OpenModelica/C2/Array-Functions-and-Operations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:51, 28 December 2017 by Latapopale (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Array Functions and Operations वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - OMShell आणि array construction functions कसे वापरावे. |
00:17 | vectors आणि matrices वर arithmetic operations कसे करावे. |
00:23 | array conversion functions कसे वापरावे? |
00:27 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी OpenModelica 1.9.2 आणि उबंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 14.04 आणि gedit वापरत आहे. |
00:40 | विंडोज वापरणारे gedit ऐवजी Notepad सारखे कोणतेही टेक्स्ट एडिटर वापरू शकतात. |
00:47 | हे ट्युटोरिअल समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला Modelica मध्ये function आणि array declaration चे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:56 | पूर्वापेक्षित ट्युटोरिअलचा आमच्या वेबसाईटवर उल्लेख केला आहे. कृपया त्यामार्फत जा. |
01:02 | आता OMShell बद्दल अधिक जाणून घेऊ. |
01:06 | OMShell हा इन्टरॅक्टिव्ह कमांड लाईन टूल आहे. |
01:10 | हा OpenModelica चा एक भाग आहे. |
01:13 | OpenModelica compiler OMShell मध्ये टाईप करून commands द्वारे वापरला जाऊ शकतो. |
01:20 | हे classes लोड करण्याकरीता आणि ते सिम्युलेट करण्यासाठी वापरले जाऊ शकते. |
01:25 | OMShell मध्ये Functions देखील कॉल केले जाऊ शकतात. |
01:29 | आता आपण OMShell सादर करण्यासाठी polynomialEvaluatorUsingVectors आणि functionTester नावाचे classes वापरणार आहोत. |
01:38 | मागील ट्युटोरिअलमध्ये ह्या classes ची चर्चा झाली आहे. |
01:42 | ह्या classes बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया पूर्वापेक्षित ट्युटोरियल्स पाहा. |
01:48 | ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरण्याजोगे सर्व कमांड्स OMShell-commands.txt नावाच्या फाईलमध्ये उपलब्ध आहेत. |
01:57 | आपण आमच्या वेबसाईटवर सर्व code files शोधू आणि डाऊनलोड करू शकता. |
02:03 | कृपया सुलभ प्रवेशासाठी ह्या सर्व कोड फाईल्स एका डिरेक्टरीमध्ये सेव्ह करा. |
02:09 | आता OMShell सुरू करू. |
02:12 | Ubuntu ऑपरेटींग सिस्टमवर OMShell उघडण्यासाठी, लाँचरच्या डावीकडे शीर्षस्थानी Dash Home आयकॉनवर क्लिक करा. |
02:21 | सर्च बारमध्ये OMShell टाईप करा. |
02:25 | OMShell आयकॉनवर क्लिक करा. |
02:28 | Windows मध्ये, तुम्हांला Start मेन्यूमध्ये आयकॉन सापडेल. |
02:33 | आता आपण काही उपयोगी कमांड्स जाणून घेऊ. |
02:37 | प्रथम, जेथे तुम्ही OMShell-commands.txt नावाची टेक्स्ट फाईल सेव्ह केली आहे तेथे जा आणि ती उघडा. |
02:47 | लक्षात घ्या की ह्या फाईलमध्ये ह्या ट्युटोरिअलशी संबंधीत सर्व कमांड्स आहेत. |
02:52 | म्हणूनच आपण जेव्हाही शंका असेल तेव्हा ह्या फाईलचा संदर्भ घेऊ शकता. |
02:57 | आता मी OMShell वर स्विच करतो. |
03:00 | cd open and close parentheses टाईप करा. |
03:05 | कमांडच्या निष्पादनाने निर्माण झालेले रिझल्ट प्रदर्शित करण्यासाठी Enter दाबा. |
03:11 | हे सध्याच्या डिरेक्टरीचे पाथ प्रिंट करतो. |
03:15 | आता आपण सध्याच्या डिरेक्टरीचे स्थान त्या ठिकाणी बदलू जिथे आपण code files सेव्ह केलेली आहे. |
03:22 | मी माझ्या सिस्टमवर डिरेक्टरी बदलतो. |
03:25 | टाईप करा cd (ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस) (डबल कोट्समध्ये), पाथ निर्दिष्ट करा. Enter दाबा. |
03:38 | लक्षात घ्या, Windows पाथमध्ये forward slash आणि Ubuntu मध्ये backward slash वापरले जाते. |
03:46 | विंडोज युजर्सनी ह्या वस्तुस्थितीबाबत सावध असणे आवश्यक आहे. |
03:51 | आता polynomialEvaluatorUsingVectors फंक्शन लोड करू. |
03:57 | टाईप करा loadFile (पॅरेंथेसिसमध्ये) (डबल कोट्समध्ये) polynomialEvaluatorUsingVectors.mo. |
04:11 | लक्षात घ्या F हे loadFile() कमांडमध्ये अप्पर केस आहे. |
04:16 | .mo फाईल्सच्या एक्सटेंशनसह class किंवा model फाईल्स लोड करण्यासाठी ह्या कमांडचा वापर केला जाऊ शकतो. |
04:25 | Enter दाबा. |
04:28 | फाईल आढळल्यास, OMShell हे true रिटर्न करतो. |
04:33 | आता आपण हे फंक्शन परस्पररित्या कॉल करू. |
04:37 | polynomialEvaluatorUsingVectors (च्या आर्ग्युमेंटसह) 10 टाईप करा. Enter दाबा. |
04:47 | हा कमांड 10 युनिट्सचे इनपुट आर्ग्यूमेंट घेतो आणि रिझल्ट प्रदर्शित करतो. |
04:55 | आता मी functionTester class लोड करतो. |
04:59 | loadFile टाईप करा (ओपन आणि क्लोज पॅरेथेसिस) (डबल कोट्समध्ये) functionTester.mo. Enter दाबा. |
05:12 | आता आपण functionTester class सिम्युलेट करू. |
05:16 | टाईप करा simulate (पॅरेथेसिसमध्ये) functionTester (कॉमा) startTime (equals) 0 stopTime (equals) 1. Enter दाबा. |
05:32 | सिम्युलेशन आता पूर्ण झाले आहे. |
05:35 | functionTester क्लासमधून व्हेरिएबल z प्लॉट करू. |
05:40 | टाईप करा plot (पॅरेथेसिसमध्ये) (कर्ली ब्रेसेसमध्ये) z आणि Enter दाबा. |
05:50 | हा कमांड वेरिएबल z वर्सेस time चा एक प्लॉट बनवतो. |
05:56 | आता मी पुन्हा स्लाईड्सवर जातो. |
06:01 | Array construction functions दिलेल्या आकाराचे arrays तयार करण्यासाठी वापरले जातात. |
06:06 | आता आपण काही array construction functions वर एक नजर टाकू. |
06:11 | आपण OMShell वापरून त्यांचा सराव करू. |
06:15 | fill() हे फंक्शन सर्व समान एलिमेन्टसह array तयार करण्यासाठी वापरले जाते. : fill साठी सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे. |
06:25 | प्रथम argument नंबर दर्शवतो, जो array फिल करतो. |
06:29 | उर्वरित arguments प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात. |
06:34 | zeros() हे शून्यासह array तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे एक फंक्शन आहे. : zeros() साठीफंक्शन सिंटॅक्स दर्शविल्याप्रमाणे आहे. |
06:44 | Arguments, अॅरेच्या प्रत्येक डायमेंशनचा आकार दर्शवितात. |
06:50 | identity() फंक्शन एक आयडेन्टिटी मेट्रिक्स तयार करतो. हे एक argument घेतो जो दोन्ही डायमेंशनचे आकार दर्शवितो. |
07:02 | आता OMShell वापरून हे फंक्शन्स प्रदर्शित करू. |
07:06 | मी OMShell वर परत जातो. |
07:09 | टाईप करा fill (पॅरेंथेसिसमध्ये) 5 (कॉमा) 2 (कॉमा) 2. |
07:16 | हे कमांड 5 सह त्याच्या सर्व एलिमेंट्सचे टू बाय टू मॅट्रिक्स तयार करते. |
07:24 | पहिले arguments array मध्ये फिल केले जाणारे एलिमेंट दर्शवितो. |
07:30 | 2 हा पहिल्या डेमिन्शनचा आकार दर्शवितो. |
07:30 | आणि तिसरे आर्ग्युमेंट 2 हे दुस-या डायमेन्शनचा आकार दर्शवते. |
07:40 | आता Enter दाबा. |
07:43 | रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे. |
07:46 | कर्लिंग ब्रॅसेसच्या एका संचासह एलिमेन्ट्स एका रोचे प्रतिनिधीत्व करतात. |
07:52 | म्हणूनच ह्या मॅट्रिक्समध्ये दोन रोज आणि दोन कॉलम्स आहेत. |
07:57 | आता आपल्या सर्व zero एलिमेन्ट्सह zeros() function (टू बाय टू) मॅट्रिक्स तयार करू. |
08:05 | टाईप करा zeros (पॅरेंथेसिसमध्ये) 2 (कॉमा) 2 आणि Enter दाबा. |
08:13 | रिझल्ट अपेक्षेप्रमाणे आहे. |
08:16 | आता identity function वापरून पाहू. |
08:19 | टाईप करा identity(3). |
08:23 | हे एक identity मॅट्रिक्स तयार करते ज्याचा आकार 3 बाय 3 आहे. |
08:29 | आपण arithmetic operations देखील करू शकतो आणि OMShell मध्ये assignment statements वापरू शकतो. |
08:36 | आपण दोन मेट्रिक्स तयार करू आणि त्यावर arithmetic operations करू. |
08:42 | टाईप करा a (कोलन) (इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) 1 (कॉमा) 2 (सेमिकोलन) 3 (कॉमा) 4. |
08:54 | Comma हा रोमध्ये एलिमेन्ट्स वेगळा करण्यासाठी वापरला जातो. |
08:58 | तर semi-colon हा रोज वेगळे करण्यासाठी वापरला जातो. आता Enter दाबा. |
09:07 | टाईप करा b (कोलन) (इक्वल्स) identity (2). |
09:15 | हे 2 by 2 identity मॅट्रिक्स बनवते. |
09:19 | आता a आणि b वर arithmetic operations करू. |
09:24 | टाईप करा a (प्लस) b आणि Enter दाबा. |
09:29 | हे मॅट्रिक्स एडिशन करते. |
09:32 | टाईप करा a (asterisk) b. |
09:36 | हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करते. Enter दाबा. |
09:42 | टाईप करा a (dot) (asterisk) b आणि Enter दाबा. |
09:49 | हे दोन मेट्रिक्सची एलिमेंटने मल्टिप्लिकेशन करते. |
09:55 | लक्षात घ्या, OMShell मध्ये वापरलेल्या डेटा-टाईपचे व्हेरिएबल्स परिभाषित करणे आवश्यक नाही. |
10:02 | आता मी पुन्हा स्लाईडवर जातो. |
10:06 | Reduction functions इनपुट म्हणून array घेतात आणि आऊटपुट म्हणून scalar रिटर्न करतात. |
10:13 | min() हे एक फंक्शन आहे जे array मध्ये सर्वात कमी व्हॅल्यू रिटर्न करतो. |
10:19 | त्याचप्रमाणे, max() function एका array मध्ये सर्वात मोठा व्हॅल्यू रिटर्न करते. sum() सर्व एलिमेंट्सची बेरीज रिटर्न करते आणि product() सर्व एलिमेंटचे प्रोटक्ट रिटर्न करते. |
10:33 | आपण हे फंक्शन्स दाखवण्यासाठी OMShell वर स्विच करू. |
10:38 | मी एक नवीन मॅट्रिक्स तयार करतो. |
10:41 | x (कोलन)(इक्वल्स) (स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये) 3 (कॉमा) 4 (सेमीकोलन) 5 (कॉमा) 6. |
10:52 | x ची कमीत कमी व्हॅल्यू मिळवण्यासाठी min (x) टाईप करा. |
11:00 | अॅरे x मधील सर्वात मोठा व्हॅल्यू मिळवण्यासाठी max (x) टाईप करा. |
11:08 | त्याचप्रमाणे सर्व एलिमेंट्सची बेरीज मिळवण्यासाठी sum (x) टाईप करा. |
11:15 | आणि वैयक्तिक एलिमेंट्स मिन x अॅरेचे प्रोडक्ट मिळवण्यासाठी product (x) टाईप करा. |
11:23 | पुन्हा एकदा मी स्लाईड्सवर परत जातो. |
11:27 | आता आपण विविध functions बद्दल चर्चा करू, जे इनपुट म्हणून array घेतात. |
11:33 | abs() 'हे फंक्शन आहे जे आपल्या सर्व एलिमेंट्सच्या absolute values सह array रिटर्न करते. |
11:40 | size() प्रत्येक डायमेंशनच्या आकारासह एक वेक्टर रिटर्न करते. |
11:45 | ndims() अॅरेमध्ये डायमेंशन्सची संख्या रिटर्न करते. |
11:51 | ह्याचबरोबर आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:54 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण array functions परस्पररित्या सादर करण्यासाठी OMShell वापरली आहे. |
12:01 | हे फंक्शन्स Modelica लॅंग्वेज स्पेसिफिकेशनचे भाग आहेत. |
12:05 | म्हणूनच OMEdit मध्ये classes लिहिताना ह्याचा वापर करता येईल. |
12:11 | असाईनमेंट म्हणून array साठी abs(), ndims() आणि size() functions लागू करा. |
12:19 | दुसरे म्हणजे, आम्ही ब-याच फंक्शन्ससाठी two-dimensional array किंवा मॅट्रिक्स argument म्हणून वापरले आहे. |
12:28 | एक असाईनमेंट म्हणून, three-dimensional arrays सह हे सर्व फंक्शन्स लागू करा. |
12:35 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा: org / What \ _is \ _a \ _Spoken \ _Tutorial |
12:39 | हे Spoken Tutorial प्रोजेक्ट सारांशित करते. |
12:42 | आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
12:48 | ह्या स्पोकन ट्यूटोरिअलमध्ये आपले प्रश्न असल्यास, कृपया नमूद केलेल्या वेबपेजला भेट द्या. |
12:54 | आम्ही लोकप्रिय पुस्तकांतील सोडवलेल्या उदाहरणांची कोडींग समन्वयित करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
13:00 | आम्ही कमर्शिअल सिम्युलेटर लॅब्स स्थलांतर करण्यास OpenModelica ला मदत करतो. |
13:06 | स्पोकन ट्युटोरिल प्रोजेक्टला NMEICT, MHRD भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. |
13:14 | त्यांच्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत.
हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. सहभागासाठी धन्यवाद. |