Arduino/C2/Seven-Segment-Display/Marathi
Time | Narration |
00:01 | Seven Segment Display वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:
Seven Segment Display, Arduino board शी जोडणे आणि Seven Segment Display वर 0 ते 4 अंकांना प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहिणे |
00:24 | हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि C किंवा C++ प्रोग्रामिंग लँग्वेजचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. |
00:37 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे
Arduino UNO Board, उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम 14.04 आणि Arduino IDE. |
00:52 | आपल्याला काही बाह्य डिव्हाइसेसची देखील आवश्यकता असेल जसे की:
Seven-Segment Display, 220 ohm Resistor, Breadboard आणि Jumper Wires. |
01:08 | seven-segment display मध्ये सात LEDs 8 व्या अंकाच्या आकारात लावले आहेत. |
01:17 | दोन प्रकारचे डिस्प्ले आहेत:
common anode आणि common cathode seven segment display. |
01:27 | common cathode seven-segment display मध्ये , पिन्स a, b, c, d, e, f, g आणि dot +5V शी जोडलेले पाहिजे. |
01:43 | दोन COM pins ground (GND) शी जोडलेले पाहिजे. |
01:49 | common anode seven-segment display अगदी उलट आहे. |
01:55 | येथे, pins a, b, c, d, e, f, g आणि dot GND शी जोडलेले पाहिजे आणि दोन COM pins +5V शी जोडलेले पाहिजे . |
02:12 | आता आपण कनेक्शन सर्किटचे तपशील पाहू. |
02:17 | या प्रयोगात आपण common cathode seven-segment display वापरणार आहोत. |
02:24 | seven-segment display च्या Pins a, b, c, d, e, f आणि g क्रमशः Arduino च्या pins 2, 3, 4, 5, 6, 8 आणि 9 शी जोडलेले आहेत. |
02:40 | लक्षात घ्या कि आपण pin 7 शी जोडले नाही. |
02:45 | दोन सामान्य (COM) pins resistors द्वारे ground शी जोडलेले आहेत.
हे येथे काळ्या रंगाच्या वायरमध्ये दर्शविले आहे. |
02:56 | resistor ची व्हॅल्यू 220 ohms पेक्षा जास्त असली पाहिजे.
Dot असं जोडलेले नाही कारण या प्रयोगात त्याचा उपयोग केला जात नाही. |
03:08 | सर्किट आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हे कनेक्शनचे थेट सेटअप आहे. |
03:15 | आता आपण Arduino IDE मध्ये एक प्रोग्राम लिहू. तर Arduino IDE वर जाऊ या. |
03:24 | प्रथम आपण seven segment display मध्ये LEDs लुकलुकण्यासाठी एक प्रोग्राम लिहू. |
03:31 | येथे दर्शविलेले code टाइप करा. |
03:34 | आम्ही सेगमेंट नावांना Arduino pins मध्ये असाइन केले आहेत. |
03:39 | यामुळे आपल्याला हे सहज लक्षात ठेवण्यास मदत करते जे Arduino ports डिस्प्ले सेगमेंटशी जोडलेली आहेत. |
03:47 | हे कोड आपल्या सोयीसाठी या ट्यूटोरियलच्या code file लिंकमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही डाउनलोड करुन त्याचा वापर करू शकता. |
03:57 | void setup फंक्शनमध्ये, pin ला output मोडमध्ये कॉन्फिगर करण्यासाठी आपण pinMode फंक्शनचा वापर करू. |
04:07 | आता आपण void loop साठी कोड लिहूया.
Void loop फंक्शन seven segment display च्या LED ला ब्लिंक करेल. |
04:18 | पूर्वीच्या ट्यूटोरियल मध्ये कोड समान आहे. |
04:23 | आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करू. |
04:27 | आता आपण पाहू शकतो की सेव्हन सेगमेंटमध्ये सर्व LEDs चमकत आहेत. |
04:35 | पुढे आपण काही अंक दाखवण्यास प्रोग्राम मध्ये बदल करू. |
04:41 | समजा आपल्याला शून्य अंक दर्शवायचा आहे. |
04:46 | सेगमेंट 'g' चे LEDs कमी असावे आणि इतर सर्व LED segments उच्च असावे. |
04:54 | '1' दाखवण्यासाठी b आणि c segments उच्च असावे आणि इतर LEDS कमी असावे.
त्याचप्रमाणे, आपण इतर सर्व अंकांसाठी कोड लिहू शकतो. |
05:10 | आपण Arduino IDE वर जाऊया. |
05:14 | येथे दर्शविल्याप्रमाणे void loop फंक्शनमध्ये कोड बदला.
मी 0,1,2,3 आणि 4 अंक दर्शविण्यासाठी कोड लिहिला आहे. |
05:31 | आता आपण प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करू. |
05:35 | आपण पाहू शकता की 0 ते 4 अंक दर्शविले आहेत, त्यांच्या दरम्यान 1 सेकंदात विलंब होतो. |
05:45 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
05:52 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो,
Seven Segment Display, Arduino board शी जोडणे आणि Seven Segment Display वर 0 ते 4 अंकांना प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्राम लिहिणे. |
06:07 | पुढील असाइनमेंट करण्याचा प्रयत्न करा.
अंक 5,6,7,8 आणि 9 दर्शविण्यासाठी समान प्रोग्राम बदला. प्रोग्राम कंपाइल करून अपलोड करा आणि seven segment display मधील प्रदर्शित अंकांचे निरीक्षण करा. |
06:27 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
06:35 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम:
स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
06:44 | कृपया या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
06:48 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
07:00 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |