OpenModelica/C3/Icon-and-Diagram-Views/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:59, 19 March 2018 by Latapopale (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Icon and Diagram Views वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण क्लासचे icon and diagram views कसे निर्दिष्ट करावे शिकणार आहोत. |
00:14 | Icon/Diagram View मध्ये polygon आणि ellipse कसे इन्सर्ट करावे ? |
00:20 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.9.2 वापरत आहे. |
00:27 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या सरावासाठी खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा उपयोग करू शकता - Linux, Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE OS. |
00:39 | हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. एनोटेशन्स कशी निर्दिष्ट करायची हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. |
00:51 | पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा. |
00:57 | Icon and Diagram Views मॉडेल ग्राफिकली पाहण्यासाठी सक्षम आहे. |
01:03 | Annotations एखाद्या मॉडेलचे Icon and Diagram Views निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. |
01:09 | Icon Annotation वापरून Icon View निर्दिष्ट केले आहे तर Diagram Annotation वापरून Diagram View निर्दिष्ट गेले आहे. |
01:19 | ते component-oriented modeling साठी ड्रॅग व ड्रॉप कार्यक्षमता सक्षम करतात. |
01:25 | आगामी ट्युटोरिअल्समध्ये आपण ह्या वैशिष्ट्याबद्दल अधिक चर्चा करू. |
01:30 | आता, Icon and Diagram Annotations चे सिन्टॅक्स समजून घेण्याचा प्रयत्न करू. |
01:37 | मागील ट्युटोरिअल्समध्ये आपण पाहिल्याप्रमाणे, अॅनोटेशन्स रेकॉर्ड म्हणून अधिक चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकतात. |
01:44 | त्यामुळे, Icon and Diagram annotations ला coordinateSystem सह रेकॉर्ड्स म्हणून आणि fields म्हणून ग्राफिक्स विचारात घेतली जाऊ शकतात. |
01:55 | आपण त्यातील प्रत्येकास वैयक्तिकरित्या पाहू. |
01:58 | coordinateSystem, खालील फिल्डसह record म्हणून मानले जाऊ शकते: extent, initialScale, preserveAspectRatio आणि grid. |
02:10 | आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून ते समजून घेऊ. |
02:15 | इथे Icon/Diagram Annotation चे सिन्टॅक्स दाखवणारे हे एक उदाहरण आहे. |
02:22 | आता मी OMEdit वर जातो. |
02:26 | आपण bouncingBallWithAnnotations नामक एका उदाहरणाद्वारे icon and diagram annotations समजून घेणार आहोत. |
02:35 | कृपया आमच्या वेबसाईटवरून ही फाईल डाऊनलोड करा. |
02:39 | हे मॉडेल मागील ट्युटोरिअल्समध्ये वापरले होते. |
02:42 | कृपया ह्या मॉडेलबद्दल अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा. |
02:48 | मी आधीच OMEdit मध्ये bouncingBallWithAnnotations उघडले आहे. |
02:54 | Libraries Browser मध्ये त्याच्या आयकॉनवर डबल-क्लिक करा. |
02:58 | मॉडेल आता Icon Viewमध्ये उघडले आहे. |
03:02 | जर ते Diagram किंवा Text View मध्ये उघडते तर Icon View वर जा. |
03:08 | चांगल्या दृश्यमानतेसाठी, OMEdit विंडो मी डावीकडे हलवतो. |
03:14 | ह्या मॉडेलच्या Icon View मध्ये आपण पांढऱ्याध पार्श्वभूमीवर एक वर्तुळ पाहू शकता. |
03:21 | मी canvas म्हणून Icon View मध्ये पांढऱ्या भागाचा संदर्भ घेत आहे. |
03:27 | लक्षात घ्या की, canvas ग्रिड्समध्ये विभागला आहे. |
03:32 | आपण प्रथम canvas च्या गुणधर्मांवर कुशलतेने कसे फेरबदल करावे ते शिकू. |
03:37 | मग आपण circle आणि polygon कसे इन्सर्ट करायचे ते शिकू. |
03:43 | circle च्या बाजूला कॅनव्हसवर राईट-क्लिक करा. Properties निवडा. |
03:51 | दाखवल्याप्रमाणे, एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो. |
03:55 | लक्षात घ्या की, Extent, Grid आणि Component नावाच्या श्रेणी आहेत. |
04:04 | Extent कॅनव्हासची मर्यादा सूचीत करते. |
04:07 | Left आणि Top नावाचे फील्ड्स कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात निर्देशांकाशी समन्वय साधते. |
04:16 | Left आडव्या निर्देशांकाशी समन्वय साधतो आणि Top उभ्या निर्देशांकाशी समन्वय साधतो. |
04:24 | त्याचप्रमाणे Bottom आणि Right हे कॅनव्हासच्या तळाशी उजव्या कोपऱ्याच्या निर्देशांकांनुसार आहे. |
04:33 | आता Left फील्ड -200 युनिट्समध्ये बदलू. Ok वर क्लिक करा. |
04:41 | लक्षात घ्या की 100 युनिट्सने कॅनव्हास डावीकडे विस्तारीत आहे. |
04:47 | पुन्हा एकदा कॅनव्हासवर राइट-क्लिक करा आणि Properties निवडा. |
04:53 | Grid हे ग्रीडची साईझ चिन्हांकित करते. |
04:57 | लक्षात घ्या की extent आणि grid चे युनिट्स Scale Factor पेक्षा भिन्न आहेत. |
05:04 | ग्रिडमध्ये क्षैतिज फिल्ड 4 युनिट्समध्ये बदला. OK वर क्लिक करा. |
05:11 | लक्षात घ्या की, कॅनव्हासमध्ये ग्रीडचा आकार वाढला आहे. |
05:16 | Icon View चे प्रॉपर्टीजदेखील Text View मधील Icon annotation वापरून फेरफार केले जाऊ शकतात. |
05:24 | लक्षात घ्या की, Icon View मधील कोणताही बदल त्यानुसार Icon annotation मध्ये परिवर्तित झाला आहे. |
05:32 | हे समजण्याचा प्रयत्न करू. modeling क्षेत्राच्या शीर्षस्थानी जा आणि Text View वर क्लिक करा. थोडे खाली स्क्रोल करा. |
05:43 | जसे की आपण स्लाईड्समध्ये पाहिले आहे, coordinateSystem हे Icon एनोटेशनमध्ये एक फील्ड आहे. |
05:50 | extent हे coordinateSystem मध्ये एक फील्ड आहे. त्यात संख्येच्या दोन जोड्या आहेत. |
05:57 | Properties डायलॉग बॉक्स वापरून extent मध्ये कसे फेरबदल करावे हे आपण आधीच पाहिले आहे. |
06:04 | संख्यांची प्रथम जोड {-200,-100} आहे. |
06:09 | ह्या जोडीची पहिली संख्या जी -200 आहे जी कॅनव्हासच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात क्षैतिज निर्देशांक दर्शविते. |
06:20 | त्याचप्रमाणे, -100 त्याच बिंदूचे उभ्या निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करते. |
06:27 | दुसरी जोडी पांढऱ्या- स्पेसच्या खालच्या उजव्या कोपऱ्या च्या निर्देशांकचे प्रतिनिधीत्व करते. |
06:35 | लक्षात घ्या की, ह्या 4 संख्या, top, bottom, left आणि right फिल्डशी संबंधित आहेत, आपण Properties डायलॉग बॉक्समध्ये पाहिले आहे. |
06:45 | आता, Icon View चा Properties डायलॉग बॉक्स वापरून मी extent बदलतो. |
06:52 | नंतर आपण पाहू की Text View च्या annotation मध्ये त्यानुसार बदल होतात. |
06:59 | मी Icon View वर जातो. |
07:02 | कॅनव्हासवर राईट-क्लिक करा आणि Properties निवडा. |
07:07 | Left फील्ड -150.00 मध्ये बदला. Ok वर क्लिक करा |
07:14 | Text View वर क्लिक करा, खाली स्क्रोल करा. |
07:18 | लक्षात घ्या की, extent मधील निर्देशांकची पहिली जोडी {-150,-100} ते {-200,-100} मध्ये बदलली आहे |
07:30 | हे Properties डायलॉग बॉक्स वापरून Icon View मध्ये केलेल्या बदलामुळे आहे. |
07:37 | म्हणूनच, Icon annotation मध्ये कोणताही बदल Icon View आणि त्याच्या विरोधात सुसंगत बदल करतो. |
07:46 | coordinateSystem च्या इतर फिल्ड्सची चर्चा जसे, ScaleFactor ह्या ट्युटोरिलच्या व्याप्ति बाहेर आहे. |
07:54 | मी पुन्हा स्लाईड्सवर जातो. |
07:57 | आपण आधीच चर्चा केली आहे की Icon एनोटेशनमध्ये त्याचे एलिमेंट्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहेत. |
08:06 | graphics record मध्ये पुढील आयटम्स असू शकतात : Line , Rectangle , Ellipse , Polygon, Text आणि Bitmap. |
08:17 | Icon and Diagram viewsमध्ये हे आयटम्स कसे इनसर्ट करायचे ते आपण आता पाहू. |
08:25 | मी OMEdit वर परत जातो. |
08:29 | आपण हे एनोटेशन्स तीन टप्प्यांत समजू शकतो. bouncingBallWithAnnotations आधीपासूनच एक circle आहे जो त्याच्या Icon View मध्ये इनसर्ट केला आहे. |
08:40 | Ellipse एनोटेशन वापरून circle प्राप्त केला आहे. प्रथम आपण त्याची प्रॉपर्टिज सुधारित करण्याचा प्रयत्न करू. |
08:49 | लक्षात ठेवा की, Ellipse इनसर्ट केले आहे आणि त्याचे प्रॉपर्टिज आयकॉन एनोटेशनच्या ग्राफिक्स फिल्डमध्ये निर्दिष्ट केले आहेत. |
08:59 | मी Icon View वर जातो. |
09:02 | circle मध्ये निळ्या भागावर राईट-क्लिक करा. Properties निवडा. |
09:09 | OriginX हे ellipse च्या केंद्राचा क्षैतिज निर्देशांक आहे. |
09:15 | त्याचप्रमाणे, OriginY हे ellipse च्या केंद्राचा उभा निर्देशांक आहे. |
09:22 | Extent1X हे ellipse च्या सर्वात डाव्या बिंदूचे क्षैतिज निर्देशांक आहे. |
09:29 | Extent1Y हे ellipse च्या सर्वात वरचा उभा निर्देशांक आहे. |
09:36 | त्याप्रमाणे Extent2X and Extent2Y सर्वात डावे आणि सर्वात खालील बिंदूशी अनुरूप आहे. |
09:48 | Line Style चा उपयोग बॉर्डर लाईनच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी केला जातो. |
09:53 | Line Style अंतर्गत Color वर क्लिक करा. |
09:57 | हा आपल्याला बॉर्डरचा रंग बदलण्याची अनुमती देतो. |
10:01 | मी रेड निवडतो आणि OK वर क्लिक करतो. |
10:05 | Line Style अंतर्गत Pattern ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा. |
10:10 | हे आपल्याला बॉर्डरचे पॅटर्न बदलण्यास अनुमती देते. मी एक सॉलिड लाईन निवडली आहे. |
10:17 | Thickness फिल्ड बॉर्डरची जाडी निर्दिष्ट करते. |
10:21 | त्यास 0.5 युनिटमध्ये बदला. |
10:25 | Ok वर क्लिक करा. |
10:27 | लाल रंगात बदलेली बॉर्डर आणि जाडीची वाढ ह्यांच्यातील बदल लक्षात घ्या. |
10:34 | आता पुन्हा एकदा सर्कलवर क्लिक करा आणि Properties निवडा. |
10:40 | Fill Style अंतर्गत, Color वर क्लिक करा. |
10:44 | Color Palette मधून Black निवडा. Ok वर क्लिक करा. |
10:49 | हा रंग ellipse च्या आतील भागात रंग भरण्यासाठी रंग दर्शवतो. |
10:56 | आता Fill Pattern ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा. |
11:00 | FillPattern.Horizontal निवडा आणि Ok वर क्लिक करा. |
11:06 | लक्ष द्या की, फिल कलर काळ्यामध्ये बदलला आहे आणि पॅटर्न सॉलिडपासून हॉरिझेन्टलमध्ये बदलले आहे. |
11:15 | आता Ellipse एनोटेशन स्पष्ट करण्यासाठी, मी Text View वर जातो. Text Viewवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा. |
11:25 | lineColor तीन संख्या घेते जे बॉर्डरचा रंग परिभाषित करते. |
11:31 | ह्या तीनपैकी प्रत्येक संख्या 0 आणि 255 ह्यांदरम्यान व्हॅल्यू घेऊ शकते. |
11:38 | ते वापरलेल्या रंगाच्या RGB तीव्रतेशी अनुरूप आहेत. |
11:44 | fillPattern इंटेरिअरमध्ये भरले जाणारे पॅटर्न निर्दिष्ट करते. |
11:51 | extent हे coordinateSystem च्या extent फील्डच्या संदर्भात समान आहे. |
11:57 | LineThickness बॉर्डरची जाडी दर्शवते. |
12:02 | लक्षात घ्या की, हे सर्व फील्ड्स Properties डायलॉग बॉक्स वापरून बदलता येतात, जसे की आपण आधीच पाहिले आहे. |
12:10 | आता, मी टूलबारच्या सहाय्याने नवीन ellipse तयार करण्यासाठी Icon View वर जातो. Icon View वर क्लिक करा. |
12:19 | मी काही स्पेस मोकळी करण्यासाठी विद्यमान circle ची पुनर्रचना करतो. |
12:24 | circle वर राईट-क्लिक करा आणि properties निवडा. |
12:29 | Extent2Y ला 0 युनिट्समध्ये बदला. Ok वर क्लिक करा. |
12:35 | आता नवीन ellipse इन्सर्ट करण्यासाठी, टूलबारमधील Ellipse बटणावर क्लिक करा. |
12:42 | कॅन्वसमध्ये कुठेतरी लेफ्ट-क्लिक करा आणि माऊस धरून ड्रॅग करा. |
12:50 | एक ellipse तयार झाल्यानंतर माऊस सोडून द्या. |
12:55 | ellipse वर राईट-क्लिक करा आणि आपल्या आवडीप्रमाणे त्याची प्रॉपर्टिज बदलण्यासाठी Properties निवडा. Ok वर क्लिक करा. |
13:05 | अशाचप्रकारे आपण टूलबारच्या मदतीने Line, Polygon, Rectangle आणि Text इन्सर्ट करू शकता. |
13:13 | आता मी Diagram View स्पष्ट करतो. Diagram View वर क्लिक करा. |
13:19 | लक्षात घ्या की, येथे एक लाईन इन्सर्ट केली आहे. या लाईनची प्रॉपर्टिज Diagram एनोटेशनमध्ये निर्दिष्ट केली आहे. |
13:28 | Diagram एनोटेशन समजून घेण्यासाठी Text View वर जा. खाली स्क्रोल करा. |
13:35 | Diagram एनोटेशन त्याच्या सिन्टॅक्समध्ये Icon एनोटेशन समान आहे. |
13:41 | ह्यात हा त्याचे कम्पोनंट रेकॉर्ड्स म्हणून coordinateSystem आणि graphics आहे. |
13:47 | Diagram View मध्ये Line ची इन्सर्ट केलेल्या प्रॉपर्टिज येथे नमूद केल्या आहेत. |
13:53 | Line एनोटेशनचे फिल्ड्ज सहज समजल्या जाऊ शकतात. |
13:58 | आता Icon आणि Diagram Views मधील फरक समजून घेऊ. |
14:04 | मी OMEdit विंडो उजवीकडे हलवतो. |
14:09 | Ctrl + S दाबून मॉडेल सेव्ह करा. |
14:13 | जसे की येथे पाहिले जाऊ शकते Icon View मध्ये दर्शविलेली आकृती Libraries Browser मधील आयकॉन म्हणून दिसते. |
14:22 | तर Diagram View component-oriented modeling लक्षणीय प्रमाणात वापरले जाते. |
14:29 | आगामी ट्यूटोरिअल्समध्ये आपण component-oriented modeling बद्दल अधिक जाणून घेऊ. |
14:35 | आता मी पुन्हा स्लाईड्सवर जातो. |
14:39 | Ellipse मध्ये खालील फील्ड्स आहेत जशी आपण आधीच चर्चा केली आहे. |
14:44 | असाईनमेंट म्हणून, मॉडेलच्या Icon View मध्ये line, polygon, rectangle आणि text इन्सर्ट करा. |
14:53 | त्यांचे प्रॉपर्टिज सुधारित करा आणि त्यांचे एनोटेशन्स समजून घ्या. |
14:58 | ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
15:02 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट सारांशित करतो. |
15:08 | आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
15:14 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
15:20 | आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग करतो. कृपया दर्शविलेल्या वेबसाईटला भेट द्या. |
15:28 | आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करतो. |
15:33 | कृपया आमच्या लॅब मायग्रेशन प्रोजेक्टविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या. |
15:39 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते. |
15:46 | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये आमच्यासोबत सहभागासाठी धन्यवाद. |