Synfig/C2/Bouncing-ball-animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Synfig वापरून Bouncing Ball animation वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण Synfig च्या इंटरफेसबद्दल शिकू. |
00:12 | तसेच आपण मूलभूत आकृत्या काढणे आणि रंग भरणे शिकू. |
00:16 | keyframes आणि waypoints जोडणे. |
00:19 | squash effect सह बॉल एनिमेशन काढणे. |
00:22 | gif फॉरमॅट मध्ये आउटपुट रेंडर करणे. |
00:26 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:37 | Dash home वर जा आणि टाईप करा Synfig. |
00:40 | तुम्ही लोगो वर क्लिक करून Synfig उघडू शकता. |
00:44 | हे Synfig चे इंटरफेस आहे. |
00:46 | मेनूबार शीर्षस्थानी आहे. |
00:50 | Menu bar च्या खाली Standard toolbar स्थित आहे. येथे आपल्याला काही शॉर्टकट आणि handles पर्याय मिळेल. |
00:58 | त्यानंतर आडव्या व उभ्या फूटपट्टी आहेत. |
01:02 | Tool box इंटरफेसच्या डाव्या बाजूला आहे. |
01:06 | टूल बॉक्सच्या खाली, लक्ष द्या तेथे दोन बॉक्सेस आहेत. |
01:10 | वरील बॉक्स काळ्या रंगात आहे. आणि टूल-टिप दाखवतो कि ते Outline color आहे. |
01:16 | खालील बॉक्स पांढऱ्या रंगात आहे. आणि टूल-टिप दाखवतो कि ते Fill color आहे. |
01:21 | मध्य भागी canvas आहे. येथे आपण आपल्या एनिमेशन करू. |
01:27 | canvas च्या खाली अॅनिमेशन पॅनल आहे. |
01:30 | येथे आपण एनिमेशनशी संबंधित असलेले बटन्स पाहू शकता. |
01:35 | इंटरफेसच्या डाव्या तळाशी Parameters panel आहे. |
01:39 | canvas वर एक ऑब्जेक्ट बनविल्यानंतर Parameters दृश्यमान होईल. |
01:43 | याच्या पुढे Keyframes panel आहे. येथे आपण keyframes जोडणार आहोत. |
01:49 | या पॅनेलच्या उजवीकडे आपल्याला Time track panel मिळू शकेल. |
01:54 | येथे आपण एनिमेशनचे waypoints आणि key frame संकेत पाहण्यास सक्षम आहोत. |
02:01 | canvas वर एक एनिमेशन बनविल्यानंतर Waypoints दृश्यमान होईल. |
02:05 | इंटरफेसच्या उजव्या तळाशी, Layers panel आहे. |
02:10 | Layers panel वर, आपण Tool options panel पाहू शकतो. |
02:14 | आणि या पॅनलच्या वर, तुम्हाला Canvas browser मिळेल. |
02:19 | Palette editor |
02:21 | Navigator आणि Info panels |
02:24 | आपल्याला या सर्व पर्यायांचे उपयोग करण्याची सवय होऊ शकते, जसे जसे आपण पुढे जाऊ. |
02:28 | आता, आपण आपल्या पहिल्या एनिमेशनने सुरवात करू. |
02:31 | प्रथम आपण एक बॅकग्राऊंड बनवू. |
02:34 | Tool box वर जा. Rectangle tool वर क्लिक करा. |
02:37 | Tool options panel मध्ये बदल लक्षात घ्या. |
02:41 | Layer Type च्या अंतर्गत आपण अनेक आईकंस पाहू शकतो. |
02:44 | Create a region layer आयत निवडा. या डेमोसाठी आपण इतर सेटींग्ज तश्याच सोडून देऊ. |
02:51 | आता दाखवल्याप्रमाणे कॅनव्हसच्या 3/4 व्या भागावर आयत काढा. |
02:57 | कृपया लक्षात घ्या की डिफॉल्टपणे भरणारा रंग पांढरा आहे, याचा अर्थ असा होतो की जर आपण 'कॅनव्हस' च्या बाहेर काढले तर ऑब्जेक्ट शोधणे कठीण होईल. |
03:07 | लक्षात घ्या की Layers Panel मध्ये layer तयार आहे. |
03:11 | Synfig हे डिफॉल्टनुसार नाव देते. येथे याला Rectangle060Region असे म्हणतात. |
03:18 | लयेर्सना अर्थपूर्ण नावे देणे हा एक चांगला अभ्यास आहे. |
03:21 | हे लेयर्सच्या लांब यादीमधून विशिष्ट ऑब्जेक्ट शोधण्यास मदत करते. |
03:28 | जेव्हा आपण क्लिष्ट एनिमेशन तयार करतो तेव्हा आपण याबद्दल प्रशंसा कराल. |
03:32 | Synfig इंटरफेसवर परत या. |
03:35 | मी ह्या डिफॉल्ट लेअरचे नाव Sky मध्ये बदलेल. |
03:39 | तर Name वर क्लिक करा , टाईप करा Sky आणि एंटर दाबा. |
03:43 | लेअरचे नाव आता sky आहे. |
03:46 | कृपया लक्षात घ्या की कर्सर अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून, मागील कृतीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सहजगत्या क्लिक करणे टाळा. |
03:55 | Parameters panel मध्ये आयतासाठी पॅरामिटर्स तयार केले जातात. |
04:00 | Color parameter शोधून Value कॉलम वर डबल क्लिक करा. लगेचच एक डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:08 | RGB scrollers ड्रॅग करून रंग निळ्या मधले बदला. |
04:13 | आता, हा डायलॉग बॉक्स बंद करा. |
04:15 | पुढे, Transform tool वर क्लिक करा. |
04:19 | नंतर Sky layer डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा. |
04:24 | आता पुन्हा Rectangle tool निवडा. |
04:26 | कॅनव्हसच्या खालील भागामध्ये दुसरा आयत बनवा. |
04:31 | पूर्वी दाखवल्याप्रमाणे लेअरचे नाव Ground आणि रंग हिरव्या मध्ये बदला. |
04:40 | Transform tool निवडून layer डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा. |
04:46 | पुढे एक ball(चेंडू) काढू. Toolbox मध्ये Circle tool वर क्लिक करा. |
04:52 | Layer Type अंतर्गत, Create a region layer निवडणे आवश्यक आहे. |
04:57 | कॅनव्हस' च्या वरच्या भागावर क्लिक करून एक वर्तुळ काढा. |
05:01 | पूर्वी दाखवल्याप्रमाणे, Layers panel मध्ये लेअरचे नाव Ball म्हणून रिनेम करा. |
05:07 | रंग लाल मध्ये बदला. |
05:11 | आता आपण ball (चेंडू) ऍनिमेट करण्यास सुरवात करू. Transform tool निवडा. |
05:16 | 'एनिमेशन पॅनल' मध्ये Turn on animate editing mode आयकन वर क्लिक करा. |
05:22 | स्क्रीनवर दिसणारी लाल सीमा असलेला आयत , दर्शविते की आपण एनिमेशन मोडमध्ये आहोत. |
05:29 | current frame बॉक्स मध्ये 9 एंटर करा. एंटर दाबा. |
05:34 | पुढे, Keyframes panel वर क्लिक करा. |
05:36 | येथे नवीन keyframe जोडण्यासाठी, हिरव्या रंगाच्या प्लस चिन्ह आयकन वर क्लिक करा. |
05:41 | canvas वर बॉल (चेंडू) निवडा. |
05:44 | लक्षात घ्या, बॉलच्या मध्यभागी हिरवा बिंदू आहे. |
05:47 | कॅनव्हसच्या तळाशी बॉल(चेंडू) हलविण्यासाठी हा हिरवा बिंदू ड्रॅग करा. |
05:52 | दाखवल्याप्रमाणे बॉल ग्राउंडच्या वरती थोडे हलवा. |
05:55 | ड्रॅग करतांना एक सरळ रेषेत हलविण्यासाठी shift key वापरा. |
05:59 | Time track panel वर waypoints तयार झालेले बघा. |
06:04 | आपण 11 व्या फ्रेमवर जाऊ या. पुन्हा एकदा, दाखवल्याप्रमाणे एक नवीन keyframe जोडूया. |
06:12 | बॉल(चेंडू) थोडे खाली हलवू, जेणेकरून बॉल(चेंडू) ग्राउंडला स्पर्श करेल. |
06:16 | बॉलभोवती नारिंगी आणि पिवळे ठिपके पहा. हे handles म्हणून ओळखले जातात. |
06:22 | चेंगरण्यासारखे प्रभाव देण्यासाठी handles मध्ये नारिंगी बिंदू वापरुन दर्शविल्याप्रमाणे बॉलचा आकार बदला. |
06:31 | Time cursor 13 व्या फ्रेमवर हलवा. |
06:36 | Keyframes panel वर 9 वी फ्रेम निवडा. |
06:39 | तळाशी Duplicate आयकन वर क्लिक करा. |
06:43 | Time cursor 24 व्या फ्रेमवर हलवा. |
06:46 | Keyframes panel वर ज़िरोथ (शून्य) फ्रेम निवडा. |
06:50 | पुन्हा तळाशी Duplicate आयकन वर क्लिक करा. |
06:53 | ज़िरोथ (शून्य) फ्रेम वर जा. बॉल(चेंडू) डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा. |
06:59 | एनिमेशन जे आपण तयार केले आहे ते पाहण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
07:04 | आता Pause बटणवर क्लिक करा. |
07:07 | शेवटी, फाइल सेव्ह करू. |
07:09 | File वर जा आणि Save वर क्लिक करा. मी Desktop वर सेव्ह करेल. |
07:14 | Synfig हे फाइलला डिफॉल्ट नाव देते, जसे तुम्ही येथे पाहू शकता. |
07:18 | मी हे नाव Bouncing-ball मध्ये बदलेल. |
07:22 | पहा उपलब्ध Synfig फाइलचे एक्सटेन्शन्स dot sifz, dot sif, dot sfg आहेत. |
07:31 | मी dot sifz फॉरमॅट निवडेल. |
07:34 | Save वर क्लिक करा. आता एनिमेशन रेंडर करूया. |
07:39 | File वर जाऊन Render वर क्लिक करा. |
07:42 | Render settings डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:45 | तुमच्या पसंतीनुसार .gif एक्सटेंशनसह एक योग्य फाइलनाव द्या. |
07:50 | सेव्ह करण्यास लोकेशन निवडण्यास Choose बटण वर क्लिक करा. |
07:54 | मी Desktop निवडून OK वर क्लिक करेन. |
07:57 | Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि Magick++ निवडा. |
08:03 | प्लस चिन्हावर क्लिक करून Quality जास्तीत जास्त म्हणजे 9 पर्यंत वाढवा. ही व्हॅल्यू कधीही ३ च्या खाली नसावी. |
08:11 | इमेजची सेटिंग्ज तशीच सोडून द्या. |
08:14 | Time टॅब वर क्लिक करा. येथे, frame rate 24 fps असावी. |
08:20 | हे विनाचुकांच्या एक स्मूथ एनिमेशन देईल. |
08:24 | End Time 24 मध्ये बदला, आमचे एनिमेशन 24 व्या सेकंदात संपते. एंटर दाबा. |
08:31 | शेवटी, तळाशी Render बटणवर क्लिक करा. आउटपुट रेंडर करण्यासाठी काही सेकंद लागतील. |
08:38 | आता मी Desktop वर जाते, जिथे मी माझी .gif फाइल सेव्ह केली आहे. |
08:44 | आपण कोणत्याही वेब ब्राउजरद्वारे किंवा Firefox वापरून एनिमेशन करू शकतो. |
08:48 | कृपया लक्षात ठेवा आपल्याला एनिमेशन करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. |
08:54 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:57 | थोडक्यात. |
08:59 | या ट्युटोरिअल मध्ये, आपण Synfig च्या इंटरफेसबद्दल शिकलो. |
09:03 | आपण मूलभूत आकृत्या काढणे आणि रंग भरणे देखील शिकलो. |
09:07 | keyframes आणि waypoints जोडणे. |
09:10 | squash effect सह बॉल(चेंडू) एनिमेशन काढणे. |
09:13 | gif फॉरमॅट मध्ये आउटपुट रेंडर करणे. |
09:16 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. तिरप्या रेषेत एक बॉल(चेंडू) एनिमेशन तयार करा. |
09:23 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
09:27 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
09:33 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:38 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
09:44 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या. |
09:49 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा. |
09:52 | तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
09:58 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
10:02 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. |
10:08 | फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
10:13 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या विषयी अधिक माहिती
या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:23 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली राजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |