Firefox/C2/Introduction/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Mozilla Firefox च्या प्राथमिक tutorial मध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
00:10 | Mozilla Firefox म्हणजे काय? |
00:12 | Firefox कशासाठी? |
00:14 | Versions, System Requirements, Download व Install करणे आणि website उघडणे. |
00:21 | Firefox हे एक विनामूल्य आणि मुक्त वेबब्राऊजर आहे. |
00:27 | Ubuntu Linux चे हे डिफॉल्ट वेब ब्राऊजर असून ज्यावर आपण इंटरनेट वापरू शकतो. |
00:33 | ह्याने आपल्याला वेब पेजेस बघता आणि नॅव्हिगेट करता येतात. |
00:39 | हे Google,Yahoo Search किंवा Bing सारखी सर्च इंजिन्स वापरून वेबपेजेस शोधते. |
00:47 | Firefox हे Mozilla Foundation च्या प्रोग्रॅमर्सनी बनवलेले ब्राऊजर आहे. |
00:54 | Mozilla विषयी अधिक माहिती mozilla.org वर उपलब्ध आहे. |
00:59 | हे Windows, Mac OSX, आणि Linux या Operating Systems वर काम करते. |
01:05 | Ubuntu वर Konqueror, Google Chrome आणि Opera हे इतर वेबब्राऊजर्स आहेत. |
01:12 | येथे आपण Ubuntu Linux 10.04 वर Firefox चे version 7.0 वापरणार आहोत. |
01:20 | Firefox मध्ये प्रायव्हसी, गती आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम आहे. |
01:27 | यात tabbed windows, built-in spell checking, pop-up blocker, integrated web search, Phishing protection सारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. |
01:39 | Firefox मध्ये वेब ब्राऊजिंग बरोबरच चित्रे व वेब पेजेस जलद दिसू शकतात. |
01:45 | त्यात खोट्या वेबसाईट, spyware and viruses, trojans किंवा इतर malware पासून वाचण्यासाठी सुरक्षा आणि प्रायव्हसी चे पर्याय आहेत. |
01:56 | युजरच्या गरजा व आवडीनुसार add-ons सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने Firefox च्या रूपात व सुविधांमध्ये बदल करता येतो. |
02:06 | Fedora, Ubuntu, Red Hat, Debian आणि SUSE वर Firefox सुरू करण्यासाठी या काही System Requirements आहेत. |
02:16 | Ubuntu Linux 10.04 वर Firefox सुरू करण्यासाठी पुढील लायब्ररीज किंवा पॅकेजेस लागतात. |
02:24 | GTK+ 2.10 or higher |
02:29 | GLib 2.12 or higher |
02:32 | libstdc++ 4.3 or higher |
02:37 | Pango 1.14 or higher |
02:40 | X.Org 1.7 or higher |
02:44 | आणि हार्डवेअरमध्ये किमानPentium 4, 512MB RAM आणि हार्डड्राईव्हमध्ये 200MB space असणे आवश्यक आहे. |
02:55 | System requirements बद्दलची पूर्ण माहिती Firefox च्या वेबसाईटवर दिलेली आहे. |
03:02 | mozilla.com या अधिकृत वेबसाईटवरून Mozilla Firefox डाऊनलोड करा. |
03:11 | येथे Firefoxचे अद्ययावत version मिळेल. |
03:15 | किंवा All Systems and Languages या लिंकवरून अधिक पर्याय मिळवू शकतो. |
03:23 | Mozilla Firefox ७० भाषांमध्ये उपलब्ध आहे. |
03:28 | येथे स्थानिक भाषेनुसार versions डाऊनलोड करता येते उदाहरण हिंदी आणि बंगाली . |
03:33 | तसेच Windows, Mac किंवा Linux च्या आयकॉनवर क्लिक करून operating system देखील निवडू शकतो. |
03:42 | Ubuntu Linux मध्ये फाईल सेव्ह करण्याचे लोकेशन निवडा. होम फोल्डरमधील डाऊनलोडस् डिरेक्टरी डिफॉल्ट लोकेशन असते. |
03:51 | Save File हा पर्याय निवडून popup window वरीलOk वर क्लिक करा. |
03:58 | हे Firefoxच्या archive, होम डिरेक्टरीतील डाऊनलोडस् या डिरेक्टरीत सेव्ह होईल. |
04:06 | टर्मिनल विंडो उघडा आणि डाऊनलोडस या डिरेक्टरीत जाण्यासाठी cd ~/Downloads ही कमांड टाईप करा. |
04:17 | आता एंटर दाबा. |
04:19 | डाऊनलोड केलेल्या फाईलमधील घटक Extract करण्यासाठी tar xjf firefox-7.0.1.tar.bz2 ही कमांड टाईप करा. |
04:35 | आता एंटर दाबा. |
04:38 | Firefox 7.0 सुरू होण्यासाठी लागणा-या फाईल्स Extract होतील. |
04:44 | Firefoxच्या डिरेक्टरीत जाण्यासाठी टर्मिनल विंडोवर cd firefox ही कमांड टाईप करा. |
04:52 | आता एंटर दाबा. |
04:54 | तुम्ही Firefoxच्या डिरेक्टरीत जाल. |
04:58 | Firefoxब्राऊजर उघडण्यासाठी ./firefox ही कमांड टाईप करून एंटर दाबा. |
05:06 | किंवा जर तुमची चालू डिरेक्टरी ही होम डिरेक्टरी नसेल तर firefox उघडण्यासाठी ही कमांड टाईप करा. |
05:15 | ~ /Downloads/firefox/firefox |
05:21 | डिफॉल्ट होमपेज सेट कसे करायचे ते आपण नंतर पाहू. |
05:25 | आता Rediff.com च्या वेबसाईटवर जाऊ या. ज्यावर ताज्या बातम्या आणि माहिती उपलब्ध आहे. |
05:33 | मेनूबारखालील Address bar मध्ये www.rediff.com टाईप करा. |
05:40 | हे rediff.com या वेबसाईटच्या होमपेजवरील घटक दर्शवेल. |
05:47 | या पानावरून विविध लिंक्सवर नेव्हिगेट करून आपण त्यातील घटक पाहू शकता. |
05:53 | Headlines tab च्या खाली पहिल्या लिंकवर क्लिक करा. |
05:58 | असे firefox च्या सहाय्याने वेबसाईट उघडून नंतर इतर पानांवर नेव्हिगेट करता येते. |
06:05 | firefox चा interface आणि इतर वैशिष्ट्ये पुढील पाठात पाहू. |
06:12 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:16 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:19 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:29 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:33 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:39 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:44 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
06:51 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:02 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |