OpenModelica/C3/Component-oriented-modeling/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Component oriented modeling वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण model सुरु (इंस्टॅन्शिएट) कसे करावे? |
00:12 | connector class कसे परिभाषित करावे आणि component models वापरून simple electric circuit चे मॉडेल कसे तयार करावे हे शिकणार आहोत. |
00:21 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2. Ubuntu Operating System version 14.04 वापरत आहे. |
00:31 | परंतु ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमसारखीच आहे. |
00:39 | हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मधील क्लास कसा परिभाषित करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे. |
00:45 | package आणि Icon and Diagram Views कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. |
00:51 | पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांच्यामार्फत जा. |
00:57 | आता Class Instantiation बद्दल अधिक जाणून घेऊ. |
01:02 | Modelica classes इंस्टॅन्शिएट केले जाऊ शकते. |
01:06 | उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस मानव class चे उदाहरण मानले जाऊ शकते. class चे उदाहरण व्हेरिएबल्स class च्या समान व्हेरिएबल आणि इक्वेशन असतात. |
01:20 | Class Instantiation साठी सिन्टॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे. |
01:25 | आता आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. कृपया आमच्या वेबसाईटवर उपलब्ध सर्व फाईल्स डाऊनलोड करून सेव्ह करा. |
01:34 | मी OMEdit वर जाते. खालील फाईल्स आधीपासून OMEdit मध्ये उघडल्या आहेत: classInstantiationExample आणि simpleCircuit. |
01:48 | classInstantiationExample वर डबल-क्लिक करा. आता ह्या class बद्दल अधिक चर्चा करू. |
01:56 | चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवते. |
02:02 | येथे, मी object1 आणि object2 नावाचे दोन ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी bouncingBall class ला त्यांचे इंस्टॅन्शिएट म्हणून दर्शविले आहे. |
02:12 | लक्षात घ्या, प्रत्येक instance ची हाईट व्हेरिएबल h साठी भिन्न प्रारंभिक वॅल्यूज आहेत. |
02:20 | bouncingBall मॉडेलवर अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स पाहा. |
02:27 | आता आपण हा क्लास सिम्युलेट करू. |
02:30 | टूलबारमध्ये Simulate बटणावर क्लिक करा. |
02:34 | क्लास सिम्युलेट होत नाही आणि एक एरर देतो. |
02:39 | याचे कारण असे की, bouncingBall class OMEdit मध्ये उघडले नाही. |
02:45 | bouncingBall class उघडा, जे आपण वेबसाईटवरून डाऊनलोड केले आहे. |
02:50 | आता पुन्हा एकदा हा class सिम्युलेट करा. पॉप अप विंडो बंद करा. |
02:56 | लक्षात घ्या की, class ह्यावेळी यशस्वीपणे सिम्युलेट होतो. |
03:01 | हा सराव असे दर्शविते की, इंस्टॅन्शिएट करण्यासाठी class OMEdit मध्ये उघडावा. |
03:09 | variables browser मध्ये object1 व्हेरिएबल्स विस्तृत करा. |
03:14 | लक्षात घ्या की, येथे सूचीबद्ध केलेले व्हेरिएबल्स bouncingBallclass मध्ये घोषित केले आहेत. |
03:20 | हे व्हेरिएबल्स' object1 आणि object2 चा भाग आहेत, कारण bouncingBall class ची समायोजित उदाहरणे आहेत. |
03:30 | आता रिझल्ट डिलीट करा आणि स्लाईड्सवर परत जा. |
03:37 | Component orientation इतर मॉडेलिंग आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स व्यतिरिक्त Modelica सेट करतो. |
03:43 | हे Modelica चे एकमेव सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. |
03:48 | component मॉडेल्स सिंगल फिजिकल फेनोमेननचे प्रतिनिधित्व करतात. |
03:53 | त्वरित आणि इच्छित प्रभाव निर्माण करण्यासाठी ते कनेक्ट केले जाऊ शकतात. |
03:59 | उदाहरणार्थ, RLC circuit हे, resistor, inductor आणि capacitor मॉडेलपासून विकसित केली जाऊ शकते. |
04:08 | Acausal connectors कंपोनेंट instances दरम्यान इंटरफेस म्हणून कार्य करतात. |
04:15 | connector class वापरून ते परिभाषित केले जातात. उदाहरणार्थ, pins विद्युत घटकांसाठी कनेक्टर म्हणून वापरता येईल. |
04:24 | ह्याविषयी आपण अधिक शिकू, जेव्हा आपण इलेक्ट्रिक सर्किटचे उदाहरण सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू. |
04:30 | Connectors मध्ये एक्रॉस आणि फ्लो व्हेरिएबल्स असतात आणि त्यामध्ये इक्वेशन्स असू शकत नाहीत. |
04:38 | आता, आपण स्लाईडमध्ये दाखविलेले,Electric Circuit सिम्युलेट करू. |
04:43 | बॅटरीची व्होल्टेज {VoSin(2pift)} द्वारे दिली जाते, जिथे Vo 10 व्होल्ट्स आहे, f 1 Hz आहे आणि resistance 5 ohm आहे. |
04:59 | मागील स्लाईडमध्ये दर्शविलेल्या electric circuit नावाच्या मॉडेलसाठी Solution Methodology वर एक नजर टाकूया. लक्षात घ्या की कोणत्याही Resistor आणि Voltage Source ला दोन पिन्स आहेत : Positive आणि Negative |
05:14 | म्हणूनच pin नावाचे connector परिभाषित करा. |
05:18 | pin connector च्या एका उदाहरणासह Ground नावाचा क्लास परिभाषित करा. |
05:24 | Resistor नामक क्लास परिभाषित करा. |
05:28 | Resistor class मध्ये पिन कनेक्टरची दोन उदाहरणे असायला हवीत : Positive pin आणि Negative pin |
05:36 | आपण resistor class च्या बाबतीत पाहिले आहे, म्हणून पिन कनेक्टरच्या दोन उदाहरणांसह VoltageSource नावाचा क्लास परिभाषित करा. |
05:46 | simpleCircuit नावाचा क्लास परिभाषित करा. simpleCircuit मध्ये Resistor आणि VoltageSource' अशी उदाहरणे असावीत. |
05:56 | Resistor, ground आणि VoltageSource शी संबंधित पिन्स कनेक्ट करा. |
06:02 | आवश्यक कंम्पोनंट मॉडेल्स आधीच प्रोग्राम केले आहेत. |
06:07 | म्हणून मी Solution Methodology च्या केवळ शेवटच्या दोन पद्धती सादर करीन. |
06:13 | मी OMEdit वर जाते. Modeling perspective वर परत जा. |
06:19 | मी OMEdit विंडो उजवीकडे हलवते. |
06:23 | लायब्ररी ब्राऊझरमध्ये simpleElectricCircuit पॅकेज विस्तृत करा. |
06:29 | लक्षात घ्या की, ह्या पॅकेजमध्ये पाच क्लासेस आहेत : pin, Ground, Resistor, Voltage Source आणि circuit. |
06:40 | simpleElectricCircuit वर डबल-क्लिक करा. ClassinstantiationExample बंद करा. |
06:48 | चांगल्या दृश्यमानतेसाठी मी OMEdit विंडो डाव्या बाजूला स्थानांतरित करते. |
06:54 | Modelica.Siunits पॅकेज simpleElectricCircuit पॅकेजमध्ये इंपोर्ट केले गेले आहे. |
07:02 | म्हणूनच, त्या पॅकेजमधील type परिभाषांचा वापर त्यांच्या संपूर्ण नावांच्या संदर्भाशिवाय केला जाऊ शकतो. |
07:10 | pin connector समजून घेण्याचा प्रयत्न करू. थोडे खाली स्क्रोल करा. |
07:17 | connector class वापरून Pin परिभाषित केले आहे. |
07:21 | Voltage आणि current हे व्हेरिएबल्स आहेत, जे आपल्या भोवतालशी पिन बदलत असतात. |
07:27 | पिनवरील' Potential हे v ने परिभाषित केले आहे. Voltage आणि Current हे प्रकार आहेत जे मॉडेलिका लायब्ररीच्या Siunits पॅकेजमध्ये परिभाषित केले आहेत. |
07:40 | Voltage कडे कम्पोनंटच्या माध्यमातून प्रवाह करण्यासाठी एक वर्तमान कारण ठरते. |
07:44 | म्हणूनच, current हे फ्लो व्हेरिएबल आहे आणि flow keyword वापरून परिभाषित केले आहे. |
07:50 | पिन कनेक्टरमध्येदेखील Icon view आहे जे ऍनोटेशन्सद्वारे निर्दिष्ट केले आहे, जसे की दाखवले आहे, |
07:57 | आता Resistor class बद्दल थोडी चर्चा करू. थोडे अधिक खाली स्क्रोल करा. |
08:04 | सोल्यूशन मेथोडॉलॉजीमध्ये चर्चा केल्याप्रमाणे, Resistor class मध्ये दोन पिन कनेक्टरची दोन उदाहरणे आहेत. |
08:12 | p ही positive pin दर्शविते आणि n negative pin दर्शविते. |
08:18 | आता मी आपल्याला दाखवते की,OMEdit चे ड्रॅग आणि ड्रॉप फंक्शनॅलिटी वापरून क्लास इंस्टॅन्शिएट कसे करावे. |
08:26 | हे सादर करण्यासाठी, मी Ctrl + N वापरून नवीन क्लास उघडते. |
08:32 | ह्या क्लासला class example1 नाव द्या आणि Ok दाबा. OMEdit विंडो उजवीकडे हलवा. |
08:41 | जर क्लास Text View मध्ये उघडेल तर Diagram View वर जा. |
08:46 | आता pin class इंस्टॅन्शिएट करू. |
08:51 | Libraries Browser मध्ये pin आयकॉनवर लेफ्ट-क्लिक करा. |
08:55 | diagram लेयरमध्ये आयकॉन धरून ठेवा आणि ड्रॅग करा. तो कॅनव्हासवरील कोणत्याही ठिकाणी ड्रॉप करा. |
09:04 | आता आपण pin class चे instance तयार केले आहे. |
09:09 | दर्शविल्याप्रमाणे, आपण ते ड्रॉप केल्यानंतर डायमेंशन आणि लोकेशनदेखील बदलू शकता. |
09:16 | आता Text View' मध्ये हा क्लास कसा इंस्टॅन्शिएट आहे ते पाहू. Text View वर जा. |
09:22 | Diagram View मधील त्याच्या प्लेसमेंटच्या आधारावर class pin आणि annotation इंस्टॅन्शिएट कमांडवर ध्यान द्या. |
09:33 | त्यामुळे, Diagram View मध्ये क्लासचे एक उदाहरण तयार करणे आपोआपच Text View मध्ये प्रतिबिंबित होते. आता example1 टॅब बंद करा. |
09:45 | electric circuit हे मॉडेल कसे करायचे ते शिकू, जे आपण स्लाइड्समध्ये पाहिले होते. |
09:51 | Circuit आयकॉनवर डबल-क्लिक करा, जोदेखील simpleElectricCircuit पॅकेजचा एक भाग आहे. |
09:58 | ह्या क्लासमध्ये आधीपासून आपल्या सर्किटची इंटरेस्ट असेम्ब्लड आहे, जसे की Diagram Viewमध्ये पाहिले जाऊ शकते. ते सिम्युलेट होण्यासाठी तयार आहे. |
10:09 | परंतु आपण एक नवीन फाईलमध्ये समान circuit तयार करू. |
10:14 | आपण नुकतीच पाहिलेली drag आणि drop फंक्शनॅलिटी वापरू. |
10:19 | Ctrl + Nदाबा. ह्या फाईलला circuit(underscore)construction नाव द्या. OK दाबा. |
10:28 | ते Text View मध्ये उघडल्यास, Diagram View वर जा. |
10:32 | Libraries Browser मधूनdrag and drop VoltageSource आयकॉन निवडा, आपण आपल्या इच्छेनुसार डायमेंशन्स बदलू शकता. |
10:43 | तशाचप्रकारे, Libraries Browser मधून drag and drop Resistor आयकॉन निवडा. |
10:50 | Ground class मध्ये असेच करा. |
10:54 | आता, प्रत्येक कम्पोनंटचे संबंधित pins जोडणे आवश्यक आहे. |
11:00 | प्रथम Voltage Source चे positive pin ,Resistor च्या positive pin ला कनेक्ट करू. |
11:07 | Voltage Source च्या डाव्या पिनवर फिरवा. |
11:11 | प्रदर्शित टेक्स्ट दर्शवितो की, हा positive pin p आहे. |
11:17 | pin वर लेफ्ट-क्लिक करा आणि कर्सर Resistor च्या डाव्या पिनजवळ ड्रॅग करा. |
11:24 | जेव्हा कर्सरचा एरो क्रॉसमध्ये बदलेल तेव्हा माऊस सोडा. |
11:30 | तशाचप्रकारे, resistor ची negative pin, voltage source च्या negative pin शी कनेक्ट करा. |
11:38 | सर्किट डायग्राममध्ये आपण Ground सह कनेक्शन्सचे उल्लेख केले नाहीत. |
11:44 | परंतु, आपल्याला वैयक्तिकरित्या Resistor आणि Voltage Source चे negative pins Ground ला कनेक्ट करू इच्छित आहोत. |
11:51 | circuit मध्ये potential साठी संदर्भ बिंदू सुनिश्चित करतो. |
11:57 | आता, हा क्लास पूर्ण झाला आहे. Ctrl + S दाबून class सेव्ह करा. |
12:04 | Simulate बटणावर क्लिक करा. पॉप अप विंडो बंद करा. |
12:10 | class यशस्वीरित्या सिम्युलेट झाला आहे. |
12:14 | Variables browser च्या अधिक चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे हलवते. |
12:20 | Variables Browser मध्ये Resistor कॉलम विस्तृत करा आणि Ir निवडा. |
12:28 | लक्षात घ्या की, अपेक्षेप्रमाणे प्रोफाईल sinusoidal आहे. |
12:33 | जरी Voltage Source हा DC ऐवजी AC स्रोत आहे. |
12:38 | म्हणून, आपण त्याच्या कम्पोनंट भागांमधून एक मॉडेल तयार केले आहे आणि ते सिम्युलेट केले आहे. |
12:44 | पुढील ट्युटोरिअलमध्ये, आपण Resistor आणि Voltage Source classes याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ. |
12:52 | मी स्लाईड्स वर जाते. |
12:55 | ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:59 | असाईनमेंट म्हणून, Voltage Source सह, series मध्ये दोन resistors सह इलेक्ट्रिक सर्किट सीरिज तयार करा. |
13:07 | simple electric circuit पॅकेजमध्ये पुरवलेल्या Voltage source आणि Resistor साठी कम्पोनंट मॉडेल्स वापरा. |
13:15 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: http://spoken-tutorial.org/ org] /What\_is\_a\_Spoken\_Tutorial. हे स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करते. |
13:21 | स्पोकन टयुटोरिअलच्या सहाय्याने आम्ही कार्यशाळा चालवितो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
13:26 | जर आपल्याला ह्या ट्युटोरिअलमध्ये काही प्रश्न असतील, तर कृपया खालील नमूद केलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
13:32 | आम्ही लोकप्रिय पुस्तकांच्या सोडवणुकीची उदाहरणे समन्वयित करतो. कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
13:38 | आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास OpenModelica ला मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या. |
13:47 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. |
13:54 | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |