मोडमध्ये कॉन्फिगर करण्यासाठी आपण pinMode फंक्शनचा वापर करू.
04:07 आता आपण void loop साठी कोड लिहूया.

Void loop फंक्शन seven segment display च्या LED ला ब्लिंक करेल.

04:18 पूर्वीच्या ट्यूटोरियल मध्ये कोड समान आहे.
04:23 आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करू.
04:27 आता आपण पाहू शकतो की सेव्हन सेगमेंटमध्ये सर्व LEDs चमकत आहेत.
04:35 पुढे आपण काही अंक दाखवण्यास प्रोग्राम मध्ये बदल करू.
04:41 समजा आपल्याला शून्य अंक दर्शवायचा आहे.
04:46 सेगमेंट 'g' चे LEDs कमी असावे आणि इतर सर्व LED segments उच्च असावे.
04:54 '1' दाखवण्यासाठी b आणि c segments उच्च असावे आणि इतर LEDS कमी असावे.

त्याचप्रमाणे, आपण इतर सर्व अंकांसाठी कोड लिहू शकतो.

05:10 आपण Arduino IDE वर जाऊया.
05:14 येथे दर्शविल्याप्रमाणे void loop फंक्शनमध्ये कोड बदला.

मी 0,1,2,3 आणि 4 अंक दर्शविण्यासाठी कोड लिहिला आहे.

05:31 आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करू.
05:35 आपण पाहू शकता की 0 ते 4 अंक दर्शविले आहेत, त्यांच्या दरम्यान 1 सेकंदात विलंब होतो.
05:45 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
05:52 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो,

Seven Segment Display, Arduino board शी जोडणे आणि Seven Segment Display वर 0 ते 4 अंकांना प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहिणे.

06:07 पुढील असाइनमेंट करण्याचा प्रयत्न करा.

अंक 5,6,7,8 आणि 9 दर्शविण्यासाठी समान प्रोग्राम बदला.

प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा आणि seven segment display मधील प्रदर्शित अंकांचे निरीक्षण करा.

06:27 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
06:35 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम:

स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

06:44 कृपया या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
06:48 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

07:00 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana