Gedit-Text-Editor/C2/Common-Edit-Functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | gedit Text editor मधील Common Edit Functions वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये gedit मध्ये वारंवार वापरत असलेल्या फंक्शन्सचे एडिटींग शिकणार आहोत. |
00:15 | आपण कंटेन्ट Cut, Copy आणि Paste, एक्शन्स Undo आणि Redo आणि टेक्स्ट Search आणि Replace करणे शिकणार आहोत. |
00:25 | आपण आपले डॉक्युमेंट प्रिंट करणेदेखील शिकू. |
00:29 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे. |
00:39 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमबद्दलचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:44 | gedit Text editor उघडा. |
00:48 | आता Students.txt फाईल उघडा, जी आपण पूर्वी तयार केली आहे. |
00:55 | टूलबारमध्ये आयकॉन लेबल open सह आयकॉन वर क्लिक करून असे करू. |
01:01 | विद्यमान फाईल उघडण्यासाठी हे शॉर्टकट आयकॉन आहे. |
01:06 | Open Files डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:09 | उजव्या बाजूला असलेले Desktop फोल्डर निवडा. |
01:12 | Students.txt फाईल निवडा आणि Open वर क्लिक करा. |
01:17 | आता टेक्स्ट cut, copy आणि paste कसे करायचे ते शिकू. |
01:22 | प्रथम आपल्याला जो टेक्स cut किंवा copy करायचा आहे तो निवडावा. |
01:27 | मला ह्या फाईलमधून पहिल्या तीन विद्यार्थ्यांचे तपशील कट करायचे आहेत. |
01:32 | पहिल्या तीन विद्यार्थ्यांचे तपशील निवडण्यासाठी त्या तीन ओळींवर कर्सर क्लिक आणि ड्रॅग करा. |
01:39 | आता, टेक्स निवडलेला आहे. |
01:42 | आपण टूलबारमधील Cut आयकॉन वापरू शकतो किंवा Main मेन्यूमधून, Edit आणि Cut निवडा. |
01:51 | अन्यथा, टेक्स कट करण्यासाठी आपण Ctrl + X कीज एकत्रितपणे दाबू शकतो. |
01:58 | लक्षात घ्या की निवडलेला टेक्स फाईलमध्ये दिसत नाही. |
02:03 | कृपया लक्षात ठेवा, हा टेक्स डिलीट केला जात नाही. |
02:08 | तो clipboard म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंप्युटरच्या मेमरीच्या एका भागामध्ये साठवला गेला आहे. |
02:13 | Clipboard असे कंटेट साठवते जे एकतर कट किंवा कॉपी केले आहे. |
02:18 | कंटेन्ट तात्पुरती साठवली जाते जोपर्यंत ती पेस्ट किंवा अन्य कंटेन्टला कॉपी केली जात नाही.
|
02:25 | एकदा तुम्ही gedit मधून बाहरे पडलात की Clipboard कंटेन्ट मेमरी मधून डिलीट होते. |
02:31 | gedit वर परत येऊ. |
02:34 | आता हा टेक्स्ट एका नवीन डॉक्युमेंटमध्ये पेस्ट करा. |
02:38 | मेन मेनूमधून, File आणि New वर क्लिक करा. |
02:42 | gedit विंडोमध्ये Untitled Document 1 नावाचे एक नवीन डॉक्युमेंट उघडेल. |
02:47 | आता, मेन मेन्यूमधून, Edit आणि Paste निवडा. |
02:53 | अन्यथा, आपण टेक्स पेस्ट करण्यासाठी Ctrl + V की एकत्रितपणे दाबू शकतो. |
03:00 | किंवा Toolbar मधील Paste आयकॉन वापरा. |
03:04 | Students.txt मधील टेक्स ह्या डॉक्युमेंटमध्ये पेस्ट केला जातो. |
03:11 | Students.txt टॅब निवडा. |
03:14 | आता उर्वरित विद्यार्थ्यांचे तपशील निवडा आणि त्याची एक कॉपी बनवा. |
03:20 | मेन मेनूमधून, Edit आणि Copy निवडा. |
03:24 | आपण कंटेन्ट कॉपी करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट Ctrl + C देखील वापरू शकतो. |
03:30 | लक्ष द्या की कॉपी केलेला टेक्स अजूनही दिसत आहे. |
03:34 | हा टेक्स clipboard मध्ये देखील संचयित केला आहे. |
03:38 | Untitled Document 1 टॅब निवडा. |
03:42 | तिसऱ्या ओळीनंतर कर्सर ठेवा आणि Enter दाबा. |
03:46 | आता कॉन्टेक्स्ट मेनूसाठी राईट-क्लिक करा आणि Paste निवडा. |
03:52 | कंटेन्ट निर्दिष्ट स्थानावर पेस्ट केली आहे. |
03:56 | gedit मध्ये कंटेन्ट cut, copy आणि paste करण्याचा हा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे. |
04:04 | आता आपण Undo आणि Redo पर्याय पाहू. |
04:07 | gedit Text editor फाईलमध्ये केलेले कोणतेही बदल Undo करण्याची परवानगी देते. |
04:13 | मुळात हे डॉक्युमेंटमध्ये केलेले शेवटचे बदल मिटवते. |
04:18 | आपण चूक केल्यावर आणि आपल्याला ते पुन्हा हवे असल्यास Undo हे उपयुक्त आहे. |
04:23 | Undo साठी कीबोर्ड शॉर्टकट Ctrl + Z आहे. |
04:27 | Undo चा विरुद्ध Redo आहे |
04:31 | Redo कमांड Undo क्रिया उलट करते. |
04:35 | Redo साठी कीबोर्ड शॉर्टकट आहे Shift + Ctrl + Z . |
04:41 | आता gedit Text editor वर जाऊ. |
04:44 | राईट-क्लिक करा आणि Undo निवडा. |
04:47 | आपण कॉपी आणि पेस्ट केलेला टेक्स आता दिसत नाही. |
04:52 | copy-paste क्रिया झाली नाही. |
04:56 | पुन्हा एकदा undo करू. यावेळी, Ctrl + Z कीज एकत्रपणे दाबा. |
05:04 | आपण पाहू शकतो की कर्सर तिसऱ्या ओळीच्या टोकाशी परत आला आहे. |
05:09 | मागील क्रिया आता झालेली नाही. |
05:13 | राईट-क्लिक करा आणि पुन्हा Undo निवडा. |
05:17 | आम्ही आधी पेस्ट केलेल्या पहिल्या तीन ओळीदेखील ह्यापुढे दिसणार नाहीत. |
05:23 | आपण टूलबार मधील Undo आयकॉनचा वापर करू शकतो. |
05:28 | अशा प्रकारे आपण आतापर्यंत केलेल्या सर्व क्रिया Undo करू शकतो. |
05:34 | आता, आपण टेक्स्ट पुन्हा कसे प्राप्त करू शकतो? |
05:38 | सोप्पे आहे ! राईट-क्लिक करा आणि Redo निवडा. |
05:42 | आता आणखीन पुन्हा एकदा आपली कृती redo करू. |
05:45 | या वेळी Shift + Ctrl + Z कीज दाबा. |
05:50 | Toolbar मध्ये आपण Redo आयकॉनदेखील वापरू शकतो. |
05:55 | आपल्याला टेक्स पुन्हा मिळाला आहे. |
05:57 | आणि आता आपण Students.txt फाईल्समधील फक्त विद्यार्थ्यांचा तपशील पाहू शकतो जो gedit विंडोमध्ये कॉपी करण्यात आला आहे. |
06:06 | पुढे, आपण Search आणि Replace पर्याय पाहू. |
06:10 | शंभर ओळी असलेल्या मजकुराच्या फायलीत एका विशिष्ट शब्दाचा शोध घेणे कठीण आहे. |
06:17 | Search फंक्शन संपूर्ण डॉक्युमेंटमध्ये शब्दाच्या एक किंवा सर्व उदाहरणे शोधण्यासाठी परवानगी देतो. |
06:24 | gedit Text editor वर परत जाऊ. |
06:28 | आता मी आधीपासूनच तयार केलेली school.txt डॉक्युमेंट उघडते. |
06:34 | ह्या ट्युटोरिअल सोबत school.txt फाईल Codefile लिंकमध्ये उपलब्ध आहे. |
06:40 | ते टेक्स्ट डॉक्युमेंट डाऊनलोड करून वापरा. |
06:44 | या डॉक्युमेंटमध्ये, मला एका विशिष्ट शब्दाचा शोध घ्यायचा आहे. |
06:48 | हे करण्यासाठी, मेन मेनूमधून Search वर व नंतर Find वर क्लिक करा. |
06:53 | अन्यथा आपण Ctrl + F की एकत्रित दाबू शकतो. |
06:58 | किंवा टूलबारमध्ये Search for text आयकॉन वापरा. |
07:02 | विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात Find बॉक्स उघडेल. |
07:07 | Find बॉक्समध्ये School शब्द टाईप करा. |
07:11 | लक्षात घ्या की school शब्दाची सर्व उदाहरणे डॉक्युमेंटमध्ये पिवळ्या रंगाने हायलाईट केली आहेत. |
07:18 | प्रथम आलेला school शब्द तपकिरी रंगात हायलाईट केला आहे. |
07:24 | आता Find बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा. |
07:29 | प्रदर्शित पर्यायांच्या सूचीमधून Match Case वर क्लिक करा. |
07:34 | केवळ एक शब्द, केस ऑप्शनशी जुळतो. School या शब्दात S हा कॅपिटल आहे. |
07:41 | पुन्हा, Find बॉक्सवर कर्सर ठेवा आणि माऊसवर राईट-क्लिक करा. Match Case ऑप्शन्स अनचेक करा. |
07:50 | आता, मेन मेन्यूमधून Search वर क्लिक करा आणि नंतर Replace वर क्लिक करा. |
07:56 | अन्यथा आपण Ctrl + H कीज एकत्रित दाबू शकतो किंवा टूलबारमधील Search for and replace text आयकॉन वापरा. |
08:08 | Replace डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:11 | Search for फील्डमध्ये, schools टाईप करा आणि Enter दाबा. |
08:17 | Replace with बॉक्समध्ये, colleges टाईप करा. Match entire word only चेक बॉक्स चेक करा. |
08:26 | आपण पाहू शकतो की सर्व schools हे शब्द पिवळ्या रंगात हायलाईट केले आहेत. |
08:31 | Replace बटणावर क्लिक करा. |
08:34 | हे प्रथम आलेल्या schools ला colleges शी बदलेल. |
08:39 | सर्व आलेल्या schools ला colleges सह बदलण्यासाठी Replace All बटणावर क्लिक करा. |
08:46 | विंडो बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
08:50 | gedit Text editor टाईप केल्याप्रमाणे आपल्याला शोधण्याची मुभा देतो. |
08:56 | Find बॉक्स उघडण्यासाठी Ctrl आणि F की एकत्र दाबा. |
09:01 | आता Find बॉक्समध्ये, Students टाईप करा. |
09:06 | लक्षात घ्या की जेव्हा आपण पहिले अक्षर S टाईप कराल तेव्हा कर्सर सर्व डॉक्युमेंटमधून S अक्षरे हायलाईट करतो. |
09:14 | अखेरीस, आपण टायपिंग केल्यावर संपूर्ण शब्द Students हायलाईट केला जातो. |
09:20 | आता आपण school.txt फाईल कशी प्रिंट करावी ते पाहू. |
09:25 | Menu bar मधून File निवडा आणि नंतर Print. |
09:30 | आपण टूलबारमधील Print आयकॉनवरदेखील क्लिक करू शकतो. |
09:35 | Print डायलॉग बॉक्स दिसेल. |
09:38 | जर प्रिंटर आपल्या मशीनशी जोडलेला असेल तर, तो Printer details अंतर्गत येथे सूचीबद्ध केला जाईल. |
09:44 | या विंडोमधील टॅब्स आणि सिलेक्शन्स हे डीफॉल्ट कॉन्फिगरेशन सेटिंग्जनुसार असतील. |
09:50 | आपले डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी, तळाशी उजवीकडे Print बटणावर क्लिक करा. |
09:55 | जर प्रिंटरचे कॉन्फिगरेशन योग्य असेल, तर आपले डॉक्युमेंट प्रिंट होईल. |
10:00 | ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया. |
10:05 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Cut, Copy आणि Paste, Undo आणि Redo, Search आणि टेक्स रिप्लेस करणे आणि प्रिंट ऑपशन्स शिकलो. |
10:16 | तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे- |
10:19 | gedit मध्ये School.txt फाईल उघडा. |
10:23 | पहिला परिच्छेद कॉपी करा आणि हे एका नवीन डॉक्युमेंटमध्ये पेस्ट करा. |
10:27 | नवीन डॉक्युमेंट SchoolNew.txt म्हणून सेव्ह करा. |
10:32 | शीर्षक म्हणून About School अशी पहिली ओळ टाईप करा. बदलांना Undo करा. |
10:38 | फाईलच्या कॉन्टेन्टसमधील बदलांवर लक्ष द्या. |
10:42 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा. |
10:49 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रे देते. |
10:54 | अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
10:58 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये तुम्हांला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या. |
11:03 | मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपल्याला प्रश्न आहे. |
11:07 | आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल. |
11:13 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. |
11:20 | ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:25 | हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |