Gedit-Text-Editor/C2/Overview-of-gedit-Text-Editor/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:44, 29 December 2017 by Latapopale (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Overview of gedit Text editor वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण gedit Text editor, gedit Text editor ची वैशिष्ट्ये आणि |
00:15 | ह्या मालिकेतील विविध ट्युटोरिअलमध्ये उपलब्ध विषय शिकणार आहोत. |
00:21 | ह्या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit Text editor 3.10 वापरत आहे. |
00:32 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला Windows किंवा Linux ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे. |
00:40 | प्रथम gedit Text editor बद्दल जाणून घेऊ. |
00:45 | gedit हे एक प्रभावी टेक्स एडिटर आहे. |
00:49 | हे साधे आणि वापरण्यास सोपे आहे. |
00:52 | हे उबंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डीफॉल्ट GUI text editor आहे. |
00:59 | पुढे, gedit Text editor ची वैशिष्ट्ये पाहू. |
01:04 | gedit Text editor मध्ये सर्व सामान्य एडिटींग वैशिष्ट्ये आहेत जसे Cut, Copy, Paste, Undo आणि Redo ऑप्शन्स. |
01:14 | जसे की इतर कोणत्याही टेक्स्ट एडिटरमध्ये, Search आणि Replace टेक्स पर्याय आहेत, त्याचप्रमाणे gedit मध्येदेखील उपलब्ध आहेत. |
01:22 | gedit Text editor मध्ये स्पेलचेकरची सुविधा आहे. |
01:26 | हे लाईन नंबर दर्शवते जे source code डीबग करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. |
01:32 | हे टेक्स रॅप करते आणि वर्तमान टेक्स हायलाईट करते. |
01:37 | Tabbed विंडो वैशिष्ट्य त्याच विंडोमध्ये बऱ्याच फाईल्सवर काम करणे सोपे करते. |
01:44 | gedit text editor विविध प्रोग्रामिंग भाषांमधील सिनटेक्स हायलाईट करते. |
01:50 | हे प्रोग्राम्समधील ओपन आणि क्लोज ब्रॅकेटचा मागोवा ठेवते. |
01:55 | plugins द्वारे नवीन वैशिष्ट्यांचा समावेश उपलब्ध आहे. |
02:00 | स्वयंचलित save आणि backup पर्यायदेखील उपलब्ध आहेत |
02:05 | gedit text editor हे प्रोग्रामर, प्रोजेक्ट मॅनेजर्स, लेखक आणि टेक्स्ट फाईल्समध्ये काम करणारे कुणीही वापरू शकतात. |
02:16 | आपण या मालिकेतील वैयक्तिक ट्युटोरिअल्स थोडक्यात पाहू. |
02:21 | ह्या मालिकेतील पहिला ट्युटोरिअल उबंटू लिनक्स आणि विंडोजमध्ये gedit Text editor चे इन्टॉलेशन स्पष्ट करतो. |
02:30 | आणि, नवीन फाईल कशी तयार करावी, अस्तित्वात असलेली फाईल उघडणे, सेव्ह करणे आणि बंद करणे स्पष्ट करतो. |
02:38 | येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे. |
02:41 | Introduction to gedit Text Editor वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण, gedit Text Editor बद्दल जाणून घेऊ. |
02:51 | पुढील ट्युटोरियल Common Edit Functions आहे |
02:55 | हे आपल्याला कन्टेट Cut, Copy आणि Paste करणे, Undo आणि Redo ह्यासारख्या एक्शन्स, टेक्स Search आणि Replace करणे आणि डॉक्युमेंट प्रिन्ट करणे ह्यासारख्या गोष्टी समजून घेण्यास मदत करेल. |
03:10 | हे ट्युटोरिअल पाहा. |
03:13 | केवळ एक शब्द केस ऑप्शनशी जुळतो. तो आहे School शब्दातील कॅपिटल 'S' . कर्सर पुन्हा Find box वर ठेवा. |
03:25 | पुढील ट्युटोरिअल Handling tabs आहे. येथे आपण |
03:30 | टॅब्स Add, move, re-order आणि बंद करणे शिकणार आहोत. |
03:30 | फाईल्स ब्राऊझ करण्यासाठी आणि उघडण्यासाठी, लाईन नंबर टाकण्यासठी आणि टेक्स रॅप करण्यासाठी |
03:39 | बाजूचे पॅनेल वापरा. |
03:43 | येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे. |
03:46 | बाजूच्या पॅनेलमधील, Untitled Document 2 वर क्लिक करा. ते डॉक्युमेंट आता सक्रिय होते. |
03:55 | पुढील ट्युटोरिअल Default Pluginsआहे. |
03:55 | हे आपल्याला डीफॉल्ट प्लगइन्स कसे वापरावे हे जाणून घेण्यास मदत करेल जसे - Sort, Change case, Spell checker , Insert date आणि time. |
04:10 | मी हे ट्युटोरिअल प्ले करते. |
04:12 | आपण उबंटू सॉफ्टवेअर सेंटर वापरून असे करू शकता. gedit Preferences box च्या Close बटणावर क्लिक करा. |
04:20 | पुढील ट्युटोरिअल थर्ड पार्टी प्लगिन्स स्पष्ट करेल. |
04:25 | ही थर्ड पार्टी plugins कसे स्थापित करावे आणि त्याचा वापर कसा करावा हे स्पष्ट करते. |
04:31 | ह्या ट्युटोरिअलमध्ये इंटेलिजंट टेक्स्ट कम्प्लिशन असे म्हटले जाणाऱ्या थर्ड पार्टी प्लगइन्सचा समावेश केला जाईल. |
04:37 | येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे. |
04:40 | मी वर्जन 3.8 आणि 3.10. साठी लिंकवर क्लिक करेन. तुम्हांला तुमच्या gedit वर्जन आधारित लिंक निवडणे आवश्यक आहे. |
04:50 | हे snippets वरील शेवटचे ट्युटोरिअल आहे. |
04:54 | snippets हे युजरला कोड वारंवार टाईप करणे टाळण्यात मदत करते. |
05:00 | हे, डीफॉल्ट snippets कसे वापरावे नवीन snippets जोडणे, snippets डिलीट करणे हे स्पष्ट करते. |
05:08 | इतर पर्याय जसे- |
05:10 | brackets जुळवणे आणि Document Statistics हायलाईट करणे हेदेखील ट्युटोरिअलमध्ये आहेत. |
05:17 | येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे. |
05:20 | डाव्या बाजूला, C मध्ये if else स्निपेटवर क्लिक करा. वरील उजव्या पॅनलवर आपण सिंटॅक्स पाहू शकता. |
05:30 | ह्यासोबत आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:33 | सारांशित करू. |
05:35 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण |
05:37 | gedit Text editor चा आढावा शिकलो. |
05:41 | नमूद केलेल्या प्रत्येक घटकावरील सविस्तर ट्युटोरिअलसाठी कृपया आमच्या वेबसाईटचा संदर्भ घ्या. |
05:47 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा. |
05:56 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
06:05 | ह्या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या. |
06:11 | जिथे आपल्याला प्रश्न आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा, आपल्या प्रश्नाचे थोडक्यात स्पष्टीकरण करा. |
06:18 | आमच्या टीममधील कुणीतरी त्यांना उत्तर देईल. |
06:22 | Spoken Tutorial forum ह्या ट्युटोरिअलवरील विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
06:27 | कृपया त्यावर असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका. यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल. कमी गोंधळ करून, आपण ह्या चर्चेचा उपयोग शिकवण्याची सामग्री म्हणून करू शकतो. |
06:41 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:53 | हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |