Gedit-Text-Editor/C2/Handling-Tabs/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:23, 10 October 2017 by Latapopale (Talk | contribs)

Jump to: navigation, search
'Time' 'Narration'
00:01 स्पोकन ट्युटोरियलमधील 'Handling tabs in gedit Text editor' मध्ये आपले स्वागत आहे.
00:04 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टॅब्स Add, move, re-order आणि close करणे
00:13 फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे
00:19 लाईन नंबर्स टाकणे आणि टेक्स रॅप करणे शिकणार आहोत.
00:22 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम, gedit 3.10 वापरत आहे
00:32 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही operating systemचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
00:38 gedit Text editor उघडा.
00:42 बाय डिफॉल्ट gedit Text editor मध्ये Untitled Document 1 नावाचे एक टॅब आहे.
00:49 आता ट्युटोरिअल थांबवा आणि स्क्रीनवर प्रदर्शित केल्याप्रमाणे खालील कोड टाईप करा.
00:56 हा C language मधील एक प्रोग्राम आहे.
00:58 प्रोग्राम सेव्ह करू.
01:01 कीबोर्डवर एकाच वेळी Ctrl + S की दाबा.
01:06 Save डायलॉग बॉक्समध्ये sample dot c नाव द्या.
01:11 c एक्सटेंशन हे C लँग्वेज प्रोग्राम दर्शवते.
01:16 जिथे आपण फाईल सेव्ह करू इच्छिता तो फोल्डर निवडा.
01:20 मी Desktop निवडेन आणि नंतर Saveबटणावर क्लिक करेन.
01:25 टॅबचे नाव sample dot c मध्ये बदलले आहे.
01:29 फाईल सेव्ह केल्यावर तुम्ही प्रोग्रामध्ये विविध रंग पाहिलेत का?
01:35 याचे कारण gedit Text editor टाईप केलेल्या कोडला C programम्हणून ओळखतो.
01:42 आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये सिंटेक्स हायलाईट करण्याबद्दल अधिक शिकणार आहोत.
01:47 तसेच status bar लक्षात घ्या जी Cमध्ये बदलली आहे.
01:52 आपल्याला दिसेल की window हे नाव बदलून sample dot c झाले आहे.
01:57 मेन मेनूमधून नवीन टॅब जोडण्यासाठी, File आणि New वर क्लिक करा.
02:04 sample.c डॉक्युमेंटच्या उजवीकडे Untitled Document 1नावाचा एक नवीन टॅब तयार केला आहे.
02:12 पुन्हा एकदा, विंडोच्या शीर्षस्थानावरील शीर्षक Untitled Document 1 मध्ये बदलले आहे.
02:18 त्यामुळे, सक्रिय टॅबचे नाव window शीर्षकाखाली प्रदर्शित केले आहे.
02:23 आता नवीन टॅब उघडण्यासाठी आणखी एक मार्ग जाणून घेऊ.
02:27 टूलबारवरील New आयकॉनवर क्लिक करा.
02:31 अन्य टॅब Untitled Document 2 तयार केला आहे.
02:35 टॅब्जची संख्या 1 ने सुरु होते आणि उघडलेल्या प्रत्येक नवीन टॅबसाठी 1 ने वाढ होते.
02:43 म्हणूनच ह्या टॅबला 2 क्रमांक दिला आहे
02:47 त्याचप्रमाणे, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट तयार करू.
02:52 आता, आपल्याकडे sample.c मिळून असे एकूण 5 टॅब आहेत.
02:58 आपण ह्या टॅबमधून नेव्हिगेट कसे करायचे?
03:01 लक्षात घ्या, टॅब बारच्या दोन्ही टोकांवर त्रिकोणी बटण आहे.
03:07 आपण या बटणांना टॅबमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी वापरू शकता.
03:12 sample.c हे डॉक्युमेंट दिसेपर्यंत डाव्या त्रिकोणी बटणावर क्लिक करू.
03:19 आपण टॅब कसे बंद करायचे ? हे अगदी सोपे आहे.
03:22 मेन मेनूमध्ये, Fileआणि Close वर क्लिक करा.
03:27 अन्यथा आपण टॅबवरील फक्त X बटणावर क्लिक करू शकता.
03:32 अशाप्रकारे शीर्षक नसलेले डॉक्युमेंट 2 आणि 3 बंद करा.
03:39 आता आपल्याकडे sample dot c, Untitled Document 1 आणि Untitled Document 4 उरले आहोत.
03:47 आता, आणखी दोन नवीन डॉक्युमेंट्स जोडू.
03:52 हे दोन नवीन टॅब्ज आहेत ज्यांना Untitled Document 2 and 3 नाव दिले आहे.
03:57 येथे दाखवल्याप्रमाणे डॉक्युमेटची क्रमांकित किंवा क्रमवारीत आहे.
04:03 geditच्या खालच्या आवृत्तीत क्रमवारी भिन्न असू शकते.
04:08 वर्जनमध्ये असे फरक असतील आणि शिकणार्यांtनी ते हाताळण्यासाठी तयार असले पाहिजे.
04:15 आता टॅब रिअरेंज करू.
04:18 प्रथम, Untitled Document1 निवडा.
04:21 लेफ्ट माऊस बटण दाबा आणि त्याला sample.c फाइलच्या डाव्या बाजूला ड्रॉप करा.
04:27 लेफ्ट माऊस बटण सोडा.
04:30 टॅब रिअरेंज झाला आहे.
04:33 याप्रमाणे, आपण टॅब 2 आणि 4 रिअरेंज करू.
04:38 पुढे एक टॅब दुसऱ्या विंडोवर मुव्ह करणे शिकूया.
04:42 प्रथम, टॅब sample.c निवडा जे आपण हलवू इच्छितो.
04:47 त्यानंतर, टॅबवर राईट क्लिक करा आणि Move to New Window निवडा.
04:52 sample.c एका नवीन विंडोमध्ये उघडेल.
04:56 'sample.c वरून Untitled Documents सह दुसऱ्या विंडोवर जाऊ.
05:02 मेन मेनूमध्ये जा आणि View आणि Side Panel वर क्लिक करा.
05:07 Side Panel विंडोच्या डाव्या बाजूला उघडेल.
05:12 आपण साईड पॅनेलमधील सर्व डॉक्युमेंटची नावे पाहू शकता.
05:17 ते विंडो पॅनेलवर दिसत असलेल्या क्रमानुसार आहेत.
05:22 बाजूच्या पॅनेलमध्ये, Untitled Document 2 वर क्लिक करा.
05:27 तो डॉक्युमेंट आता सक्रिय होतो.
05:31 आपण आधी केल्याप्रमाणे gedit Text editor window मधील डॉक्युमेंटची पुनर्रचना करू.
05:37 Untitled Document 4 वर क्लिक करा.
05:40 शेवटच्या टॅब नंतर फाइल क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करा.
05:46 लक्षात घ्या की डॉक्युमेंटची ऑर्डर आता side panel मध्येदेखील बदलली आहे.
05:52 साईड पॅनेल बंद करण्यासाठी, फक्त वर उजव्या बाजूला X बटण क्लिक करा.
05:58 gedit Text editor file मध्ये ठराविक लाईन नंबरवर जा.
06:04 sample.c वर जा.
06:07 मेन मेनूमध्ये Search आणि Go to Line वर क्लिक करा.
06:12 Go to Line डायलॉग बॉक्स gedit Text editor window च्या वर उजव्या कोपऱ्यात दिसतो.
06:20 डायलॉग बॉक्समध्ये नंबर 8 टाका आणि Enter की दाबा.
06:26 कर्सर लाईनवर जातो. 'status bar मध्ये आपण लाईन नंबर 8 म्हणूनदेखील पाहू शकतो.
06:33 परंतु, जर लाइन नंबर टेक्स्टसहित प्रदर्शित केला असेल तर कर्सर शोधणे सोपे होईल.
06:40 मेन मेनूमधून कोडची लाईन नंबर दर्शविण्यासाठी, Edit and Preferences निवडा.
06:47 gedit Preferences डायलॉग-बॉक्स दिसतो.
06:50 View टॅबवर क्लिक करा.
06:52 Display line numbers ऑप्शनवर चेकमार्क द्या.
06:56 Highlight current line वर एक चेकमार्क ठेवा. Close बटणावर क्लिक करा.
07:04 लक्ष द्या की कोडच्या उजव्या बाजूला लाईन नंबर्स दाखवले आहेत.
07:09 तसेच, लाईनरवर दिसत असलेला कर्सर bold आहे.
07:14 पुढे आपण text wrap पिंग शिकू.
07:18 प्रोग्राममधील कोडची ओळ gedit Text editor च्या विंडोच्या लांबीपेक्षा अधिक असू शकते.
07:24 त्यामुळे, टेक्स्टची संपूर्ण ओळ वाचणे अवघड होते.
07:29 विंडोच्या आकारात टेक्स्ट रॅप करण्यासाठी Text wrapping मदत करते.
07:34 sample.c प्रोग्रावर पुन्हा जा.
07:37 मेन मेनूमध्ये , Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
07:43 लक्ष द्या की Enable text wrapping ऑप्शन डीफॉल्टनुसार चेक केला आहे.
07:50 हे बॉक्स अनचेक करा. Close बटणावर क्लिक करा.
07:55 मी प्रोग्रामच्या शेवटी कोडची ओळ जोडतो.
08:00 लक्षात घ्या की टेक्स्टची लांबी विंडोच्या आकारापेक्षा जास्त आहे.
08:05 आता Enable text wrapping ऑप्शन तपासू.
08:10 विंडोत फिट बसविण्यासाठी टेक्स्ट व्यवस्थितपणे रॅप केला आहे.
08:15 ह्यामुळे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया.
08:20 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण टॅब्ज जोडणे, मुव्ह करणे, रिऑर्डर आणि बंद करणे शिकलो.
08:26 फाईल्स ब्राऊझ आणि उघडण्यासाठी Side Panel वापरणे.
08:30 लाईन नंबर्स इनसर्ट करणे आणि टेक्स्ट रॅप
08:34 तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे.
08:37 gedit Text Editor मध्ये 5 नवीन टॅब्स तयार करा.
08:41 One, Two, Three, Four आणि Five म्हणून सेव्ह करा.
08:47 आता Three, Two, One, Five आणि Four असे रिऑर्डर करा.
08:54 Side Panel उघडा.
08:56 Side Panelमध्ये फाईल Fiveवर क्लिक करा आणि काही टेक्स्ट एंटर करा.
09:01 खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा.
09:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते, ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण झाल्यास प्रमाणपत्रे देते.
09:17 अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा.
09:21 ह्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत का? कृपया ह्या साईटला भेट द्या.
09:26 मिनिट आणि सेकंद निवडा जिथे आपला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा.
09:32 आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल.
09:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे.
09:43 या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:48 हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale, Ranjana