OpenModelica/C2/Developing-an-equation-based-model/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:45, 17 January 2018 by Latapopale (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Developing an equation based model वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत OMEdit मधील textual मॉडेल कसे तयार करावे आणि ते सिम्युलेट कसे करावे ? |
00:14 | व्हेरिएबल्स आणि इक्वेशन्स कसे घोषित करायचे. |
00:17 | Simulation Setup टूलबॉक्स कसा वापरावा. |
00:21 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2 आणि उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम 14.04 वापरत आहे. |
00:32 | परंतु, ही प्रोसेस Windows, Mac OS X किंवा ARM वर FOSSEE मध्ये समान आहे. |
00:40 | हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी, आपल्याला फिजिकल सिस्टम्सच्या इक्वेशन-आधारित मॉडेलिंग माहित असणे आवश्यक आहे. |
00:48 | आपण वस्तुमान m च्या बॉलची गती सिम्युलेट करू. जे free fall due to gravity अंतर्गत आहे. |
00:54 | पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची व्हेरिएबल h द्वारे दर्शविली जाते. |
00:59 | बॉलची गती व्हेरिएबल v द्वारे दर्शविली जाते. |
01:04 | Acceleration due to gravity हा g द्वारे दर्शविला जातो आणि तो स्थिर मानला जातो. |
01:10 | पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर केलेल्या व्हेरिएबल्सना सकारात्मक मानले जाते. |
01:16 | मुक्तपणे खाली येण्याऱ्या बॉडीसाठी equations of motion खालीलप्रमाणे आहेत: dh/dt = v , dv/dt = g |
01:27 | t = 0 वेळी h ची वॅल्यू 30 m आहे आणि t = 0 वेळी v ची वॅल्यू 0 आहे. |
01:37 | आता मी OMEdit वर जातो. मी ते आधीच माझ्या सिस्टमवर सुरू केले आहे. |
01:43 | उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर OMEdit उघडण्यासाठी, Dash Home आयकॉनवर क्लिक करा जे launcher मध्ये डावीकडे सर्वात वर प्रदर्शित होते. |
01:53 | search bar मध्ये OMEdit टाईप करा. |
01:56 | OMEdit आयकॉनवर क्लिक करा. |
01:59 | OMEdit आयकॉनवर क्लिक केल्यास आपण अशी एक विंडो पाहाल. |
02:06 | ही विंडो Welcome perspective म्हणून ओळखली जाते. |
02:09 | OMEdit डीफॉल्टपणे Welcome perspective मध्ये उघडते. |
02:14 | तळाशी उजव्या कोपऱ्यात, Welcome, Modeling आणि Plotting perspectives बटण्स पाहू शकता. |
02:23 | Modeling perspective वर क्लिक करा. |
02:26 | Modeling perspective आता उघडले आहे. |
02:29 | मी modeling area च्या रूपात डाव्या बाजूला Libraries Browser, खाली Messages Browser आणि शीर्षावर Toolbar दरम्यान क्षेत्राचा संदर्भ घेत आहे. |
02:41 | toolbar मध्ये file operations, graphical view आणि simulation शी संबंधित बटन्स आहेत. |
02:51 | जसे आपण पुढे जाऊ, आपण ह्या बटण्सबद्दल अधिक जाणून घेऊ. |
02:55 | आता, आपण आपल्या स्पोकन ट्युटोरिअल वेबपेजवर Code Files लिंकमध्ये उपलब्ध freeFall class फाईल वापरू. |
03:02 | कृपया ही फाईल डाऊनलोड करून आपल्या सिस्टमवर सेव्ह करा. |
03:07 | हा classउघडण्यासाठी, Menu bar मध्ये File मेनूवर जा. |
03:13 | Open Model/Library File वर क्लिक करा. |
03:17 | आपण डाऊनलोड केलेली आणि आपल्या सिस्टमवर सेव्ह केलेली freeFall शोधा आणि ती उघडा. |
03:24 | आपण फाईल उघडण्यासाठी Open Model/Library File नावाचे टूलदेखील वापरू शकता, ज्यास माझे कर्सर निर्देशित करत आहे. |
03:34 | लक्षात ठेवा की freeFall आयकॉन Libraries Browser मध्ये प्रदर्शित होते. |
03:39 | Libraries Browser सर्व classes दर्शविते, जे OMEdit च्या सेशनमध्ये लोड केले गेले आहेत. |
03:45 | freeFall आयकॉन वर राईट-क्लिक करा आणि View Class निवडा. |
03:52 | class आता Diagram व्ह्यूमध्ये उघडला आहे. |
03:56 | Diagram व्ह्यूमध्ये class उघडत नसेल तर काळजी करू नका. |
04:00 | मी आपल्याला वेगवेगळ्या व्ह्यूजमध्ये कसे जायचे ते दाखवेन. |
04:04 | Modeling area च्या शीर्षस्थानी जा. |
04:07 | लक्षात घ्या की दुसरे बटण Diagram view साठी आहे. |
04:10 | तिसरे बटण Text View आहे. |
04:13 | Text View वर जाण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
04:17 | class आता Text view मध्ये उघडला आहे. |
04:20 | लक्षात घ्या की पहिले बटण Icon View साठी आहे. |
04:24 | आपण Icon view आणि Diagram view विषयी नंतर अधिक जाणून घेऊ. |
04:29 | आपण freeFall नावाचा एक नवीन class देखील तयार करू शकता आणि आवश्यक माहिती टाईप करू शकता. |
04:36 | नवीन class तयार करण्यासाठी, File मेनूवर जा. |
04:40 | New Modelica Class निवडा. |
04:43 | दाखविल्याप्रमाणे एक डायलॉग बॉक्स पॉप अप होतो. |
04:46 | ह्या डायलॉग बॉक्सच्या Name फील्डमध्ये, freeFall टाईप करा. |
04:51 | मी वेगळे नाव वापरत आहे. freeFall1 कारण freeFall आधीपासूनच OMEdit मध्ये उघडली आहे. |
04:58 | लक्षात घ्या की दोन क्लासेसना एकच नाव असू शकत नाही. |
05:03 | ड्रॉप-डाऊन मेनूमध्ये Specialization वर क्लिक करा. Class निवडा. Ok वर क्लिक करा. |
05:10 | एक नवीन class तयार करण्यात आला आहे. |
05:13 | आपण नवीन क्लास उघडण्यासाठी, New Modelica class नावाचे टूलदेखील वापरू शकता. |
05:20 | मी annotation section डिलीट करतो. |
05:23 | आता, आपण येथे आवश्यक माहिती टाईप करू शकता आणि हा class सेव्ह करा. |
05:29 | हा class सेव्ह करण्यासाठी' मेन्यू बारमधील File मेनूवर जा आणि Save वर क्लिक करा. |
05:36 | ह्या फाईलसाठी योग्य स्थान निवडा आणि ती सेव्ह करा. |
05:41 | आता freeFall class वापरून Modelica चे सिंटॅक्स समजून घेऊ. |
05:47 | तर freeFall class वर जा. |
05:49 | Modelling area च्या शीर्षस्थानी जा. freeFall टॅबवर क्लिक करा. |
05:54 | Modelica मधील प्रोग्रॅम्स classes च्या स्वरूपात आयोजन केले आहे. |
05:58 | class ची पहिली ओळ त्याचे नाव परिभाषित करते. |
06:02 | ह्या क्लासचे नाव freeFall आहे. |
06:05 | क्लास कोठे समाप्त होतो हे दर्शविण्यासाठी प्रत्येक क्लासमध्ये end statement असणे आवश्यक आहे. |
06:11 | ह्या क्लासमध्ये variable declarations आणि equations आहेत. |
06:15 | मी आपल्याला दाखवतो की variables कसे घोषित करायचे. |
06:18 | Real हे data-type प्रदर्शित करते. |
06:21 | h हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बॉलची उंची दर्शवते. |
06:25 | start हे Real variable चे वैशिष्ट्य आहे. |
06:29 | प्रत्येक data-type कडे विशिष्ट गुणधर्म आहेत, जे व्हेरिएबल्सशी संबंधित उपयुक्त माहिती निर्दिष्ट करतात. |
06:36 | start चे वैशिष्ट्य व्हेरिएबलची प्रारंभिक वॅल्यू निर्दिष्ट करते. |
06:41 | h ची प्रारंभिक वॅल्यू 30 युनिट्स आहे. |
06:45 | unit attribute व्हेरिएबलचे युनिट निर्दिष्ट करते. |
06:49 | h चे युनिट metreआहे. |
06:52 | प्रत्येक variable declaration सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे. |
06:57 | v हे बॉलची गती दर्शवते. ही Real data-type चा आहे. |
07:02 | v ची प्रारंभिक वॅल्यू शून्य आहे. त्याचे युनिट meter per second आहे. |
07:09 | g हा acceleration due to gravity प्रदर्शित करतो. हा Real data-type चा आहे. आणि त्याचे युनिट meter per second squareआहे |
07:18 | parameter हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशन रनमध्ये स्थिर असते. |
07:24 | 9.81 च्या वॅल्यूसह, g ची वॅल्यू संपूर्ण सिम्युलेशन रनमध्ये स्थिर राहते. |
07:32 | नेगेटिव्ह चिन्ह हे साईन कन्वेंशनच्या वापरामुळे आहे. |
07:36 | दुहेरी अवतरणातील टेक्स्ट g च्या विधानासह लिहिलेले एक comment आहे. |
07:42 | Comments प्रोग्रामबद्दल उपयुक्त माहिती पुरवतात. ते डॉक्युमेंटेशनसाठीसुद्धा उपयुक्त आहेत. |
07:49 | आता मी स्लाईड्सवर परत जातो. |
07:52 | parameter हे असे प्रमाण आहे जे सिम्युलेशन रनमध्ये स्थिर राहते. |
07:57 | Real, Integer, Boolean आणि String data-types हे Modelica मध्ये समर्थित आहेत. |
08:03 | start आणि unit attributes आधीच परिभाषित केल्या गेल्या आहेत. |
08:07 | min attribute एका व्हेरिएबलच्या किमान वॅल्यू निर्दिष्ट करते. |
08:10 | त्याचप्रमाणे, max attribute हे व्हेरिएबलची कमाल वॅल्यू निर्दिष्ट करते. |
08:16 | मी OMEdit वर परत जातो. |
08:19 | ‘equation’ हे क्लासच्या equation section च्या सुरूवातीस चिन्हांकित करते. |
08:25 | comments प्रविष्ट करण्याचा हा एक वैकल्पिक मार्ग आहे. |
08:30 | a freely falling बॉडीसाठी दोन equations of motion चा इथे समावेश करण्यात आला आहे. जसे आपण आधीच चर्चिले आहे, |
08:38 | der() हे time derivative साठी Modelica function आहे. |
08:43 | म्हणून, der(h) हे dh/dt चे प्रतिनिधित्व करतो. |
08:48 | आणि der(v) हे dh/dt चे प्रतिनिधित्व करतो. |
08:52 | प्रत्येक equation सेमी-कोलनसह समाप्त झाले पाहिजे. |
08:57 | हा class सिम्युलेट कसा करायचा ते मी तुम्हांला दाखवतो. |
09:00 | टूलबारमध्ये simulate बटणावर क्लिक करा. |
09:04 | पॉप-अप विंडो बंद करा. |
09:07 | ही विंडो Plotting perspective म्हणून ओळखली जाते. |
09:11 | क्लासचे यशस्वी सिम्युलेशन केल्यावर, Plotting perspective स्वयंचलितरित्या उघडते. |
09:17 | Variables browser क्लासच्या variables आणि parameters शी संबंधित माहिती दर्शविते. |
09:24 | लक्षात घ्या की तिथे Unit आणि Description नावाचे कॉलम्स आहेत. |
09:29 | Unit कॉलम व्हेरिएबल्सचे युनिट्स निर्दिष्ट करते, जसे Unit गुणधर्म वापरून परिभाषित केले गेले आहे. |
09:37 | Description कॉलम variable declarations सह डबल कोट्समध्ये लिहिलेले कमेंट्स प्रदर्शित करते. |
09:45 | मी आपल्याला plot जनरेट कसा करावा हे दाखवितो. h निवडा |
09:51 | हे y एक्सिसवर h आणि x एक्सिसवर time सह टाईमच्या संदर्भात h चे प्लॉट तयार करते. |
10:01 | डीफॉल्टपणे, सिम्युलेशन टाईमच्या 0 ते 1 युनिटपर्यंत रन केले जाते. |
10:07 | time ही युनिट इतर व्हेरिएबल्ससाठी वापरलेल्या units च्या सिस्टमवर अवलंबून असते. |
10:13 | मी h डी-सिलेक्ट करतो. |
10:17 | आवश्यक ते प्लॉट्स तयार झाल्यानंतर नेहमी रिझल्ट डिलीट करणे हा चांगला सराव असतो. |
10:25 | हे रिझल्ट डिलीट करण्यासाठी, freeFall वर राईट-क्लिक करा आणि Delete result निवडा. |
10:33 | रिझल्ट आता डिलीट झाला आहे. |
10:36 | मी Modeling perspective वर परत जातो. |
10:39 | उजवीकडे खाली असलेल्या Modeling बटणावर क्लिक करा. |
10:43 | Modelica मध्ये क्लास मॉडेलसह समानार्थीपणे वापरले जाते. |
10:48 | तोच प्रभाव निर्माण करण्यासाठी, येथे class ऐवजी model वापरू शकता. |
10:54 | आता मी आपल्याला दाखवतो की सिम्युलेशनसाठी time interval कसा बदलावा. |
11:01 | टूलबारमध्ये असलेल्या Simulation Setup बटणावर क्लिक करा. |
11:06 | General टॅबखाली, Stop time फील्ड शोधा. तो 5 युनिट्समध्ये बदला. |
11:14 | Simulate वर क्लिक करा. प्रदर्शित झालेला पॉप-अप विंडो बंद करा. |
11:21 | मी Variables browser मध्ये पुन्हा एकदा h निवडतो. |
11:26 | हे h v/s time प्लॉट बनवते. |
11:29 | लक्षात घ्या की टाईम इन्टर्वल 5 युनिट्समध्ये वाढला आहे. |
11:33 | परंतु, h ची वॅल्यू शून्याने खाली गेली आहे, जे अस्वीकार्य आहे. |
11:40 | आपण ह्या समस्या नंतरच्या ट्युटोरिअलमध्ये कसे सुधारित करावे ते शिकू. |
11:45 | मी freeFall वर राईट-क्लिक करून हा रिझल्ट डिलीट करतो आणि Delete result निवडतो. |
11:53 | तळाशी उजवीकडे Modeling perspective वर क्लिक करून Modeling perspective वर परत जा. |
11:59 | इक्वेशनची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येएवढी आहे हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. |
12:07 | ह्या class चे दोन वेरिएबल्स आणि दोन इक्वेशन्स आहेत. |
12:11 | आता, मी पहिले equation डिलीट करतो आणि काय होते ते पाहण्यासाठी, हा क्लास सिम्युलेट करतो. |
12:18 | मी पहिले equation डिलीट केले आहे. |
12:21 | लक्षात घ्या की freeFall टॅबमध्ये class च्या नावाच्या बाजून एक स्टार दिसतो. |
12:28 | हे क्लासमधील सेव्ह न केलेले बदल दर्शविते. |
12:31 | त्यामुळे बदल केल्यानंतर क्लास सेव्ह करण्याचा हा चांगला सराव आहे. |
12:38 | हा क्लास सेव्ह करण्यासाठी, File menu वर जा आणि Save वर क्लिक करा. |
12:44 | आपण फाईल सेव्ह करण्यासाठी टूलबारमधील Save बटणदेखील वापरू शकता, ज्याला माझा कर्सर निर्देशित करतो. |
12:53 | मी आता Simulate बटणावर क्लिक करून हा क्लास सिम्युलेट करतो. |
12:59 | लक्षात घ्या की Messages browser मध्ये एक एरर मेसेज पॉप अप होतो. |
13:04 | ते म्हणते, खूप कमी इक्वेशन्स आहेत आणि मॉडेलमध्ये 1 equation आणि 2 variablesआहेत. म्हणून हे सिम्युलेट केले जाऊ शकत नाही. |
13:14 | मी equation त्याच्या जागी परत टाकतो आणि टूलबारमध्ये Save बटणावर क्लिक करतो. |
13:24 | क्लास सिम्युलेट करण्यासाठी पुन्हा एकदा Simulate बटणावर क्लिक करा. |
13:29 | लक्षात घ्या की, क्लास यशस्वीपणे सिम्युलेट झाला कारण इक्वेशन्सची संख्या व्हेरिएबल्सच्या संख्येइतकी आहे. |
13:37 | पॉप-अप विंडो बंद करा. |
13:40 | मी स्लाईड्सवर पुन्हा जातो. |
13:43 | der() हे time derivative साठी मॉडेलिका फंक्शन आहे. |
13:48 | येथे equations साठी कोणताही डेटा फ्लो डायरेक्शन नाही आहे. |
13:52 | उदाहरणार्थ, der(h) = v हे v = der(h) असे लिहिले जाऊ शकते. |
14:00 | Initial equations section प्रारंभिक कंडीशन्स प्रविष्ट करण्यासाठी वापरले जाते. |
14:05 | आपण Initial equation बद्दल नंतर अधिक जाणून घेऊ. |
14:10 | एक असाइनमेंट म्हणून, differential equation dx/dt = -a into x सिम्युलेट करण्यासाठी एक model लिहा, जिथे a = 1, x हे R शी संबंधित आहे आणि टाईम t=0 वर x ची वॅल्यू 5 आहे. |
14:28 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
14:31 | खालील लिंकवरील व्हिडिओ पाहा. हा स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट सारांशित करतो. |
14:37 | आम्ही स्पोकन ट्यूटोरिअलच्या साहाय्याने कार्यशाळा आयोजित करतो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
14:43 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टला, NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. |
14:49 | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. |
14:53 | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. धन्यवाद. |