OpenModelica/C2/Examples-through-OMEdit/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:00, 18 April 2018 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Examples through OMEdit वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण विविध Modelica लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकणार आहोत.
00:13 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica वर्जन 1.9.5 आणि Ubuntu Linux OS 14.04 वापरत आहे.
00:25 परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रक्रिया ही इतर OS, जसे Windows , Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS च्या समान आहे.
00:37 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी तुमच्या सिस्टमवर OMEdit इन्टॉल असणे आवश्यक आहे.
00:43 आपल्याला OMEdit विंडोवर कसे काम केले पाहिजे हे देखील माहित असले पाहिजे.
00:47 जर नसेल तर, कृपया ह्या वेबसाईटवर मागील OpenModelica ट्युटोरिअल्स पाहा.
00:53 OMEdit विंडोवर जाऊ.
00:57 OMEdit विंडोच्या डाव्या बाजूवर, आपल्याला Libraries Browser दिसेल. येथे आपण लायब्ररींची सूची पाहू शकतो.
01:07 Modelica लायब्ररी विस्तृत करू. हे करण्यासाठी, Modelica लायब्ररीच्या डावीकडे असलेल्या एरो वर क्लिक करा.
01:16 आता मी Electrical लायब्ररीतून एक उदाहरण सादर करेन.
01:21 Electrical लायब्ररी विस्तृत करू.
01:24 Electrical लायब्ररीच्या डाव्या बाजूला असलेल्या एरो वर क्लिक करा.
01:28 Electrical अंतर्गत, आपल्याला Analog लायब्ररी आढळेल.
01:32 Analog लायब्ररी विस्तृत करू.
01:35 पुन्हा एकदा, आपल्याला कित्येक वेगवेगळ्या लायब्ररी प्रदर्शित झालेल्या दिसतील.
01:39 आता Example लायब्ररी विस्तृत करू.
01:43 येथे आपण Analog चे विविध उदाहरण पाहू शकतो.
01:48 नंतर, आपण Rectifier नावाचा क्लास उघडू.
01:53 Rectifier वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा.
01:58 क्लास उघडण्यासाठी आपण क्लास नावावर डबल क्लिक करू शकतो.
02:03 आता आपण Modeling Perspective विंडोमध्ये आहोत.
02:07 डीफॉल्टपणे क्लास Diagram View मध्ये उघडतो.
02:11 मी आधीच ह्या मालिकेत सांगितले आहे की विविध views मध्ये कसे जावे.
02:18 आता Text View आयकॉनवर क्लिक करून Text View वर जाऊ.
02:24 येथे आपण Rectifier क्लासशी संबंधित Modelica कोड पाहू शकतो.
02:30 मॉडेल सिम्युलेट करण्याआधी, आपल्याला मॉडेलची शुद्धता तपासणे गरजेची आहे.
02:36 हे करण्यासाठी, प्रथम टूलबारवरील Check All Models बटण पाहा.
02:42 ह्या बटणावर पांढर्या रंगाचे डबल टिक्स आहेत. त्यावर क्लिक करा.
02:48 लगेच, विंडोच्या तळाशी Messages Browser उघडतो.
02:54 हे Modelica क्लासशी संबंधित संदेश दर्शवेल.
02:58 आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
03:00 टूलबारवर, हिरव्या रंगाच्या एरो बटणावर क्लिक करा.
03:07 हे Simulate बटण आहे, जे मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाते.
03:13 आपण मॉडेल सिम्युलेट करण्यासाठी Ctrl आणि B कीजदेखील दाबू शकतो.
03:18 सिम्युलेट केल्यावर एक नवीन विंडो उघडते.
03:21 हे क्लासची कंम्पायलेशन प्रोसेस दर्शविते.
03:26 कंम्पायलेशन यशस्वी झाल्यानंतर, आऊटपुट विंडो संदेश प्रदर्शित करतो: Simulation process finished successfully. ही विंडो बंद करा.
03:37 डिफॉल्टपणे, Plotting Perspective आता OMEdit विंडोमध्ये उघडले पाहिजे.
03:43 जर ते उघडत नसेल, तर तळाशी उजव्या बाजूस Plotting बटणावर क्लिक करा.
03:48 आपण Plotting Perspective उघडण्यासाठी Ctrl आणि F3 कीज दाबू शकतो.
03:54 येथे आपण Modelica क्लासचे सिम्युलेशन रिझल्ट्स पाहू शकतो.
03:59 Plotting Perspective च्या उजवीकडे Variables Browser विंडोकडे पाहा.
04:05 Variables Browser अंतर्गत, आपण Modelica क्लासच्या इनपुट व्हेरिएबल वॅल्यूजमध्ये बदल करायला शिकू.
04:13 डिफॉल्टपणे IDC = 500, Losses = 2890.26
04:22 IDC ची वॅल्यू बदला आणि Losses चे वॅल्यूज कसे बदलतात ते पाहा.
04:28 IDC ची वॅल्यू 500 वरून 250 बदलू.
04:33 आणि एंटर दाबा.
04:37 विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जा.
04:39 Re-simulate बटणावर क्लिक करा.
04:42 success message विंडो उघडेल.
04:46 विंडो बंद करा.
04:48 एकदा सिम्युलेशन पूर्ण झाल्यानंतर बदललेले Losses = 1756.77 लक्षात घ्या.
04:57 आता मी प्लॉट कसा बनवायचा ते दाखवते.
05:01 आम्ही Losses आणि Time दरम्यान एक प्लॉट तयार करू.
05:06 Losses व्हेरिएबल विरुद्ध चेक बॉक्सवर क्लिक करा.
05:10 आपण X-axis वर Time आणि Y-axis वर Losses दरम्यान प्लॉट पाहू शकतो.
05:17 हा प्लॉट टाईमसह diode bridge बदलत असलेल्या पावर लॉसेसचे वर्णन करतो.
05:24 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 0.1 युनिट टाईमपर्यंत रन होतो.
05:31 आपण Simulation Setup ऑप्शन वापरून हे अंतर बदलू शकतो.
05:36 हे करण्यासाठी, Modeling Perspective वर जा.
05:40 Modeling बटणावर क्लिक करा.
05:43 टूलबारवर Simulation Setup वर क्लिक करा.
05:47 Simulation Setup विंडो उघडते.
05:50 येथे, Start Time 0.01 युनिटमध्ये बदला.
05:55 हे सुनिश्चित करा की, Simulate चेक बॉक्स चेक केलेला आहे.
05:59 आणि नंतर Ok वर क्लिक करा.
06:02 लगेच success message विंडो दिसेल.
06:06 ही विंडो बंद करा.
06:08 क्लास 0.01 ते 0.1 सिम्युलेशन मध्यांतराने पुन्हा सिम्युलेट झाला आहे.
06:16 हे रिझल्ट्स डिलीट करू.
06:18 असे करण्यासाठी, Rectifier वर राईट-क्लिक आणि नंतर Delete Result वर क्लिक करा.
06:26 रिझल्ट आता डिलीट झाला आहे.
06:29 आता मी Mechanics लायब्ररीमधून एक उदाहरण दाखवेन.
06:34 प्रथम आपण Mechanics लायब्ररी विस्तारीत करू.
06:38 Mechanics अंतर्गत, आपल्याला Multibody लायब्ररी आढळते.
06:43 Multibody लायब्ररीसुद्धा विस्तारीत करू.
06:47 ह्यानंतर, Example लायब्ररी विस्तृत करू.
06:51 इथे आपण Multibody मेकेनिक्सचे विविध उदाहरणे पाहू शकतो.
06:56 नंतर, आपण Elementary लायब्ररी विस्तारीत करू.
07:00 DoublePendulum नावाचा क्लास उघडू.
07:04 ह्यासाठी DoublePendulum वर राईट-क्लिक करा आणि Open Class निवडा.
07:11 क्लास Text view मध्ये उघडेल.
07:14 आता टूलबारवरील Check All Models बटणावर क्लिक करा.
07:19 Messages Browser पाहा.
07:22 हे Modelica क्लासशी संबंधित संदेश दर्शवेल.
07:27 आता, मॉडेल सिम्युलेट करण्याचा प्रयत्न करू.
07:31 असे करण्यासाठी, टूलबारवरील Simulate बटणावर क्लिक करा.
07:35 एकदा कंम्पायलेशन पूर्ण झाले की, OMEdit विंडोमध्ये Plotting Perspective उघडते.
07:43 Variables Browser अंतर्गत, damper व्हेरिएबल विस्तृत करू.
07:49 डिफॉल्टपणे, d = 0.1, relative angular acceleration(a_rel) = 11.567 आणि relative rotational angle [der(phi_rel)] = 4.1
08:05 d ची वॅल्यू 0.1 मधून 0.05 मध्ये बदलू आणि एंटर दाबा.
08:14 त्यानंतर Re-simulate बटणवर क्लिक करा.
08:17 सिम्युलेशन पूर्ण केल्यानंतर, बदलांचे निरीक्षण करा.
08:22 relative angular acceleration (a_rel) = 15.449 आणि relative rotational angle [der(phi_rel)] = 4.359
08:33 आता, आपण relative angular acceleration आणि Time दरम्यान प्लॉट बनवू.
08:40 a_rel व्हेरिएबल विरुद्ध चेकबॉक्सवर क्लिक करा.
08:46 आपण X-axis वर Time आणि Y-axis a_rel दरम्यान प्लॉट पाहतो.
08:54 हा प्लॉट टाईमसह बदलत असलेल्या relative angular acceleration चे वर्णन करतो.
09:00 डीफॉल्टपणे, सिम्युलेशन 0 ते 3 युनिट टाईमने रन होते.
09:06 हे इंटरवल बदलू.
09:10 हे करण्यासाठी, Modeling Perspective वर जा.
09:14 टूलबारवर Simulation Setup पर्यायवर क्लिक करा.
09:18 Simulation Setup विंडो उघडते.
09:21 येथे Start Time 1 युनिट आणि Stop Time 5 युनिट्समध्ये बदला.
09:28 हे सुनिश्चित करा की Simulate चेक बॉक्स चेक केलेला आहे.
09:32 नंतर Ok वर क्लिक करा.
09:35 आपल्याला सक्सेस मेसेज विंडो दिसेल.
09:37 ही विंडो बंद करा.
09:39 क्लास 1 ते 5 युनिट टाईमच्या सिम्युलेशन इंटरवलसह री-सिम्युलेट झाला आहे.
09:45 एकदा आवश्यक प्लॉट तयार केल्यानंतर आपण रिझल्ट्स डिलीट करू शकतो.
09:50 व्हेरिएबल ब्राऊजरमध्ये, DoublePendulum वर राईट-क्लिक करा.
09:55 Delete Result निवडा. रिझल्ट आता डिलीट करण्यात आला आहे.
10:01 सारांशित करू.
10:03 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण, विविध Modelica लायब्ररी क्लासेस उघडणे आणि सिम्युलेट करणे शिकलो.
10:10 असाईनमेंट म्हणून Modelica मध्ये Magnetic लायब्ररी विस्तृत करा.
10:16 FluxTubes लायब्ररीमध्ये SaturatedInductor क्लास सिम्युलेट करा.
10:21 काही इनपुट व्हेरिएबल्सची वॅल्यूज बदला आणि री-सिम्युलेट करा.
10:26 व्हेरिएबल i आणि LossPower चे व्हेरिएबल r दरम्यान एक Parametric plot तयार करा.
10:32 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देतो.
10:41 स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअल कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करते.
10:53 ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:00 FOSSEE टीम लोकप्रिय पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडिंगचे समन्वय करते. आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:15 FOSSEE टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी मदत करते.
11:22 आम्ही असे करणाऱ्यांसाठी मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:31 स्पोकन ट्युटोरिअल आणि फोसेस प्रॉजेक्ट्सला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
11:40 हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana