Gedit-Text-Editor/C3/Third-party-plugins-in-gedit/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:15, 11 January 2018 by Latapopale (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | gedit Text editor मधील Third party Plugins वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण third party plugins इन्टॉल करणे आणि ते वापरणे शिकणार आहोत. |
00:15 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटींग सिस्टम gedit Text editor 3.10 वापरत आहे. |
00:25 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:32 | आता आपण third party plugins बद्दल शिकू. |
00:36 | Plugins हे इतर प्रोग्रामर्सद्वारेही विकसित केले आहेत. |
00:40 | ह्यांना third party plugins म्हणतात. |
00:44 | हे आपल्याला अतिरिक्त कार्यक्षमता देते जे डीफॉल्ट gedit plugins मध्ये उपलब्ध नाही. |
00:51 | third-party plugin संस्थापित करण्यात समावेश आहे: खालील लिंकवरून plugin डाऊनलोड करणे. |
00:58 | plugin फाईल्स योग्य डिरेक्टरीत ठेवणे. |
01:02 | plugin सक्रिय करणे. |
01:05 | plugins डाऊनलोड करण्यासाठी आपण gedit वेबसाईटवर जाऊ. |
01:10 | वरच्या उजव्या कोपऱ्यात plugins लिंकवर क्लिक करा. |
01:14 | Lists of gedit plugins वर क्लिक करा. |
01:18 | आपण gedit Text editor च्या विविध वर्जन्ससाठी third-party plugins चे अनेक लिंक्स पाहू शकतो. |
01:25 | जरी माझ्या gedit चे वर्जन 3.10 आहे, तरी मी वर्जन 3.8 आणि 3.10 साठी लिंकवर क्लिक करेन. |
01:34 | आपल्याला आपल्या gedit वर्जनवर आधारित लिंक निवडणे आवश्यक आहे. |
01:39 | विभिन्न third party plugins पाहण्यासाठी स्क्रोल-डाऊन करा. |
01:44 | Intelligent Text completion ची वैशिष्ट्ये पाहू. |
01:49 | Auto-close brackets आणि quotes |
01:52 | Auto-complete html tags |
01:55 | फंक्शन किंवा लिस्टनंतर Auto-indent |
01:59 | मी Intelligent Text Completion कसे इन्टॉल करायचे आणि वापरायचे ते सादर करेन. |
02:06 | gedit बेवसाईटवर जाऊ. |
02:09 | Download लिंकवर क्लिक करा. |
02:11 | आपण Intelligent Text Completion साठी Features आणि Installation चे तपशील पाहू शकतो. |
02:18 | आपल्या स्वतःच्या माहितीसाठी संपूर्णपणे माहिती मिळवा. |
02:22 | उजव्या कोपऱ्यात Clone or download ड्रॉप-डाऊन बॉक्सवर क्लिक करा. |
02:29 | त्यानंतर Download Zip वर क्लिक करा. |
02:32 | Save file ऑप्शन निवडा आणि Ok वर क्लिक करा. |
02:36 | फाईल Downloads फोल्डरमध्ये सेव्ह झाली आहे. |
02:40 | फाईल्स एक्सट्रॅक्ट करा. उपलब्ध फाईल्स पाहण्यासाठी फोल्डर उघडा. |
02:47 | मी फोल्डर gedit3-8 कॉपी करेन, कारण माझे gedit वर्जन ह्यापेक्षा उच्च आहे. |
02:55 | आपल्याला हे फोल्डर Home डिरेक्टरीमध्ये dot local/share/gedit/plugins मध्ये कॉपी करण्याची आहे. |
03:05 | Home डिरेक्टरी निवडा. |
03:08 | मेनूबारवरील View मेनूवर क्लिक करा आणि Show Hidden Files निवडा. |
03:15 | .local share फोल्डरवर जा. |
03:20 | जर ते तिथे नसेल तर gedit सबडिरेक्टरी बनवा. |
03:26 | gedit डिरेक्टरीमध्ये plugins नावाची दुसरी सबडिरेक्टरी तयार करा. |
03:33 | फोल्डर पेस्ट करा किंवा plugins च्या आतील फोल्डरमधील फाईल्स कॉपी करा. |
03:39 | Third party plugin फाईल्स दर्शविल्याप्रमाणे योग्य डिरेक्टरीमध्ये कॉपी केल्या पाहिजेत. |
03:45 | आता, आपले plugin वापरण्यासाठी तयार आहे. |
03:49 | gedit Text editor उघडा. |
03:52 | Main मेनूमध्ये, Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
03:56 | Plugins टॅबअंतर्गत, आपले third party plugin जोडले आहे का ते पाहण्यासाठी स्क्रोल डाऊन करा. |
04:03 | आपण पाहू शकता की Intelligent Text completion plugin आपल्या सूचीमध्ये जोडले आहे. |
04:09 | बॉक्स चेक करा. Close वर क्लिक करा. |
04:13 | Intelligent Text completion आपल्याला html प्रोग्राम लिहिण्यास कशा प्रकारे मदत करतो ते पाहू. |
04:19 | मी येथे दर्शविल्याप्रमाणे टॅग्स टाईप करेन. |
04:23 | less than सिम्बॉलनंतर backslash दाबा. |
04:27 | ते आपोआप title क्लोजिंग टॅगचा समावेश करेल. |
04:32 | पुढील ओळीत, less than backslash टाईप करा. आपण पाहू शकता head क्लोजिंग टॅग प्रविष्ट झाला आहे. |
04:41 | पुन्हा less than backslash. html टाईप करा. क्लोजिंग टॅगदेखील प्रविष्ट झाला आहे. |
04:48 | म्हणून, ते आपोआप html टॅग ओळखतो आणि ते तयार करतो. |
04:54 | source code लिहिताना हे आपले काम सोपे करते. |
04:59 | आपण पाहू शकतो, सिन्टॅक्स हायलाईट off mode मध्ये आहे. |
05:02 | जोपर्यंत आपण डॉक्युमेंट gedit Text editor मध्ये सेव्ह करत नाही, सिन्टॅक्स हायलाईट off राहतो. |
05:10 | View आणि Highlight Mode मेनूवर क्लिक करून आपण ते ON करू शकता. |
05:16 | आपण आपल्या सोर्स कोडवर आधारित मोड निवडू शकता. |
05:20 | आपला प्रोग्राम HTML आहे, मी सूचीमधून HTML ऑप्शन निवडेन. |
05:28 | आपण पाहू शकतो, आपले HTML कोड सिंटेक्ससह हायलाईट केला गेला आहे. |
05:33 | ह्यासह आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांशित करूया. |
05:38 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण third party plugins कसे इन्स्टॉल करायचे आणि वापरायचे ते शिकलो. |
05:45 | येथे आपल्यासाठी एक असाईनमेंट आहे. gedit Text editor साठी Advanced find/replace plugin नावाचे plugin डाऊनलोड करून इन्टॉल करा. |
05:56 | ते सक्षम करा आणि त्याचे फंक्शन्स चेक करा. |
06:00 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा. |
06:07 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळेचे आयोजन करते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
06:16 | ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध क्वेरीज पोस्ट करा. |
06:21 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:33 | हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |