OpenModelica/C2/OpenModelica-Connectors/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:18, 15 March 2018 by Latapopale (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 OpenModelica Connectors वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण एक नवीन class' तयार करणे, अस्तित्वात असलेला class उघडणे, विभिन्न classes कनेक्ट करणे, model बनवणे model आणि सिम्युलेट करणे शिकणार आहोत.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica version 1.11.0 आणि Ubuntu Linux OS 14.04 वापरत आहे.
00:34 परंतु, ह्या ट्युटोरिअलमध्ये प्रदर्शित केलेली प्रक्रिया इतर OS मध्ये समान आहे. जसे - Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE.
00:47 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, आपल्याला OMEdit बद्दल माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरिअलचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख केला आहे.
00:57 ट्युटोरिअलमध्ये वापरलेली RLC_Circuit फाईल आमच्या साईटवर कोड फाईल म्हणून देण्यात आली आहे.
01:04 Code Files लिंकवरून फाईल्स डाऊनलोड करा.
01:09 मी आधीच OMEdit विंडो उघडली आहे.
01:13 आता आपण नवीन model कसे तयार करावे याबद्दल चर्चा करू.
01:18 प्रथम आपण नवीन class तयार करणार आहोत. तर File मेनूवर जा आणि New Modelica Class निवडा.
01:27 Create New Modelica Class विंडो प्रदर्शित होते.
01:31 Name फील्डमध्ये, आपण तयार करू इच्छित असलेल्या class चे नाव प्रविष्ट करा.
01:37 मी Sample असे नाव प्रविष्ट करेन.
01:41 Specialization फील्डमध्ये, आपण तयार करू इच्छित असलेल्या class चा प्रकार निवडा. मी Class निवडेन.
01:50 मग OK वर क्लिक करा.
01:53 दिलेल्या नावासह एक नवीन class तयार होईल.
01:57 आगामी ट्युटोरिअलमध्ये आपण classes बद्दल अधिक शिकू.
02:02 आता आपण हा क्लास सेव्ह करू.
02:05 त्यासाठी, Sample class वर राईट-क्लिक करा आणि Save वर क्लिक करा.
02:11 ही फाईल सेव्ह करण्यासाठी योग्य स्थान निवडा.
02:15 Sample फाईल बंद करू. Sample वर राईट-क्लिक करा आणि Unload निवडा.
02:22 प्रदर्शित कंम्फरमेशन डायलॉग बॉक्समध्ये Yes वर क्लिक करा.
02:27 आता आपण विद्यमान class कसा उघडायचा हे शिकणार आहोत.
02:32 class उघडण्यासाठी, File मेनूवर जा. मग Open Model/Library File वर क्लिक करा.
02:40 आपल्याला जी उघडायची आहे ती इच्छित फाईल निवडा.
02:44 मी Code files फाईल निवडेन जी आधी RLC_Circuit.mo मधून डाऊनलोड केली होती.
02:52 Open बटणावर क्लिक करा.
02:55 आता आपण Connectors बद्दल शिकू.
02:59 Connector हा एका मॉडेलचे दुसर्या मॉडेलसोबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीचा एक मार्ग आहे.
03:07 Connectors चे उपयोग :
03:09 कनेक्टर्स हे कनेक्शन्स, कम्युनिकेशन, कंपोन्मेट आणि बाहेरील जग यांना एकत्र जोडण्यासाठी वापरले जातात.
03:17 पुढे आपण classes जोडणे शिकू.
03:20 यासाठी मी RLC_Circuit फाईल वापरणार आहे जी आपण आधीच उघडली आहे.
03:28 RLC_Circuit हे एक Modelica package आहे ज्यात भिन्न classes आहेत.
03:34 package विस्तृत करू.
03:37 येथे आपण विविध classes, म्हणजे, Ground, VoltageSource , Resistor , Capacitor आणि Inductor
पाहू शकतो.
03:49 आणि connector नावाचे Pin देखील.
03:53 आपण ह्या मालिकेत आगामी ट्युटोरिअल्समध्ये classes आणि connectors बद्दल अधिक जाणून घेऊ.
04:00 ह्या पॅकेजमध्ये circuit class देखील असतो.
04:05 circuit फाईलवर डबल-क्लिक करा आणि Text view वर जा.
04:11 इथे आपण पाहू शकतो की class मध्ये कोणत्याही कोडचा समावेश नाही.
04:17 आता Diagram View वर जा.
04:20 ग्रिड क्षेत्रामध्ये आपण सर्व blocks/components ठेवू. मग आपण त्यांना कनेक्ट करू.
04:29 Resistor वर क्लिक करा आणि त्यास ग्रीड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
04:35 आपल्याला मेसेज मिळतो Enter Component Name.
04:38 Name फील्डमध्ये, R म्हणून कम्पोनन्ट नाव प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
04:47 Inductor वर क्लिक करा आणि त्याला ग्रिड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि Resistor च्या नंतर ठेवा.
04:56 कम्पोनन्ट नाव L प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
05:02 Capacitor वर क्लिक करा. ग्रिड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा आणि ते Inductorच्या नंतर ठेवा.
05:10 कम्पोनन्ट नाव C प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
05:15 नंतर, VoltageSource वर क्लिक करा आणि त्यास ग्रीड स्पेसमध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा.
05:22 हे R, L आणि C च्या वर ठेवा, जे श्रृंखलेनुसार आहेत.
05:28 कम्पोनन्ट नाव ACVoltage म्हणून प्रविष्ट करा.
05:32 लक्षात ठेवा, कृपया कम्पोनन्ट नावाच्या फील्डमध्ये कोणतीही स्पेस ठेवू नका.
05:38 सिम्युलेशनच्या वेळी तो अनुवाद एरर देईल. आता OK वर क्लिक करा.
05:45 त्यानंतर, Ground वर क्लिक करा आणि त्यास ग्रीड स्पेसमध्ये ड्रॉप आणि ड्रॉप करा.
05:52 हे श्रृंखलेत, R, L आणि C कम्पोनन्ट खाली ठेवा.
05:57 कम्पोनन्ट नाव G म्हणून प्रविष्ट करा आणि OK वर क्लिक करा.
06:02 आता श्रृंखलेत RLC Circuit तयार करण्यासाठी आपल्याकडे सर्व आवश्यक कम्पोनन्ट्स घटक आहेत.
06:09 हे कम्पोनन्ट्स जोडू.
06:12 माऊस कम्पोनन्टच्या डाव्या भागावर ठेवा.
06:16 पॉपअप RLC underscore Circuit dot pin p प्रदर्शित होतो.
06:22 हे positive pin दर्शवते.
06:25 त्याचप्रमाणे, कम्पोनन्टचा उजवा भाग RLC underscore Circuit dot pin n म्हणून पॉप अप दाखवितो.
06:34 हे negative pin दर्शवते.
06:37 कर्सर Resistorच्या negative pin वर ठेवा.
06:42 आपण + चिन्ह पाहू शकतो जेव्हा कर्सर n pin वर ठेवले जाते.
06:48 pin वर क्लिक करा.
06:49 ते पकडून ठेवा आणि Inductor च्या p pin वर ड्रॅग करा.
06:54 Inductor's p pin वर क्लिक करा आणि नंतर कर्सर सोडा.
07:01 पुढे, आपण Inductor च्या n pin ला Capacitor च्या p pin शी जोडणार आहोत.
07:08 Inductor च्या n pin वर क्लिक करा.
07:11 पकडून ठेवा आणि ते Capacitor च्या p pin वर ड्रॅग करा.
07:15 Capacitor च्या n pin वर क्लिक करा.
07:20 आता आपण श्रृंखलेत Resistor, Inductor आणि Capacitor कनेक्ट आहेत.
07:28 पुढील पायरी आहे VoltageSource प्रदान करणे.
07:32 Resistor च्या n pin वर क्लिक करा.
07:36 पकडून ठेवा आणि ते VoltageSource च्या p pin वर ड्रॅग करा.
07:42 तशाचप्रकारे, आपण Capacitor चे n pin हे VoltageSource च्या n pin शी कनेक्ट करणार आहोत.
07:50 Capacitor च्या n pin वर क्लिक करा.
07:53 पकडून ठेवा आणि ते VoltageSource च्या p pin वर ड्रॅग करा.
07:58 n pin वर क्लिक करा आणि कर्सर सोडा.
08:03 पुढील पायरी आहे, सर्किट Ground करणे.
08:07 VoltageSource च्या n pin वर क्लिक करा.
08:11 पकडून ठेवा आणि ते Ground वर ड्रॅग करा.
08:14 लक्षात घ्या की Ground ला फक्त एकच pin मिळाली आहे जी आहे p pin.
08:20 त्यावर क्लिक करा आणि कर्सर सोडा. आता सर्किट पूर्ण आहे.
08:25 ट्युटोरिअल थांबवा आणि तपासा की आपले सर्किट ह्याप्रमाणे दिसले पाहिजे.
08:33 class सेव्ह करण्यासाठी CTRL S दाबा.
08:37 आता आपण class ची शुद्धता तपासणार आहोत.
08:41 Check All Models बटणावर क्लिक करा.
08:45 Messages Browser चे निरीक्षण करा.
08:49 हे, समीकरणांची संख्या आणि व्हेरिएबल्सची संख्या दर्शविते.
08:53 ते दोन्ही समान असतील तर मॉडेल सिम्युलेटसाठी तयार होईल.
08:58 Simulate बटणावर क्लिक करा. एक नवीन विंडो प्रदर्शित होते.
09:03 ही आऊटपुट विंडो success message दाखवते.
09:09 R विस्तृत करा आणि Ir आणि time च्या दरम्यान प्लॉट मिळवण्यासाठी Ir वर क्लिक करा.
09:18 आगामी ट्युटोरिल्समध्ये आपण इक्वेशन्स आणि व्हेरिएबल्स ह्याबद्दल शिकू.
09:24 हे सर्व ह्या ट्युटोरिअलसाठी आहे. सारांशित करू.
09:28 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण, नवीन class तयार करणे, एक विद्यमान class उघडणे, विभिन्न classes कनेक्ट करणे, Model तयार करणे आणि सिम्युलेट करणे शिकलो.
09:43 असाईनमेंट म्हणून - RLC सर्किट निर्माण करा, जिथे Resistor, Inductor आणि Capacitor समांतर कनेक्शनमध्ये आहेत.
09:53 RLC_Circuit package मध्ये उपलब्ध असलेले समान classes आणि connector वापरा.
10:01 ही सर्किटची आकृती आहे ज्याची रचना करणे गरजेची आहे.
10:01 खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा. [1] हे स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते.
10:15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या् विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.
10:31 ह्या फोरममध्ये आपल्या वेळेसह आपले प्रश्न पोस्ट करा.
10:34 FOSSEE टीम लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांच्या कोडींगचे समन्वय करतो. आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया हया साईटला भेट द्या.
10:49 FOSSEE टीम व्यावसायिक सिम्युलेटर लॅब OpenModelica मध्ये स्थलांतर करण्यास मदत करते. आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. अधिक माहितीसाठी, कृपया ह्या साईटला भेट द्या.
11:06 स्पोकन ट्युटोरिअल आणि FOSSEE प्रोजेक्ट्सला NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे निधी मिळाला आहे.
11:15 हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. सहभागासाठी धन्यवाद

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana