Firefox/C2/Introduction/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Introduction to Mozilla Firefox
Author: Manali Ranade
Keywords: Mozilla Firefox
|
|
---|---|
00:00 | Mozilla Firefox चा परिचय करून देणा-या Spoken tutorial मध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
00:10 | Mozilla Firefox म्हणजे काय? |
00:12 | Firefox कशासाठी? |
00:14 | Versions, System Requirements, Download तसेच Firefox Install करणे आणि website उघडणे. |
00:21 | Mozilla Firefox किंवा थोडक्यात Firefox हे एक विनामूल्य आणि मुक्तपणे उपलब्ध असलेले वेबब्राऊजर आहे. |
00:27 | Ubuntu Linux चे हे डिफॉल्ट वेब ब्राऊजर असून जे आपल्याला इंटरनेटचे जग खुले करून देते. |
00:33 | हे आपल्याला इंटरनेट वेब पेजेस बघण्याची आणि नेव्हिगेट करण्याची सुविधा देते. |
00:39 | हे Google,Yahoo Search किंवा Bing सारख्या सर्च इंजिनच्या सहाय्याने वेबपेजेस देखील शोधते. |
00:47 | Mozilla Firefox हे Mozilla Foundation या सेवाभावी संस्थेच्या प्रोग्रॅमर्सनी विकसित केले आहे. |
00:54 | Mozilla विषयी अधिक माहितीसाठी mozilla.org या संकेत स्थळाला भेट द्या. |
00:59 | Firefoxहे Windows, Mac OSX, and Linux या Operating Systems वर काम करते. |
01:05 | Ubuntu वरील Konqueror, Google Chrome आणि Opera ही इतर लोकप्रिय वेबब्राऊजरची उदाहरणे आहेत. |
01:12 | या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.04 वर Firefox चे version 7.0 वापरणार आहोत. |
01:20 | Firefox च्या ब्राऊजिंग मध्ये प्रायव्हसी, गती आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम आहे. |
01:27 | यात tabbed windows, built-in spell checking, pop-up blocker, integrated web search, Phishing protection सारखी अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. |
01:39 | Firefox वेब ब्राऊजिंग बरोबरच चित्रांचे व वेब पेजेसचे सादरीकरण जलद करू शकते. |
01:45 | तसेच ते आपल्याला खोट्या वेबसाईट, spyware and viruses, trojans किंवा इतर malware पासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारच्या सुरक्षा आणि प्रायव्हसी प्रदान करते. |
01:56 | शिवाय Firefox मध्ये युजरच्या गरज व आवडीनुसार add-ons सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने रूपात व सोयी सुविधांमध्ये बदल करता येतो. |
02:06 | Fedora, Ubuntu, Red Hat, Debian आणि SUSE सारख्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर Firefox सुरू करण्यासाठी या काही System Requirements आहेत. |
02:16 | Ubuntu Linux 10.04 वर Firefox सुरू करण्यासाठी आपल्याला पुढील लायब्ररीज किंवा पॅकेजेसची आवश्यकता भासेल. |
02:24 | GTK+ 2.10 or higher |
02:29 | GLib 2.12 or higher |
02:32 | libstdc++ 4.3 or higher |
02:37 | Pango 1.14 or higher |
02:40 | X.Org 1.7 or higher |
02:44 | आणि हार्डवेअरमध्ये किमानPentium 4, 512MB RAM आणि हार्डड्राईव्हमध्ये 200MB space असणे आवश्यक आहे. |
02:55 | System requirements बद्दलची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसत असलेल्या Firefox च्या वेबसाईटवर दिलेली आहे. |
03:02 | mozilla.com या अधिकृत वेबसाईटवरून Mozilla Firefox डाऊनलोड करा. |
03:11 | येथे आपल्याला नेहमीच Firefoxचे अद्ययावत version मिळेल. |
03:15 | किंवा आपण All Systems and Languages या लिंकवरून अधिक पर्याय मिळवू शकतो. |
03:23 | Mozilla आपल्याला ७० भाषांमध्ये Firefox वापरण्याची संधी देते. |
03:28 | येथे आपल्यासाठी स्थानिक भाषेनुसार Firefoxचे version डाऊनलोड करू शकतो. उदाहरणार्थ हिंदी किंवा बंगाली. |
03:33 | तसेच आपण Windows, Mac किंवा Linux च्या आयकॉनवर क्लिक करून operating system देखील निवडू शकतो. |
03:42 | Ubuntu Linux मध्ये प्रथम फाईल सेव्ह करण्याचे लोकेशन निवडा. डिफॉल्ट रूपात आपल्या होम फोल्डरमधील डाऊनलोडस ही डिरेक्टरी निवडलेली असते. |
03:51 | आता तुम्ही Save File हा पर्याय निवडून popup window वरीलOk या बटणावर क्लिक करा. |
03:58 | हे Firefoxच्या archive, होम डिरेक्टरीतील डाऊनलोडस या डिरेक्टरीत सेव्ह होईल. |
04:06 | टर्मिनल विंडो उघडा आणि डाऊनलोडस या डिरेक्टरीत जाण्यासाठी cd ~/Downloads ही कमांड टाईप करा. |
04:17 | आता एंटर दाबा. |
04:19 | डाऊनलोड केलेल्या फाईलमधील घटक Extract करण्यासाठी tar xjf firefox-7.0.1.tar.bz2 ही कमांड टाईप करा. |
04:35 | आता एंटर दाबा. |
04:38 | Firefox 7.0 सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या फाईल Extract होण्यास सुरूवात होईल. |
04:44 | Firefoxच्या डिरेक्टरीत जाण्यासाठी टर्मिनल विंडोवर cd firefox ही कमांड टाईप करा. |
04:52 | आता एंटर दाबा. |
04:54 | हे तुम्हाला Firefoxच्या डिरेक्टरीत घेऊन जाईल. |
04:58 | Firefoxब्राऊजर उघडण्यासाठी ./firefox ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
05:06 | किंवा जर तुमची चालू डिरेक्टरी ही होम डिरेक्टरी नसेल तर firefox उघडण्यासाठी ही कमांड टाईप करा. |
05:15 | ~ /Downloads/firefox/firefox |
05:21 | डिफॉल्ट होमपेज सेट कसे करायचे ते आपण नंतर पाहू. |
05:25 | आता उदाहरणादाखल Rediff.com च्या वेबसाईटवर जाऊ या. ज्यावर ताज्या बातम्या आणि माहिती उपलब्ध आहे. |
05:33 | मेनूबारखालील Address bar मध्ये www.rediff.com टाईप करा. |
05:40 | हे rediff.com या वेबसाईटच्या होमपेजवरील घटक दर्शवेल. |
05:47 | आता आपण या पानावरून विविध लिंकसवर त्यातील घटक बघण्यासाठी नेव्हिगेट करू शकतो. |
05:53 | Headlines tab च्या खाली पहिल्या लिंकवर क्लिक करा. |
05:58 | अशा प्रकारे आपण firefox च्या सहाय्याने वेबसाईट उघडू शकतो. आणि नंतर तेथून इतर अनेक पानांवर नेव्हिगेट करू शकतो. |
06:05 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण firefox चे interface आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती करून घेऊ. |
06:12 | सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे. |
06:16 | ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:19 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:29 | जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:33 | अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा. |
06:39 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
06:44 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
06:51 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:02 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |