Synfig/C2/Bouncing-ball-animation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Synfig वापरून Bouncing Ball animation वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये, आपण Synfig च्या इंटरफेसबद्दल शिकू.
00:12 तसेच आपण मूलभूत आकृत्या काढणे आणि रंग भरणे शिकू.
00:16 keyframes आणि waypoints जोडणे.
00:19 squash effect सह बॉल एनिमेशन काढणे.
00:22 gif फॉरमॅट मध्ये आउटपुट रेंडर करणे.
00:26 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टिम आणि Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे.
00:37 Dash home वर जा आणि टाईप करा Synfig.
00:40 तुम्ही लोगो वर क्लिक करून Synfig उघडू शकता.
00:44 हे Synfig चे इंटरफेस आहे.
00:46 मेनूबार शीर्षस्थानी आहे.
00:50 Menu bar च्या खाली Standard toolbar स्थित आहे. येथे आपल्याला काही शॉर्टकट आणि handles पर्याय मिळेल.
00:58 त्यानंतर आडव्या व उभ्या फूटपट्टी आहेत.
01:02 Tool box इंटरफेसच्या डाव्या बाजूला आहे.
01:06 टूल बॉक्सच्या खाली, लक्ष द्या तेथे दोन बॉक्सेस आहेत.
01:10 वरील बॉक्स काळ्या रंगात आहे. आणि टूल-टिप दाखवतो कि ते Outline color आहे.
01:16 खालील बॉक्स पांढऱ्या रंगात आहे. आणि टूल-टिप दाखवतो कि ते Fill color आहे.
01:21 मध्य भागी canvas आहे. येथे आपण आपल्या एनिमेशन करू.
01:27 canvas च्या खाली अॅनिमेशन पॅनल आहे.
01:30 येथे आपण एनिमेशनशी संबंधित असलेले बटन्स पाहू शकता.
01:35 इंटरफेसच्या डाव्या तळाशी Parameters panel आहे.
01:39 canvas वर एक ऑब्जेक्ट बनविल्यानंतर Parameters दृश्यमान होईल.
01:43 याच्या पुढे Keyframes panel आहे. येथे आपण keyframes जोडणार आहोत.
01:49 या पॅनेलच्या उजवीकडे आपल्याला Time track panel मिळू शकेल.
01:54 येथे आपण एनिमेशनचे waypoints आणि key frame संकेत पाहण्यास सक्षम आहोत.
02:01 canvas वर एक एनिमेशन बनविल्यानंतर Waypoints दृश्यमान होईल.
02:05 इंटरफेसच्या उजव्या तळाशी, Layers panel आहे.
02:10 Layers panel वर, आपण Tool options panel पाहू शकतो.
02:14 आणि या पॅनलच्या वर, तुम्हाला Canvas browser मिळेल.
02:19 Palette editor
02:21 Navigator आणि Info panels
02:24 आपल्याला या सर्व पर्यायांचे उपयोग करण्याची सवय होऊ शकते, जसे जसे आपण पुढे जाऊ.
02:28 आता, आपण आपल्या पहिल्या एनिमेशनने सुरवात करू.
02:31 प्रथम आपण एक बॅकग्राऊंड बनवू.
02:34 Tool box वर जा. Rectangle tool वर क्लिक करा.
02:37 Tool options panel मध्ये बदल लक्षात घ्या.
02:41 Layer Type च्या अंतर्गत आपण अनेक आयकंस पाहू शकतो.
02:44 Create a region layer आयत निवडा. या डेमोसाठी आपण इतर सेटींग्ज तश्याच सोडून देऊ.
02:51 आता दाखवल्याप्रमाणे कॅनव्हसच्या 3/4 व्या भागावर आयत काढा.
02:57 कृपया लक्षात घ्या की डिफॉल्टपणे भरणारा रंग पांढरा आहे, याचा अर्थ असा होतो की जर आपण 'कॅनव्हस' च्या बाहेर काढले तर ऑब्जेक्ट शोधणे कठीण होईल.
03:07 लक्षात घ्या की Layers Panel मध्ये layer तयार आहे.
03:11 Synfig हे डिफॉल्टनुसार नाव देते. येथे याला Rectangle060Region असे म्हणतात.
03:18 लेअर्सना अर्थपूर्ण नावे देणे हा एक चांगला अभ्यास आहे.
03:21 हे लेअर्सच्या लांब यादीमधून विशिष्ट ऑब्जेक्ट शोधण्यास मदत करते.
03:28 जेव्हा आपण क्लिष्ट एनिमेशन तयार करतो तेव्हा आपण याबद्दल प्रशंसा कराल.
03:32 Synfig इंटरफेसवर परत या.
03:35 मी ह्या डिफॉल्ट लेअरचे नाव Sky मध्ये बदलेल.
03:39 तर Name वर क्लिक करा, टाईप करा Sky आणि एंटर दाबा.
03:43 लेअरचे नाव आता sky आहे.
03:46 कृपया लक्षात घ्या की कर्सर अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून, मागील कृतीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सहजगत्या क्लिक करणे टाळा.
03:55 Parameters panel मध्ये आयतासाठी पॅरामिटर्स तयार केले जातात.
04:00 Color parameter शोधून Value कॉलम वर डबल क्लिक करा. लगेचच एक डायलॉग बॉक्स दिसेल.
04:08 RGB scrollers ड्रॅग करून रंग निळ्या मधले बदला.
04:13 आता, हा डायलॉग बॉक्स बंद करा.
04:15 पुढे, Transform tool वर क्लिक करा.
04:19 नंतर Sky layer डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा.
04:24 आता पुन्हा Rectangle tool निवडा.
04:26 कॅनव्हसच्या खालील भागामध्ये दुसरा आयत बनवा.
04:31 पूर्वी दाखवल्याप्रमाणे लेअरचे नाव Ground आणि रंग हिरव्या मध्ये बदला.
04:40 Transform tool निवडून layer डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा.
04:46 पुढे एक ball(चेंडू) काढू. Toolbox मध्ये Circle tool वर क्लिक करा.
04:52 Layer Type अंतर्गत, Create a region layer निवडणे आवश्यक आहे.
04:57 कॅनव्हसच्या वरच्या भागावर क्लिक करून एक वर्तुळ काढा.
05:01 पूर्वी दाखवल्याप्रमाणे, Layers panel मध्ये लेअरचे नाव Ball म्हणून रिनेम करा.
05:07 रंग लाल मध्ये बदला.
05:11 आता आपण ball (चेंडू) ऍनिमेट करण्यास सुरवात करू. Transform tool निवडा.
05:16 'एनिमेशन पॅनल' मध्ये Turn on animate editing mode आयकन वर क्लिक करा.
05:22 स्क्रीनवर दिसणारी लाल सीमा असलेला आयत , दर्शविते की आपण एनिमेशन मोडमध्ये आहोत.
05:29 current frame बॉक्स मध्ये 9 एंटर करा. एंटर दाबा.
05:34 पुढे, Keyframes panel वर क्लिक करा.
05:36 येथे नवीन keyframe जोडण्यासाठी, हिरव्या रंगाच्या प्लस चिन्ह आयकन वर क्लिक करा.
05:41 canvas वर बॉल (चेंडू) निवडा.
05:44 लक्षात घ्या, बॉलच्या मध्यभागी हिरवा बिंदू आहे.
05:47 कॅनव्हसच्या तळाशी बॉल(चेंडू) हलविण्यासाठी हा हिरवा बिंदू ड्रॅग करा.
05:52 दाखवल्याप्रमाणे बॉल ग्राउंडच्या वरती थोडे हलवा.
05:55 ड्रॅग करतांना एक सरळ रेषेत हलविण्यासाठी shift key वापरा.
05:59 Time track panel वर waypoints तयार झालेले बघा.
06:04 आपण 11 व्या फ्रेमवर जाऊ या. पुन्हा एकदा, दाखवल्याप्रमाणे एक नवीन keyframe जोडूया.
06:12 बॉल(चेंडू) थोडे खाली हलवू, जेणेकरून बॉल(चेंडू) ग्राउंडला स्पर्श करेल.
06:16 बॉलभोवती नारिंगी आणि पिवळे ठिपके पहा. हे handles म्हणून ओळखले जातात.
06:22 चेंगरण्यासारखे प्रभाव देण्यासाठी handles मध्ये नारिंगी बिंदू वापरुन दर्शविल्याप्रमाणे बॉलचा आकार बदला.
06:31 Time cursor 13 व्या फ्रेमवर हलवा.
06:36 Keyframes panel वर 9 वी फ्रेम निवडा.
06:39 तळाशी Duplicate आयकन वर क्लिक करा.
06:43 Time cursor 24 व्या फ्रेमवर हलवा.
06:46 Keyframes panel वर ज़िरोथ(शून्य) फ्रेम निवडा.
06:50 पुन्हा तळाशी Duplicate आयकन वर क्लिक करा.
06:53 ज़िरोथ(शून्य) फ्रेम वर जा. बॉल(चेंडू) डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा.
06:59 एनिमेशन जे आपण तयार केले आहे ते पाहण्यासाठी Play बटणावर क्लिक करा.
07:04 आता Pause बटणवर क्लिक करा.
07:07 शेवटी, फाइल सेव्ह करू.
07:09 File वर जा आणि Save वर क्लिक करा. मी Desktop वर सेव्ह करेल.
07:14 Synfig हे फाइलला डिफॉल्ट नाव देते, जसे तुम्ही येथे पाहू शकता.
07:18 मी हे नाव Bouncing-ball मध्ये बदलेल.
07:22 पहा उपलब्ध Synfig फाइलचे एक्सटेन्शन्स dot sifz, dot sif, dot sfg आहेत.
07:31 मी dot sifz फॉरमॅट निवडेल.
07:34 Save वर क्लिक करा. आता एनिमेशन रेंडर करूया.
07:39 File वर जाऊन Render वर क्लिक करा.
07:42 Render settings डायलॉग बॉक्स उघडेल.
07:45 तुमच्या पसंतीनुसार .gif एक्सटेंशनसह एक योग्य फाइलनाव द्या.
07:50 सेव्ह करण्यास लोकेशन निवडण्यास Choose बटण वर क्लिक करा.
07:54 मी Desktop निवडून OK वर क्लिक करेन.
07:57 Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि Magick++ निवडा.
08:03 प्लस चिन्हावर क्लिक करून Quality जास्तीत जास्त म्हणजे 9 पर्यंत वाढवा. ही व्हॅल्यू कधीही ३ च्या खाली नसावी.
08:11 इमेजची सेटिंग्ज तशीच सोडून द्या.
08:14 Time टॅब वर क्लिक करा. येथे, frame rate 24 fps असावी.
08:20 हे विनाचुकांच्या एक स्मूथ एनिमेशन देईल.
08:24 End Time 24 मध्ये बदला, आमचे एनिमेशन 24 व्या सेकंदात संपते. एंटर दाबा.
08:31 शेवटी, तळाशी Render बटणवर क्लिक करा. आउटपुट रेंडर करण्यासाठी काही सेकंद लागतील.
08:38 आता मी Desktop वर जाते, जिथे मी माझी .gif फाइल सेव्ह केली आहे.
08:44 आपण कोणत्याही वेब ब्राउजरद्वारे किंवा Firefox वापरून एनिमेशन करू शकतो.
08:48 कृपया लक्षात ठेवा आपल्याला एनिमेशन करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही.
08:54 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:57 थोडक्यात.
08:59 या ट्युटोरिअल मध्ये, आपण Synfig च्या इंटरफेसबद्दल शिकलो.
09:03 आपण मूलभूत आकृत्या काढणे आणि रंग भरणे देखील शिकलो.
09:07 keyframes आणि waypoints जोडणे.
09:10 squash effect सह बॉल(चेंडू) एनिमेशन काढणे.
09:13 gif फॉरमॅट मध्ये आउटपुट रेंडर करणे.
09:16 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. तिरप्या रेषेत एक बॉल(चेंडू) एनिमेशन तयार करा.
09:23 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
09:27 तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
09:33 स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:38 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा.
09:44 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या.
09:49 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
09:52 तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
09:58 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
10:02 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल.
10:08 फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
10:13 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या विषयी अधिक माहिती

या लिंकवर उपलब्ध आहे.

10:23 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली राजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana